Rohit Sharma Information in Marathi : रोहित गुरुनाथ शर्मा भारतीय क्रिकेट संघातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील सलामीचा फलंदाज आहे. रोहित हीटमॅन, शान ह्या नावांनीही प्रसिद्ध आहे. ट्वेन्टी-ट्वेन्टी, एक दिवसीय, कसोटी आणि इंडियन प्रीमिअर लीग अशा सर्व प्रकारांमध्ये रोहितने आपल्या तंत्रशुद्ध, तडाखेबाज फलंदाजीचे प्रदर्शन केले आहे.
रोहित शर्मा मराठी माहिती – Rohit Sharma Information in Marathi
Table of Contents
पूर्ण नाव: | रोहित गुरुनाथ शर्मा |
जन्म: | 30 एप्रिल 1987, बनसोड, नागपूर, महाराष्ट्र |
वडिलांचे नाव: | गुरुनाथ शर्मा |
आईचे नाव: | पूर्णिमा शर्मा |
पत्नीचे नाव: | रितिका सजदेह |
शिक्षण: | बारावी पर्यंत |
व्यवसाय: | भारतीय क्रिकेटपटू (फलंदाज) |
उपलब्धी: | अर्जुन पुरस्कार (२०१५) |
छंद: | प्रवास, चित्रपट पाहणे, टेबल टेनिस आणि व्हिडिओ गेम खेळणे |
धर्म: | हिंदू |
प्रशिक्षक: | दिनेश लाड |
घर पत्ता: | एक 4-बीएचके अपार्टमेंट आहुजा टॉवर्स, वरळी, मुंबई |
बालपण आणि क्रिकेटची ओळख
रोहित शर्माचा जन्म ३० एप्रिल १९८७ रोजी महाराष्ट्रात बसोड येथे झाला. रोहितचे वडील गुरुनाथ शर्मा परिवहन व्यवसायात आहेत, आई पूर्णिमा शर्मा मूळची विशाखापट्टणमची आहे. वडिलांची परिस्थिती बेताची असल्यामुळे रोहित बोरीवली, मुंबई येथे आजोबा आणि काकांच्या सहवासात वाढला. विशाल शर्मा हा रोहितचा धाकटा भाऊ.
रोहितने काकांच्या मदतीने १९९९ मध्ये एका क्रिकेट शिबिरामध्ये खेळण्यास सुरुवात केली. त्या वेळी रोहितचे प्रशिक्षक दिनेश लाड स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रशिक्षक असल्यामुळे रोहितला त्यांनी शाळा बदलून स्वामी विवेकानंदमध्ये प्रवेश घेण्याचा सल्ला दिला.
नंतर रोहितने क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात उजव्या हाताच्या फिरकी गोलंदाजीने केली. परंतु रोहित मधील फलंदाजीची चुणूक दिनेश लाड यांनी अचूक हेरली आणि त्याला फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले. रोहित तेव्हा आठव्या क्रमांकावर फलंदाजी करत असे. लाड सरांनी त्याला सलामी फलंदाजीची संधी दिली. रोहितने आपल्या पहिल्या सामन्यात सलामी फलंदाज म्हणून शतक केले.
रोहित शर्माने क्रिकेट मध्ये पदार्पण कधी केले?
२००६ – मुंबई क्रिकेट संघ
२३ जून २००७ – भारतीय क्रिकेट संघ
२००८ – डेक्कन चार्जर्स
२०११ – मुंबई इंडियन्स
सुरुवातीचे क्रिकेटचे दिवस
मार्च २००५ मध्ये देवधर ट्रॉफीमध्ये वेस्ट जॉनकडून सेंट्रल जॉन विरुद्ध ग्वालिअर येथे लिस्ट ए क्रिकेटने रोहितची क्रिकेटची सुरुवात झाली. नंतर त्याच प्रतियोगितेत रोहितेने धडाकेबाज फलंदाजी करत १२३ चेंडूंवर १४२ धावा केल्या. ते शतक रोहितसाठी खूपच फायद्याचे ठरले. त्यानंतर अबूधाबी येथे भारत अ संघाकडून खेळताना रोहितने सरस खेळाचे प्रदर्शन केले. त्यामुळे त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ३० सदस्यांमध्ये निवडले गेले. परंतु अंतिम संघात रोहितची निवड झाली नाही. मात्र नंतर रणजी ट्रॉफीमध्ये रोहितला स्थान मिळाले.
जुलै २००६ मध्ये डार्विन येथे न्यूझीलंड विरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रोहितने पाऊल ठेवले. रणजी ट्रॉफी कारकिर्दीची सुरुवात रोहितने मुंबई संघाकडून २००६/०७ मध्ये केली. त्यावेळी रोहितने गुजरात संघाविरुद्ध २६७ चेंडूमध्ये २०५ धावा केल्या होत्या. रोहितने अंतिम सामन्यात बंगाल विरुद्ध अर्धशतक केले.
अजित आगरकरने ऑक्टोबर २०१३ मध्ये क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यावर रोहित आय पी एल सामन्यांसाठी मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार झाला. आतापर्यंत तोच सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय कारकीर्द
नियमित षटकांच्या खेळासाठी २००७ च्या आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाकडून रोहितची निवड झाली. त्यानंतर त्याने बेलफास्टमध्ये आयर्लंड विरुद्ध एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली, परंतु त्या सामन्यात रोहितला फलंदाजीची संधी मिळाली नाही.
नंतर २० सप्टेंबर २००७ रोजी आय सी सी विश्व ट्वेन्टीट्वेन्टी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४०चेंडूत झटपट ५० धावा केल्या. तो सामना जिंकल्यामुळे भारत प्रतियोगितेच्या उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचला. त्या सामन्यात भारताने केवळ ६१ धावांवर ४ गडी गमावले होते. रोहितने कर्णधार महेन्द्रसिंग धोनी बरोबर ८५ धावांची भागीदारी केल्यामुळे भारत १५३ धावांपर्यंत मजल मारू शकला. रोहितला सामनावीर निवडले गेले. त्याच टी-२० मालिकेत अंतिम सामन्यात रोहितने पाकिस्तानविरुद्ध १६ चेंडू खेळून ३० धावा केल्या.
१८ नोव्हेंबर २००७ रोजी राजस्थानच्या जयपुर सवाई मानसिंग स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्माने एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक केले. नंतर २००७-०८ च्या कॉमनवेल्थ शृंखलेमध्ये ऑस्ट्रेलिया येथे खेळण्यासाठी १६ सदस्यांच्या संघात रोहितला स्थान मिळाले. तेथे ३३. ५७ धावांच्या सरासरीने २ अर्धशतक करून रोहितने २३५ धावा कमावल्या. ज्यामध्ये अंतिम सामन्यात सिडनीमध्ये कौतुकास्पद ६६ धावा केल्या. कॉमनवेल्थ मालिका रोहितसाठी उज्ज्वल भवितव्याची खात्री देणारी ठरली.
डिसेंबर २००९ मध्ये रोहितने रणजी ट्रॉफीच्या एका सामन्यात नेत्रदीपक तीन शतके केली. ज्यामुळे निवड समितीला रोहितच्या काही काळ असमाधानी कामगिरीकडे दुर्लक्ष करून त्याला संघात पुन्हा स्थान द्यावेच लागले. त्यानंतर बांगलादेशमधील एक दिवसीय सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकरला विश्रांती देऊन त्रिकोणी शृंखलेत रोहितला खेळवण्यात आले.
रोहितने पहिले एक दिवसीय शतक २८ मे २०१० रोजी झिंबाब्वेविरुद्ध नोंदवले. त्याने ११४ धावा केल्या. ३० मे २०१० रोजी रोहितने त्रिकोणी शृंखलेमध्ये श्रीलंकेविरुद्ध झंझावाती नाबाद ११० धावा केल्या.
नंतर एक दिवसीय शृंखलेमध्ये रोहितने चांगली सुरुवात केली आणि पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी करत, ६५ चेंडूवर नाबाद ६८ धावा केल्या ज्यामध्ये ४ चौकार आणि १ षटकार होता. रोहितला सामनावीर घोषित करण्यात आले. सर व्हिव्हियन रीचर्ड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माने ९१ चेंडूवर अत्युच्च खेळाचे प्रदर्शन केले व ९१ धावा केल्या. त्या सामन्यामध्ये भारताचे ९२ धावांमध्ये ६बळी गेले होते. नंतर रोहितने हरभजनच्या साथीने भारताला विजय मिळवून दिला. रैनाच्या नेतृत्वाखाली रोहितने रंगतदार प्रदर्शन केले आणि तो पहिल्यांदाच एक दिवसीय सामन्यामध्ये मालिकावीर म्हणून गौरवला गेला. नंतर पुन्हा एकदा भारतात वेस्ट इंडिजविरुद्ध रोहितला मालिकावीर घोषित करण्यात आले.
२०१३ मधील चॅम्पियन्स ट्रॉफी रोहित शर्माला मिळाली आणि रोहितचा प्रभावी फॉर्म सुरूच राहिला, नंतर २०१३ मध्ये ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला. त्या शृंखलेत रोहितने एका सामन्यात जयपूरमध्ये १४१ धावा केल्या व बाद झाला, परंतु बेंगलूरू येथील सामन्यात १५८ चेंडूमध्ये २०९ धावा केल्या. रोहितने १६ षटकार खेचत ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनचा १५ षटकारांचा विक्रम मोडला आणि एक दिवसीय सामन्याच्या एका डावात कुठल्याही फलंदाजाने सर्वाधिक षटकार खेचण्याचा नवा विक्रम होता.
नोव्हेंबर २०१३ मध्ये कोलकाता येथे ईडन गार्डन्स मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध रोहित सामना खेळला. त्यात १७७ धावा करणारा रोहित पहिल्या कसोटी सामन्यात शतक करणारा दुसरा खेळाडू होता. शतकांची शृंखला कायम ठेवत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर नाबाद १११ धावा करणारा रोहित शर्मा तिसरा असा भारतीय खेळाडू ठरला ज्याने सुरुवातीच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये शतक नोंदवले.
२०१० मध्ये रोहित शर्मा जगातील सर्व फलंदाजांपेक्षा अद्भुत किमया दाखवत एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात २५० पेक्षा अधिक धावा करणारा आणि दोन वेळा, द्विशतक करणारा एकमात्र फलंदाज ठरला. ईडन गार्डन्सवर पुन्हा एकदा रोहितची बॅट तळपली आणि २६४ धावा फलकावर लावत त्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
२ ऑक्टोबर २०१५ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मध्ये एच पी सी ए स्टेडियम धर्मशाला, हिमाचल प्रदेश येथे रोहितने देदीप्यमान फलंदाजी करत १०६ धावा काढल्या आणि तो टी-२० सामन्यामध्ये शतक ठोकणारा दुसरा खेळाडू ठरला. ह्याचबरोबर क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये शतक करणारा रोहित हा एकमेव खेळाडू आहे. ११ ऑक्टोबरला १३३ चेंडूंचा सामना करत १५० धावा रोहितने केल्या. नंतर ऑस्ट्रेलियामधील मालिकेत रोहित शर्माने पुन्हा लागोपाठ दोन शतके केली व अंतिम सामन्यात ९९ धावा केल्या.
आय पी एल
रोहित शर्मा आय पी एलच्या यशस्वी खेळाडूंपैकी आहे आणि शेवटच्या चेंडूवर षटकार मारून विजय खेचून आणण्याची कुवत त्याच्यामध्ये आहे. रोहित शर्माने प्रथम २००८ आय पी एल मध्ये ७५०००० यू. एस. डॉलरच्या अवाढव्य रकमेवर करार केला. (डेक्कन चार्जर्स संघाकडून) २००८ आय पी एल मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी रोहित शर्मा एक होता. त्याने ३६. ७२ च्या सरासरीने ४०४ धावा केल्या. त्यामुळे त्याला काही सामन्यांमध्ये ऑरेंज कॅप मिळाली.
२००८ ते २०१० पर्यंत रोहित डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळला परंतु २०११ पासून मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे. २०१३, २०१७, २०१९, २०२० आणि २०१५ मध्ये त्याने संघाला विजय मिळवून दिला.
ह्या व्यतिरिक्त रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई चार वेळा चॅम्पियन्स लीग टी-२० सुद्धा जिंकली आहे.
इतर पुरस्कार
१) २०१५ मध्ये रोहित शर्माला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले. अर्जुन पुरस्कार भारत सरकारकडून राष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जातो.
२) २०१३ आणि २०१४ मध्ये एक दिवसीय सामन्यात 2 द्विशतक केल्यामुळे सर्वश्रेष्ठ फलंदाज पुरस्कार ई.एस.पी.एनकडून.
३) २०१५ मध्ये ई एस पी एनकडून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी २० मध्ये शतक केल्यामुळे सर्व श्रेष्ठ खेळाडूचा पुरस्कार
४) २०१९ मध्ये सिएट टायर पुरस्कार संमेलनात एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऑफ द ईअर सन्मान.
फोर्ब्स इंडिया २०१५ च्या भारतातील १०० प्रसिद्ध व्यक्तींमध्ये रोहित शर्माला आठवे स्थान मिळाले. महेन्द्रसिंग धोनी आणि गौतम गंभीर नंतर संघाला आय पी एल चषक मिळवून देणारा रोहित शर्मा तिसरा कर्णधार आहे.
रोहित शमाची बॅट गोलंदाजांवर तुटून पडते आणि एकदा रोहितची षटकार चौकारांची फटकेबाजी सुरू झाली की तो विरोधी संघातील गोलंदाजांना सळो की पळो करून सोडतो. रोहितच्या पुढील वाटचालीमध्ये आणखी नेत्रदीपक खेळाची त्याचे लाखो चाहते वाट पहात आहेत. रोहितला शुभेच्छा!
रोहित शर्माचं प्रेम प्रकरण आणि लग्न
प्रथम प्रेम शाळेच्या दिवसांत घडले
रितिकापूर्वी रोहितचे नाव बर्याच मुलींशी संबंधित होते. २०१५ च्या विश्वचषकातही रोहित ऑस्ट्रेलियामध्ये एका मुलीसोबत फिरताना दिसला. मात्र ती कोण होती हे समजू शकले नाही. आपल्या शाळेच्या दिवसांत रोहित पहिल्यांदाच एका मुलीवर प्रेम करत होता. मुंबईच्या बोरिवली येथील स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेत शिकणाऱ्या रोहितने अकरावीच्या मुलीला प्रपोज केले. हे संबंध सुमारे 2 वर्षे टिकले. दोन वर्षांनंतर त्याच्या मैत्रिणीने हे संबंध संपवण्याचा निर्णय घेतला होता.
ब्रिटिश मॉडेलशी संबंधित नाव
क्रिकेटमध्ये पुढे जाणे आणि स्टार खेळाडू झाल्यानंतर रोहितचे नाव ब्रिटिश मॉडेल आणि अभिनेत्री सोफिया हिच्याशी ही जोडले गेले. नोव्हेंबर २०१४ मध्ये रोहितने दुसर्यांदा वनडेमध्ये दुहेरी शतक झळकावल्यानंतर सोफियानेही ट्विटरवर रोहितला समर्पित न्यूड फोटो शेअर केला होता. परंतु, या रिलेशनशिपवरुन दोघांकडून कोणतेही विधान झालेले नाही.
खाजगी जीवन
रोहित शर्माने आपल्या बालपणातील मित्र रितिका सजदेह यांच्याशी एप्रिल २०१५ मध्ये साखरपुडा केला आणि नंतर १३ डिसेंबर २०१५ रोजी या दोघांनी लग्न केले,
रोहित शर्मा आणि रितिका सजदेह ३० डिसेंबर २०१८ रोजी समीरा नावाच्या बाल मुलीचे पालक बनले.
रोहित शर्माच्या आवडी निवडी
आवडता खेळाडू – | सचिन तेंडुलकर , वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग |
आवडते स्पोर्ट्स – | क्रिकेट आणि टेबल टेनिस |
आवडती अभिनेत्री – | करीना कपूर , दीपिका पादुकोण, मेगन फॉक्स |
आवडता अभिनेता – | हृतिक रोशन, अक्षय कुमार |
आवडता चित्रपट – | जो जीता वही सिकंदर (१९९२) |
आवडते ठिकाण – | न्यूयॉर्क |
आवडते फूड – | अंडी आणि आलू पराठे |
रोहित शर्माशी संबंधित काही रंजक तथ्य
- रोहित शर्मा धूम्रपान करतो का? – नाही
- रोहित शर्मा मद्यपान करतो काय? – माहित नाही
- रोहितची मातृभाषा तेलगू आहे कारण त्याचा जन्म तेलगू कुटुंबात झाला आहे.
- त्यांचा जन्म नागपुरात झाला आणि जेव्हा तो १½ वर्षाचा होता तेव्हा त्यांचे कुटुंब मुंबईच्या डोंबिवलीमध्ये गेले.
- त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती त्यांच्यासाठी आणि भावासाठी पुरेशी नव्हती, म्हणून त्याला बोरिवलीत आपल्या आजोबांसोबत राहण्यासाठी पाठवण्यात आले जेथे तो ‘गल्ली क्रिकेट खेळू लागला.’
- जेव्हा तो सहाव्या इयत्तेत होता तेव्हा उन्हाळ्याच्या सुटीत तो स्थानिक क्लबमध्ये सामील झाला, फलंदाज म्हणून नव्हे तर ऑफस्पिन गोलंदाज म्हणून.
- १९९९ मध्ये अंडर -१२ (दहा षटक) स्पर्धेत त्याने काही महत्त्वपूर्ण बळी मिळवताना त्याची कौशल्य त्याच्या शाळेचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी प्रथम शोधून काढली.
- यापूर्वी तो ८ किंवा ९ व्या क्रमांकावर फलंदाजी करायचा, परंतु जेव्हा त्याच्या कोचने त्याच्यात फलंदाजीची क्षमता पाहिली तेव्हा त्याने रोहितला सराव करण्यास सांगितले तेव्हा रोहितने नेटमध्ये फलंदाजीचा क्रम वाढविला. आणि, तो प्रथमच आंतरशालेय ‘गिल्स शील्ड’ स्पर्धेत खेळला, जिथे त्याने 120 धावा केल्या.
- एकदा तो म्हणाला की त्याने ब्रेट ली विरुद्ध फलंदाजी करण्यासाठी संघर्ष केला.
- २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या सेंचुरियन येथे अभिषेक नायर, हरभजन सिंग आणि सौरभ तिवारी यांना बाद करून डेक्कन चार्जर्सकडून त्याने आयपीएलची हॅटट्रिक घेतली.
- तो गणपतीचा ठाम विश्वास ठेवतो आणि कोणत्याही दौर्यापूर्वी सिद्धिविनायक मंदिराला भेट देतो.
- वीरेंद्र सेहवागला भेटायला तो आपल्या शाळेतून पळाला होता.
- तो रिअल माद्रिद फुटबॉल क्लबचा मोठा चाहता आहे
- त्याला झोपायला खूप आवडते.
- जर तो क्रिकेटपटू नसता तर तो आज रिअल इस्टेट उद्योगपती झाला असता.
अजून वाचा:
रोहित शर्मा फोटो – Rohit Sharma Photo
FAQ: Rohit Sharma Information in Marathi
रोहित शर्माचे पूर्ण नाव काय आहे?
रोहित गुरुनाथ शर्मा
रोहित शर्माचे वय किती आहे?
34 वर्षे (30 एप्रिल 1987)
रोहित शर्मा यांचे गाव कोणते आहे?
रोहित शर्माचा गाव नागपूर येथील बनसोड येथे आहे.
रोहित शर्माच्या आईचे नाव काय आहे?
पूर्णिमा शर्मा
रोहित शर्माचा जन्म कधी व कोठे झाला?
30 एप्रिल 1987, नागपूर
रोहित शर्माने 264 धावा कधी केल्या?
रोहित शर्माने आज 2014 म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वाधिक वैयक्तिक धावा केल्या. कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये रोहितने श्रीलंकेविरुद्ध 264 धावांची डाव खेळला.
रोहित शर्माने किती दुहेरी शतके ठोकली आहेत?
एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन दुहेरी शतक झळकावणारा रोहित जगातील एकमेव फलंदाज आहे.
रोहित शर्माची किती मुले आहेत?
एप्रिल २०१५ मध्ये त्याने रितिका सजदेहशी लग्न केले आणि नंतर या दोघांनी लग्न केले. रोहितला एक मुलगी आहे मुलीचे नाव समीरा शर्मा आहे.