उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी : जर आपल्याला उन्हाळ्याच्या काळात त्वचेची चमक कायम ठेवायची असेल तर हे ५ नियम कधीही विसरू नका.

उन्हाळ्यात त्वचेची अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक असते. पण आपल्या धावत्या जीवनात आपण आपल्या त्वचेकडे लक्षच देऊ शकत नाही, याचा परिणाम म्हणजे आपली त्वचा निस्तेज, निर्जीव दिसू लागते. अशा परिस्थितीत जर आपण दररोज काही मिनिटांसाठी आपल्या त्वचेची योग्य काळजी घेतली तर उन्हाळयातही आपली त्वचा चमकत राहील. त्या अत्यावश्यक बाबींविषयी जाणून घेऊया, ज्यांचा अवलंब करून आपण या उन्हाळयात ताजी/टवटवीत त्वचा मिळवू शकता.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी | Skin Tips in Marathi

उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी
उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी

1. नवी सुरुवात

असे म्हटले जाते की जर सकाळी आपल्या त्वचेत ताजेपणा जाणवत असेल तर आपल्याला स्वतःला ताजेतवाने तर वाटतेच शिवाय आपला आत्मविश्वासही वाढतो. आपण अधिक उत्साही होऊन कार्य करू शकता. यासाठी आपण आपल्या सकाळच्या त्वचेची काळजी घेण्याच्या नित्यक्रमात अयूरचा बॉडी वॉश सामील करणे आवश्यक आहे. यामुळे त्वचेवर जी काही धूळ-मातीमुळे घाण जमा होते, ती निघून जाऊन आपल्या त्वचेला मऊपणा जाणवू लागेल. याव्यतिरिक्त हे त्वचेचे नैसर्गिक तेल राखण्यासाठी देखील कार्य करेल. ज्यामुळे त्वचेवरील नैसर्गिक मॉश्चरायझरदेखील संतलित राहील.

2. मॉइश्चराइझ करणे आवश्यक आहे

अनेक स्त्रियांना ही समस्या उद्भवते की अंघोळ केल्यावर त्यांची त्वचा कोरडी होण्यास सुरवात होते. यामागचे कारण असे आहे की त्यांना त्वचेला मॉइश्चरायझेशन करणे आवश्यक वाटत नाही, ज्यामुळे त्वचा ताणली गेलेली आणि कोरडी जाणवते. ज्यामुळे त्यांना दिवसभर अस्वस्थता जाणवते. यासाठी आपण स्नान केल्यानंतर आपल्या त्वचेला अवश्य व्यवस्थितपणे मॉइश्चराइझ करणे महत्वाचे आहे. हे देखील लक्षात ठेवा की आपण जे काही मॉइश्चरायझर निवडाल ते नैसर्गिक घटकांचे बनलेले असावे कारण यामुळे त्वचेला भरपूर फायदा होतो. प्रयत्न करा की आपल्या मॉइश्चरायझरमध्ये गुलाब, कोरफड आणि काकडीसारखे घटक असावेत, जे उन्हाळयात त्वचेला थंड प्रभाव देण्याबरोबरच त्वचेला टॅनिंग आणि डलनेसपासूनदेखील संरक्षण देते. तर रसायने असलेली उत्पादने त्वचेवर अत्यधिक वापरल्यामुळे त्वचेचे नुकसान होण्याची भीती असते.

3. सूर्यापासून संरक्षण आवश्यक

मॉइश्चरायझरनंतर त्वचेला सूर्यापासून संरक्षण देणे फार महत्वाचे आहे. अन्यथा, सूर्याची हानिकारक किरणे हळूहळू त्वचेच्या रंगद्रव्यासह त्वचेचे नैसर्गिक सौंदर्य चोरतात. म्हणूनच आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार सूर्यापासून संरक्षणाचा वापर करा. आपण हे ही लक्षात ठेवा की आपण बाहेरील वातावरणाच्या संपर्कात किती काळ राहता, हे लक्षात ठेवून एसपीएफची निवड करा, जेणेकरून आपल्याला सनस्क्रीनचा योग्य फायदा मिळेल. यासाठी आपण अयूर हर्बल अँटी सन टॅन वापरू शकता. हे आपल्या | त्वचेमध्ये चमकदेखील दर्शवेल.

4. सीटीएम रूटीन करते त्वचेला आरामदायक

सीटीएम म्हणजे त्वचेची स्वच्छता, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंगने त्वचेला आरामदायक बनविणे. कारण उष्णता, धूळ-माती आणि प्रदूषणामुळे आपल्या त्वचेचे आकर्षण हळूहळू कमी होऊ लागते. ज्यासाठी सीटीएम रुटीन पाळणे फार महत्वाचे असते, कारण ते त्वचेची खोलवर मालिश करून तिला स्वच्छ करण्याचे कार्य करते. ज्याने त्वचा पुन्हा उजळते आणि आपल्या कोमजलेल्या चेहऱ्यापासून आपल्याला सुटकारा मिळतो. यासाठी आपण अशा घटकांची उत्पादने खरेदी करू शकता, ज्यामध्ये कडुलिंब, कोळसा आणि पपईसारखे घटक सामील असावेत, कारण हे त्वचेवर अगदी थोडया वेळातच चांगले परिणाम देण्यासाठी कार्य करतात.

5. पोर्स घट्ट करा

बऱ्याचदा साफसफाईनंतर त्वचेचे आकर्षण वाढते, परंतु या प्रकरणात त्वचेचे छिद्र उघडले जातात, जे ना चांगले दिसतात किंवा त्वचेसाठीही चांगले मानले जात नाहीत. यासाठी साफसफाई केल्यानंतर आपण त्वचेवर टोनर अवश्य लावावे कारण ते त्वचेवर गुलाबी चमक आणण्याबरोबरच छिद्रेदेखील लहान करण्याचे काम करते. यामुळे त्वचा लवचिकही राहते. यानंतर आपल्या त्वचेवर हर्बल मॉइश्चरायझर लावण्यास विसरू नका. काही दिवसातच तुमची त्वचा पुन्हा तरूण आणि ताजी दिसू लागेल असा विश्वास ठेवा.

अजून वाचा:


अल्सर म्हणजे काय? | Ulcer Mhanje Kay

सोरायसिस म्हणजे काय? | Psoriasis Mhanje Kay

डायलिसिस म्हणजे काय? | Dialysis Mhanje Kay

PCOS म्हणजे काय? | PCOS Mhanje kay

Leave a Reply