David Warner Information in Marathi : डेव्हिड वॉर्नरचा जन्म २७ ऑक्टोबर १९८६ रोजी पॅडीन्ग्टन, न्यू साऊथ वेल्स्, ऑस्ट्रेलिया येथे झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा पदार्पणाचा सामना खूपच स्मरणीय ठरला. एकही प्रथम श्रेणी सामना पूर्वी न खेळताही त्याने टी-२० सामन्यामध्ये अचंबित करणारा खेळ केला.
डेव्हिड वॉर्नर माहिती – David Warner Information in Marathi
Table of Contents
नाव | डेव्हिड अँड्र्यू वॉर्नर |
टोपणनाव | लॉयड, मारिओ, बैल, तोफ |
जन्म | २३ ऑक्टोबर १९८६ |
जन्मस्थान | न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया |
प्रोफेशन | क्रिकेटर |
उंची | १.७० सेमी |
फलंदाजीची शैली | डावा हात |
बॉलिंग शैली | डावा आर्म लेग स्पिन |
राष्ट्रीयत्व | ऑस्ट्रेलिया |
वडिलांचे नाव | हॉवर्ड वॉर्नर |
आईचे नाव | लॉरिएन वॉर्नर |
पत्नी | कँडिस वॉर्नर |
जर्सी क्रमांक | ३१ |
आयपीएल टीम | सनरायझर्स हैदराबाद |
नेट वर्थ | १० दशलक्ष |
डेव्हिड वॉर्नर कुटुंब – David Warner Wife
बालपण आणि तारुण्यातील क्रिकेट
डेव्हिडला बालपणातच क्रिकेटबद्दल रुची निर्माण झाली. डेव्हिड १३ वर्षाचा असतांना त्याच्या प्रशिक्षकाने त्याला उजव्या हाताने फलंदाजीचा प्रयत्न करण्यास सांगितले. परंतु उजव्या हाताने फलंदाजी करण्यात त्याला यश आले नाही. त्यामुळे एका मोसमानंतर त्याच्या आईने त्याला डावखुरी फलंदाजी करण्यास सुचवले.
आईच्या सल्ल्यानुसार डेव्हिडने फलंदाजीमध्ये बदल करून सोळा वर्षाखालील धावांचा नवा विक्रम सिडनी कोस्टल क्रिकेट क्लबमध्ये केला. पंधराव्या वर्षी ईस्टर्न सबर्बस् क्लबकडून डेव्हिडने त्याचे प्रथम श्रेणी पदार्पण केले. नंतर त्याने १९ वर्षाखालील संघाकडून श्रीलंकेचा दौरा केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
न्यू साऊथ वेल्स् ब्लूज संघाकडून खेळतांना टास्मानिया विरुद्ध त्याच्या १६५ नाबाद धावा त्याच्यासाठी उज्ज्वल भवितव्याची वाट खुली करणाऱ्या ठरल्या. ब्लूजच्या फलंदाजाने रचलेली ती सर्वात मोठी धावसंख्या ठरली. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम करण्याची वॉर्नरची संधी थोडक्यात चुकली. पण त्याच्या तडाखेबाज फलंदाजीमुळे त्याची निवड जानेवारी २००९ मधील टी- २० सामन्यांकरता झाली.
ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिडने आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी–२० मालिकेत साऊथ आफ्रिकेविरुद्ध मेलबोर्न क्रिकेट ग्राऊंडवर ११ जानेवारी २००९ ला पदार्पणाचा सामना खेळला. रंजक बाब अशी की १८७७ पासून प्रथम श्रेणी सामना न खेळता थेट ऑस्ट्रेलियाचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्व करणारा वॉर्नर हा एकमेव फलंदाज आहे. त्या सामन्यात डेव्हिडने आक्रमक फलंदाजी करत ४३ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांच्या सहाय्याने ८९ धावा केल्या. ट्वेन्टी-२० च्या इतिहासातील ते दुसरे सर्वात जलद अर्धशतक होते.
आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० पदार्पणातील सामन्यामध्ये त्याच्या ८९ धावा म्हणजे दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या होती. २३ फेब्रुवारी २०१० रोजी सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना त्याने २९ चेंडूत रोमहर्षक ६७ धावा केल्या.
कसोटी सामने
१) १२ डिसेंबर २०११ रोजी बॅल्लेरीव ओव्हल, होबार्ट ऑस्ट्रेलिया येथे न्यूझीलंड विरुद्ध १२३ धावा.
२) १४ जानेवारी २०१२ रोजी वाका, पर्थ (ऑस्ट्रेलिया) येथे भारताविरुद्ध १८० धावा
३) ॲडीलेड ओव्हल, ऑस्ट्रेलिया येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ११९ धावा, २२ नोव्हेंबर २०१२ रोजी वाका येथे ६९ चेंडूमध्ये वॉर्नरने केलेले शतक एका सलामीच्या फलंदाजाने केलेले सर्वात जलद शतक आहे.
एक दिवसीय सामने
१) ४ मार्च २०१२ मध्ये गाबा, ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथे श्रीलंकेविरुद्ध १६३ धावा.
२) ६ मार्च २०१२ मध्ये Adelaide Oval, ऑस्ट्रेलिया येथे श्रीलंकेविरुद्ध १०० धावा
ट्वेंटी-२० सामने
१) २०१० मध्ये दिल्ली येथे दिल्ली डेअरडेव्हिल्स् संघाकडून कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध ६९ चेंडूमध्ये नऊ चौकार व पाच षटकारांच्या सहाय्याने १०७ धावा
२) २०११ साली चेन्नई येथे न्यू साऊथ वेल्स् ब्लूज संघाकडून चेन्नई सुपर किंग्ज् विरुद्ध ६९ चेंडूमध्ये ११ चौकार व ८ षटकारांच्या सहाय्याने १३५ धावा.
३) २०११ मध्ये बेंगलुरू येथे न्यू साऊथ वेल्स् ब्लूज संघाकडून चेन्नई सुपर किंग्ज् विरुद्ध ६८ चेंडूंमध्ये सहा चौकार व ११ षटकार मारत १२३ धावा.
४) २०११ मध्ये मेलबोर्न येथे सिडनी थंडर संघाकडून मेलबोर्न स्टार विरुद्ध १०२ धावा, ५१ चेंडूमध्ये – ६ चौकार व ६ षटकार
५) २०१२ साली हैदराबाद येथे दिल्ली डेअरडेव्हिल्स् संघाकडून डेक्कन चार्जर्स विरुद्ध ५४ चेंडूत १०९ धावा (१० चौकार आणि ७ षटकार)
६) आय पी एल २०१४ मधील लिलावानंतर वॉर्नरला सनरायझर्स हैदराबाद संघाने ८८०००० अमेरिकन डॉलर्सच्या घसघशीत रकमेसाठी करारबद्ध केले. २०१५ मध्ये हैदराबाद सनरायझर्स संघाचा कर्णधार म्हणून डेव्हिड वॉर्नरची नियुक्ती झाली. वॉर्नर ह्या शृंखलेतील आघाडीचा फलंदाज ठरला. त्याला ऑरेंज कॅपने सन्मानित करण्यात आले.
७) २०१६ मधील हंगामासाठी वॉर्नरचे कर्णधारपद कायम ठेवण्यात आले. त्याच मालिकेत ३८ चेंडूमध्ये ६९ धावा करत रॉयल चॅलेंजर्स, बेंगलुरू विरुद्ध हैदराबाद सनरायझर्यने अंतिम सामना जिंकला. डेव्हिड वॉर्नरने मालिकेत ८४८ धावा केल्या. ती धावसंख्या शृंखलेतील दुसरी सर्वोच्च हाती.
८) २०१७ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध १२६ धावा करत स्वत:चा १०९ धावांचा विक्रम मोडला. डेव्हिडचे आय. पी. एल.मधील ते तिसरे शतक होते. तो मालिकेतील आघाडीचा फलंदाज ठरला अणि दुसऱ्यांदा त्याला ऑरेंज कॅपने गौरवण्यात आले. ५८. २७ धावांच्या सरासरीने वॉर्नरने त्या हंगामात ६४१ धावा केल्या.
९) २०१८ च्या आय. पी. एल. मोसमात वॉर्नरला कर्णधार म्हणून कायम ठेवले गेले. परंतु साऊथ आफ्रिकेत चेंडूशी छेडछाड केल्याच्या आरोपानंतर त्याने सनरायझर्स, हैदराबादचे नेतृत्त्व नाकारले. त्यानंतर बी. सी. सी. आयने २०१८ मधील आय. पी. एल. सामने खेळण्यास वॉर्नरला बंदी घातली.
१०) २०१९ च्या आय. पी. एल. मध्ये हैदराबाद सनरायझर्सकडून खेळतांना आय. पी.एल. मधील एक वर्षाच्या बंदीनंतर पहिल्याच सामन्यात डेव्हिडने ५३ चेंडूमध्ये ८५ धावा केल्या. परंतु कोलकाता नाईटरायडर्सविरुद्ध तो सामना सनरायझर्सने गमावला. दोनच दिवसानंतर वॉर्नरने ५५ चेंडूमध्ये १०० धावा केल्या आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुविरुद्ध सनरायझर्सला विजय मिळवून दिला. त्याने हंगामात ६९२ धावा केल्या. त्याची सरासरी धावसंख्या ६९.२० होती. त्याला तिसऱ्यांदा ऑरेंज कॅपने गौरवण्यात आले. परंतु १२ सामने खेळल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या विश्वचषकाच्या तयारीकरिता डेव्हिड वॉर्नर मालिका सोडून मायदेशी परतला.
गौरव सन्मान
एलन बॉर्डर पदक एक पेक्षा जास्त वेळा जिंकणारा डेव्हिड वॉर्नर हा चौथा फलंदाज आहे. एका कॅलेंडर वर्षात ७ एक दिवसीय शतक करणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज आहे.
वॉर्नर आणि शेन वॉटसन ही जोडी टी-२० च्या इतिहासातील सर्वात यशस्वी सलामीची जोडी आहे. ह्या जोडीने ‘टी-२० ‘मध्ये १००० धावा करण्याचा ही विक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १५०० धावा करणारा वॉर्नर हा पहिला ऑस्ट्रेलियन आणि जगातील सहावा खेळाडू आहे.
वाका येथे तीन शतके करणारा पहिला फलंदाज म्हणून वॉर्नर ओळखला जातो. त्याची २५३ धावांची संख्या दुसरी सर्वाधिक ठरली आहे.
७ नोव्हेंबर २०१५ मध्ये तीन वेळा एकाच कसोटी सामन्यात दोन्ही डावांमध्ये शतक करणारा वॉर्नर हा तिसरा फलंदाज आहे. ह्या आधी सुनिल गावसकर आणि रिकी पाँटींग ह्यांनी हा विक्रम केला होता. न्यूझीलंडविरुद्ध पुढील कसोटी सामन्यात त्याने पहिले दुहेरी शतक वाका पर्थ येथे केले.
त्याच सामन्यात ३ सलग कसोटी शतके कारकिर्दीत २ वेळा करणारा वॉर्नर हा कसोटी क्रिकेटमध्ये दुसरा सलामीचा फलंदाज आहे. ४००० कसोटी धावा सर्वात जलद करणारा चौथा ऑस्ट्रेलियन फलंदाज म्हणून डेव्हिड वॉर्नर प्रसिद्ध आहे.
३ जानेवारी २०१७ मध्ये सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर पाकिस्तान- विरुद्ध खेळतांना कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दुपारच्या जेवणापूर्वी शतक करणारा वॉर्नर हा पाचवा क्रिकेटपटू आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात संघाला झटपट धावांची गरज असतांना वॉर्नरने दणकेबाज खेळ करत २३ चेंडूमध्ये वेगवान अर्धशतक केले. ते अर्धशतक ऑस्ट्रेलियन खेळाडूने केलेले सर्वात वेगवान दुसरे अर्धशतक ठरले. पाकिस्तानविरुद्ध पाच एक दिवसीय सामन्यांमध्ये वॉर्नरने संथगतीने सुरुवात केली. परंतु लवकरच सिडनी आणि ॲडीलेडमध्ये झालेल्या शेवटच्या दोन एक दिवसीय सामन्यांमध्ये त्याने दोन शतके केली. २०१७ मध्ये अॅलन बॉर्डर पुरस्कार सोहळ्यामध्ये डेव्हिडला ए. बी. पदक आणि ‘ऑस्ट्रेलियन वन-डे इंटरनॅशनल प्लेअर ऑफ द इयर’ने गौरवण्यात आले.
दोन शतके केल्यामुळे डेव्हिड मालिकावीर ठरला आणि काही काळातच आय सी सी आंतरराष्ट्रीय एक दिवसीय फलंदाजांच्या नामावलीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला.
२८ सप्टेंबर २०१७ मध्ये डेव्हिड शंभरावा आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामना खेळला आणि शंभराव्या सामन्यात शतक करणारा पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. डेव्हिड वॉर्नरचा अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.
खेळ-शैली
आक्रमक डावखुऱ्या फलंदाजीसाठी डेव्हिड वॉर्नर सुप्रसिद्ध आहे. यष्टीच्या मागील बाजूने फटके मारण्याचे कसब त्याच्याकडे आहे. ऑफ साईडला फटकेबाजी करणे त्याला आवडते. कसोटी सामन्यामध्ये डेव्हिडचा स्ट्राईक रेट उच्च आहे. कसोटी क्रिकेट मधील सर्व शतकांमध्ये (२६ डिसेंबर २०१७ पर्यंत) त्याचा स्ट्राईक रेट कधीही ५२.५ पेक्षा कमी नव्हता.
डेव्हिड वॉर्नर उत्तम क्षेत्ररक्षक आणि फिरकी गोलंदाजही आहे. त्याची गोलंदाजीची पद्धत आगळीवेगळी आहे. मध्यम गती आणि फिरकी गोलंदाजी अशी दोन्ही कौशल्ये त्याला अवगत आहेत. विरुद्ध संघाची नासधूस करणारा आक्रमक, तेजस्वी डावखुरा सलामी फलंदाज म्हणून वॉर्नर क्रिकेट विश्वात ओळखला जातो.
डेव्हिड वॉर्नरशी संबंधित मनोरंजक माहिती
- असे म्हणतात की वॉर्नरकडे बॅट विकत घेण्यासाठी पैसे नव्हते, आज क्रिकेटचा एक नामांकित खेळाडू आहे.
- असे म्हणतात की एकदा वॉर्नरच्या मार्गदर्शकाने त्याला सांगितले की आपण आपल्या आयुष्यात कधीही काहीही करू शकत नाही, आपण अपयशी आहात. ही गोष्ट वॉर्नरला इतकी वाईट होती की त्याने स्वत:ला देखील असे दर्शविले की संपूर्ण जगात त्याचे नाव आणखी वाढेल.
- जेव्हा डेव्हिड १४ वर्षांचा झाला तेव्हा त्याला पॉकेटमनीची समस्या उद्भवू लागली, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, अशा परिस्थितीत वॉर्नरच्या वडिलांनी त्याला काही काम करायला लावले, असे सांगितले जाते की डेव्हिडला पहाटे 3:00 वाजेपर्यंत काम करत असे.
- आठवड्याच्या शेवटी वॉर्नर वर्तमानपत्रे वितरीत करायचे जेणेकरून शाळा छावणीसाठी पैसे गोळा करेल आणि प्रत्येक ख्रिसमसमध्ये त्याच्या पालकांसाठी भेटवस्तू खरेदी करू शकतील.
- वॉर्नरचा असा विश्वास आहे की जर त्याने तो काळ आपल्या आयुष्यात पाहिला नसता तर कदाचित त्याला गोष्टींचे महत्त्व कळले नसते.
- वॉर्नर बालपणात १ तासासाठी १२ डॉलर कमावत होता परंतु आज तो कोट्यावधी मध्ये खेळत आहे.
अजून वाचा:
FAQ: डेव्हिड वॉर्नर माहिती – David Warner Information in Marathi
डेव्हिड वॉर्नरची उंची किती आहे?
१.७ मी
डेव्हिड वॉर्नरची नेट वर्थ किती आहे?
डेव्हिड वॉर्नरची एकूण संपत्ती 11 दशलक्ष डॉलर्स एवढी आहे, जी भारतीय चलनात अंदाजे 80 कोटी भारतीय रुपयां इतकी आहे.
डेव्हिड वॉर्नर कोणत्या संघाचा आहे?
सनरायझर्स हैदराबाद