अपघात कसे टाळता येतील निबंध मराठी
अपघात कसे टाळता येतील निबंध मराठी

अपघात कसे टाळता येतील निबंध मराठी

हल्ली नेहमी अपघाताच्या बातम्या ऐकायला मिळतात. अपघातांमध्ये माणसाला पाण्यापणा होतात. कधी हातापायांची हाडे मोडतात. कधी डोके फुटते. कधी मोठी जखम होते आणि खूप रक्त वाहून जाते कधी कधी माणसे मृत्युमुखीही पसतात. हे अपधात आपण टाळू शकत नाही का?

आपण अपघात नक्कीच टाळू शकतो. त्यासाठी आपण काही पथ्ये पाळली पाहिजेत. रस्त्याने चालताना रहदारीचे नियम पाळले पाहिजेत. अकारण वेगाने सायकल चालवू नये. गर्दीच्या ठिकाणी तर सायकल चालवूच नये.

पोहता येत नसेल, तर पाण्यात उतरू नये. अनोळख्या ठिकाणी तर पाण्यात उतरूच नये. झाडावर चढता येत नसेल, तर इतरांच्या मदतीशिवाय चढण्याचा प्रयत्न करू नये. विजेच्या उपकरणांची पूर्ण माहिती घेऊनच ती हाताळावीत.

म्हणजेच, आपण सगळीकडे नियमाने वागले पाहिजे. मग अपघात नक्कीच कमी होतील.

पुढे वाचा:

Leave a Reply