आगीपासून वाचण्याचे उपाय : हा विषय मला हवा तितका वाढवता येईल. निरनिराळ्या पद्धतीचे अग्निशामक, त्यातील रसायने, त्यांची कार्यपद्धती, यावर वाट्टेल तितके लिहिता येईल. तसेच, आग लागण्याच्या कारणांविषयी लिहायचे झाल्यास दोन स्वतंत्र लेख होतील. परंतु सर्वसामान्य लोकांसाठी जितके आवश्यक आहे तितकेच मांडण्याचा माझा प्रयत्न राहील. आग लागण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते. आगीचा स्त्रोत, इंधन आणि ऑक्सिजन. या गोष्टी एकत्रितपणे एका जागी असतील तरच आग लागते. त्यामुळे आग विझवण्याच्या पद्धतींमध्ये यांपैकी एकाचा संपर्क आगीशी तोडण्याचे काम केले जाते. सर्वसामान्यपणे सर्वच अग्निशामक यंत्रे हवेचा संपर्क आगीपासून तोडण्याचे काम करतात.
आगीपासून वाचण्याचे उपाय – आगीपासून सुरक्षा
Table of Contents
१) स्थायू पदार्थांची आग
हि आग फार वेगाने पसरत नाही. एकाच जागी पेटत राहते. कागद, पालापाचोळा, कपडे किंवा कोणत्याही घन पदार्थाला लागलेली आग तो पदार्थ जोपर्यंत जळून पूर्ण संपत नाही तोपर्यंत पेटत राहते. धोका टाळण्यासाठी अशी आग साध्या पाण्याने विझवता येते. पाण्यामुळे हवेचा आगीशी संपर्क तुटतो. आणि तापमानही कमी होते. त्यामुळे आग विझते. अग्निशामक वापरायचा असल्यास तो ज्वाळांवर न फवारता, आगीचा बेस जिथे आहे तिथे पदार्थावर फवारल्यास आग सहज विझते.
२) द्रव पदार्थाची आग
ही आग द्रव जिथे पसरतो तिथे पसरत जाते. पाण्याने ही आग विझवता येत नाही. कारण पाणी द्रवाच्या सर्व भागावर पसरू शकत नाही. शिवाय अनेक द्रवपदार्थ हे पाण्यापेक्षा हलके असल्याने ते पाण्यावर अग्निशामक वापरला जातो. परंतु अग्निशामक नसल्यास कोरडी माती, किंवा कोरडी वाळू वापरता येते.
३) वायूंची आग
ही आग सर्वात भयंकर असते. कारण पेटल्यानंतर ती फार मोठ्या भागात ती भराभर पसरते. अशी आग पाण्याने किंवा मातीने विझवता येत नाही. लहान आकाराचे अग्निशामक सुद्धा अपुरे पडतात. अग्निशामक दलाला पाचारण करावे लागते. त्यामुळे मोठी आग विझवणे शक्य नसेल स्वतःचा बचाव करून निसटण्याचा प्रयत्न करणे उत्तम. सर्वात आधी जोरजोरात “आग आग” ओरडा. त्यामुळे इतर लोक सावध होतील. आग जळत असताना हवेत मोठ्या प्रमाणावर धूर साठतो. मार्ग दिसत नाही. श्वास कोंडतो. अशा वेळी जमिनीवर झोपून लहान मुलांप्रमाणे रांगत मोकळ्या जागी यावे. हवेत विषारी वायू असेल तर हवेच्या काटकोनाच्या दिशेत पाळावे. मार्गात आगीच्या ज्वाळा असतील तर अंगावर जाड घोंगडी घेऊन पाळावे. कपड्यांना आग लागलीच तर जमिनीवर रोलिंग करावे. आग विझते.
४) विद्युत आग
कोणत्याही विद्युत उपकरणामुळे, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यास, ती आग विझविण्याचा कोणताही प्रयत्न करण्याआधी प्रमुख वीजप्रवाह खंडित करावा. त्यानंतर ती आग साध्या पाण्यानेही विझू शकते. परंतु वीजप्रवाह खंडित न करता सर्किटवर पाणी ओतले तर आग आणखी भडकू शकते.
या सर्वव्यतिरिक्त प्रत्येकाने आपापल्या सोसायटीमध्ये असणाऱ्या अग्निशामक यंत्रांचा अभ्यास करावा. ती कशी वापरावीत याच्या सूचना त्यावर घरातील सर्वांना हे शिकवावे. इमारतीत होज पाईप आणि हायड्रॉलिक टॅक असतील तर किमान काही व्यक्तींना ते वापरण्याचे ट्रेनिंग असणे केव्हाही उत्तम.
अजून वाचा: घरगुती एलपीजी गॅस आणि सुरक्षा