अन्नामधून विषबाधा, रक्तदाबाचे झटके, मधुमेहाचे झटके, आणि हृदयविकाराचे झटके यांसाठी प्रथमोपचार
अन्नामधून विषबाधा, रक्तदाबाचे झटके, मधुमेहाचे झटके, आणि हृदयविकाराचे झटके यांसाठी प्रथमोपचार

अन्नामधून विषबाधा प्रथमोपचार

खराब, दूषित अन्न ग्रहण केल्यामुळे, चुकून (किंवा मुद्दाम) एखादे विषारी रसायन पोटात गेल्यास, विषबाधा होते. विषबाधेचा रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो. परंतु ती विषबाधा लवकरात लवकर लक्षात येणे गरजेचे असते. कधीकधी रुग्ण बेशुद्ध पडतो. अशा वेळी तोंडावर पाणी शिंपडणे, तसेच मागील भागात पाहिलेल्या कृत्रिम श्वासोच्छवासापैकी एखादी पद्धत वापरून त्याला शुद्धीवर आणता येते.

रुग्ण शुद्धीवर असेल आणि त्याला आपोआप उलट्या होत असतील तर करू द्याव्यात. परंतु जबरदस्तीने त्याला खायला किंवा प्यायला देऊन उलटी करवण्याचा प्रयत्न अजिबात करू नये ! अशी जबरदस्ती केल्यास विष फुप्फुसात जाऊन मोठी गुंतागुंत निर्माण होते आणि रुग्णाचा जीव जातो. विषबाधेच्या रुग्णाला कधीही खाऊपिऊ देऊ नये. आणि शक्य तितक्या लवकर हॉस्पिटलमध्ये न्यावे.

रक्तदाबाचे झटके प्रथमोपचार

बऱ्याच वेळा कमी रक्तदाबाच्या रुग्णाला अचानक रक्तदाब कमी झाल्यामुळे चक्कर येऊन बेशुद्धावस्था येते. अशा वेळी शुद्धीवर आणण्याचे सर्व उपाय करून तो शुद्धीवर आल्यानंतर त्याला मोकळ्या हवेत बसवावे. एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा मीठ विरघळून ते पाणी पिण्यास द्यावे. रुग्ण थोडा स्तिरावल्यानंतर त्याला डॉक्टर कडे न्यावे. उच्च रक्तदाबाच्या रुग्णाला कधीही मीठ देऊ नये.

मधुमेहाचे झटके प्रथमोपचार

मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक कमी झाल्यास कमजोरी येते. त्यामुळे चक्कर येऊन कधीकधी माणूस बेशुद्ध होतो. साखर जास्त झाल्यास माणूस बेशुद्ध होत नाही. मधुमेहाच्या झटक्यामुळे बेशुद्ध झालेल्या रुग्णाला शुद्धीवर आणल्यानंतर त्याला एक ग्लास पाण्यात दोन चमचे साखर विरघळून ते पाणी पिण्यास द्यावे. रुग्ण स्थिरावल्यानंतर डॉक्टरकडे न्यावे. 

हृदयविकाराचे झटके प्रथमोपचार

Heart Attack हृदयविकाराचा झटका कधीही अचानक येत नाही. त्या आधी रक्तातील कोलेस्टेरॉल चे प्रमाण वाढलेले असते. किंवा रक्तदाब खूप असतो. परंतु वेळोवेळी मेडिकल चेकअप न केल्यामुळे लक्षात येत नाही. हृदयविकाराचा झटका येणार असेल तर एकदोन दिवस आधी दावा हात कोणतेही कारण नसताना सतत दुखत राहतो. याकडे वेळेत लक्ष दिले तर हृदयविकाराचा झटका टाळता येतो.

जर एखाद्याला झटका आलाच तर काय करावे?

सर्वात महत्वाचे म्हणजे घाबरून जाऊन त्याला घाबरवू नये. रुग्णाला एका जागी बसवावे. त्याला दीर्घ श्वास घेण्यास सांगावे. वेदना होत असल्यास छातीवर हलक्या हाताने मसाज करावे. परंतु दीर्घ श्वास थांबवू नये. पहिल्या दहा मिनिटात दीर्घ श्वास घेत राहिल्यास जीवावरचा धोका टाळण्यास मदत होते. लक्षात ठेवा, हा फक्त प्रथमोपचार आहे, रुग्णाला डॉक्टरकडे नेणे गरजेचे आहे. क्वचितप्रसंगी रुग्ण बेशुद्ध होतो. अशा वेळी शुद्धीवर आणण्याच्या प्रयत्नांसोबतच रुग्णवाहिका त्वरित बोलवावी. हृदयविकाराच्या झटक्यात शक्य तितके लवकर उपचार घ्यावेत.

हार्ट अटॅक नंतरची ती दहा मिनिटे

कार्डियाक अरेस्ट, म्हणजेच हार्ट अटॅक आल्यानंतर सर्वांची घाबरगुंडी उडते. पहिली दहा मिनिटे अत्यंत महत्वाची असतात. वेदना कमी करणं आणि जीव वाचवणं दोन्ही करायचं असतं. मेजर अटॅक आल्यानंतर हॉस्पिटल मध्ये नेईपर्यंत रुग्ण दगावण्याच्या घटना अनेक वेळा होतात. दीर्घ श्वास, छातीवर हलका मसाज, याव्यतिरीक्त असा काही उपाय असेल तर, ज्याने हमखास जीव वाचेल?

आहे ! असा उपाय आहे. हार्ट अटॅक आल्यानंतर दहा मिनिटांत ऍस्पिरिन ची 300 एमजी ची टॅबलेट घेतल्यास रुग्णाचे प्राण हमखास वाचतात. हेच काम सॉर्बिट्रेट ची टॅबलेट सुद्धा करते. या गोळ्या रक्त पातळ करतात. त्यामुळे ब्लॉकेज चा त्रास कमी होतो. जीव वाचल्यामुळे पुढचे इलाज करता येतात.

सर्वांनी आपल्या घरात ऍस्पिरिन किंवा सॉर्बिट्रेट टॅबलेट ठेवावी. हा जीव वाचवण्याचा हमखास उपाय आहे.

अजून वाचा: कापणे आणि भाजणे यासाठी प्रथमोपचार

अल्सर म्हणजे काय? | Ulcer Mhanje Kay

सोरायसिस म्हणजे काय? | Psoriasis Mhanje Kay

डायलिसिस म्हणजे काय? | Dialysis Mhanje Kay

PCOS म्हणजे काय? | PCOS Mhanje kay

Leave a Reply