आषाढ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी गुरु पौर्णिमा हा हिंदू सण आहे. आपल्या आध्यात्मिक आणि शैक्षणिक शिक्षकांबद्दल (गुरू) कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. हा उत्सव विविध सांस्कृतिक कार्यक्रम, भाषणे आणि आध्यात्मिक आणि शैक्षणिक विषयांवर चर्चा करून चिन्हांकित केला जातो. बौद्ध आणि जैन धर्मातही तो साजरा केला जातो. उज्वल आणि अधिक उज्वल भविष्यासाठी आपल्या गुरूंचा सन्मान आणि आशीर्वाद मिळविण्यासाठी हा दिवस समर्पित आहे.

गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा विषयी माहिती मराठी – Guru Purnima Information in Marathi

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः

गुरु हाच ब्रह्मदेव, गुरु हाच विष्णु, गुरु हाच महादेव. गुरु हेच साक्षात परब्रह्म आहे.

गुरु ज्ञान देतो. ज्ञान मिळत नाही तोवर आपण आयुष्यात प्रगती करू शकत नाही. गुरु म्हणजे ज्ञानाचा समुद्र असतो; पण समुद्रातून, नदीतून अगर तलावातून पाणी घ्यायचे असेल तर आधी वाकावे लागते. तसे गुरूंपुढे नम्र झाल्याशिवाय ज्ञान मिळत नाही.

आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा. या दिवशी प्रत्येकाने आपल्या विद्याभ्यास, संगीत, चित्रकला, नृत्य अशा कुठल्याही विषयातल्या ‘गुरूं’ची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा व गुरूंना दक्षिणा द्यावी, अशी पद्धत आहे.

गुरूंचे व गुरुदक्षिणेचे महत्त्व सांगणार्‍या अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत.

व्यासमुनींना गुरूंचे गुरु मानले जाते. म्हणून या पौर्णिमेला ‘व्यासपौर्णिमा’ असेही म्हणतात.

व्यास हे पराशर ऋषी आणि कोळी-राजाची मुलगी सत्यवती यांचे पुत्र होते. पराशर ऋषी अतिशय विद्वान होते. अशी कथा सांगतात की, पराशर आपल्या आईच्या पोटात असतानाच वेदपठण करत असत. पराशरांनी आपला मुलगा व्यास यालाही शिकवून विद्वान केले. सोळा वर्षांचे असतानाच व्यासांना वेदांचे पूर्ण ज्ञान होते.

फार पूर्वी सर्व ज्ञान तोंडी असल्याने त्यात थोडा विस्कळीतपणा आला होता. पाठ करताना कधी कधी शब्द मागे पुढे होत, अर्थाचा घोटाळा होई. अशा काहीशा विस्कळीत झालेल्या वेदांची व्यासांनी नीट रचना केली आणि त्याचे ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद व सामवेद असे चार भाग पाडले. त्यांतला अर्थ व्यवस्थित समजावा म्हणून त्यांनी वेदांवर सूत्रेही रचली. या त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना ‘वेदव्यास’ असे म्हणतात.

वेदांच्या अर्थाचे निरूपण व्यासमुनी उच्चासनावर बसून करत. म्हणूनच आजही सभेत ज्या उंच जागेवर बसून अगर उभे राहून वक्ता बोलतो, त्या जागेला व्यासपीठ असे म्हणतात.

व्यासांनी महाभारत नावाचा १८ पर्वांचा प्रचंड काव्यग्रंथ लिहिला. खरे पाहता हा सोमवंशाचा इतिहासच आहे. परंतु सोमवंशात पुढे घडणार्‍या घटना या ग्रंथात आधीच लिहून ठेवल्या होत्या. या ग्रंथात कौरव, पांडव, त्यांचे पूर्वज आणि त्यांची मुले-नातवंडे अशा शेकडो व्यक्तींच्या स्वभावाचे, वागण्याचे वर्णन आहे. तसेच तेव्हाची शहरे, अरण्ये, त्या काळात झालेली युद्धे, यज्ञयाग, राजनीती अशा असंख्य गोष्टींचे वर्णन आले आहे. व्यासांनी वर्णन केला नाही, असा विषयच जगात नाही अशा अर्थाचे एक संस्कृत वचन आहे -‘व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम् ।’

गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणूनच ‘ॐ नमोस्तु ते व्यास विशालबुद्धे’ अशी प्रार्थना करून प्रथम गुरूंचे गुरु असणार्‍या व्यासांना नमस्कार करतात व नंतर आपल्याला ज्ञान देणार्‍या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्यांना नमस्कार करतात.

आपल्या संस्कृतीत आईला सर्वात पहिला गुरु मानले आहे, गुरुमाऊलीचे स्थान सर्वप्रथम मानले आहे ते यामुळेच. मातेप्रमाणेच ग्रंथालाही आपण गुरु मानलेले आहे. योग्य गुरु भेटेल न भेटेल, अशावेळी ग्रंथरूपी गुरु कोणालाही सहज उपलब्ध होतो. शिखांच्या ‘गुरुद्वारा’त मूर्तीची पूजा न होता त्याऐवजी ग्रंथ-साहेबाचीच पूजा केली जाते.

गुरुपौर्णिमा विषयी माहिती मराठी – Guru Purnima Information in Marathi

पुढे वाचा:

FAQ – गुरुपौर्णिमा विषयी सामान्य प्रश्न

गुरुपौर्णिमा म्हणजे काय?

गुरु पौर्णिमा हा एक हिंदू सण आहे जो एखाद्याच्या आध्यात्मिक गुरू किंवा गुरूचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समर्पित आहे. आषाढ (जून-जुलै) या हिंदू महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी (पौर्णिमा) हा उत्सव साजरा केला जातो, जरी चंद्र दिनदर्शिकेनुसार अचूक तारीख बदलू शकते.

गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते?

गुरुपौर्णिमा एखाद्या आध्यात्मिक शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या मार्गदर्शन आणि शिकवणीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. असे मानले जाते की या दिवशी वैश्विक ऊर्जा शिखरावर असते आणि गुरूंचा आशीर्वाद वाढतो.

गुरुपौर्णिमा कोण साजरी करू शकेल?

अध्यात्मिक गुरू किंवा गुरू असलेले कोणीही गुरुपौर्णिमा साजरी करू शकतात. ते कोणत्याही विशिष्ट धर्म किंवा पंथापुरते मर्यादित नाही.

गुरुपौर्णिमा कशी साजरी केली जाते?

गुरुपौर्णिमा गुरूंची पूजा करून, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून आणि त्यांचे आशीर्वाद मागून साजरी केली जाते. भक्त सत्संगात (आध्यात्मिक मेळावे), ध्यान, मंत्र जप आणि धर्मादाय आणि निःस्वार्थ सेवा करू शकतात.

कोणाला गुरू मानले जाते?

गुरू असा असतो जो त्यांच्या शिष्यांना किंवा अनुयायांना आध्यात्मिक पद्धतींचे मार्गदर्शन करतो आणि शिकवतो. हिंदू धर्मात, गुरूला अनेकदा आध्यात्मिक मार्गदर्शक, गुरू आणि अगदी दैवी प्रकटीकरण मानले जाते.

गुरुपौर्णिमा ऑनलाइन साजरी करता येईल का?

होय, गुरुपौर्णिमा व्हर्च्युअल सत्संग, थेट-प्रवाहित पूजा समारंभ आणि गुरू आणि अध्यात्मिक शिक्षकांसोबत ऑनलाइन संवादाद्वारे ऑनलाइन साजरी केली जाऊ शकते.

गुरुपौर्णिमेशी संबंधित काही सामान्य विधी कोणते आहेत?

गुरुपौर्णिमेशी संबंधित काही सामान्य विधींमध्ये गुरूंच्या प्रतिमेला किंवा चित्राला फुले, फळे आणि इतर अर्पण करणे, आरती करणे (दिवा लावणे), मंत्र किंवा स्तोत्रांचे पठण करणे आणि गुरूंचे आशीर्वाद घेणे यांचा समावेश होतो.

गुरुपौर्णिमा सार्वजनिक सुट्टी आहे का?

नाही, गुरु पौर्णिमा ही बहुतेक देशांमध्ये सार्वजनिक सुट्टी नाही, परंतु जगभरातील अनेक हिंदू आणि इतर आध्यात्मिक साधकांकडून हा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उत्सव म्हणून साजरा केला जातो.

Leave a Reply