सैराट चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेले. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला चित्रपट कसा बनवायचा याचा एक मापदंड घालून दिला. नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाने एक वेगळीच उंची गाठली.

हा चित्रपट देश-विदेशात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला. परदेशातही या चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटात अभिनेत्री रिंकू राजगुरूलाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. चित्रपटाने चांगला व्यवसाय केला.

पुढे या चित्रपटाचा हिंदीतही धडक नावाने रिमेक करण्यात आला. या चित्रपटात श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर दिसली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. सैराट चित्रपटानंतर आर्चीला चांगल्या ऑफर्स येऊ लागल्या.

रिंकू राजगुरूचा जन्म 3 जून 2001 रोजी महाराष्ट्रातील अकलूजू शहरात झाला. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांना सातव्या वर्गात एका कार्यक्रमात पाहिले. त्यानंतर त्याने वडिलांना म्हणजेच महादेव राजगुरू यांना रिंकूच्या चित्रपटात काम करण्याबद्दल विचारले. त्यानंतर राजगुरू यांनी मंजुळे यांना होकार दिला. यानंतर सैराट चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली.

rinku rajguru

Leave a Reply