शरद पवार ग्रामसमृद्धी योजना माहिती – Sharad Pawar Gram Samridhi Yojana Marathi
सुरुवात | 9 डिसेंबर 2020 |
द्वारे | महाराष्ट्र राज्य सरकार |
संयोजन | महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून |
मुख्य उद्देश | 2022 पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे. ग्रामपंचायती समृद्ध करणे. |
शरद पवार ग्रामसमृद्धी या योजनेची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे
मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या ध्येयासाठी वैयक्तिक लाभाच्या चार योजना ‘शरद पवार ग्रामसमृद्धी‘ योजनेंतर्गत राबविण्यात येणार.
- गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे.
- शेळीपालन शेड बांधणे.
- कुकुटपालन शेड बांधणे.
- भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग.
1) गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे
स्वत:ची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील. एका गोठ्यासाठी 77 हजार 188 रुपये खर्च येईल. दोन ते सहा गुरांसाठी एक गोठा व त्यानंतर अधिक गुरासाठी सहाच्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट आणि 18 गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट अनुदान देय राहील.
2) शेळीपालन शेड बांधणे
किमान दोन शेळ्या असलेल्या भूमीहीन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देता येऊ शकेल. एका कुटुंबास जास्तीत जास्त 30 शेळ्यासाठी तिप्पट अनुदान मंजूर करण्यात येईल.
3) कुक्कुटपालन शेड बांधणे
100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थीना पक्ष्याची संख्या 150 च्या वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. निवारा चांगला नसल्याने कुक्कुट पक्षांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते. यासाठी प्रत्येक शेडला 49 हजार 760 रुपये खर्च अपेक्षित आहे.
4) भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग
शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगद्वारे प्रक्रिया केल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात भर पडते. याकरिता शेतात एक नाडेप बांधण्यासाठीची ही योजना आहे. या नाडेपमध्ये सेंद्रीय पदार्थ, कचरा, शेणमाती आणि मातीचे एकावर एक थर रचले जातात. दोन-तीन महिन्यात काळपट तपकिरी, भुसभुसीत, मऊ, दुर्गंधी विरहीत कंपोस्ट तयार होते, या नाडेपच्या बांधकामासाठी 10 हजार 537 रुपये खर्च अपेक्षित आहे.
- मिशन कर्मयोगी योजना माहिती मराठी
- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मराठी
- आयुष्मान सहकार योजना माहिती मराठी
- भारताचा GDP किती आहे
- जगातील सर्वात लहान देश कोणता आहे
- भारताची राजधानी कोणती आहे
- जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे?
- भारतात किती धर्म आहेत 2021
- भारतात किती राज्य आहेत 2021
- भारताच्या सीमेवरील देशांची नावे आणि राजधानी
- घड्याळाचा शोध कोणी लावला आणि कधी