Jahirat Lekhan in Marathi: जाहिरात लेखन मराठी आजच्या स्पर्धात्मक युगात जाहिरातींना खूप महत्त्व आहे. जाहिरात म्हणजे उत्पादनाकडे सर्वांचे लक्ष वेधून घेणे. जाहिरात ही एक सर्जनशील कला आहे आणि त्यात प्रभुत्व मिळवणे हे एक कौशल्य आहे. एखाद्या उत्पादनाबद्दल लोकांच्या मनात रुची निर्माण करणे आणि त्याकडे लोकांचे लक्ष वेधून घेणे हा जाहिरातींचा मुख्य उद्देश असतो. तुमचे उत्पादन चांगले विकले जात आहे हे सांगण्याचा जाहिरात हा एक उत्तम मार्ग आहे. आजच्या संगणक आणि माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, इंटरनेट आणि मोबाईल फोनमधील क्रांतीमुळे जाहिरातींचा आवाका व्यापक झाला आहे.

जाहिरात लेखन मराठी-Jahirat Lekhan in Marathi
जाहिरात लेखन मराठी-Jahirat Lekhan in Marathi

जाहिरात लेखन मराठी – Jahirat Lekhan in Marathi – जाहिरात लेखन मराठी 9वी – जाहिरात लेखन मराठी 10वी – Jahirat Lekhan in Marathi 9th and 10th Class

जाहिरात लेखन प्रस्तावना

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेक वस्तू वापरतो. त्या वस्तू आपण निर्माण करीत नाही. म्हणून, आपल्या गरजेच्या वस्तूंसंबंधात आपल्याला पुढील माहिती हवी असते:

  1. आपल्याला हवी असलेली वस्तू कोण निर्माण करते?
  2. ती वस्तू आपल्या गरजा किती प्रमाणात भागवते?
  3. ती वस्तू कुठे मिळते?
  4. त्या वस्तूची किंमत काय?

वरील माहिती पुरवणारा मजकूर म्हणजे ‘जाहिरात’ होय. आपल्याला हव्या असलेल्या वस्तूची माहिती आपल्याला जाहिरातींमार्फत मिळते. म्हणजेच, जाहिरात आपल्याला हव्या असलेल्या वस्तूपर्यंत नेते म्हणजेच आपले लक्ष वेधून घेते. लोकांना हव्या असलेल्या वस्तू निर्माण करणारा तो निर्माता होय. निर्मात्याने वस्तू निर्माण केल्यावर ती वस्तू लोकांनी खरेदी करणे आवश्यक असते. म्हणून वरील माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी लागते.

वरील माहिती पुरवणाऱ्या मजकुराला जाहिरात म्हणतात. वस्तूचा निर्माता व ग्राहक यांना जोडून देण्याचे कार्य जाहिरात करते.

आपण निर्माण केलेली वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदी करावी, असे प्रत्येक निर्मात्याला वाटत असते. म्हणून जाहिरात आकर्षक करावी लागते.

तसेच, एकाच प्रकारची वस्तू निर्माण करणारे अनेक निर्माते असतात. अशा वेळी आपलीच वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांनी घ्यावी, असे प्रत्येक निर्मात्याला वाटत असते. म्हणूनही जाहिरात आकर्षक करावी लागते.

जाहिरात करण्याचे विविध मार्ग आहेत. मार्ग कोणताही असला, तरी प्रथम ती जाहिरात लिहून काढावीच लागते.

जाहिरातीची माध्यमे

  1. इंटरनेट
  2. चित्रपट
  3. वृत्तपत्रे
  4. मासिके
  5. आकाशवाणी
  6. दूरदर्शन
  7. चौकांमधील फलक
  8. गर्दीच्या ठिकाणी वाटली जाणारी पत्रके

जाहिरात तयार करताना घ्यायची काळजी

  1. जाहिरात तयार करताना प्रथम मथळा, उपमथळा तयार करावा.
  2. जाहिरात नेहमी कमीत कमी शब्दांत असावी.
  3. जाहिरातीची भाषा साधी, सोपी, पण वेधक असावी.
  4. जाहिरातीत व्यवहारातील भाषा वापरली तरी चालेल.
  5. जाहिरातीची भाषा क्लिष्ट, किचकट, बुद्धीला ताण दयायला लावणारी नसावी.
  6. जाहिरातीतील तपशिलामध्ये सुभाषिते, सुवचने, सुप्रसिद्ध गाण्याच्या ओळी, कवितेतल्या ओळी, काव्यमयतेचा आभास निर्माण करणाऱ्या ओळी, लोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले शब्दप्रयोग इत्यादींचा उपयोग करावा.
  7. समाजातील प्रचलित संकेत, लोकभावना यांना धक्का देणारी भाषा नसावी.
  8. जाहिरात ही वेचक, अर्थपूर्ण आणि प्रसन्नता निर्माण करणारी असावी.
  9. जाहिरात ही परिणामकारक आणि सुसंवाद साधणारी असावी.
  10. जाहिरातीत विनोदाची पखरण करता आल्यास उत्तम.
  11. जाहिरातीला चित्राची जोड देता आल्यास जाहिरात अधिक प्रभावी होते, हे खरे. मात्र जाहिरातलेखनात चित्रे काढणे किंवा चित्रकलात्मक सजावट करणे परीक्षेत अनिवार्य नाही.
  12. जाहिरातीचे भाषिक रूप महत्त्वाचे आहे. साध्या चौकटीमध्ये योग्य ओळींत केलेली मांडणीही पुरेशी असते.
  13. जाहिरातीमध्ये शक्य झाल्यास कंपनीची मुद्रा तयार करावी.
  14. जाहिरातीमध्ये कंपनीचे नाव व पत्ता ठळकपणे लिहावा.

जाहिरात लेखनाचे काही नमुने

प्रश्न १. पुढे दिलेल्या शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करा :

(१) शब्द : छत्री, रेनकोट, पाऊस.

उत्तर :

जाहिरात लेखन मराठी

(२) पुढील शब्दांचा आधार घेऊन आकर्षक जाहिरात तयार करा :
जाहिरात लेखन मराठी 2
जाहिरात लेखन मराठी

उत्तर :

जाहिरात लेखन मराठी 3
जाहिरात लेखन मराठी

(३) पुढे दिलेल्या वाक्यावरून जाहिरातलेखन करा :

उत्तम आरोग्य हाच खरा दागिना

उत्तर :

जाहिरात लेखन मराठी 4
जाहिरात लेखन मराठी

प्रश्न २. पुढील जाहिरात वाचून त्याखालील कृती करा :

जाहिरात लेखन मराठी
जाहिरात लेखन मराठी
(अ) कृती करा :
जाहिरात लेखन मराठी 6
जाहिरात लेखन मराठी

उत्तर :

जाहिरात लेखन मराठी 8
जाहिरात लेखन मराठी
(आ) शब्दजाल पूर्ण करा :
जाहिरात लेखन मराठी
जाहिरात लेखन मराठी

उत्तर :

जाहिरात लेखन मराठी 9
जाहिरात लेखन मराठी

जाहिरात लेखन मराठी – Jahirat Lekhan in Marathi – जाहिरात लेखन मराठी 9वी – जाहिरात लेखन मराठी 10वी – Jahirat Lekhan in Marathi 9th and 10th Class

पुढे वाचा:

प्रश्न १: सोशल मीडिया जाहिरात म्हणजे काय?

उत्तर – सोशल मीडिया जाहिरातींमध्ये फेसबुक, लिंक्डइन, इंस्टाग्राम, ट्विटर इ. सारख्या विविध सोशल मीडिया चॅनेलवर सशुल्क जाहिराती चालवणे समाविष्ट असते. यामध्ये बॅनर जाहिराती तसेच पोस्ट किंवा मोहिमा सारख्या क्रियाकलापांचा समावेश असू शकतो.

प्रश्न २: जाहिरातीची तीन मुख्य उद्दिष्टे कोणती?

उत्तर – जाहिरातीचे तीन प्राथमिक उद्दिष्टे असतात: माहिती देणे, ग्राहक मिळवणे आणि आठवण करून देणे. माहितीपूर्ण जाहिराती ब्रँड, उत्पादने, सेवा आणि जागरूकता निर्माण करतात.

This Post Has One Comment

  1. Kadam

    Please do a जाहिरात on थंडी साठी उपलब्ध वस्तू

Leave a Reply