अस्वच्छता आणि प्रदूषण मराठी निबंध – Aswachata Ani Pradushan Essay in Marathi
आपल्या भारत देशाची जगात चांगल्या गोष्टींसाठी प्रसिद्धी आहे; तशीच ‘अस्वच्छ देश’ अशीही भारताची कुप्रसिद्धी आहे… आणि ती खरी आहे. आपण वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देतो; पण सार्वजनिक स्वच्छतेकडे कळत-नकळत दुर्लक्ष करतो. त्यामुळे प्रदूषणाचा धोका आपल्यावर ओढवून घेतो.
हवा, पाणी, जमीन या आपल्याला निसर्गाकडून मिळणाऱ्या गोष्टी आहेत; पण आपल्याला त्याचे मोल कळत नाही. गावातील लोक घरातील घाणेरडे पाणी नदीत सोडून नदीचे पाणी दूषित करतात. कारखान्यांच्या व वाहनांच्या धुरामुळे सर्व हवा दूषित होते. प्रदूषण वाढते. जमिनीची होणारी धूप, वाढणारा नापीकपणा शेतकरीही लक्षात घेत नाही.
अफाट लोकसंख्या ही भारताची एक मोठी समस्या आहे. लोकसंख्या वाढली की, कचऱ्याचा साठाही वाढतो. त्यात सर्वांत जास्त घातक असा प्लॅस्टिकचा कचरा! तो कशाही प्रकारे नष्ट करता येत नाही. मग या कचऱ्याचे काय करायचे? कचऱ्यामुळे फार मोठे प्रदूषण होते. रोगराई वाढते. पण माणसे या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. सुंदर पर्यटनक्षेत्रेही आपण गलिच्छ करतो. हा माणूस कोठेही धुंकतो, घाण करतो. या सर्व चुकीच्या वागण्यामुळे प्रदूषण वाढतच जाते. तेव्हा आपण आता प्रदूषण रोखण्याचा निश्चय करू या.
पुढे वाचा:
- ध्वनि प्रदूषण मराठी माहिती
- मृदा प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती
- हवा प्रदूषण मराठी माहिती
- जल प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती
- रस्त्यावरील अपघात मराठी निबंध
- अशी झाली माझी फजिती मराठी निबंध
- अशी झाली चांदण्यातील सहल निबंध मराठी
- अवचित मिळालेला मोकळा तास मराठी निबंध
- रस्त्यावरील अपघात मराठी निबंध
- मी पाहिलेला अपघात निबंध
- अपघात कसे टाळता येतील निबंध मराठी
- अन्न हे पूर्णब्रह्म निबंध मराठी
- अनाथालयास भेट निबंध मराठी
- अंधश्रद्धेचा बळी समाज निबंध मराठी
- अंधश्रद्धा निबंध मराठी
- अंतराळ संशोधन निबंध मराठी