दत्तजयंती माहिती मराठी – Datta Jayanti Information in Marathi

मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमा ही दत्तजयंती म्हणून साजरी करतात.

भाविक लोक या दिवशी गुरुचरित्राचे पारायण करतात. गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर इत्यादी ठिकाणी दत्ताची स्थाने आहेत. तिथे दत्तजयंतीला मोठा उत्सव होतो.

dutta-दत्तजयंती

अशी कथा सांगतात की, महातपस्वी ऋषी अत्रि यांची पत्नी सती अनसूया ही महापतिव्रता होती. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांना अशी इच्छा झाली, की तिची परीक्षा पाहावी. एक दिवस अत्रि ऋषी नदीवर स्नानाला गेले असतांना ब्रह्मदेव, विष्णू व महादेव यांनी साधूंचे रूप धारण केले व अनसूयेच्या झोपडीच्या दाराशी येऊन ते भिक्षा मागू लागले. अनसूयेने त्यांना आदराने बसवून घेतले व त्यांच्यासाठी स्वयंपाक केला; पण आता ते तीन साधू म्हणू लागले की, तू अंगावर कपडे न घालता आम्हांला वाढलेस तरच आम्ही जेवू. तेव्हा सती अनसूयेने आपल्या सामर्थ्याने त्या तिघांची लहान बाळे केली व मग त्यांना जेवायला वाढले.

अत्रि ऋषी स्नान आटपून परत आले, तेव्हा त्यांनी ओळखले की ही तीन बाळे म्हणजे ब्रह्मा, विष्णू व महेश आहेत. त्यांनी त्यांची नावे चंद्र, दत्त व दुर्वास अशी ठेवली. त्यातला दत्त हा विष्णूचे रूप होता. पुढे चंद्र चंद्रलोकी निघून गेला. दुर्वास तपश्चर्या करायला जंगलात निघून गेला व दत्त या तिघांचे रूप म्हणून तीन शिरे, सहा हात असा ‘दत्तात्रेय’ म्हणून राहिला.

स्कंदपुराणात मात्र अशी कथा सांगितली आहे की, अत्रि ऋषींना व अनसूयेला एक मुलगा झाला. तो देवाच्या कृपेने झाला म्हणून दत्त आणि अत्रि ऋषींचा मुलगा म्हणून अत्रेय. दत्त आणि अत्रेय मिळून ‘दत्तात्रेय’ असे त्याचे नाव पडले.

दशावताराप्रमाणे विष्णूपुराणात विष्णूचे २४ अवतार सांगितले आहेत. त्यानुसार दत्त हा विष्णूचा सहावा अवतार मानला जातो.

दत्तजयंती माहिती मराठी – Datta Jayanti Information in Marathi

पुढे वाचा:

FAQ:

दत्त जन्म किती वाजता?

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.

दत्तात्रेय जयंती पारायण कसे करावे?

दत्तात्रेय जयंती पारायण सहसा दत्तात्रेय चरित्र वाचून केले जाते, जो एक पवित्र ग्रंथ आहे ज्यामध्ये दत्तात्रेयांची जीवनकथा आणि शिकवण आहे.

दत्तात्रेय जयंती उपवास कधी आहे?

दत्तात्रेय जयंती उपवास मार्गशीर्ष हिंदू महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी (पौर्णिमा) पाळला जातो, जो सहसा डिसेंबरमध्ये येतो.

दत्तात्रेयचा जन्म कुठे झाला?

दत्तात्रेयांचे जन्मस्थान निश्चितपणे ज्ञात नाही, परंतु ते पश्चिम भारतात कुठेतरी, शक्यतो महाराष्ट्र किंवा गुजरात राज्यात असावे असे मानले जाते.

दत्त म्हणजे काय?

दत्त हे दत्तात्रेयाचे दुसरे नाव आहे, ज्याला हिंदू देवता मानले जाते आणि ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्या हिंदू त्रिमूर्तीचे एकत्रित रूप आहे.

दत्तात्रेय हा विष्णूचा अवतार आहे का?

होय, दत्तात्रेयांना हिंदू धर्मात भगवान विष्णूचा अवतार मानले जाते.

दत्तात्रेय पूजेसाठी कुठे जातात?

दत्तात्रेयांची सहसा त्यांना समर्पित मंदिरांमध्ये तसेच त्यांच्या जीवनकथेशी संबंधित ठिकाणी, जसे की महाराष्ट्रातील गाणगापूर येथील दत्तात्रेय मंदिरात पूजा केली जाते.

पारायण कसे करावे?

पारायण हा भक्तिपूर्ण वाचनाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये भक्ती आणि आदराने पवित्र ग्रंथ किंवा धर्मग्रंथ मोठ्याने वाचले जाते. दत्तात्रेय चरित्राचे पारायण करण्यासाठी आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून, दत्तात्रेयांच्या चित्रासमोर किंवा मूर्तीसमोर बसून भक्तिभावाने व एकाग्रतेने ग्रंथाचे पठण करावे.

दत्तात्रेय जयंतीला आपण मांस खाऊ शकतो का?

दत्तात्रेय जयंतीला मांस आणि इतर मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे अशी शिफारस केली जाते, कारण हा दिवस अध्यात्मिक पद्धती आणि देवतेला अर्पण करण्यासाठी शुभ मानला जातो.

दत्तात्रेयांचे २४ गुरू कोण आहेत?

दत्तात्रेयांचे २४ गुरू हे सजीव आणि निर्जीव अशा प्राण्यांचा समूह आहेत, ज्यांना दत्तात्रेयांनी आपले शिक्षक मानले आणि ज्यांच्याकडून त्यांनी विविध धडे आणि आध्यात्मिक अंतर्दृष्टी शिकल्या. यामध्ये निसर्गातील घटक, प्राणी, पक्षी, कीटक आणि मानव यांचा समावेश होतो.

दत्त अवतार किती आहेत?

हिंदू धर्मात दत्तात्रेयांचे 24 अवतार मानले जातात, ज्यात तीन मुख्य अवतार आहेत: श्रीपाद श्री वल्लभ, नरसिंह सरस्वती आणि माणिक प्रभू.

Leave a Reply