जगन्नाथ शंकरशेठ : हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील मुंबई इलाख्याच्या सार्वजनिक जीवनात त्यांना महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले या कार्यात त्यांना अनेक सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. आपल्या संपत्तीची खरी गरज ही सामान्य माणसाच्या उद्धारासाठी व्हावी या हेतूने त्यांनी लोकसेवेचे व्रत घेऊन सामाजिक सुधारणेच्या पायाभरणीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे
नाना शंकरशेट यांनी जवळजवळ अर्धशतकाच्या कालावधीत मुंबईच्या व पर्यायाने महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा, राजकीय चळवळीचा आणि अनेकविध अशा लोककल्याणकारी सुधारणांचा पाया घातला.
जगन्नाथ शंकरशेठ माहिती मराठी – Jagannath Shankar Sheth Information in Marathi
Table of Contents
जन्म : 10 फेब्रुवारी1803
मृत्यु : 31 जुलै 1865
पूर्ण नाव : जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे
टोपणनाव : नाना शंकरशेट
इंडियन रेल्वे असोसिएशनच्या स्थापनेसाठी प्रयत्न : सप्टेंबर 1830 मध्ये इंग्लंडमधील लिव्हरपूल ते मँचेस्टर या रेल्वेमार्गाच्या उद्घाटनाची माहिती नाना शंकरशेट यांना समजली आणि त्यांनी अशी गाडी आपल्या शहरातही हवी, असा ध्यास घेतला. सामान्य नागरिकांना लांब पल्ल्याच्या प्रवासापासून होत असलेला त्रास लक्षात घेऊन नानांनी 1843 साली रेल्वेची कल्पना सत्यात उतरविण्यासाठी ग्रेट ईस्टर्न कंपनीची स्थापना केली.
मुंबईत रेल्वे सुरू करण्याची संकल्पना पहिल्यांदा त्यांचेच मित्र जमशेटजी जिजिभोय यांच्याकडे मांडली.या दोघांनी मिळून 1845 साली ‘इंडियन रेल्वे असोसिएशन’ची स्थापना केली. या माध्यमातून ते तत्कालीन ब्रिटिश सरकारला रेल्वे सुरू करण्यासाठी विविध प्रकारे समजवू लागले. त्याचाच परिपाक म्हणजे, 1 ऑगस्ट 1849 रोजी ‘द ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे’ (GIP रेल्वे) ची स्थापना झाली.आणि त्यांच्या अथक प्रयत्नांतून 16 एप्रिल 1853 रोजी आशिया खंडातील पहिली रेल्वे (Railway) बोरीबंदर ते ठाणे या लोहमार्गावर धावली. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना ‘भारतीय रेल्वेचे जनक’ म्हणून ओळखले जाते.
पहिल्या रेल्वे विषयी इतर महत्वाची माहिती
- 16 एप्रिल 1853 रोजी, दुपारी साडेतीन वाजता मुंबईतील बोरिबंदरहून ठाण्याच्या दिशेनं भारतातील पहिली रेल्वेगाडी ट्रॅकवरून धावली.
- मुंबई ते ठाणे हा 32 किलोमीटरचा प्रवास या रेल्वेनं 57 मिनिटांत पूर्ण केला.
- या रेल्वेतल्या एका कंपार्टमेंटला फुलांनी सजवलं होतं. यात बसण्याचा मान मोजक्याच लोकांना होता, त्यातले एक होते – जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे उर्फ ‘नाना शंकरशेट’.
- ‘द ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे’ (GIP) विषयी इतर माहिती :
- GIP रेल्वेमध्ये तेव्हा दोनच भारतीय होते, त्यातले एक जमशेटजी जिजिभोय आणि दुसरे होते, नाना शंकरशेट.
- या GIP रेल्वेच्या माध्यमातूनच भारतातील, नव्हे आशियातील पहिली रेल्वे मुंबईत धावली.
बॉंम्बे नेटिव्ह एज्युकेशन
भारतीय लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, यासाठी एल्फिन्स्टनने 1822 मध्ये हैंदशाळा व शाळापुस्तक मंडळी काढली, त्यांचे आधारस्तंभ नाना होते. यांनी ही पहिली शैक्षणिक संस्था स. का. छत्रे यांच्या साह्याने स्थापिली. पुढे हिचे 1824 मध्ये बॉंम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत रूपांतर झाले. शिक्षण प्रसारासाठी मुंबईत एका भारतीयाने स्थापन केलेली ही पहिलीच संस्था होती.
एल्फिन्स्टननंतर उच्च शिक्षणाच्या सोयीसाठी 4,43,901 रुपयांचा एल्फिन्स्टन फंड जमविण्यात आला. त्याचे नाना हे विश्वस्त राहिले. या संस्थेचे 1837 मध्ये एल्फिन्स्टन कॉलेज झाल्यावर तिला एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूट म्हणण्यात येऊ लागले.
बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना : 1856 मध्ये महाविद्यालय व विद्यालय पृथक झाले.आणि 1841 मध्ये बोर्ड ऑफ एज्युकेशनची स्थापना झाली. बोर्डातील तीन एतद्देशीय सभासदांत सतत सोळा वर्षे नाना निवडून आले.
जगन्नाथ शंकरशेठ यांची स्त्रियांसाठी केलेले कार्य
1823 साली ब्रिटिश पार्लमेंटकडे सती या अमानुष प्रथेवर बंदी आणण्यासाठी एक अर्ज केला गेला. त्यावर राजा राममोहन रॉय आणि नाना शंकरशेट यांच्या प्रामुख्यानं सह्या होत्या. पुढे म्हणजे 1829 साली ज्यावेळी सती चालीस बंदी घालणारा कायदा आणला गेला, त्यावेळी नाना शंकरशेट यांनी त्याला जाहीर पाठिंबा दिला होता. सर्वांना शिक्षण मिळाले पाहिजे, या तत्त्वावर स्त्रीशिक्षणास प्राधान्य दिले.
जस्टिस ऑफ द पीस साठी पुढाकार
ग्रॅंड ज्यूरीत भारतीयांचा समावेश व्हावा, तसेच जस्टिस ऑफ द पीस अधिकार भारतीयांस मिळावा, यासाठी त्यांनी खटपट केली व काही अधिकार मिळविले.
जगन्नाथ शंकरशेट यांनी स्थापन केलेल्या संस्था :
- 1845 : सर ग्रॅंटच्या मृत्यूनंतर ग्रॅंट मेडिकल कॉलेजची मध्ये स्थापना करून येथे आंग्ल वैद्यक-शिक्षणाची सोय केली
- 1848 : स्ट्यूडंट्स लिटररी व सायन्टिफिक सोसायटी
- 1849 : जगन्नाथ शंकरशेट मुलींची शाळा
- 1852 : बॉंबे असोसिएशन स्थापण्यात पुढाकार घेतला.
- 1855 : विधी महाविद्यालयाचा पाया घातला.
- 1857 : द जगन्नाथ शंकरशेट फर्स्ट ग्रेड ॲंग्लो व्हर्नाक्युलर स्कूल
- भारतीयांना कलाशिक्षण मिळावे, म्हणून सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला.
- जे.जे. हॉस्पिटलचा पाया घालून त्यांनी रुग्णसेवेस चालना दिली.
- बॉंबे स्टीम नेव्हिगेशन कंपनीची स्थापना केली.
जगन्नाथ शंकरशेठ यांनी भूषविलेली महत्वाची पद
- मॅजिस्ट्रेट : पहिले देशी मॅजिस्ट्रेट
- फेलो : मुंबई विद्यापीठ
- ट्रस्टी : बॉंम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी
- विश्वस्त : एल्फिन्स्टन फंड.
- संस्थापक अध्यक्ष : बॉंम्बे असोसिएशन
- संस्थापक : जगन्नाथ शंकरशेठ स्कुल, द मर्कंटाईल बॅंक ऑफ इंडिया
- संचालक/अध्यक्ष : बॉम्बे नेटिव्ह डिस्पेन्सरी (पहिला धर्मार्थ दवाखाना )
- अध्यक्ष : पोटसमिती (शिक्षण प्रसार समिती), डेव्हिड ससून रिफॉर्मेटरी इन्स्टिटयूट, हॉर्टिकल्चर सोसायटी, जिओग्राफिकल सोसायटी, बॉंम्बे स्टीम नेव्हिगेशन कंपनी, बादशाही नाट्यगृह,
- उपाध्यक्ष : स्कुल ऑफ इंडस्ट्रीज,
- आद्य संचालक : रेल्वे (मुंबई ते ठाणे पहिला रेल्वे प्रवास गोल्डन पासने)
- संचालक : बॅंक ऑफ वेस्टर्न इंडिया, कमर्शिअयल बॅंक ऑफ इंडिया
- संस्थापक सदस्य : जे. जे. आर्टस् कॉलेज
- सदस्य : बोर्ड ऑफ कॉन्झरवंसी, मुंबई विद्यापीठ व्यवस्थापक मंडळ, सिलेक्ट समिती (म्युनसिपल कायदा व बिल), बोर्ड ऑफ एज्युकेशन, नेटिव्ह स्कुल बुक सोसायटी, द इनलॅंड रेल्वे असोसिएशन
जगन्नाथ शंकरशेठ यांना मिळालेले सन्मान
- देशाच्या सर्वांगीण सुधारणेच्या साऱ्या चळवळींत पुढाकार घेणाऱ्या या थोर पुरुषाचा पुतळा जिजामाता बागेत उभारण्यासाठी लोकांनी स्वेच्छेने 25,000 रु जमविले होते.
- नानांच्या स्मरणार्थ मॅट्रिकला संस्कृत विषयात पहिला येणाऱ्या विद्यार्थास शंकरशेट शिष्यवृती देण्यात येऊ लागली.
- मुंबईतील सेंट्रल रेल्वे स्टेशन ला नाना शंकरशेठ यांचे नाव देण्यात आले आहे
जगन्नाथ शंकरशेठ यांच्याबद्दल इतर महत्वाची माहिती
- महानगरपालिकेत आयुक्त असताना त्यांनी आरोग्यव्यवस्था, विहिरी, तलाव वगैरे योजना अंमलात आणल्या. गॅंस कंपनी सुरू केली;
- धर्मार्थ दवाखाना काढून तसेच पुढे मुंबई-ठाणे रेल्वेचा प्रारंभ, नाटकांचे प्रेक्षागृह, सोनापूरच्या स्मशानभूमीचे रक्षण यासाठी तरतुदी केल्या
- नानांनी आईच्या स्मरणार्थ गोवालिया तलावाजवळ भवानी शंकर मंदिर व एक धर्मशाळा बांधली.
- मुंबई कायदे मंडळाच्या आरंभीच्या सभासदांत ते प्रमुख होते.
- 1861 साली तत्कालीन मुंबई प्रांताच्या विधिमंडळात नानांना स्थान मिळालं.
- 1962 साली ते तत्कालीन मुंबई प्रांताच्या गव्हर्नरचे सल्लागर म्हणूनही नियुक्त झाले.
- बॉम्बे म्युनिसिपल अॅक्ट तयार करण्यात नाना शंकरशेट यांनी योगदान दिलंय. याच कायद्यान्वये मुंबई महापालिकेची स्थापना झाली होती.
- 31 जुलै 1865 रोजी नाना शंकरशेट यांचं निधन झालं.
पुढे वाचा: