आई थोर तुझे उपकार मराठी निबंध-Aai Thor Tujhe Upkar Essay in Marathi
आई थोर तुझे उपकार मराठी निबंध-Aai Thor Tujhe Upkar Essay in Marathi

Set 1: आई थोर तुझे उपकार मराठी निबंध – Aai Thor Tujhe Upkar Essay in Marathi

आई हे संपूर्ण जगातील थोर दैवत आहे. प्रभू रामचंद्रांना त्यांच्या आईने घडवले. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजामातेनेच मोठे केले. जगातील सर्व थोर माणसांवर त्यांच्या आईनेच संस्कार केले. म्हणून आईपेक्षा मोठे या जगात कोणीही नाही.

आपला जन्म होतो, तेव्हा आपण फक्त एक गोळा असतो. आपल्याला चालता येत नाही. बोलता येत नाही. आपल्याला काहीही करता येत नाही. त्या काळात आईच आपली काळजी घेते.

आईच आपल्याला मोठे करते. आई आपल्यावर चांगले संस्कार करते. आपण मोठे व्हावे म्हणून ती अहोरात्र धडपडते. आपल्यामध्ये जे जे चांगले आहे, ते ते आईमुळेच मिळालेले असते. म्हणूनच सर्वजण म्हणतात, “आई, थोर तुझे उपकार!” “

Set 1: आई थोर तुझे उपकार मराठी निबंध – Aai Thor Tujhe Upkar Essay in Marathi

आई ही व्यक्ती प्रत्येकच लहान मुलाची अत्यंत आवडती व्यक्ती असते. खरोखर ज्या मुलांना आई नसते किंवा असूनही तिचे प्रेम मिळतं नाही अशी मुले खरोखरच दुर्दैवी म्हणावी लागतील. म्हणूनच कवींनी आईवर पुष्कळ कविता केल्या आहेत. त्यातील काही कविता तर आम्हाला अभ्यासात सुद्धा होत्या. त्यापैकी दोन कविता माझ्या खास आवडीच्या आहेत. त्या म्हणजे ” नीज न ये तर गीत म्हणावे, अथवा झोके देत बसावे, कोण करी ते जीवेभावे- ती माझी आई” ही कविता, तसेच ‘प्रेमस्वरूप आई, वात्सल्यसिंधू आई ही कविता. ह्या दोन्ही कविता मी कधीकधी गुणगुणत असतो.

खरोखरच लहान मुलांना आई असणे केट्ढे भाग्याचे आहे. परंतु आपण कधीकधी आईवर रागावतो, चिडतो ते चुकीचे आहे. ज्या हतभागी मुलांना आई नसेल त्यांनाच आईची खरी किंमत कळत असेल असे मला वाटते.

वडील नसतील तर कदाचित लहान मुलांना पैशांची उणीव भासू शकेल पण आई नसेल तर त्यांच्या भावनांची उपासमार होईल. लहान वयात आपण पूर्णपणे आईवरच अवलंबून असतो. आई नसेल आणि दुसरे कुणी काळजी घ्यायला नसेल तर अगदी तान्हे बाळ तरजगूही शकणार नाही.

आई बाळाला नऊ महिने स्वतःच्या पोटात वाढवते, जन्मल्यावर त्याला स्तनपान देते त्यामुळेच बाळाचे आईशी खूप घट्ट आणि जवळचे नाते बनते. म्हणूनच संत तुकारामांनी एका अभंगात लिहिले आहे की

“चुकलिया माये, बाळ हुरहुरू पाहे, ॥ तैसे झाले माझ्या जीवा, केव्हा भेटसी केशवा”

माझी आई म्हणजे माझे सर्वस्व आहे असे मला वाटते. ती नोकरी करते परंतु संध्याकाळ झाली की आमच्या ओढीने घरी येते. ती आहे म्हणून आमचे घर आहे. ती आजीची काळजी घेते, बाबांकडे लक्ष देते, आम्हाला काही दुखले खुपले तर तीच बघते. त्यामुळे माझ्या आईच्या हातात जादूची कांडीच आहे असे मला वाटते. ती पुष्कळदा मला काहीतरी करायला सांगते ते मला पटत नाही. मग कधीकधी मी तिचे ऐकतही नाही. पण नंतर मला कळते की आईजे सांगत होती ते अगदी बरोबर होते.

लहानपणी आई नोकरीला गेल्यावर संध्याकाळ झाली की मी तिची खूप वाट पाहात राही.खरेतर आजी होती. पण तरीही आई बराच वेळ दिसली नाही की मी बेचैन होत असे. मग मी आमच्या इमारतीच्या पायरीवर जाऊन बसत असे. दूरवरून येणारी आईची मूर्ती दिसली की मला एवढा आनंद होत असे म्हणून सांगू.

खरोखर आजही मला किंवा ताईला ताप आला तर आई रजा घेते. तिने रजा घेतली की तिच्या असण्यानेच आमचा तापअर्धापळून जातो.

मी तिला कामात मदत करतो, भाजी किंवा दुकानातल्या वस्तू आणून देतो त्यामुळे आईला खूप बरे वाटते. तिला बरे वाटले की मलाही खूप बरे वाटते. अशी आहे माझी आई.

आई थोर तुझे उपकार मराठी निबंध – Aai Thor Tujhe Upkar Essay in Marathi

पुढे वाचा:

Leave a Reply