LPG Gas Information in Marathi : आपण सर्वच बॉम्बला घाबरतो. परंतु आपल्या प्रत्येकाच्या घरात एक बॉम्ब आहे. एक अतिशय पोटेन्शियल बॉम्ब. तो म्हणजे घराघरात वापरला जाणारा एलपीजी सिलिंडर.

घरगुती एलपीजी गॅस आणि सुरक्षा – LPG Gas Information in Marathi

LPG Gas Information in Marathi, घरगुती एलपीजी गॅस आणि सुरक्षा
LPG Gas Information in Marathi, घरगुती एलपीजी गॅस आणि सुरक्षा

एलपीजी गॅस मध्ये कोणता वायू असतो

लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजेच एलपीजी. या गॅस मध्ये ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे दोन वायू मिश्र स्वरूपात असतात. पेट्रोलियम रिफायनरी मध्ये हे वायू तयार होतात. आपल्या घरी येणाऱ्या सिलिंडर मध्ये हे वायू कंप्रेस करून भरलेले असतात. कम्प्रेस्ड स्वरूपात असल्यामुळे ते स्टेबल राहतात. एक लिटर कम्प्रेस्ड गॅसचे पूर्ण गॅसमध्ये रूपांतर केल्यास साधारण 270 लिटर गॅस इतके आकारमान व्यापणारा वायू तयार होतो… विचार करा हा गॅस किती भयंकर आहे !

एक घटना

एक स्त्री बाजारात जाताना दूध शेगडीवर उकळण्यासाठी ठेवून विसरून तशीच निघून गेली. दूध उतू जाऊन ज्योतीवर सांडले आणि ज्योत विझली. परंतु शेगडीचे बटन चालू असल्यामुळे गॅस लीक होत राहिला. दारे खिडक्या बंद असल्यामुळे गॅस पूर्ण घरात भरून गेला. वासाने शेजारी गोळा झाले. ती परत आली तेव्हा तिने गर्दी पाहिली. आपली चूक तिच्या लक्षात आल. तिने विलंब न करता दरवाजा उघडला. तिच्यामागून आणखी दोन स्त्रिया घरात शिरल्या. तिने चटकन किचनमध्ये जाऊन लाईट लावला.. क्षणात मोठा भडका उडून तिघीही भाजल्या. कुणालाही वाचवता आले नाही.

म्हणूनच मी सुरवातीला म्हटले, आपल्या घरात एक बॉम्ब आहे ! परंतु काही गोष्टींची काळजी घेतली तर एलपीजी वापरणे अजिबात धोकादायक नाही.

गॅस सिलिंडर घेताना घ्यायची काळजी

गॅस सिलिंडर घेताना घ्यायची काळजी
गॅस सिलिंडर घेताना घ्यायची काळजी

सिलिंडरच्या रिंगवर सिलिंडरची तपासणी तारीख लिहिलेली असते. ती पाहून घ्या. सील तोडून सेफ्टी कॅप काढून हाताची करंगळी सिलिंडरच्या तोंडात घालून आत व्हॉल्व आहे की नाही हे पहा. असायला हवा. तुम्हाला जमत नसल्यास कर्मचाऱ्याला तपासण्यास सांगा. पुन्हा सेफ्टी कॅप लावूनच ठेवा.

सिलिंडर जोडताना घ्यायची काळजी

सिलिंडर जोडताना घ्यायची काळजी
सिलिंडर जोडताना घ्यायची काळजी

शेगडीची दोन्ही बटणे बंद करा. खिडक्या उघडून ठेवा. रेग्युलेटरचे बटण बंद करा. रेग्युलेटर रिकाम्या सिलिंडरवरून काढून घ्या. रिकाम्या सिलिंडरची सेफ्टी कॅप बंद करा. नव्या सिलिंडरची सेफ्टी कॅप काढून रेग्युलेटर बसवा. तो नीट बसल्याची खात्री झाल्यावर मगच रेग्युलेटर चालू करा. गॅस लिकेज असेल तर आवाज आणि वास येईल. गॅस लीक नसल्याची खात्री झाल्यानंतर शेगडीची बटणे चालू करू शकता.

गॅस लीक झाल्यास काय करावे

गॅस लीक झाल्यास काय करावे
गॅस लीक झाल्यास काय करावे

सर्वात महत्वाची गोष्ट ! चुकूनही कुठल्याही विजेच्या बटणाला हात लावू नका ! मोबाईल वापरू नका. रेग्युलेटर चे बटण बंद करून रेग्युलेटर काढून टाका. आणि सेफ्टी कॅप बसवा. त्या लहानशा पांढऱ्या कॅपला कमी लेखू नका… सिलिंडरचा व्हॉल्व तुटून पूर्ण 14 किलो गॅस बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल तरीही ते सेफ्टी कॅप कंट्रोल करते. कारण त्याची कमाल मर्यादा 45 किलो आहे. त्यानंतर ताबडतोब इमर्जन्सी नंबरवर फोन करून मेकॅनिक ला बोलवा. बिचारे रात्रीअपरात्री सुद्धा धावत येतात ! ते येईपर्यंत खिडक्या दरवाजे उघडून ठेवा. साठलेला गॅस निघून जाईल.

गॅस लीक होऊच नये म्हणून काय करावे

गॅस पाईप योग्य वेळी बदलत राहा. चुकूनही गॅस शेगडी चालू ठेवून कुठे जाऊ नका. दिवसभर घरात कुणी नसेल तर सकाळी घराबाहेर पडताना रेग्युलेटर बंद करा. जास्त दिवसांच्या सुट्टीवर जाताना रेग्युलेटर काढून सेफ्टी कॅप लावून ठेवा. आणि रात्री झोपतानाही रेग्युलेटर बंद करूनच झोपा.

गॅसचा वास कसा असतो

एलपीजीला रंग आणि वास नसतो ! परंतु हे घातक रसायन हवेत असल्यास चटकन ओळखता यावे यासाठी यात खास सल्फरयुक्त दुर्गंधी रसायन मिसळले जाते… सल्फरचा गुणधर्म असा आहे की तो जितक्या प्रमाणात हवेत असतो त्याच्या दहापट जास्त वास पसरवतो !

तर असा हा एलपीजी अत्यंत उपयुक्त आणि तितकाच घातक. म्हणूनच प्रत्येकाने तो वापरताना काळजी घ्यायलाच हवी !

अजून वाचा: आपल्या घरात धूळ कशी कमी करावी

पॅंटी खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या

मग जुने फर्निचरदेखील दिसेल नवीन | जुने फर्निचर नवीन करण्यासाठी टिप्स

आगीपासून वाचण्याचे उपाय | आगीपासून सुरक्षा

कापणे आणि भाजणे यासाठी प्रथमोपचार

Leave a Reply