मॅरेथॉन शर्यत माहिती, मॅरेथॉन स्पर्धेचे अधिकृत अंतर किती असते
मॅरेथॉन शर्यत माहिती, मॅरेथॉन स्पर्धेचे अधिकृत अंतर किती असते

मॅरेथॉन शर्यत माहिती – मॅरेथॉन स्पर्धेचे अधिकृत अंतर किती असते?

मॅरेथॉन शर्यत (Marathon Race)

१) मॅरेथॉन शर्यत पूर्ण करण्यासाठी स्पर्धकाला ४२१९५ मी. (२६ मैल ३८५ यार्ड) अंतर धावावे लागते. मॅरेथॉन स्पर्धेचे अधिकृत अंतर ४२,१९५ मीटर असते.

२) शर्यत चांगल्या रस्त्यावर घ्यावी. शर्यतीच्या वेळी रस्त्यावर अवजड वाहनांची वाहतूक नसावी. स्पर्धकांना सुरक्षिततेची हमी मिळाली पाहिजे.

३) धावण्याच्या मार्गावर किलोमीटर व मैलामध्ये अंतराची कल्पना देणारे फलक लावावेत.

४) धावण्याच्या मार्गावर प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर स्पर्धा समितीने स्पर्धकांसाठी उपाहाराची सोय करावी. उपाहाराच्या दोन केंद्रांच्या मध्ये स्पंजिंगची (Sponging) सोय करावी. त्या ठिकाणी फक्त पाणी उपलब्ध असेल.

५) उपाहार केंद्रावर उपाहार सहज उपलब्ध होईल असा ठेवावा अगर स्पर्धकाच्या हातात द्यावा. अधिकृत उपाहार केंद्राशिवाय स्पर्धकाने उपाहार घेतल्यास तो स्पर्धक बाद होण्यास पात्र ठरतो.

६) शर्यत सुरू असताना अधिकृत डॉक्टरने स्पर्धकाला शर्यत सोडण्याचा सल्ला दिला‚ तर स्पर्धकाने शर्यत सोडली पाहिजे.

७) मॅरेथॉन शर्यतीचा आरंभ व शेवट ट्रॅकवरच व्हावा.

VIDEO: What is Marathon? मॅरेथॉन शर्यत माहिती

पुढे वाचा:

Leave a Reply