गुलाबाच्या फुलाची आत्मकथा – Gulabachya Fula Chi Atmakatha

शाळेतून परत येताना रस्त्यातील कचराकुंडीत समोरच एक सुंदर नुकतेच उमलेले फूल दिसले. ते उचलण्यासाठी हात पुढे केला तर ते फूलचं माझ्याशी बोलू लागले.

‘काय ग! मला इथे पाहून आश्चर्य वाटले ना, पण तुझ्या सारख्याच एका मुलीने मला झाडावरुन तोडले आणि नंतर निर्दयपणे मला रस्त्यात फेकून दिले. तिथून सर्वांच्या लाथा खात-खात या कचराकुंडीत येऊन पडलो. मी फुलांचा राजा गुलाब आहे. पण बघ, माझी काय अवस्था झाली आहे!

माझा जन्म याच बागेत झाला. दोन दिवसांपूर्वी मी या काटेरी कोमल फांद्यांवर माझ्या भाऊ बहिणींबरोबर डोलत होतो. सुरुवातीला एक छोटीशी कळी असलेला मी एक पूर्ण विकसित गुलाबाचे फूल बनलो. माझ्या सुगंधामुळे मधमाशा माझ्याकडे आकर्षिल्या गेल्या आणि माझ्याभोवती घिरट्या घालू लागल्या. भुंग्यांना मी माझे परागकण दिले. दवबिंदूनी मला स्नान घातले. हवेच्या झोतांनी माझे तोंड पुसले. सूर्यप्रकाशात उमलणे शिकलो.

वसंत ऋतूत तर माझी शोभा पाहत राहावे अशी असते. चहूकडे गुलाब फुललेले असतात. याखेरीज बागेत उमललेल्या माझ्या मित्र मैत्रिणी चाफा, चमेली, जुई, सूर्यफूल, रातराणीला पण बहार येतो. आम्ही सारे मिळून बागेत येणाऱ्या लहान थोरांचे लक्ष आकर्जून घेतो. मला तोडण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला माझे काटे बोचतात.

आम्ही आपल्या सुगंधाने वातावरण सुंगधित करतो. त्याशिवाय माझे इतरही अनेक फायदे आहेत. माझ्यापासून गुलाब पाणी आणि अत्तरे बनवितात. त्याचा सौंदर्य प्रसाधनांत उपयोग करतात. माझ्या फुलांचा औषधी गुलकंद पण तयार करतात. पण मानव फार कठोर आहे. मी कोमेजलो असे पाहताच हे दुष्ट लोक मला फेकून देतात. सफाई कामगार येतो, मला उचलून कचरा कुंडीत टाकतो. ‘गरज सरो वैद्य मरो’ अशी त्याची वृत्ती आहे. माझ्या बाबतीतही आज हेच घडले. फुलाला पुढे बोलवेना.

मला खूप वाईट वाटले. मी ते फूल उचलले व माझ्या अभ्यासाच्या टेबलवर फुलदाणीत ठेवले. सुकल्यानंतरही मी ते फूल फेकले नाही. माझ्या पुस्तकांत जपून ठेवले.

गुलाबाच्या फुलाची आत्मकथा

पुढे वाचा:

Leave a Reply