Soil Pollution in Marathi : नमस्कार मित्रांनो, आमच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे, आज आपण जाणून घेणार आहोत मृदा प्रदूषण म्हणजे काय, मृदा प्रदूषण माहिती मराठी, मृदा प्रदूषणाची कारणे आणि मृदा प्रदूषणाचे परिणाम आणि माती प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी उपाय.

नैसर्गिक आणि मानवी कारणांमुळे मातीची गुणवत्ता कमी होण्याला मृदा प्रदूषण म्हणतात. माती ही पृथ्वीच्या वरच्या पृष्ठभागावर पसरलेली संसाधने आहे ज्यामध्ये सेंद्रिय आणि अजैविक पदार्थांचे मिश्रण आढळते.

मृदा प्रदूषण-Soil Pollution
मृदा प्रदूषण, Soil Pollution

मृदा प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती – Soil Pollution in Marathi

जमिनीवर नैसर्गिक घटक (नद्या, सरोवरे, पिके, वनस्पती, जलाशय, खनिज क्षेत्र इत्यादी) व सांस्कृतिक घटक (इमारती, मंदिरे, कार्यालये, रस्ते, वस्त्या, लोहमार्ग, उद्योगधंदे, धरण प्रकल्प इ.) आढळतात.

काही जमीन शेती, वनस्पतीसाठी उपयोगी पडते, तर काही जमिनीवर पावसाअभावी वाळवंटे आहेत. काही भाग डोंगराळ आहेत.

शेती वनस्पतीच्या दृष्टीने ‘मृदा’, ‘भूमी’ महत्त्वाची असते. या मृदेला आर्द्रतेचा पुरवठा झाला की, ती वनस्पतींच्या वाढीला उपयुक्त बनते. मृदेपासून विटा, मातीची भांडी तयार करतात. इमारतीसाठी मातीचा (मृदेचा) उपयोग होतो.

‘मृदा’ म्हणजे जमीन. योग्य हवामान उपलब्ध असले तर ही खनिज घटकयुक्त मृदा पिकांच्या व वनस्पतींच्या वाढीला उपयुक्त असते. विशेषत: तापमान व आर्द्रता (पाऊस) हे दोन घटक मृदेच्या रचनेवर व उत्पादकतेवर परिणाम करतात. भूपृष्ठावरील खडकांची झीज होऊन त्यापासून मृदा’ निर्माण होते. त्यामुळे मूळ खडकातील गुणधर्म हे मृदेमध्ये आढळतात. मृदा सुपीक व नापीक असते.

वाळवंटात पाण्याअभावी मृदा नापीक बनत; शिवाय मृदेचा पीकउत्पादनासाठी वापर करताना अति पाणी व अतिरासायनिक खते दिल्याने ती नापीक बनते. बर्फाने आच्छादलेल्या थंड हिम क्षेत्रात शेती करता येत नाही.

सेंद्रिय खनिज गुणधर्माची मृदा सुपीक असते. मृदेच्या निर्मितीस हजारो वर्षांचा काळ लागतो.

मृदा प्रदूषण व्याख्या

जमिनी/मातीमध्ये विविध प्रकारच्या विषारी रासायनिक द्रव्यांचे आक्रमण होणे म्हणजे मृदा किंवा भूमी प्रदूषण होय.

भूमीच्या/मृदेच्या जैविक, रासायनिक, भौतिक गुणधर्मात अनावश्यक परिवर्तन किंवा अमर्याद वाढ झाल्याने सजीवांचे जगणे अवघड होते. त्या मृदेचे नैसर्गिक गुणधर्म व उपयोग नष्ट होतात. जमीन नापीक व निरुपयोगी बनते. त्यालाच मृदाप्रदूषण म्हणतात.

मृदा प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती-Soil Pollution in Marathi
मृदा प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती, Soil Pollution in Marathi

मृदा प्रदूषण कारणे

मृदा प्रदूषण-Soil Pollution (1)
मृदा प्रदूषण, Soil Pollution

१) रासायनिक खते व कीटकनाशके यांचा अतिवापर

कोणत्याही पिकाच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम हे तीन महत्त्वाचे घटक आवश्यक आहेत.

घटक घटकप्राप्तीसाठी वापरली जाणारी काही रासायनिक खते नायट्रोजन अमोनियम सल्फेट, अमोनियम नायट्रेट, अमोनियम क्लोराइड युरिया, NPK 20 : 20, 0 : 18, 18 : 18. फॉस्फरस सिंगल व ट्रिपल सुपर फॉस्फेटस्, डाय अमोनियम फॉस्फेट इ. पोटॅशियम पोटॅशियम नायट्रेट, पोर्टेश इ.

कोणत्याही पिकाच्या वाढीसाठी रासायनिक खते वापरली जातात, जेव्हा या रासायनिक खतांचे प्रमाण अती होते, तेव्हा जमिनी/मृदेचा पोत खालावतो, पिकांना आवश्यक असलेले मातीतील जीवजंतू मरून जातात. पिकांना पाणी देताना हे जास्ती झालेले विषारी द्रवपदार्थ पाण्यात मिसळतात व उताराने वाहून जाताना नद्या, ओढे वा तलावांना जाऊन मिळतात.

भारतात उसाच्या पिकाला अतिपाणी व अतिरासायनिक खते वापरल्याने त्या जमिनीकडक, नापीक वखारवट बनत चालल्या आहेत.

शेतात पिकांवरील कीड नष्ट करण्यासाठी, तसेच पिकांचे मातीतून मिळणारे अन्न नष्ट व फस्त करणारे गवत, हरळी यांच्यासाठी रासायनिक कीटकनाशके, तृणनाशके वापरली जातात. त्यात डी.डी.टी., एन्ड्रीन, बगमार, रोगोर ही BHC, 24D, M.45 कीटकनाशके माती, हवा, पाणी यांचे प्रदूषण वाढवीत असतात.

शेतीचे व्यापारीकरण होताना रासायनिक खते व कीटक-जंतुनाशके ही जास्त उत्पन्नासाठी वापरतात; तात्पुरते जास्त उत्पादन मिळते, पण त्याने मातीतील कस निघून जातो. पिकांची वाढ खुंटते.

कीटकनाशकातील टाकाऊ घटकांमधून हायड्रोजन सल्फाइड (H2S) व सल्फरडाय ऑक्साइड (SO2) हे वायूतयार होऊन जमिनीतून दुर्गंधी येते. नायट्रोजन खतांचा जास्त वापर केल्याने अनेक पिकांमध्ये पोटॅशियमचा अभाव निर्माण होतो.

२) कचरा

कचरा म्हणजे टाकाऊ पदार्थ होय. घरे, कारखाने, वस्त्या, रस्ते, कार्यालये, उद्योगधंदे, सार्वजनिक कार्यालये अशा ठिकाणी कागद, पालेभाज्या व वाया गेलेले पदार्थ, प्लॅस्टिकचा कचरा, घाण पदार्थ, केर, टाकाऊ अन्नपदार्थ, कारखाने व उद्योगातील त्याज्य वस्तू यांचे ढीग सर्वत्र आढळतात.

वाढत्या वस्त्या, वाढती शहरे, वाढते औद्योगिकीकरण, वाढती लोकसंख्या यांच्यामुळे कचऱ्याचे प्रमाण सतत वाढत असते. अनेक ठिकाणी कुजलेल्या, नासलेल्या पदार्थांच्या कचऱ्यांच्या ढिगामुळे परिसरात घाण वास पसरतो. या कचऱ्याच्या ढिगामध्ये अनेक ठिकाणी धातूची भांडी, वाहनांचे टाकून दिलेले , भाग, प्लॅस्टिकच्या वस्तू, काचेच्या वस्तूव कागद इ. चे प्रमाण जास्त असते.

कचऱ्याचे प्रकार

ओला कचरा : यात टाकाऊ पदार्थांत सुकलेला पालापाचोळा, पालेभाज्या, अन्नपदार्थ, मांस, वाया गेलेले अन्न, मलमूत्र यांचा समावेश होतो.

सुका कचरा : यात प्लॅस्टिकच्या पिशव्या, प्लॅस्टिकच्या विविध वस्तू, वर्तमानपत्रे, कागद, काचेच्या वस्तू व बाटल्या, पुठ्याच्या पेट्या, लाकडी वस्तू, अनेक धातू, अॅल्युमिनियमच्या फॉईल्स यांचा समावेश होतो. मातीच्या सुपीकतेवर कचऱ्याचा विपरीत परिणाम होतो.

कचरा हा वस्त्यांमधून गोळा करून कोठेतरी त्याचे ढीग केले जातात. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून खत निर्माण करतात. काही ठिकाणी – ओल्या कचऱ्यापासून गॅस निर्माण करतात, सुका कचरा हा जाळून टाकतात. सुक्या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिकचे पदार्थ, पिशव्या, प्लॅस्टिकच्या काचा यांचे विघटन होत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी जमिनीवर कचरा साचलेला किंवा पाण्यावर तरंगत असलेला दिसतो, तो नष्ट होत नाही.

कचरा जाळून टाकल्याने त्याचा आकार 90 टक्क्यांनी कमी होतो व त्याचे वजन 75 टक्क्यांनी घटते.

पुण्या-मुंबईसारख्या ठिकाणी कचऱ्यांचे मोठे ढीग आढळतात. त्यांची दुर्गंधी पसरत असते.

प्लॅस्टिक कचऱ्याचे शेतजमिनीवर आच्छादन निर्माण झाल्यास मृदेला सूर्याची पुरेशी उष्णता मिळू शकत नाही; तसेच पावसाळ्यात पेरलेल्या बीजांना अंकुर फुटण्यास अडथळे निर्माण होतात, समुद्राच्या पाण्यावर तरंगणाऱ्या प्लॅस्टिक कचऱ्यामुळे जलचक्राला अडथळे निर्माण होतात.

३) सिंचन पद्धती व मशागत पद्धती

शेतातील पिकांना विशेषत: नगदी, बागायती व व्यापारी पिकांना आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी दिल्याने, (अतिजलसिंचन) जमिनीच्या खालच्या थरातील क्षार वरच्या थरात केशाकर्षण पद्धतीने जमा होऊन मृदाखारट, कडक व नापीक होते. शेतीतील मशागतीत नांगरणी, कुळवणी, पेरणी इत्यादी प्रक्रिया उताराला अनुसरून केल्याने पावसाच्या पाण्याबरोबर उतारावरील शेतात वाहून मातीतील सुपीक द्रव्ये इतरत्र नेऊन टाकली जातात वजमीन नापीक बनते.

४) वृक्षतोड

भूपृष्ठावर जमिनीवर वृक्षांचे आच्छादन असल्यास मृदा सुपीक, आर्द्रतायुक्त व ओलसर राहते. वृक्षतोड केल्याने मात्र जमिनी उघड्या पडतात व झीज होते, हीच मृदेची धूप होय, त्यामुळे मृदा नापीक बनते. वृक्षतोड, महापूर, जलप्रवाह यांच्यामुळे सुपीक मृदेचे थर नष्ट होऊन मूळ कठीण खडकाचा भाग उघडा पडतो. जास्त पाऊस व जास्त उतार असेल तर मृदेची धूप लवकर घडून.

५) खाणकाम

खाणीतून बाहेर काढलेला टाकाऊ मुरूम व दगडांचा ढीग हा सुपीक मृदेवर पसरला तर उत्पादक सुपीक मातीचा थर झाकला जातो; त्याचा उपयोग करता येत नाही.


मृदा प्रदूषणाचे परिणाम

मृदा प्रदूषण-Soil Pollution (2)
मृदा प्रदूषण, Soil Pollution
 1. जमिनीवरील कचऱ्यात टाकाऊ पदार्थ साठतात. त्यातून दुर्गंधी, दलदल व घाण पसरते. डास, घुशी, उंदीर यांची संख्या वाढते. कचऱ्यात कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या व वस्तू, पालापाचोळा, स्वयंपाकातील टाकाऊ अन्नपदार्थ, कुजलेल्या पालेभाज्या, फळे अशा विविध वस्तूंचे ढीग असतात. कचऱ्यामुळे रोगराई पसरते.
 2. रासायनिक खते व जंतुनाशके पिकांसाठी वापरताना त्यांचे मातीत अतिमिश्रण होते. त्यातून माती दूषित होते व मातीची उत्पादनक्षमता घटते. कीटकनाशकातील टाकाऊ कचऱ्यातून सल्फरडाय ऑक्साइड (SO2) व हायड्रोजन सल्फाइड (H2S) हे वायू निर्माण होऊन मृदेला दुर्गंधी येते.
 3. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मातीची / मृदेची नैसर्गिक नायट्रोजन मिळवण्याची प्रक्रिया कमी कमी होते व ती नापीक होते.
 4. मृदाप्रदूषणामुळे पारा, शिसे, अर्सेनिक दूषितके मातीत मिसळतात; त्यामुळे मातीतील सूक्ष्म जीव मरून जातात. त्यात विषारी घटक जास्त प्रमाणात असतात. वनस्पतींची वाढ होत नाही. हे विषारी पदार्थ मानवी शरीरात प्रवेशतात व त्यातून विषबाधा होते. वनस्पतींची रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन कीड लागते.ही प्रदूषके मानवी शरीरात प्रवेश करतात, त्यातून कर्करोग, कावीळ, पटकी, कॉलरा, त्वचेचे आजार बळावतात.
 5. मृदाप्रदूषण भागातून जी पिके व गवत उगवून येते, त्यांच्या आहारातून विषारी द्रव्ये पोटात गेल्याने अनेक पक्षी व प्राणी मृत पावतात. त्यांना वेगवेगळे रोग होतात.
 6. मृदाप्रदूषणामुळे पीक-उत्पादन घटल्याने ‘अन्न’ प्रश्न निर्माण होतो. 7. मृदा, पाणी व हवा प्रदूषणातून परिसंस्थेतील अन्नसाखळीत अडथळे येतात.
 7. धूप होऊन जमीन कोरडी, नापीकव ओसाडबनते. तापमान वाढते. 10.हानीकारक किरणोत्सारी पदार्थ हे जलचरवजमिनीवरील वनस्पतींद्वारे मानवी शरीरात प्रवेशतात. त्यात कार्बन, लोह, मँगेनीज, कोबाल्ट, झिंक इ. चा समावेश होऊन रोग पसरतात.

मृदा प्रदूषण उपाय

 1. कारखान्यातील टाकाऊ पदार्थ, रासायनिक घटक, कचरा तसेच रस्त्यावरील टाकाऊ पदार्थ हे एकत्र करून स्वतंत्रपणे साठवावेत. त्या कचऱ्यात घन कचरा, ओला कचरा (नासके पदार्थ, फळभाज्या, मांस इ.) अविघटनशील पदार्थ (प्लॅस्टिक वस्तू व प्लॅस्टिक पिशव्या, रबरी वस्तू), विषारी पदार्थ यांचे वर्गीकरण करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी किंवा त्यावर प्रक्रिया करून इतर उपयुक्त वस्तूंची निर्मिती करावी.
 2. दवाखान्यातील टाकून दिलेला कचरा, विषारी द्रव्ये, रक्तांचे, मांसाचे रोगट भाग, इंजेक्शनच्या वापरलेल्या सुया व इतर कचऱ्यांचे उच्च तापमानात ज्वलन करून त्याची राख खोल खड्च्यात साठवावी.
 3. शेतातील वघरातील कचराहा सेंद्रिय खत तयार करण्यास वापरावा. 4.रासायनिक खतांऐवजी जैव खते, नैसर्गिक खते वापरावीत. त्यात गांडूळ खत, कंपोस्ट खत, जीवाणू खते उपयुक्त असतात.
 4. मृदेची/जमिनीची धूप थांबविण्यासाठी योग्य पद्धतीने पाणी अडवा पाणी जिरवा’ योजना आखाव्यात. ताली बांधणे, बांध घालणे, बंधारे व धरणे बांधणे, चर करणे, वनस्पतींची लागवड करणे आवश्यक आहे. पाझर तलाव बांधावेत, उताराला आडव्या दिशेने ताली घालाव्यात.
 5. प्लॅस्टिक, काच, कागद, रबर, धातूयांचा पुनर्वापर करावा.
 6. पावसापासून जमिनीचा वरचा थर सुपीक राहावा म्हणून जमिनीवर पालापाचोळ्याचे व वनस्पतींचे आच्छादन निर्माण करावे, गवताळ कुरणांवर चराईबंदी’ वजंगलभागात ‘कु-हाडबंदी करावी.
 7. शेतातील पिके आलटून-पालटून घेताना कस वाढेल, अशी पिके घ्यावीत. तसेच शेतीवर आधारित मेषपालन, कुक्कुटपालन तसेच फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापन करावेत.
 8. पिकांना पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे. शेताला अतिपाणी देऊन ते वाया घालवू नये, एकपिकी शेतीऐवजी मिश्रपीकशेती घ्यावी. जमिनीच्या वापराचे नियोजन करावे.
 9. शेतीची मशागत ही उताराच्या दिशेने करू नये. नांगरणी, पेरणी आडव्या दिशेने करावी.
 10. पावसाचे पाणी जमिनीत साठून मुरावे म्हणून जमिनीवर वृक्षांची लागवड करावी. डोंगरउतारावर झुडपे, वनस्पतींची लागवड वजोपासना करावी.
 11. शेतकऱ्यांना मृदेच्या संरक्षणातील उपायांची माहितीद्यावी.
 12. टाकाऊ पदार्थ, कचरा यांच्यावर प्रक्रिया करून त्यापासून ऊर्जा, गॅस तसेचखतनिर्मिती करावी.
 13. कचऱ्याचे भस्मीकरण करून त्यापासून वीज तयार करावी.
 14. कचऱ्यापासून बायोगॅस निर्माण करावा. त्याची वीज उपयोगी पडते.
 15. मृदा संवर्धनार्थ जनजागृती करावी.

मृदा प्रदूषण निष्कर्ष

मातीचे प्रदूषण आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक आहे कारण विषारी रसायने अन्न साखळीतून शरीरात प्रवेश करतात आणि संपूर्ण शरीराच्या अंतर्गत प्रणालीला त्रास देतात. मातीचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि प्रतिबंधित करण्यासाठी पर्यावरण संरक्षण कायद्यांसह सर्व प्रभावी नियंत्रण उपायांचे पालन लोक विशेषतः उद्योगपतींनी केले पाहिजे. घनकचऱ्याचा पुनर्वापर आणि शक्य तितक्या लोकांमध्ये वृक्ष लागवडीलाही प्रोत्साहन दिले पाहिजे.

वरील लेख मृदा प्रदूषण प्रस्तावना मराठी माहिती वाचून आपल्याला मृदा प्रदूषणाची कारणे, मृदा प्रदूषणाचे उपाय आणि मृदा प्रदूषणाचे परिणाम या लेखातून आपल्याला समजले असेलच. Soil Pollution in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक व्हाट्सअँप आणि विविध सोशियल मीडियावर शेअर करा. तसेच Information About Soil Pollution in Marathi हा लेख कसा वाटला व अजून मृदा प्रदूषण बद्दल काही माहिती पाहिजे असेल तर आपण Comments द्वारे कळवा.

Soil Pollution in Marathi या आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला Comment Box आणि Email लिहून कळवावे, तुम्ही दिलेली मृदा प्रदूषण मराठी माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या www.marathime.com ला.

मृदा प्रदूषण मराठी माहिती

पुढे वाचा:

मृदा प्रदूषणावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न

माती कशी प्रदूषित होते?

मातीचे प्रदूषण तेव्हा होते जेव्हा मानव प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मातीमध्ये हानिकारक पदार्थ, रसायने किंवा वस्तू वापरतो ज्यामुळे इतर सजीवांचे नुकसान होते किंवा माती किंवा पाण्याची परिसंस्था नष्ट होते.

माती दूषित होण्याचे कारण काय आहेत?

शेतीमध्ये खते, रसायने आणि कीटकनाशकांचा अतिवापर. औद्योगिक युनिट्स, खाणी आणि खाणींद्वारे निर्माण होणाऱ्या घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे. इमारती, रस्ते इत्यादींच्या बांधकामात घनकचरा सोडणे.

खतांच्या अतिवापरामुळे कोणते प्रदूषण होते?

माती प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण

कोरडा खोकला का येतो | Korda Khokla Ka Yeto

रात्री खोकला का येतो | Ratri Khokla Ka Yeto

सर्दी खोकला घरगुती उपाय | Sardi Khokla Gharguti Upay

खोकला घरगुती उपाय मराठी | Khokla Gharguti Upay in Marathi

खोकला किती दिवस राहतो | Khokla Kiti Divas Rahato

लहान मुलांना ताप किती असावा? | Lahan Mulancha Tap Kiti Asava

भारतीय संविधानात किती कलमे आहेत 2024?

शिवाजी महाराज किती वर्षे जगले?

गरोदर आहे हे किती दिवसात कळते?

घेवडा लागवड माहिती | Ghevda Lagwad Mahiti

Leave a Reply