योगाचे फायदे : ज्यांना पूर्वी संक्रामक (Infection) रोग होतो, अशा 408 योगधारकांचे रोगाबाबत संशोधन केले असता त्यापैकी 70 टक्के योगसाधकांनी असे सांगितले की, अशा रोगांचे प्रमाण योगधारणेमुळे हळूहळू कमी झाले. यावरून योगधारकांची प्रतिकारशक्ती वाढून तिचा आरोग्यवाढीसाठी उपयोग झाल्याचे दिसून येते.
ज्यांना अॅलर्जी आहे अशा 156 रोग्यांच्या योगधारणकाळात संशोधन केले असता असे आढळले की, शेकडा 56 टक्के साधकातील अॅलर्जी पुष्कळच कमी झाली अथवा ती पूर्णपणे थांबली.
दातांची रोगप्रतिकारशक्ती वाढते, योगाचा अभ्यास करण्यापूर्वी हिरड्या सुजणाऱ्या 46 मनुष्यांच्या हिरड्यांची वैद्यकीय तपासणी केली. तशीच त्यांची तपासणी 25 दिवसांच्या योगधारणकालानंतर केली. त्यात असे आढळले की, योगाभ्यासामुळे हिरड्यांचे सुजणे तर कमी झालेच; पण दातांनासुद्धा एक प्रकारची बळकटी आली.
योगाचे फायदे – Yoga che Fayde
Table of Contents
50-60 वर्षांपूर्वी माणसांचे जीवन जवळ-जवळ निसर्गावरच अवलंबून होते. त्याच्या चहूबाजूला निसर्गच निसर्ग होता; पण पुढे काही वर्षांत औद्योगिकीकरणाने माणसाच्या जीवनात प्रवेश केला, आणि त्यांनी माणसाच्या जीवनात प्रचंड प्रमाणात बदल घडवून आणले. औद्योगिकीकरणाने माणसाचे जीवन प्रचंड गतिमान झाले.
आज तर हे जीवन एवढे गतिमान झाले आहे की, ताशी 120 कि. मी. पळणारी गाडीही त्याला अपुरी वाटत आहे. या बदलाने माणसाच्या जीवनात आमुलाग्र बदल घडला आहे. त्याचे जीवन पूर्वीपेक्षा कितीतरी समृद्ध झाले आहे. संपर्काच्या विविध साधनांनी जगातील सर्व लोक अतिनिकट आले आहेत. वैद्यकशास्त्रातील संशोधनाने जवळ-जवळ मृत माणूस जिवंत करण्याची क्षमता प्राप्त केली आहे.
औद्योगिकीकरणाचे चांगले परिणाम जसे माणसाच्या जीवनावर झाले, तसेच काही वाईट परिणामही माणसाच्या जीवनावर झाले आहेत. ते म्हणजे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण झाले, खाद्यपदार्थांत भेसळीचे प्रमाण वाढले असून, कोणतीही वस्तू गावरान व शुद्ध स्वरूपात मिळणे दुर्मिळ झाले आहे. या बरोबरच माणसाला संपत्ती जमा करण्याची लालसा निर्माण झाली. त्यासाठी तो सर्व शक्ती पणाला लावून भल्या-बुऱ्या मार्गांचा अवलंब करून आपले हे कार्य अव्याहतपणे करत आहे. यातूनच त्याचे जीवन यंत्रवत झाले आहे.
प्रलोभनाच्या पाठीमागे तो प्रचंड गतीने पळत आहे. तो एवढ्या गतीने पळतो आहे की, त्याचे आपल्या शरीराकडे अजिबात लक्ष नाही. ‘जान है तो जहाँ है’ हे तो संपूर्णपणे विसरून गेला. आपल्या आरोग्याविषयी त्याला थोडीही काळजी वाटत नाही, की आपण आपल्या उत्तम आरोग्यासाठी वेळ दिला पाहिजे याचीही त्याला जाणीव नाही.
परिणामी माणसाचे जीवन दिवसेंदिवस दु:खी होत चालले आहे. त्याला चांगली भूक लागत नाही. झोपेकरिता गोळ्या खाव्या लागत आहेत. पोट साफ ठेवण्यासाठी रेचक घ्यावे लागत आहे. मानसिक ताण कमी करण्याकरिता विविध व्यसनांचा अवलंब करावा लागत आहे. या सगळ्यांचा दुष्परिणाम म्हणून दिवसेंदिवस माणसाचे आयुष्य कमी होत चालले आहे.
दिवसेंदिवस माणसाला जे विविध व नवनवीन आजार होत आहेत. त्यापासून आपण स्वत:ला वाचवू शकतो. दैनंदिन जीवनातील फक्त अर्धा तास जर आरोग्यासाठी दिला, तर या सगळ्या व्याधींपासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. या अर्ध्या तासात आपण योगासने केली पाहिजेत, कारण या धकाधकीच्या आणि मानसिक ताणतणावाच्या जगात ‘योग’ हाच एक आशेचा किरण मानव जातीला तारणारा आहे.
‘योग’ हा संस्कृत शब्द असून, तो ‘युज’ धातूपासून बनला आहे. ‘युज’ म्हणजे जोडणे. योग हा मन आणि शरीराला जोडतो. मनाचे आपल्या शरीराबाहेर मिलन करतो, ज्यामुळे माणूस मनो-शारीरिक आरोग्याची वाढ करू शकतो. त्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक मार्गाचे योग हे एक शास्त्र आहे.
योगशास्त्र हे इतक्या उत्कृष्ट रीतीने रचनाबद्ध केलेले आहे की, ते मानवी शरीर व मनावर सुयोग्य परिणाम घडवून आणते. शरीर व मनाच्या जडणघडणीचे सर्व बारकावे लक्षात घेऊन योगशास्त्रात विविध प्रकारच्या अवस्थांचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. योगिक प्रक्रियांचा शरीरातील महत्त्वाची इंद्रिये व संस्थांवर अधिकाधिक परिणाम होतो. त्यामुळे दररोज जर माणसाने योगासने केली तर त्याला नानविध स्वरूपाचे फायदे मिळतात.
जसे दररोज योगासने केल्याने कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी इ. दुखण्यावर आराम मिळतो. त्याप्रमाणेच पोटावरील चरबी कमी होऊन कंबर आकर्षक बनते. पायाच्या पोटरीच्या दोन्ही बाजूंची चरबी कमी होते. सुरकुत्या पडणे व केस पांढरे होणे, गळणे थांबते. स्मरणशक्ती वाढते. पुरुष व स्त्रियाच्या लैंगिक आजारांवर फायदा होतो. यौवन रोग दूर होतो. स्त्रियांच्या मासिक पाळीच्या रोगात फायदा होतो.
श्वसनसंस्था व फुफ्फुसाच्या त्रासातून मुक्ती मिळते. पचनशक्ती तीव्र होऊन जेवण लवकर पचते. गॅस होत नाही व पोटाच्या इतर रोगांत फायदा होतो. दमा व खोकला दूर होतो. संपूर्ण शरीराच्या पेशींना शक्ती व स्फूर्ती मिळते. या सगळ्याचा फायदा असा होतो की, माणसाला मानसिक शांती लाभून रक्ताभिसरण सुरळीत होते. संपूर्ण शरीर हलके व ताजेतवाने होते. मानसिक तणाव नष्ट होऊन माणसाच्या शरीरात नवचैतन्य येते.
योगासनाचे विविध फायदे असले तरी योगासने करण्याचे काही नियम आहेत. योगासने हे त्या पद्धतीने झाले तरच त्याचे मोठ्या प्रमाणात फायदे मिळतात.
योगासने स्वच्छ, शांत, ऑक्सिजनयुक्त वातावरणात जमिनीवर सतरंजी किंवा मऊ अंथरूण टाकून करावीत. योगासने आपल्याला दैनंदिन कामे पार पाडण्यासाठी ऑक्सिजन पुरवतात आणि उत्साह वाढवितात. दिवसातला थोडासा वेळ आपल्या शरीरासाठी आपण दिला तर दिवसभर ताजेतवाने राहण्यास आपल्याला मदत मिळते.
Yoga Benefits in Marathi
1) व्यक्तीची चिंता वृत्ती कमी होते
तुलनात्मकद़ृष्टीने योगाभ्यासी आणि अयोगाभ्यासी यांचा संशोधनात्मक अभ्यास केला असता आणि हा अभ्यास मानसिक विश्लेषणात्मक शास्त्राने केला असता असे आढळले की, योगाभ्यासी व्यक्तीमध्ये असणारी चिंता ही अगदी झपाट्याने दूर होत गेली. यात असे आढळून आले की, योगाभ्यासापूर्वी ज्यांच्या चिंता त्यांना फार मोठ्या वाटत होत्या, त्या योगसाधनेनंतर हळूहळू उतरत्या क्रमाने कमी कमी होत गेल्या.
2) मानसिक आरोग्यात वाढ
योगसाधनेमुळे रोग्याच्या मानसिक प्रक्रियेत फार मोठा चांगला फरक आढळून आला. ज्यांनी पुष्कळ दिवस ध्यानधारणा केली, त्यांच्यातील चिडचिडेपणा व चेतनी रुग्णावस्था यांची पातळी पुष्कळच खाली आल्याचे आढळले.
3) समतोल वजनाचा लाभ
जास्त वजन असलेल्या योगसाधकाचे वजन कमी कमी होत असल्याचे आढळले. ज्याचे वजन समतोल आहे म्हणजे जास्त पण नाही व कमी पण नाही अशा योगसाधकाचे वजन स्थिरच राहिले.
ज्यांचे वजन कमी आहे त्यांचे वजन वाढून ते समतोल होत असल्याचे आढळले.
यावरून योगसाधकाच्या वजनाचा कल प्रमाणबद्ध होऊन आरोग्य चांगले राहते व आयुष्य वाढत असल्याचे दिसून आले.
4) दमा हटविता येतो
योगाभ्यासाचा दम्यावर सुपरिणाम होत असल्याचे संशोधनानंतर प्रत्ययास आले. शेकडा 94 टक्के दमेकऱ्यात योगाभ्यासाने दमेकर्यांच्या श्वासनलिकेत सुधारणा झाल्याचे आढळले. याकरिता ‘फिजिऑलिजिकल मेजरमेंट ऑफ एअरवे रेझिस्टन’ या पद्धतीचा उपयोग करून संशोधन केले. या 94 टक्क्यांत सर्व जरी योगाभ्यासी होते तरी पण दम्याचा विकार असल्यामुळे वैद्यकीय सल्ला पण घेत होते. या वैद्यकीय सल्ल्यानुसार शेकडा 61 टक्के लोकांत त्यांच्या डॉक्टरांनी योगामुळे सुधारणा झाली अशी ग्वाही दिली. ही ग्वाही या दमेकरी योगाभ्यासी व्यक्तींनी मान्यही केली.
श्वासनलिकेतील ही 94 टक्के सुधारणा असे दर्शविते की, वैद्यकीयद़ृष्ट्या योगात औषधाशिवाय दमा बरा करण्याची किती शक्ती आहे हे दिसून येते.
5) योगाभ्यासाने रक्तदाबावर नियंत्रण
याबाबत बऱ्याच व्यक्तींवर प्रयोग करण्यात आले. अगदी हळव्या मनाच्या रुग्णांवर 1119 वेळा प्रयोग योगाभ्यासापूर्वी व नंतरही केला असता असे आढळून आले की, योगाभ्यासानंतर रुग्णाचा रक्तदाब विकार कमी झाला. याचे चिकित्सालयीन मूल्यांकन केले असता हळव्या मनाच्या रुग्णाला ध्यानधारणा फलदायी होऊ शकते. याचा आलेख पुढीलप्रमाणे.
ध्यानपूर्व सिस्टॉलिक रक्तदाब 150 आणि डायस्टॉलिक रक्तदाब 80 होता; पण 63 महिन्यांच्या ध्यानधारणेनंतर ते प्रमाण सिस्टॉलिक रक्तदाब 145 आणि डायस्टॉलिक रक्तदाब 40 वर आले.
6) निद्रानाशावर रामबाण उपाय योगधारणा
निद्रानाशावर योगधारणा ही एक चांगली उपचार पद्धती आहे, असे संशोधनांती आढळून आले, ही पद्धत अगदी साधी व तत्काळ गुणदायी, स्थिर आणि प्रतिकूल परिणामविरहित अशी आहे.
याबाबतच्या संशोधनात योगधारणेपूर्वी निद्रानाशवाल्याचे 30 दिवस अगोदर निरीक्षण केले असता असे आढळण्यात आले की, त्याला निद्राधीन होण्यास प्रथमत: 75 मिनिटे वाट पाहावी लागत असे; पण तीस दिवसांच्या ध्यान-धारणकालानंतर हा निद्राधीन होण्याचा काळ 15 मिनिटांवर आला.
शास्त्रीय प्रयोगात असे आढळून आले की, योगामुळे मिळालेली विश्रांती पाच तास झोपेपासून मिळालेल्या विश्रांतीच्या दुप्पट असते. विश्रांतीमुळे थकवा, शारीरिक व मानसिक ताण कमी होतो.
7) सतेज बुद्धिमत्तेसाठी योग सराव
योगधारणेचा हायस्कूलमधील मुलांवर काय परिणाम होतो याबाबतीत हॉलंडमध्ये हायस्कूलच्या विद्यार्थ्यांवर योगधारणेचा प्रयोग एक वर्षापर्यंत केला असता प्रयोगांती असे आढळले की, जो विद्यार्थी नियमितपणे ध्यानधारणा करीत होता त्या योगधारक विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची इतर अयोगी विद्यार्थ्यांबरोबर तुलना केली असता असे आढळले की, योगधारक विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेत डोळ्यात भरण्याजोगी वाढ झालेली आढळली.
8) परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद येते
माणसाला जीवनामध्ये निरनिराळ्या परिस्थितीतून जावे लागते. एखाद्याचे घर मोठ्या रस्त्यावर अगर रेल्वेजवळ असते. सतत रेल्वेची खडखड आणि ट्रकचा आवाज सुरू असतो. सुरुवातीला त्रास होतो; पण मग सवय होते. सवय म्हणजे अशा त्रासापासून मज्जासंस्थेचे संरक्षण. तर एक प्रयोग केला. मुद्दाम सतत आवाज चालू ठेवला. तेव्हा असे आढळून आले की, योगाचा अभ्यास करणार्यांना त्याची सवय लवकर झाली. इतरांना बराच वेळ लागला.
ध्यानाचा परिणाम दयावर असा होतो की, ध्यानानंतरसुद्धा एक प्रकारची मानसिक शांतता प्रतीत होत असते आणि हीच शांतता हळूहळू दयाच्या पडणाऱ्या ठोक्यांचे प्रमाण कमी कमी करून त्यात चिरकालीन उपकारक क्षीणता आणते. यामुळे दयाचा वापर कमी प्रमाणात केला जातो आणि त्यामुळे साधकाच्या रक्तवाहिन्यांची क्षमता वाढते. असाधकाच्या दयस्पंदनाचे ठोके 80 च्या जवळपास असतात; पण साधकाचे या स्पंदनाचे प्रमाण 65 ते 70 च्या दरम्यान असते.
ध्यानधारणेमुळे दयाचे ठोके जसे कमी होतात त्याचप्रमाणे ध्यानाचा परिणाम श्वसनक्रियेवरही होत असतो. ध्यानधारणेतील श्वसनक्रिया अगदी मंद असल्यामुळे शरीराला पूर्ण विश्रांती लाभते. सर्वसाधारण मनुष्याची श्वसनक्रिया विश्रांतीपूर्व, विश्रांतीत अथवा विश्रांतीनंतर 15 ते 16 च्या आसपास असते; पण साधकाची ही क्रिया 13 च्या आसपास घोटाळत असते.
आसन, प्राणायाम व ध्यान यांच्या संयुक्त अभ्यासामुळे रोगी व निरोगी व्यक्तींना आरोग्यद़ृष्ट्या पुढील लाभ होतात. मेंदूतील शक्तीत व सुव्यवस्थितपणात वाढ होते. दयस्पंदनाच्या व रक्तवाहिन्यांच्या कामात सुसूत्रता येते व रक्तदाब निश्चितपणे कमी होतो.
श्वासोच्छ्वासाच्या क्रियेतील कार्यक्षमता वाढते.
स्वायत्त मज्जातंतूच्या कार्यक्षमतेत वाढ होते.
शीतोष्णादी द्वंद्वांचे आघात लागत नाहीत म्हणजेच त्वचेला सहन करण्यासाठी शक्ती उत्पन्न होते. त्वचा तिप्पट आघात सहन करू शकते. शरीरातील इंद्रियांना आणि अंत:स्त्रावी ग्रंथींना योग्य व्यायाम मिळतो.
व्यसनांचे आकर्षण राहत नाही. शरीर आणि मनाचा समन्वय साधतो.
योगाभ्यासी व्यक्ती सुखामुळे हुरळून जात नाही किंवा दु:खामुळे नेहमीच्या जीवनात उगीचच काळजी करण्याची सवय असते, ती नाहीशी होते.
वैचारिक निर्णय स्पष्टपणे घेतले जातात. मनाचा गोंधळ होत नाही.
अजून वाचा: