Corona Care Tips in Marathi: विषाणूंचा संसर्ग होण्याच्या या काळात घरात राहणे हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे, पण २४ तास सोबत राहिल्यामुळे हा पर्याय तुमच्या नात्यांना बाधित तर करत नाही ना? जाणून घ्या काही महत्त्वपूर्ण गोष्टी.

कोरोना मध्ये घ्यावयाची काळजी

कोरोनाचा कहर संपूर्ण जगावर झाला आहे. जवळपास सर्वच देश याच्या फेऱ्यात अडकले आहेत. लोक घरात नाईलाजाने बंदिस्त झाले आहेत. काय करणार? कोरोनापासून स्वत:चे रक्षण करणेही गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाता येणार नाही. साफसफाईकडे लक्ष द्यायचे आहे आणि संसर्गापासून दूर रहायचे आहे. अशावेळी काय होईल, जेव्हा पतीपत्नी किंवा लिवइन जोडप्याला एका घरात पूर्ण वेळ सोबत रहावे लागेल? कशी असेल ती परिस्थिती जिथे पतीपत्नीला जबरस्तीने एकमेकांसमोर रहावे लागेल? लक्षात घ्या, हा हनिमून नाही. संशोधनानुसार असा निष्कर्ष निघाला आहे की, अशा परिस्थितीत लोकांना प्रचंड हताशा, कंटाळा, एकाकीपण, राग आणि तणावासारख्या भावनांचा सामना करावा लागतो.

कोरोना मध्ये घ्यावयाची काळजी, Corona Care Tips in Marathi
कोरोना मध्ये घ्यावयाची काळजी, Corona Care Tips in Marathi

जगभरात पतीपत्नीवर केलेल्या विनोदांची कमी नाही. सर्वांना माहिती आहे की, भलेही हे नाते जीवनभराचे असले तरी थोडासा स्वत:साठी वेळ प्रत्येकालाच हवा असतो. म्हणून हेच चांगले असते की, पतीने सकाळी कामाला जावे, पत्नी गृहिणी असेल किंवा नोकरीला जात असेल आणि रात्री उशिरा दोघे एकमेकांना भेटत असतील. यामुळे दोघांना आपापले जीवन जगता येते. शिवाय भेटल्यानंतर कितीतरी नवीन गोष्टी सांगण्यासारख्या असतात, ज्या या नात्यात नव्याने गोडवा आणतात. पण कोरोनामुळे अशी गोड हवेची झुळूकही हरवून गेली आहे. ज्या जोडप्यांच्या घरी मुले आहेत तिथे लक्ष दुसऱ्या गोष्टीत वळवणारे इतरही सदस्य आहेत. पण ज्या जोडप्यांना मुले नाहीत तिथे एकमेकांशिवाय दुसरे असणारच कोण?

अशावेळी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे, या ७ गोष्टींकडे द्या लक्ष.

Corona Care Tips in Marathi

1. दिनक्रम बिघडू देऊ नका

जेव्हा आपल्या सर्वांसमोर घरात राहण्यावाचून पर्याय उरलेला नाही, अशावेळी आळशीपणाने प्रत्येक काम टाळू नका. ज्याप्रमाणे यापूर्वी सकाळी उठत होता, तसेच उठा. अंघोळ करुन तयार व्हा. त्यानंतर घरातील कामे उरका. ऑफिसची वेळ होईल तेव्हा जागा निश्चित करून तेथे टेबल आणि खुर्ची घेऊन बसा. लक्षात ठेवा, कोरोनामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर खूपच वाईट परिणाम होत आहे. म्हणूनच आपले काम प्रामाणिकपणे करा.

2. घरातली कामे आपापसात वाटून घ्या

या काळात घरकाम करणाऱ्या महिला, ड्रायव्हर, कार धुणारे, स्वयंपाकी सर्वांनाच सट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आता घरातली सर्व कामे आपल्यालाच करायची आहेत. अशावेळी कोणा एकावर सर्व कामांची जबाबदारी अली तर त्याची चिडचिड होणे स्वाभाविक आहे. अशी वेळ येऊ नये म्हणून घरातल्या कामांची एक यादीच तयार करा. आपली क्षमता आणि आवडीनुसार कामाचे वाटप करा. जसे की, भांडी पतीने घासली तर साफसफाई पत्नीने करावी. जेवण पत्नीने बनवले तर सर्व पुसून घेणे, वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणे, ही कामे पतीने करावीत.

3. जवळ येऊ नका, दूरही जाऊ नका

आज परिस्थिती अशी आहे की, जवळही जाता येत नाही आणि फार दूरही राहता येणार नाही. एकाच घरात एकत्र बंद झाल्यामुळे तरुण जोडप्यांमध्ये एकमेकांप्रती शारीरिक आकर्षण निर्माण होणे स्वाभाविक आहे. जेव्हा तरुण पती किंवा पत्नी समोर असते तेव्हा मनावर नियंत्रण ठेवणे कठीण असते. पण सोबतच या गोष्टींकडेही लक्ष द्यायला हवे की, कोरोना विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होतो. म्हणूनच जर जवळ आलात तर त्यानंतर स्वत:च्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. अंघोळ करा. तसे तर शॉवरखालीही तुम्ही एकमेकांजवळ येण्याच्या संधीचा फायदा घेऊ शकता. म्हणजे प्रेम आणि स्वछता दोन्ही साधता येईल.

पण एकत्र राहिल्यामुळे फक्त प्रेम फुलेल, असेही अजिबात नाही. याचे दुष्परिणामही होऊ शकतात.

4. ओव्हर एक्सपोजरचा धोका

सतत सोबत राहिल्यामुळे तरुण जोडप्यात केवळ प्रेमच बहरेल असे नाही तर मतभेदही वाढू शकतात. आकडेवारीनुसार चीनमध्ये कोरोना काळात एकमेकांसोबत राहण्यावाचून पर्याय नसलेल्या जोडप्यांवर घटस्फोटाची वेळ आली आहे. चीनचा दक्षिण-पश्चिम भाग सिशुआनमध्ये 24 फेब्रुवारीनंतर ३०० हून अधिक घटस्फोटाचे अर्ज आले आहेत. दक्षिण चीनमधील फुजीआन प्रांतात तर एका दिवसात घटस्फोटाच्या १० अर्जावर सुनावणी ठेवण्यात आली. असे यामुळे होत आहे की, तरुण जोडपी गरजेपेक्षा जास्त वेळ नाईलाजाने एकमेकांसोबत घालवत आहेत. त्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसल्यामुळे गरजेपेक्षा जास्त काळसोबत राहून अनेकदा त्यांच्यात वाद होतात आणि शेवटी स्वतःचा अहंकार, राग किंवा जिद्दी स्वभावामुळे ते घटस्फोटाचा निर्णय घेतात.

5. घरात राहूनही अंतर ठेवणे आहे शक्य

स्वत:साठी थोडा वेळ असायला हवा असे प्रत्येकालाच वाटते. आपली स्पेस, आपला वेळ. पण सतत सोबत राहिल्यामुळे जोडीदाराची नजर सर्वकाळ आपल्यावरच खिळून राहिल्यासारखे वाटते. हे टाळण्यासाठी तुम्हाला दोघांची स्वतः साठीची वेळ आणि जागा ठरवून घ्यायला हवी. तुम्ही दोघेही वर्किंग असाल तर सोबत असूनही एकमेकांपासून थोडे अंतर सहज ठेवू शकता. शिवाय एकमेकांचा कंटाळा येणार नाही.

6. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून

अनेकदा तुमच्या मनात काहीतरी वेगळे असते पण प्रत्यक्षात त्यापेक्षा वेगळे वागण्याची कारणे अनेक असतात. जसे की, तुम्हाला राग आला कारण तुमच्या जोडीदाराने त्याची भांडी धुतली नाहीत. जेव्हा की तुम्ही नुकतेच किचन स्वच्छ करून आला असाल. प्रत्यक्षात तुमच्या रागावण्यामागचे खरे कारण असे असते की, तुमच्या जोडीदाराने तुम्हाला होणार त्रास आणि तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केले.

मानसशास्त्रज्ञ डॉक्टर प्रियांका सांगतात की, तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी बोलायला हवे आणि तुमच्या रागामागचे जे खरे कारण आहे ते सांगायला हवे.

जेव्हा तुम्हाला वाटेल की, तुमच्या दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून भांडण होऊ शकेल अशावेळी खोलीतून बाहेर जा. कुठले तरी दुसरे काम करायला घ्या, जेणेकरून भांडणाचा विषय तुमच्या डोक्यातून निघून जाईल. सतत सोबत राहिल्यामुळे असेही होऊ शकते की, तुम्हाला तुमच्या जोडीदारामधील थोडे जास्तीच दोष दिसू लागतील. पण तुम्हाला स्वत:वर लक्ष द्यायचे आहे. सकारात्मक रहायचे आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घालवलेले चांगले क्षण, चांगल्या गोष्टी आठवा. त्याच्यातील केवळ चांगल्याच गोष्टी शोधून काढण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला त्यांच्या काही त्रासदायक सवयींकडे दुर्लक्ष करावे लागेल.

7. क्वॉलिटी टाइम घालवा

ही वेळ केवळ अडचणींची आहे असे मुळीच नाही. तुम्ही दोघे मिळून या क्षणांना सोनेरी क्षण बनवू शकता. त्यासाठी आपल्या जोडीदारासोबत आवडीची पुस्तके वाचा. जुने चित्रपट पहा. आवडीचे गेम खेळा. चित्र काढा. सोबतच व्यायाम करून स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्या. पण या गोष्टीकडे लक्ष द्या की, एकमेकांच्या इतकेही जवळ येऊ नका की, कंटाळा येऊ लागेल. बाहेरच्या जगासोबचे संबंध तोडू नका. तुम्ही घराबाहेर पडू शकत नसाल म्हणून काय झाले, व्हर्चुअल वर्ल्ड तर आहेच. त्याच्याद्वारे तुमचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, शेजाऱ्यांशी कायम संवाद साधा. सोशल मीडियावरही काही वेळ घालवता येऊ शकेल.

अजून वाचा : कोरोना विषाणूबद्दल माहिती


कोरोना : काय खरे, काय खोटे

अशा कठीण काळात तुम्ही खोटया बातम्यांच्या जाळ्यात अडकू नये यासाठी आम्ही तुम्हाला कोरोनासंबंधी गैरसमज आणि वास्तव याची माहिती देत आहोत. चला तर मग जाणून घेऊया नक्की काय खरे, काय खोटे:

समज १ : कोव्हिड –१९ पासून वाचण्यासाठी गरम पाणी किंवा मिठाचे पाणी खूपच उपयोगी आहे.

वास्तव : आतापर्यंत हे सिद्ध झालेले नाही की, गरम पाणी किंवा मिठाचे पाणी प्यायल्यामुळे कोव्हिड -१९ च्या प्रादुर्भावापासून वाचता येईल. जर असे झाले असते तर या विषाणूने अगदी। सहजपणे कोणालाही आपल्या जाळ्यात अडकवले नसते. तुम्ही दररोज मिठाचे पाणी पीत असाल तर हे बीपीच्या रुग्णांसाठी जीवघेणेही ठरू शकते. कारण सोडियम शरीरातील द्रव पदार्थ संतुलित ठेवण्याचे काम करत असते, पण जर तेच सोडियम रक्त प्रवाहात गरजेपेक्षा जास्त झाले तर ते रक्त वाहिन्यांमधून पाणी शोषून घेऊ लागते. यामुळे रक्त प्रवाह वाढल्यामुळे ब्लड प्रेशर खूपच वाढते. पण हो, गरम पाणी प्यायल्यामुळे घसा सुकण्याच्या समस्येपासून सुटका होऊ शकते.

समज २ : चीनी वस्तूंची खरेदी केल्यामुळे आजारी पडण्याची भीती

वास्तव : संशोधनानुसार हे सिद्ध झाले आहे की, नवीन विषाणू कोव्हिड -१९ पृष्ठभागावर जास्त वेळ राहू शकत नाही. पण ज्या | चीनी वस्तूंची खरेदी करण्यासाठी तुम्ही घाबरत आहात त्या कितीतरी दिवस, महिने किंवा आठवडे तशाच दुकानात | ठेवलेल्या असल्यामुळे त्यांची खरेदी करणे हे कोणत्याही प्रकारे हानीकारक नाही. कोव्हिड -१९ तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या थेट संपर्कात येता. ज्यामुळे त्याच्या खोकल्यातून, शिंकण्यातून उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यातून विषाणू तुमच्या शरीरात प्रवेश करतात.

समज ३ : कुठल्याही मास्कद्वारे कोव्हिड –१९ च्या संसर्गापासून वाचता येते

वास्तव : बाजारात असे कितीतरी मास्क उपलब्ध आहेत जे केवळ दिसण्यापुरतेच मास्क आहेत. प्रत्येक मास्क कोव्हिड -१९ ला रोख शकत नाही. जर तुमच्या मास्कची फिटींग टाईट नसेल तर संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या तोंडातून खोकताना निघालेल्या छोटया छोटया थेंबांतून विषाणू थेट तमच्या तोंडात प्रवेश करुन तुम्हालाही संसर्गाची बाधा होईल. किंवा तम्ही संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर त्याच हाताने स्वत:च्या तोंडाला, नाकाला किंवा डोळयाला स्पर्श केल्यास संसर्गाची लागण होणारच.


अल्सर म्हणजे काय? | Ulcer Mhanje Kay

सोरायसिस म्हणजे काय? | Psoriasis Mhanje Kay

डायलिसिस म्हणजे काय? | Dialysis Mhanje Kay

PCOS म्हणजे काय? | PCOS Mhanje kay

Leave a Reply