Chris Gayle Information in Marathi : क्रिस्टोफर हेन्री गेल वेस्ट इंडिजचा आघाडीचा अष्टपैलू क्रिकेटर आहे. क्रिसचा जन्म २१ सप्टेंबर १९७९ रोजी किंगस्टन, जमैका येथे झाला. क्रिस गेल युनिवर्स बॉस, हेन्री, गेल फोर्स, गेल स्टॉर्म ह्या टोपणनावांनी प्रसिद्ध आहे. डावखुरी फलंदाजी आणि उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करणारा गेल क्रिकेट विश्वातला दिग्गज समजला जातो.

क्रिस गेल माहिती मराठी, Chris Gayle Information in Marathi
क्रिस गेल माहिती मराठी, Chris Gayle Information in Marathi

क्रिस गेल माहिती मराठी – Chris Gayle Information in Marathi

नाव –क्रिस्टोफर हेन्री गेल
जन्म –२१ सितम्बर १९७९
जन्म ठिकाण –किंग्स्टन, जमैका
वडील –डडली गेल
आई –हेजल गेल
पत्नी –नताशा हेरिस
मुलगी –ब्लश
टी शर्ट नंबर –३३३
अचिव्हमेंट –आंतरराष्ट्रीय टी -२० मध्ये १०० षटकार ठोकणारा पहिला खेळाडू
राष्ट्रीयता –जमैका

क्रिकेटची सुरुवात आणि आंतरराष्ट्रीय पदार्पण

गेल ने क्रिकेटची सुरुवात किंगस्टन जमैका येथे लूकास क्रिकेट क्लबमधून केली. गेल म्हणतो, ‘लूकास क्रिकेट क्लब नसते तर कदाचित आज मी रस्त्यावर आलो असतो.’ लूकासची नर्सरी क्रिस गेल नर्सरी नावाने प्रसिद्ध आहे.

Childhood Photo of Chris Gayle
Childhood Photo of Chris Gayle

१९ वर्षाचा असताना वेस्ट इंडिजकडून ‘यूथ इंटरनॅशनल’ सामन्यामध्ये गेल पहिल्यांदा खेळला. १९९८ मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक दिवसीय सामन्यातून पदार्पण केले. त्यानंतर सहा महिन्यांनी गेल पहिला कसोटी सामना खेळला. सलामीला फलंदाजी करणारा गेल ‘विध्वंसक वादळ’ अशी बिरुदावली मिरवतो. अनेक सामन्यांमध्ये पहिल्या चेंडूपासून आक्रमक होऊन त्याने गोलंदाजांचे मानसिक खच्चीकरण केले आहे. २००१ मध्ये क्रिस गेलने डॅरेन गंगाच्या साथीने सलामी फलंदाजी करताना क्वीन्स स्पोर्टस् क्लब बूलावायो येथे २०१४ धावांचे भक्कम पाठबळ वेस्ट इंडिज संघाला दिले. त्यात १७५ धावा गेलच्या होत्या.

Chris Gayle Old Photo
Chris Gayle Old Photo

प्रगतीच्या शिखरावर

गेलच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात जरी धिम्या गतीने झाली असली तरी २००२ मध्ये त्याने वेग घेतला. वर्षाच्या अंतापर्यंत (नोव्हेंबर मध्ये) त्याने भारताविरुद्ध तीन शतके केली होती. एका कॅलेंडर वर्षात १००० धावा करणारा क्रिस गेल हा वेस्ट इंडिजचा तिसरा फलंदाज आहे. आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यांच्या इतिहासात १५० धावा तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा करणाऱ्या सहा खेळाडूंमध्ये क्रिस गेलचे नाव आहे. २००५ मध्ये चौथ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध क्रिस गेलने संघासाठी निर्णायक योगदान दिले. त्याने ३१७ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रथमच अशी अजस्त्र धावसंख्या रचली गेली होती.

Chris Gayle
Chris Gayle

ऑगस्ट २००५ मध्ये क्रिस गेल वॉरसेस्टरशायर संघाकडून आठ सामने खेळला. तिथेही त्याने धावांचा डोंगर उभारला. तीन प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २ अर्धशतके आणि 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये २ अर्धशतके केल्याने त्याला मॅन ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.

‘प्लेअर ऑफ द २००६ चॅम्पियन्स ट्रॉफी’ने क्रिस गेलला गौरवण्यात आले. गेलने ३ शतके करत ४७४ धावा नोंदवल्या आणि 8 बळीही घेतले. परंतु २००७ चा विश्वकप मात्र गेलसाठी निराशाजनक होता. मालिकेत फक्त एकाच सामन्यात ५८ चेंडू खेळत त्याने ७९धावा इंग्लंड विरुद्ध केल्या. २००७ च्या टी-२० विश्वचषकात पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ११७ धावांची सर्वोच्च संख्या क्रिस गेलने उभारली. क्रिसची ती खेळी म्हणजे आंतरराष्ट्रीय टी-२० मधील पहिली शतकी धावसंख्या होती; त्याचबरोबर क्रिकेटच्या तीनही आंतरराष्ट्रीय प्रकारांमध्ये शतक करणारा क्रिस गेल हा पहिला फलंदाज ठरला.

२००९ मध्ये टी-२० विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या उपान्त्य सामन्यात नाबाद राहिलेला एकमेव खेळाडू म्हणजे क्रिस गेल. एप्रिल २००८ मध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने क्रिस गेलशी करार केला, परंतु श्रीलंका संघ कॅरिबीअन दौऱ्यावर आलेला असल्यामुळे सुरुवातीचे काही सामने गेल खेळू शकला नाही. नंतर दुखापत झाल्यामुळे गेल उद्घाटनाच्या हंगामात आय. पी. एलमध्ये खेळू शकला नाही.

अजून वाचा: विराट कोहली माहिती मराठी 

Chris Gayle IPL
Chris Gayle IPL

२००९ च्या सुरूवातीला आय. पी. एल.च्या दुसऱ्या हंगामात क्रिस गेलच्या ८८ धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवण्यात वेस्ट इंडिज संघाला मोलाची मदत केली.

१७ डिसेंबर २००९ रोजी तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलिया-विरुद्ध वेस्ट इंडिज होता. ज्यामध्ये केवळ ७० चेंडू खेळत गेलने १०० धावा केल्या. त्यामध्ये ९ चौकार आणि ६ षटकारांची बरसात होती.

१६ नोव्हेंबर २०१० रोजी कसोटी सामन्यामध्ये २ शतके करण्याची अद्भत कामगिरी करणारा क्रिस गेल चौथा क्रिकेटपटू ठरला. जुलै २०१२ मध्ये कसोटी सामन्यात पुनरागमन करतांना न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी गेलने १५० धावा ठोकल्या.

२०१२ आय. सी. सी. विश्व टी-२० मालिकेत उपांत्य सामन्यात क्रिस गेलने ४१ चेंडूंना सामोरे जात ७५ धावा केल्या.

नोव्हेंबर २०१२ मध्ये ढाका येथे बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या चेंडूवर षटकार खेचण्याचा विक्रम गेलने केला. फेब्रुवारी २०१५ मध्ये एक दिवसीय सामन्यामध्ये द्विशतक करणारा क्रिस गेल हा चौथा खेळाडू ठरला.

Chris Gayle
Chris Gayle

कौतुकाचा तुफानी वर्षाव होत असतांनाच विश्वचषकात कॅनबेरामध्ये झिंबाब्वेविरुद्ध सामन्यात विश्वचषकात द्विशतक करणारा गेल हा पहिला खेळाडू ठरला. मार्लन सॅम्यूएल्स्सोबतची त्याची भागीदारी अजूनही विश्वचषक इतिहासातील उत्कंठापूर्ण, सोनेरी म्हणून प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. सॅमूएल्स गेल जोडीने त्या सामन्यात ३७२धावांचे योगदान दिले. योगायोगाने, झिंबाब्वेचा गोलंदाज तिनाशे पान्यांगराने पहिल्याच चेंडूंवर गेल पायचीत झाल्याची मागणी केली होती परंतु पंचांनी ती फेटाळून लावली.त्या रोमहर्षक सामन्यांवर गेल कसोटीमध्ये त्रिशतक, एक दिवसीय सामन्यात द्विशतक आणि आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये शतक करणारा एकमेव खेळाडू ठरला.

अजून वाचा: महेंद्रसिंग धोनी मराठी माहिती

टी-२० क्रिकेट

१ जुलै २००९ रोजी गेलने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया वॉरिअर्स संघाशी करार केला. ऑस्ट्रेलियन डोमेस्टिक टी-२० मालिकेत २००९-१० वर्षामध्ये खेळण्यासाठी गेल उत्सुक होता.

२०११ मध्ये आय. पी. एल.च्या चौथ्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरु संघाकडून खेळण्याचा गेलने निर्णय घेतला. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध खेळतांना १० चौकार आणि ७ षटकारांची बरसात करत त्याने ५५ चेंडूंचा सामना करत १०२ धावा ठोकल्या. ६ मे २०११ ला गेल पुन्हा एकदा गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरला. त्याने बेंगलुरुमध्ये किंग्ज् इलेव्हन पंजाब विरुद्ध १० चौकार आणि ९ षटकार खेचत ४९ चेंडूमध्ये १०७ धावा केल्या.

पुढच्या सामन्यात कोची टस्कर्स केरळाविरुद्ध गेलने ‘न भूतो न भविष्यती’ कामगिरी करत एका षटकात ३७ धावा केल्या. त्यामध्ये ३ षटकार ३ चौकार आणि नो बॉलवर मारलेला षटकार अशा धावा होत्या. १२ सामन्यांमध्ये ६०८धावांसाठी गेलला ऑरेंज कॅपने सन्मानित करण्यात आले. पाच सामनावीर पुरस्कार आणि मालिकावीर पुरस्कार मिळवणारा क्रिस गेल रॉयल चॅलेंजर्सच्या अनेक विजयांचा शिल्पकार आहे. २०११ चॅम्पियन्स लीग टी-२० मध्ये क्रिस गेल सर्वाधिक धावा करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आला. त्याने ६ सामन्यात २५७ धावा लुटल्या.

कलात्मक आणि आक्रमक कामगिरीनंतर माटाबेलेलँड टस्कर्स या झिंबाब्वेच्या संघाने गेलशी करार केला. २०११-१२ स्टॅनबिक बँक २० मालिका महत्त्वपूर्ण ठरली असे गेलने नंतर एका मुलाखतीत सांगितले. पुढे के-एफसी बिग बॅश टी-२० साठी सिडनी थंडरकडून गेल खेळला. त्या मालिकेत गेलला भरभरून यश मिळाले. मालिकेत २९३ धावा करणारा गेल मालिकेतील आघाडीचा फलंदाज ठरला.

बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये बारीसाल बर्नर्सकडून गेलने दोन शतके ठोकली आहेत. २०१२ च्या आय. पी. एल. हंगामात गेलने ५९ षटकारांची रेलचेल करीत ७३३ धावा लुटल्या ही कामगिरी १४ सामन्यांमध्ये केल्याबद्दल त्याला ऑरेंज कॅपने गौरवण्यात आले.

गेलची अद्भुत कामगिरी २०१३ च्या आय. पी. एल. मध्येही सुरुच राहिली. ५८ चेंडू खेळत त्याने नाबाद ९२ धावा फटकावल्या. त्यामध्ये ११ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. त्या सामन्यात गेलने मुंबई इंडियन्स संघाला पराभवाचा धक्का दिला. गेल सामनावीर ठरला.

२३ एप्रिल २०१३ रोजी पुणे वॉरिअर्स इंडिया संघाविरुद्ध गेलने अनेक विक्रम मोडले. ६६ चेंडू खेळत नाबाद १७५ धावा, त्यातील शतक केवळ ३० चेंडूमध्ये ! गेल नावाच्या वादळाने त्या सामन्यात प्रेक्षकांना थक्क केले ! क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारातील सर्वात वेगवान शतक, टी-२० सामन्यामध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या आणि आय.पी. एल.च्या एका डावात सर्वाधिक षटकार अशी विक्रमांची इमारत क्रिस गेलने त्या दिवशी उभारली.

Chris Gayle
Chris Gayle

१८ जानेवारी २०१६ मध्ये ॲडीलेड स्ट्राईकर्स विरुद्ध सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम केला. १२ चेंडू खेळत ५१ धावा गेलने केल्या त्यामध्ये ७ षटकार होते.

२०१६ मध्ये पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळण्यास लाहोर कलंदर्सने २,००,००० यू एस डॉलर्सचा करार क्रिस गेलशी केला. परंतु पाठीच्या दुखापतीमुळे तो चांगली कामगिरी करू शकला नाही.

१८ एप्रिल २०१७ राजी गेलने टी-२० क्रिकेटमधील १०,००० धावांचा मैलाचा दगड पार केला. १६ सप्टेंबर २०१७ ला आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात १०० षटकार मारणारा गेल हा पहिला फलंदाज ठरला.

२८ जानेवारी २०१८ ला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने क्रिस गेलला २ करोड रुपये अशा घसघशीत रकमेसाठी करार बद्ध केले. १९ एप्रिलला गेलने ६३ चेंडू खेळत १०४ धावा केल्या. त्याचा संघ सनरायझर्स हैदराबादविरुद्ध १५ धावांनी जिंकला. ते त्याचे आय. पी. एल. शतक होते.

अजून वाचा: रोहित शर्मा मराठी माहिती

ख्रिस गेल बद्दलचे मनोरंजक तथ्य

  • गेल वयाच्या १९ व्या वर्षी जमैकाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी युवा आंतरराष्ट्रीय स्तरावर वेस्ट इंडिजकडून खेळला.
  • ख्रिस गेलची आंतरराष्ट्रीय कारकीर्दीची सुरूवात हळू होती.
  • ख्रिस गेल वेस्ट इंडीजचा पहिला खेळाडू आहे ज्याने वनडेमध्ये ७००० हून अधिक धावा केल्या आहेत आणि त्याने १५० हून अधिक बळीही घेतले आहेत.
  • २०१२ मध्ये, ख्रिस गेलने कसोटी सामन्यात नवीन विक्रम केला, त्याने पहिल्याच चेंडूवर षटकार मारत हा विक्रम केला.
  • ख्रिस गेलने व्यावसायिक खेळामध्ये जगातील सर्वात वेगवान शतक झळकावले आहे, ख्रिस गेलने आयपीएल दरम्यान हे कामगिरी केली होती, त्याने फक्त ३० चेंडूंत शतक केले होते.
  • ख्रिस गेल इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये १५० षटकार ठोकणारा पहिला खेळाडू ठरला.
  • शांत, संयमी क्रिकेटपटू म्हणून पाहिले गेलेले असूनही गेल काही वादात अडकला आहे.
  • १७ डिसेंबर २००९ रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीजमधील तिसर्‍या कसोटी सामन्यात ख्रिस गेलने कसोटी सामन्यांच्या इतिहासातील पाचवे वेगवान शतक ठोकले. त्याने अवघ्या 70 चेंडूत शतक ठोकले.
  • ख्रिस गेल टी -२० क्रिकेटमध्ये ८००० धावा पूर्ण करणारा जगातील पहिला फलंदाज आहे.

ख्रिस गेलच्या लक्झरी कार आणि उत्पन्न

ख्रिस गेलचे उत्पन्न ५ अब्ज ते ७ अब्ज डॉलर दरम्यान आहे. गेलने जमैकामध्ये एक लक्झरी घर विकत घेतले आहे ज्याची किंमत २२.५ कोटी आहे. आणि गेलबरोबर असलेल्या कारंबद्दल बोलताना ख्रिस गेलकडे ८ लॅक्झेरी कार आहेत. त्यापैकी मर्सिडीज बेंझ, रेंज रोव्हर, लम्बोर्गिनी आणि ऑडी अशी मोठी वाहने आहेत. गेल हा कारच्या नृत्याचा मोठा चाहता आहे, जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा तो त्याच्या डान्सचे व्हिडिओ सोशल साइटवर पोस्ट करत राहतो.

Chris Gayle

ख्रिस गेलचे विवाद

शांत, संयमी क्रिकेटपटू म्हणून पाहिले गेलेले असूनही गेल काही वादात अडकला आहे. २००५ मध्ये, गेल प्रायोजकत्वाच्या मुद्द्यांवरून वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्ड आणि अनेक खेळाडूंमधील वादात अडकले होते. केबल एंड वायरलेस, जे वेस्ट इंडिज क्रिकेट प्रायोजित करायचे; या खेळाडूंचा त्याच्याबरोबर वैयक्तिक प्रायोजकत्व करार होता. तथापि, नुकताच वेस्ट इंडीजने केबल एंड वायरलेस प्रतिस्पर्धी डिजिसेल पुरस्कृत केल्यामुळे वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने खेळाडूंनी केबल एंड वायरलेस करार सोडावा अशी मागणी केली. जेव्हा खेळाडूंनी ते सोडण्यास नकार दिला तेव्हा वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाने त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून वगळले.

आंतरराष्ट्रीय विक्रमांची शृंखला बांधणारा क्रिस गेल मैदानावर फलंदाजी करण्यास येतो तेव्हा प्रेक्षक आक्रमण आणि गरज पडल्यास संयम असा मिलाफ पाहण्यास उत्सुक असतात. क्रिकेटमध्ये सर्वोच्च प्रतिष्ठा मिळवलेल्या काही फलंदाजांपैकी एक असलेला क्रिस गेल नावाचा सूर्य असाच तळपत राहो ही सदिच्छा!

अजून वाचा: क्रिकेट मराठी माहिती

Chris Gayle Photo

Chris Gayle
Chris Gayle

FAQ: Chris Gayle

गेलचा जर्सी क्रमांक 333 का आहे?

३३३ ही क्रमवारी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातल्या सर्वात लांब स्वरूपाच्या वेस्ट इंडियातील सर्वाधिक धावांचे प्रतिनिधित्व करते. ख्रिस गेलने जर्सी क्रमांकाची संख्याही 175 ने दान केली असून या सामन्यात वीस षटकांच्या फॉर्ममध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत.

ख्रिस गेल श्रीमंत आहे का?

ख्रिस गेल नेट वर्थ $35 दशलक्ष आहे.

ख्रिस गेलला युनिव्हर्स बॉस का म्हणतात?

त्याला युनिव्हर्स बॉस म्हटले जाण्याचे एक कारण वयाच्या ४१ व्या वर्षी चियर्स गेल अनेकांना न मिळालेल्या गोष्टी साध्य करण्यात यशस्वी झाली आहे.

ख्रिस गेल मुलगी किती वर्षांची आहे?

५ वर्षांची

Leave a Reply