You are currently viewing मॉइस्चराइजर चे फायदे – उन्हाळ्यातही गरजेचे आहे मॉइस्चराइजर?
मॉइस्चराइजर चे फायदे, उन्हाळ्यातही गरजेचे आहे मॉइस्चराइजर

मॉइस्चराइजर चे फायदे : जर तुम्हाला असे वाटत असेल की त्वचेला केवळ हिवाळ्यात मॉइश्चरायझरची गरज असते तर चला, तुमचा गैरसमज दूर करतो.

बदलत्या मोसमनुसार त्वचेवरही अनेक बदल पहायला मिळतात. त्वचेत होणाऱ्या बदलांना पाहून आपण कॉस्मेटिकची निवड करतो. जसे की हिवाळयात मॉइश्चरायझरचा वापर भरपूर केला जातो. मात्र उन्हाळा येताच त्याचा वापर कमी होतो. उन्हाळयात त्वचा चिपचिपित होण्याच्या भीतीने बहुतेक महिला मॉइश्चरायझरचा वापर बंद करतात. पण खरोखरच उन्हाळयात मॉइश्चरायझरचा वापर बंद करायला हवा का? नाही, मुळीच नाही. उन्हाळा असो किंवा हिवाळा याचा वापर त्वचेसाठी खूपच गरजेचा आहे.

चला, जाणून घेऊया, उन्हाळयात मॉइश्चरायझरचा वापर गरजेचा का आहे

तज्ज्ञांच्या मते, “बहुसंख्य महिलांना असे वाटते की, उन्हाळयात मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचा तेलकट आणि चिपचिपित होते. त्यामुळेच उन्हाळयात याचा वापर त्या टाळतात. प्रत्यक्षात तापमान वाढल्यानंतर मॉइश्चरायझर त्वचेसाठी आणखी गरजेचे होते. विशेष करुन त्यांच्यासाठी ज्या एसीत खूप वेळ असतात.”

मॉइस्चराइजर चे फायदे – उन्हाळ्यातही गरजेचे आहे?

मॉइस्चराइजर चे फायदे, उन्हाळ्यातही गरजेचे आहे मॉइस्चराइजर
मॉइस्चराइजर चे फायदे, उन्हाळ्यातही गरजेचे आहे मॉइस्चराइजर

1. त्वचा रुक्ष असल्यास

उन्हाळा सुरू होताच त्वचेवर उन्हाचा परिणाम दिसू लागतो. हा मोसम स्वतःसोबत स्विमिंग आणि वॉटर स्पोर्ट्ससारखी मौजमजाही घेऊन येतो. रखरखीत ऊन, स्विमिंग पूलमधील पाण्यात असलेल्या क्लोरीनसारख्या घटकांच्या संपर्कात आल्यामुळे त्वचा खराब होऊ लागते. विशेष करून तेव्हा ज्यावेळी तिची योग्य काळजी घेतली जात नाही. योग्य काळजी घेतल्यास त्वचेला हानिकारक गोष्टींपासून वाचवता येईल.

2. जेव्हा प्रखर उन्हाचा होतो कहर

उन्हाळयातील प्रखर ऊनाचे चटके त्वचेला जाळत असतात. यामुळे सनबर्न, टॅनिंगसारखे स्किन प्रॉब्लेम होतात. अशा वेळी सनस्क्रीनचा वापर त्वचेला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून वाचवतो. पण त्वचेच्या देखभालीसाठी एवढेच पुरेसे नाही. सनस्क्रीननंतर त्वचेला चांगल्या प्रकारे मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचा मुलायम होते. उन्हाळयात तुम्ही मॉइश्चरायझर बेस्ड सनस्क्रीनचाही वापर करू शकता.

3. केमिकलपासून वाचण्यासाठी

उन्हाळा सुरू होताच आपण खूप सारे बेत आखतो. जसे की, कधीतरी वॉटरपार्कला फिरायला जायचे, पूल पार्टी करायची किंवा मुलांसोबत स्विमिंग क्लास करायचा. पण आपण हे विसरतो की स्विमिंग पूलमध्ये क्लोरीन नावाचे केमिकल मिसळले जाते, जे त्वचेसाठी हानिकारक असते. तुम्ही जर स्विमिंग पूलमध्ये जास्त वेळ घालवला असाल तर आपले शरीर चांगल्या प्रकारे स्वच्छ करा. त्वचा स्वच्छ केल्यानंतर मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे. ते त्वचेच्या खोलवर जाऊन तिला पोषण देते. ते त्वचेला नुकसान होण्यापासून वाचवते.

4. उन्हाळयात रुक्ष त्वचा

बहुतांश महिलांना असे वाटते की, उन्हाळयात त्वचा कोरडी होत नाही. पण हा त्यांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात उन्हाळयात त्यांचा वेळ जास्त करुन ऊन, स्विमिंग पूल, एअर कंडीशनिंगमध्ये जातो. काही जणी अशा ब्युटी प्रोडक्ट्सचा उपयोग करतात ज्यात क्लोरीनची मात्रा जास्त असते. त्यामुळे त्यांची त्वचा शुष्क आणि निर्जीव दिसू लागते. हे टाळण्यासाठी त्वचेला सौम्य आणि मुलायम बनवणारे प्रोडक्ट वापरायला हवेत. जसे की दररोज मॉइश्चरायझरचा वापर त्वचेसाठी उपयोगी ठरतो. यात त्वचा मुलायम होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुणधर्म असतात, जे त्वचेला रुक्ष, कोरडी होण्यापासून वाचवतात

आणि तिला उजळ बनवतात. त्वचा विशेषज्ज्ञही मॉइश्चरायझर वापण्याचा सल्ला देतात, कारण हे त्वचेवर सुरक्षा कवच तयार करुन तिला किटाणू आणि अन्य हानिकारक गोष्टींपासून वाचवते.

5. जेव्हा असेल ओपन पोर्सची समस्या

चांगल्या, सुदृढ त्वचेसाठी क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग खूपच गरजेचे असते. महिलांना असे वाटत असते की, उन्हाळयात घामामुळे त्यांची त्वचा ओलसरच राहणार. पण घामामुळे त्वचेतील छिद्र उघडतात. त्यांना पुन्हा बंद करण्यासाठी टोनर वापरणे गरजेचे असते आणि टोनरनंतर मॉइश्चरायझर वापरल्यामुळे त्वचा खुलते.

6. जेव्हा त्वचेतून येईल जास्त घाम

उन्हाळयाच्या मोसमात त्वचा तेलकट होऊ शकते, पण याचा असा अर्थ होत नाही की त्वचेला मॉइश्चरायझरची गरज नसते. प्रत्यक्षात उन्हाळयाच्या मोसमात जास्त घाम येत असल्यामुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते. उकाडा आणि उन्हामुळे त्वचेतील पाणी निघून जाते. अशावेळी त्वचेला हायड्रेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आणि पाण्याच्या जास्त प्रमाणात जेवण जेवणे एवढयावरच अवलंबून राहू नका. उलट योग्य मॉइश्चरायझरचा उपयोग करायला हवा, जो त्वचेतील मॉइश्चरचे प्रमाण कायम ठेवेल.

मॉइश्चरायझरचा वापर कसा करावा?

उन्हाळयात मॉइश्चरायझरचा वापर कधी करावा हे माहिती करुन घेणेही गरजेचे आहे:

अंघोळीनंतर मॉइश्चरायझरचा वापर नक्की करा. तो बॉडी हायड्रेड करतो व त्वचेतील ओलावा कायम ठेवतो. खूप घाम येत असेल तर तुम्ही मॉइश्चरायझर आणि टोनरचाही वापर करू शकता.

अजून वाचा:


अल्सर म्हणजे काय? | Ulcer Mhanje Kay

सोरायसिस म्हणजे काय? | Psoriasis Mhanje Kay

डायलिसिस म्हणजे काय? | Dialysis Mhanje Kay

PCOS म्हणजे काय? | PCOS Mhanje kay

Leave a Reply