You are currently viewing डेव्हिड मिलर माहिती मराठी | David Miller Information in Marathi
डेव्हिड-मिलर-माहिती-मराठी-David-Miller-Information-in-Marathi

David Miller Information in Marathi : डेव्हिड अँड्रयू मिलरचा जन्म पिटरमॅरीझबर्ग, नताल प्रोव्हिंस, दक्षिण आफ्रिका येथे १० जून १९८९ रोजी झाला. मिलर दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाकडून खेळणारा मधल्या फळीतील फलंदाज आणि उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी करणारा प्रसिद्ध खेळाडू आहे. मिलर डॉल्फिन्स क्रिकेट संघाकडून घरेलू क्रिकेट खेळतो.

आय. पी. एल. मध्ये मिलरने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व केले आहे. आंतरराष्ट्रीय एक दिवसीय आणि टी-२० करंडकामध्ये मिलर दक्षिण आफ्रिका संघाकडून खेळतो. सप्टेंबर २०१८ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा मिलरने केली.

डेव्हिड मिलर माहिती मराठी, David Miller Information in Marathi
डेव्हिड मिलर माहिती मराठी, David Miller Information in Marathi

डेव्हिड मिलर माहिती मराठी – David Miller Information in Marathi

नावडेव्हिड अँड्र्यू मिलर
टोपणनावकिलर मिलर
जन्म तारीख१० जून १९८९
वय (२०२१ प्रमाणे)३१ वर्षे
जन्म ठिकाणपिटरमारिट्जबर्ग, नेटल प्रांत, दक्षिण आफ्रिका
व्यवसायदक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटर (फलंदाज)
प्रशिक्षकजेसन गिलेस्पी
जर्सी क्रमांक#१० (दक्षिण आफ्रिका)
#१० (आयपीएल, काउंटी क्रिकेट)
विरुद्ध खेळायला आवडतेभारत आणि ऑस्ट्रेलिया
राष्ट्रीयत्वदक्षिण आफ्रिकन
होमटाउनपीटरमारिट्जबर्ग, दक्षिण आफ्रिका
कॉलेजमारिट्झबर्ग कॉलेज, पीटरमारिट्जबर्ग
David Miller Family
David Miller Family

घरच्या मैदानांवरील कारकीर्द

२००७-०८ मध्ये सुपरस्पोर्ट मालिकेतून डॉल्फिन्स् संघाच्या अंतिम सामन्यातून मिलरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पहिल्या डावातच त्याने अर्धशतक केले.

एक दिवसीय एम टी एन डोमेस्टिक चॅम्पियनशिप स्पर्धेत एकाच मोसमात मिलर आठ वेळा खेळला, परंतु अंतिम सामना ३ षटकांनंतर बंद करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. मिलरने स्पर्धेमध्ये सरासरी १३ धावा केल्या. स्पर्धेच्या निकालात डॉल्फिन्स पाचव्या क्रमांकावर होता. नंतर डॉल्फिन्स संघाकडून टी-२० स्पर्धेत मिलर दोन सामने खेळला. डॉल्फिन्स संघ अंतिम सामन्यात हरला.

DEVID MILLER

मे २०१८ मध्ये ग्लोबल टी-२० कॅनडा क्रिकेट स्पर्धेतील १० मार्की प्लेअर्सपैकी मिलर एक होता. ०३ जून २०१८ रोजी विन्नीपेग हॉक्स् संघाकडून पहिल्या मोसमात खेळण्यासाठी मिलरचा समावेश करण्यात आला.

ऑक्टोबर २०१८ मध्ये मेझन्सी सुपर लीग टी-२० स्पर्धेमध्ये पहिल्या मोसमात डर्बन हीट संघात मिलरची निवड करण्यात आली होती.

अजून वाचा: विराट कोहली माहिती मराठी 

आय. पी. एल. कारकीर्द

२०१३ च्या आय. पी. एल. मधील लिलावात किंग्ज् इलेव्हन पंजाब संघाने सहा करोड रुपयांचा करार मिलरशी केला. त्या मालिकेत मिलर सर्व सामने खेळला.

६ मे २०१३ ला मिलरने आय. पी. एल. च्या इतिहासातील तिसरी सर्वात जलद १०० धावांची खेळी नोंदवली. मिलरच्या त्या शतकाने त्याची आय. पी. एल. विश्वात एक वेगळीच ओळख निर्माण झाली. आय. एस. बिंद्रा स्टेडियम, मोहाली येथील त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुविरुद्ध ३८ चेंडू खेळत १०१ धावा केल्या. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार विराट कोहलीने मिलर ४१ धावांवर खेळत असतांना त्याचा झेल सोडला. नंतर त्या खेळीबद्दल बोलताना विराट म्हणाला, ‘आय. पी. एल. इतिहासातील सर्वोत्तम सामन्यांपैकी एक मला पहायला मिळाला.’

DEVID MILLER IPL

२०१४ आय. पी. एल. मध्ये डेव्हिड मिलरचे स्थान किंग्ज् इलेव्हन पंजाब संघाने राखून ठेवले. त्याने सर्व सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत आय. पी. एल. करंडकाच्या अंतिम सामन्यात पंजाब संघ पोहोचवण्यास मदत केली. २०१६ आय. पी.एल. साठी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार डेव्हिड मिलर असणार अशी घोषणा झाली.
६ सामन्यांपैकी ५ सामने किंग्ज इलेव्हन पंजाब संघ हरल्यानंतर कर्णधारपद डेव्हिड मिलरकडून काढून घेण्यात आले आणि त्याऐवजी मुरली विजयच्या नावाची घोषणा झाली.

२०१५ च्या आय. पी. एल. मोसमात डेव्हिड मिलरने ईडन गार्डन्स येथे ९ मे रोजी कोलकाता रायडर्सविरुद्ध सामन्यात मारलेल्या षटकाराचा बॉल लागल्यामुळे एका पोलिसाच्या डाव्या डोळ्याला दुखापत झाली होती.

अजून वाचा: महेंद्रसिंग धोनी मराठी माहिती

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

२०१० मध्ये दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्ध बांगलादेश ‘अ’ मालिकेत मिलरने दुसरी सर्वाधिक धावसंख्या उभारली, ज्यामुळे त्याला राष्ट्रीय संघामध्ये खेळण्यास विचारण्यात आले. मिलरने आंतरराष्ट्रीय टी-२० पदार्पण करतांना २० मे २०१० ला अँटीग्वा येथे वेस्ट-इंडिज विरुद्ध सामना खेळला. जॅक कॅलीस जायबंदी असल्यामुळे बदली खेळाडू म्हणून आलेल्या मिलरने त्याच्या डावाचा सहावा चेंडू षटकार खेचत सीमेपार धाडला आणि फलंदाजीत कल्पनातीत प्रगती करत दक्षिण आफ्रिकेला १ धावेनी विजय मिळवून दिला.

DEVID MILLER ODI

दोन दिवसानंतर मिलरने आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले. २३ नाबाद धावा करून त्याने दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवण्यात मदत केली. नंतर झिंबाब्वेचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आला असता एक दिवसीय आणि टी-२० दोन्ही प्रारुपांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या विजयात मिलरचे महत्त्वाचे योगदान होते. त्यामुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०१० मध्ये यू.ए. ई. येथे पाकिस्तान विरुद्ध खेळण्यासाठी मिलरचा संघात समावेश करण्यात आला. तो पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध दोन एक दिवसीय सामन्यांची मालिका खेळला. त्यानंतर २०११ विश्वकरंडकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या प्राथमिक संघात त्याचा समावेश करण्यात आला.

१५ ऑक्टोबर २०१० रोजी झिंबाब्वेविरुद्ध मिलरने पहिले आंतरराष्ट्रीय एक दिवसीय अर्धशतक केले; दक्षिण आफ्रिकेने ३५१ अशी भक्कम धावसंख्या केली.

२०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ श्रीलंका दौऱ्यावर गेला, तेव्हा तिसऱ्या एक दिवसीय सामन्यामध्ये मिलरने ७२ चेंडूत ८५ धावा करून दक्षिण आफ्रिकेला मालिकेतील पहिला विजय मिळवून दिला. सामनावीराचा सन्मान ही मिलरने मिळवला.

२०१३ च्या आय. सी. सी. चँपियन्स ट्रॉफीच्या उपानत्य सामन्यात क्लेनवेल्टबरोबर मिलरने नवव्या गड्यासाठी आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम केला. २५ जानेवारी २०१५ रोजी डेव्हिड मिलरने आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यातील पहिले शतक वेस्ट इंडिजविरुद्ध केले. ऑगस्ट २०१७ मध्ये पाकिस्तान विरुद्ध लाहोरमध्ये इंडीपेंडन्स कपमध्ये ३ टी-३० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळण्यासाठी वर्ल्ड 11 संघामध्ये मिलरची निवड झाली.

२०१५ क्रिकेट विश्वकरंडक

२०१५ क्रिकेट विश्वकरंडकात ६५ च्या सरासरीने ३२४ धावा करणारा मिलर दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होता. उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध १८ चेंडू खेळत त्याने गगनभेदी ४९ धावा ठोकल्या. परंतु डेव्हिड मिलरने केलेली प्रयत्नांची चुरस दक्षिण आफ्रिकेच्या वाट्याला विजय देऊ शकली नाही. न्यूझीलंडने सामना जिंकला. त्या विश्वकरंडकामध्ये जे. पी. ड्यूमिनीच्या साथीने ५ व्या गड्यासाठी आंतरराष्ट्रीय एक दिवसीय आणि विश्वकरंडकातील इतिहासामध्ये सर्वाधिक धावांची नोंद केली.

अजून वाचा: रोहित शर्मा मराठी माहिती

२०१७-१८ बांगलादेश मालिका

१५ ऑक्टोबर २०१७ रोजी डेव्हिड मिलर १०० वा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळला आणि रोहित शर्मा व पोलार्ड नंतर कसोटी सामना न खेळता १०० एक दिवसीय सामने खेळणारा तिसरा खेळाडू ठरला. त्याच दौऱ्यात दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने टी-२० मधील शतक ३५ चेंडूत नोंदवले. ते त्याचे सर्वात वेगवान टी-२० शतक होते. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतांना टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये शतक करणारा डेव्हिड मिलर हा पहिला खेळाडू ठरला. ह्या सामन्यात आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये १००० धावा करणारा मिलर हा दक्षिण आफ्रिकेचा पाचवा खेळाडू होता.

DEVID MILLER

डेव्हिड मिलरने विक्रमांचे सत्र एकेक पायरी चढत सुरुच ठेवले होते. डेव्हिड मिलर अनेक संघांकडून प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे. ते संघ असे दक्षिण आफ्रिका, डॉल्फिन्स, डरहॅम, जमैका टालावास, किंग्ज इलेव्हन पंजाब, क्वाझुलू नताल, क्वाझुलू नताल इनलॅन्ड, १९ वर्षाखालील, ‘दक्षिण आफ्रिका अ, दक्षिण आफ्रिका अकादमी, साऊथ आफ्रिकन स्कूल्स, सेंट ल्यूसिया झूक्स, विनिपेग हॉक्स्, वर्ल्ड इलेव्हन यॉर्कशायर.

डेव्हिड मिलरने क्वाझुलू नताल १९ वर्षाखालील संघासाठी आणि डॉल्फिन्स संघाकरीता यष्टीरक्षणही केले आहे. विश्वकरंडक २०१९ मध्ये पर्यायी यष्टीरक्षक म्हणून मिलरचे नाव तज्ञांनी सुचवले आहे. हाँगकाँग इंटरनॅशनल क्रिकेट सिक्सेस टूर्नामेंट मध्ये ऑक्टोबर २०१२ मधेही दक्षिण आफ्रिका संघाकडून मिलरने यष्टीरक्षण केले आहे.

DEVID MILLER

जवळपास सात वर्षांच्या काळानंतर सेंचुरीअन येथे श्रीलंके-विरुद्ध दुसऱ्या आंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामन्यामध्ये मिलरने यष्टीरक्षण केले. डी-कॉक जायबंदी झाल्यामुळे मिलरचे नाव यष्टीरक्षक म्हणून पुढे आले. १९ मार्च २०१९ रोजी श्रीलंकेच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर केपटाऊन येथे पहिल्या टी-२० सामन्यात डी कॉकने मिड ऑफआणि मिड विकेटवर क्षेत्ररक्षण केले तर मिलरने यष्टीरक्षण सामन्याच्या दुसऱ्या चेंडूवर झेल घेतला.

डेव्हिड मिलर हा डावखुरा फलंदाज जगातील विध्वंसक फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. त्याच्या बॅटचे तडाखे चेंडू सहजरित्या सीमेपार पाठवू शकतात. यष्टीरक्षक, फलंदाज आणि गोलंदाज अशा सर्व भूमिका मिलर व्यवस्थित पार पाडू शकतो. अष्टपैलू खेळाडूच्या रुपात डेव्हिड मिलर येत्या काळात सोनेरी यश प्राप्त करेल असे क्रिकेट जगतातील दिग्गजांचे मत आहे. विश्वकरंडक २०१९ मध्ये मिलर सर्व चाहत्यांच्या आणि दक्षिण आफ्रिका संघाच्या अपेक्षा पूर्ण करेल ह्यात शंका नाही!

अजून वाचा: क्रिकेट मराठी माहिती

FAQ: David Miller Information in Marathi

डेव्हिड मिलर जर्सी क्रमांक?

१० (दक्षिण आफ्रिका)
१० (आयपीएल, काउंटी क्रिकेट)

डेव्हिड मिलरचे वय काय आहे?

32 वर्षे (10 जून 1989)

डेव्हिड मिलरचे टोपणनाव

किलर मिलर

Leave a Reply