शंकरराव भावराव चव्हाण (14 जुलै 1920 – 26 फेब्रुवारी 2004) हे भारतीय राजकारणी होते ज्यांनी 1975 ते 1977 पर्यंत आणि 13 मार्च 1986 ते 26 जून 1988 पर्यंत दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. ते 1988 ते 1989 पर्यंत भारताचे अर्थमंत्री होते आणि 21 जून 1991 ते 16 मे 1996 पर्यंत त्यांनी पी व्ही नरसिंह राव मंत्रिमंडळात भारताचे गृहमंत्री म्हणून काम केले. शंकरराव भाऊराव चव्हाण 31 डिसेंबर 1984 ते 12 मार्च 1986 राजीव गांधी मंत्रिमंडळात त्यांनी भारताचे गृहमंत्री म्हणून काम केले.

शंकरराव भाऊराव चव्हाण माहिती मराठी-Shankarrao Bhaurao Chavan Information in Marathi
शंकरराव भाऊराव चव्हाण माहिती मराठी-Shankarrao Bhaurao Chavan Information in Marathi

शंकरराव भाऊराव चव्हाण माहिती मराठी – Shankarrao Bhaurao Chavan Information in Marathi

(पाचवे व चौदावे बारावे मुख्यमंत्री)

  • पूर्ण नाव : शंकरराव भाऊराव चव्हाण
  • जन्म : १४ जुलै १९२०
  • मृत्यू : २६ फेब्रुवारी २००४
  • कार्यकाल : २१ फेब्रुवारी १९७५ ते १६ एप्रिल १९७७

जन्म : शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे ५ वे व १३ वे मुख्यमंत्री होते. शंकरराव चव्हाण यांचा जन्म १४ जुलै १९२० रोजी पैठण, जि. औरंगाबाद येथे १४ मार्च १९८९ ते २४ जून १९८८ झाला.

शिक्षण : ते मद्रास विश्वविद्यालयातून (Bachelor of Arts ) पदवीधर झाले. तसेच उस्मानिया विश्वविद्यालयातून त्यांनी L.L.B. ही पदवी प्राप्त केली.

राजकीय कारकीर्द : ते सर्व प्रथम धर्माबाद मतदारसंघातून आमदार म्हणून १९५७ साली निवडून आले. १९६२ मध्ये लोकसभा निवडणुकीत ते धर्माबाद येथून खासदार म्हणून निवडून आले. तसेच भोकर मतदारसंघातून १९६७,१९७२ व १९७८ साली तीन वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची दोन वेळा निवड झाली. २१ फेब्रुवारी १९७५ ते १६ एप्रिल १९७७ मध्ये ते महाराष्ट्राचे पाचवे मुख्यमंत्री झाले. नंतर ७ मार्च ७८ ते १७ जूलै १९७८ मध्ये सातवे मुख्यमंत्री तर १४ मार्च १९८६ ते २४ ९ जून १९८८ मध्ये १४ वे मुख्यमंत्री म्हणून निवडले गेले.

त्यांनी आपल्या कारकीर्दीत पाटबंधारे प्रकल्पाच्या उभारणीत फार मोलाचे योगदान दिले. जायकवाडी प्रकल्प, विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प, उजनी, इसापूर पैनगंगा, अप्पर मांजरा प्रकल्प, कापूस एकाधिकार योजना, ऊर्दू अकादमीची स्थापना, गृहनिर्माण मंडळ, आदिवासी आश्रमशाळा इ. त्यांच्या कारकीर्दीतील केंद्र सरकारमध्येसुद्धा त्यांनी शिक्षण व सांस्कृतिक मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षण मंत्री अशी पदे भूषविली..

मृत्यू : वयाच्या ८३ व्या वर्षी २६ फेब्रुवारी २००४ या दिवशी वार्धक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

शंकरराव भाऊराव चव्हाण माहिती मराठी – Shankarrao Bhaurao Chavan Information in Marathi

Leave a Reply