James Anderson Information in Marathi : जेम्स मायकल जिमी अँडरसनचा जन्म ३० जुलै १९८२ रोजी बर्नले, युनायटेड किंगडममध्ये झाला. तो जिमी, जिम, जिमजा, बर्नले एक्सप्रेस, डेजी ह्या टोपण नावांनी प्रसिद्ध आहे. जेम्स डाव्या हाताचा मध्यम-जलद गति गोलंदाज म्हणून प्रसिद्ध आहे.

शालेय जीवन आणि क्रिकेटमध्ये प्रवेश. जेम्स अँडरसन सेंट मेरीज आणि सेंट थिओडोरच्या आर. सी. हायस्कूलचा विद्यार्थी होता. लहान वयातच बर्नले क्रिकेट क्लबकडून खेळताना जेम्स क्रिकेटवेडा झाला. बालवयातच क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न जेम्सने पाहिले. वयाच्या १७ व्या वर्षीच अँडरसन लंकाशायर लीगच्या सर्वात जलदगती गोलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जाऊ लागला.

जेम्स एका मुलाखतीत म्हणाला, ‘मी नेहमीच सीम बॉलिंग केली परंतु १७ वर्षांचा असताना मी अचानक जलद गती गोलंदाजी करू लागलो. पदार्पणानंतर काही महिन्यातच जेम्स इंग्लिश क्रिकेट मधील चमकता तारा म्हणून ओळखला जाऊ लागला.

जेम्स अँडरसन माहिती मराठी,  James Anderson Information in Marathi
जेम्स अँडरसन माहिती मराठी, James Anderson Information in Marathi

जेम्स अँडरसन माहिती मराठी – James Anderson Information in Marathi

पूर्ण नाव –जेम्स मायकेल अँडरसन
टोपणनाव –जिमी, बर्नली एक्सप्रेस, स्विंगचा किंग
जन्म तारीख –३० जुलै १९८२
व्यवसाय –इंग्लिश क्रिकेटर (गोलंदाज)
आंतरराष्ट्रीय पदार्पण –कसोटी – २२ मे २००३
एकदिवसीय सामन्यात पदार्पण –झिम्बाब्वे – १५ डिसेंबर २००२ ऑस्ट्रेलिया विरुद्ध, मेलबर्न
टी २० पदार्पण –९ जानेवारी २००७ ऑस्ट्रेलिया विरुद्ध, सिडनी
प्रशिक्षक –माईक वॅटकिन्सन
जर्सी क्रमांक –#९ (इंग्लंड)
देशांतर्गत / राज्य संघ –ऑकलंड, लँकशायर
बॉलिंग शैली –उजवा हात वेगवान-मध्यम
फलंदाजीची शैली –डाव्या हाताची बॅट
विरुद्ध खेळायला आवडते –ऑस्ट्रेलिया
वय (२०२१ प्रमाणे) –३९
वडील –मायकेल अँडरसन
आई –कॅथरीन अँडरसन
James Anderson With Family
James Anderson With Family

प्रारंभिक कारकीर्द

अँडरसनने २००२ मध्ये लंकाशायरकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. १३ सामन्यांमध्ये २२. २८ च्या सरासरीने ५० बळी घेतले. २००२ मध्ये जेम्सला एन बी सी डेनिस कॉम्पटन पुरस्काराने गौरवण्यात आले.

२००३ मध्ये झिंबाब्वे विरुद्ध कसोटी सामन्याच्या एक आठवडा आधी जेम्सने लंकाशायरकडून खेळतांना हॅट्रिक घेतली. आठ वर्षात ओल्ड ट्रॅफर्डवरील ती पहिली हॅट्रिक होती. हॅट्रिक घेणारा जेम्स हा सर्वात तरुण खेळाडू होता. मे २००४ मध्ये बोरसेस्टरशायरविरुद्ध एका सामन्यात अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील दहा बळींचा विक्रम नोंदवला.

२००५ मध्ये अँडरसन लंकाशायरकडून पहिले पूर्ण सत्र खेळला. लंकाशायरमधील पदार्पणानंतर लवकरच त्याला इंग्लंडच्या संघात सामील करण्यात आले. इंग्लंड बरोबर शीतकालीन दौऱ्यानंतर जेम्सने जास्तीत जास्त वेळ साईडलाईनवर घालवला. नंतर इंग्लंडकडून खेळण्याची संधी मिळूनही जेम्सची गोलंदाजी तितकीशी प्रभावी ठरली नाही.

अँडरसनला २००६ मध्ये लंकाशायरकडून जास्त खेळू दिले गेले नाही. मे महिन्यात पाठीला दुखापत झाल्यामुळे हा निर्णय निवड समितीने घेतला होता.

२००८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी आणि एक दिवसीय मालिका सप्टेंबरमध्ये संपल्यावर अँडरसनला लंकाशायरच्या उरलेल्या सत्रात खेळता आले नाही.

२००९ च्या सुरुवातीला अँडरसनने प्रथम श्रेणी सामन्यात ससेक्स विरुद्ध १०९ धावांमध्ये ११ बळी घेतले. २६ एप्रिल २००९ पर्यंत जेम्स अंडरसनने लंकाशायर संघाकडून खेळतांना 48 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये २४. ३७ च्या सरासरीने १८८ बळी घेतले.

James Anderson
James Anderson

अजून वाचा: सचिन तेंदुलकर माहिती मराठी

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

जेम्स २० वर्षांचा असतांना त्याने १५ डिसेंबर २००२ रोजी मेलबोर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक दिवसीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने ६ षटकांमध्ये ४६ धावा देऊन १ बळी घेतला. २००३ मध्ये जेम्सचा काऊंटी कॅप देवून गौरव करण्यात आला.

२००३ च्या उन्हाळ्यात लॉर्डस् मैदानावर झिंबाब्वेविरुद्ध अँडरसनने पहिला कसोटी सामना खेळला. पदार्पणात एकाच डावात त्याने पाच बळी घेतले. त्याची यशस्वी गोलंदाजी पाकिस्तानविरुद्ध एक दिवसीय शृंखलेतही कायम राहिली.

पाकिस्तानविरुद्ध त्याने द ओव्हल वर हॅट्रिक घेतली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेनी अँडरसनला इंग्लंडचा स्वर्णिम गोलंदाज म्हणून प्रस्थापित केले. अँडरसनने पाच सामन्यांची मालिका ३५-६७ च्या सरासरीने १५ बळी घेवून समाप्त केली. ट्रेंट ब्रिजमध्ये तिसऱ्या कसोटीमध्ये १०२ धावांवर ५ बळी ही त्याची सर्वोत्तम कारकीर्द होती.

ऑगस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या खेळीनंतर अँडरसनला यंग क्रिकेटर ऑफ द इयर घोषित करण्यात आले. सर्व सम्मतिने पुरस्कार मिळालेला तो पहिला खेळाडू होता. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने जेम्स अँडरसनला २०११ -१२ मध्ये इंग्लंडचा क्रिकेटर घोषित केले.

अँडरसनची चेंडू फेकण्याची पद्धत असामान्य आहे. गोलंदाजी करतांना नजरखाली ठेवून बॉल फेकण्याची शैली त्याने बदलून पाहिली, परंतु चेंडूची गति कमी होत असल्याचे त्याला जाणवले. त्यामुळे तो आपल्या मूळ शैलीने पुन्हा गोलंदाजी करू लागला.

२००६ मध्ये इंग्लंड ‘अ’ संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी अँडरसनची निवड झाली. परंतु पहिल्या सामन्याच्या काही दिवस आधी अँडरसनला भारतात खेळण्यासाठी पाठवले गेले. भारतातील अंतिम सामन्यात प्रभावी कामगिरी केल्यावर अँडरसन २००७ च्या विश्व चषकासाठी इंग्लंडच्या संघाकडून खेळण्यास उत्साही होता. परंतु १४ मार्च २००७ ला बातमी आली की सरावादरम्यान त्याच्या बोटाला दुखापत झाली होती. परंतु वेदना होत असतांना देखील तो खेळू शकला.

२००७ मध्ये अँडरसन भारताविरुद्ध तीन कसोटी सामने खेळला. पहिल्या कसोटीमध्ये त्याने महेन्द्रसिंग धोनीला बाद करून पन्नासावा कसोटी बळी घेतला. राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीचा एकाच डावात बळी घेणारा तो पहिला इंग्लिश गोलंदाज आहे. इंग्लंडने मालिका गमावली. तरी अँडरसनचे गोलंदाजीतील सातत्य कौतुकास्पद होते. त्याने ३५. ५७ च्या सरासरीने १४ फलंदाज बाद केले. त्याला मालिकावीर घोषित करण्यात आहे. लॉर्डस्च्या सन्माननीय मंडळाच्या यादीत त्याचे नाव दुसऱ्यांदा नोंदवले गेले. नंतरची एक मालिका इंग्लंडने घरच्या मैदानांवर ३ वर्षांनंतर जिंकलेली मालिका ठरली. मालिकेच्या पहिल्या एक दिवसीय सामन्यामध्ये अँडरसनने गौतम गंभीरला ३ धावांवर बाद करून एक दिवसीय सामन्यातील १०० वा बळी नोंदवला.

सप्टेंबर २००७ मध्ये होणाऱ्या विश्व टी-२० चषकासाठीही इंग्लंड संघामध्ये अँडरसनची निवड झाली. इंग्लंडकडून ४ सामने खेळून त्याने ३ बळी घेतले. मात्र इंग्लंड मालिकेची दुसरी फेरी पार करू शकला नाही.

अजून वाचा: विराट कोहली माहिती मराठी 

२००८ : न्यूझीलंड, साऊथ आफ्रिका, भारत

२००८ च्या वसंतात अँडरसनने इंग्लंड संघाबरोबर न्यूझीलंडचा दौरा केला. टी-२० मालिकेत इंग्लंडने २-० असा विजय मिळवला परंतु नंतर झालेली एक दिवसीय मालिका न्यूझीलंडने ३-२अशी जिंकली. २००८ मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड दौऱ्यावर असतांना अँडरसनला सूर गवसला. त्याने १९. ३१ सरासरीने १९ बळी घेतले आणि मालिकेचा आघाडीचा गोलंदाज म्हणून यश मिळवले. पहिल्या कसोटीमध्येही अँडरसनने प्रभावी गोलंदाजी करत १३० धावांमध्ये ५ बळी घेतले. दुसऱ्या कसोटीमध्ये त्याने १३९ धावांमध्ये ५ बळी घेतले. इंग्लंडने तो सामना ६ गडी राखून जिंकला. नंतरच्या सामन्यात पहिल्या डावात ४३ धावांवर ७ बळी आणि सामन्यात ९८ धावांवर ९ बळी अशी चमकदार कामगिरी करत सामनावीर होण्याचा मान मिळवला. इंग्लंडने मालिका २-० अशी जिंकली

२००९ : वेस्ट इंडिज

२००९ मधील इंग्लंडच्या वेस्ट इंडिज दौऱ्यामध्ये पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात त्रिनिदाद मध्ये क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर ५४६/६वर वेस्ट इंडिजने डाव घोषित केला. नंतर अँडरसनने यष्टीरक्षक दिनेश रामदीनला ७० धावांवर बाद केले. त्याचा रन रेट (धाव संख्येचा दर) २. १८- त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम असलेल्या प्रदर्शनांपैकी एक होता.

अँडरसनने वेस्ट इंडिज दौरा ३८ च्या सरासरीने, २. ६५ च्या रन रेटने ९ बळी घेवून संपवला. एक दिवसीय सामन्यांमध्ये अँडरसनने २१. ११ च्या सरासरीने, षटकामध्ये ५ धावा देत ९ बळी घेतले. नंतर आय पी एल मध्ये खेळण्याचा प्रस्ताव मात्र त्याने नाकारला. इंग्लंडसाठी उज्ज्वल भविष्य साकारण्याचा त्याचा मानस होता.

२००९-१० साऊथ आफ्रिका

अँडरसन साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला तो इंग्लिश संघाचा झंझावाती गोलंदाज म्हणूनच. त्याला एकही बळी घेता आला नाही पण त्याची आंतरराष्ट्रीय ढ-२० मालिकेतील पहिल्या सामन्यातील कामगिरी समाधानकारक होती. त्याने प्रत्येक षटकामध्ये सरासरी ८ धावा दिल्या. पुढील सामन्यात त्याने १ बळी घेतला.
एक दिवसीय मालिकेत जेम्सची गोलंदाजी प्रभावशाली ठरली. दुसऱ्या सामन्यात त्याने साठ धावांमध्ये ३ बळी आणि चौथ्या सामन्यात २३ धावांमध्ये ५ बळी घेतले.

अजून वाचा: महेंद्रसिंग धोनी मराठी माहिती

२०१० बांगलादेश आणि पाकिस्तान

बांगलादेश विरुद्ध २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली कसोटी इंग्लंडने जिंकली. अँडरसनने ७८ धावांमध्ये ८ आणि ८४ धावांमध्ये १ बळी घेतले. अँडरसन दुसरा सामनाही खेळला ज्यामध्ये त्याने ४५ धावांमध्ये १ आणि सोळा धावांमध्ये ३ बळी घेतले. इंग्लंडने मालिका २-० ने जिंकली.

त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर पाकिस्तान संघ आला. त्या सामन्यांमध्ये अँडरसनने स्वत:ला जगातील सर्वश्रेष्ठ कसोटी गोलंदाजांपैकी एक म्हणून प्रस्थापित केले. पहिल्या सामन्यात ५४ धावांमध्ये ५ बळी आणि १७ धावांमध्ये सहा बळी अशी अँडरसनची कामगिरी होती. इंग्लंडने सामना जिंकला. इंग्लंडने दुसरा सामनाही जिंकला. त्यामध्ये अँडरसनचे पहिल्या डावात २० धावांमध्ये ४ बळी होते. शृंखला संपेपर्यत अंडरसनच्या स्विंग बॉलींगमुळे त्याचा क्रिकेट विश्वात दबदबा निर्माण झाला होता.

२०११ विश्वचषक

२०११ च्या विश्वचषकात साऊथ आफ्रिकेविरुद्ध अँडरसनने सहा षटकांमध्ये १६ धावा देवून २ बळी घेतले. नंतर श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ६६ धावा देऊन जेम्सने ३ गडी बाद केले. इंग्लंडने एक दिवसीय मालिका श्रीलंकेविरुद्ध जिंकली. शेवटच्या सामन्यात ५५ धावांमध्ये अँडरसनने २ बळी घेतले.

२०१५ : वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड अँटीग्वा येथे वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असतांना २०१५ मध्ये अँडरसन १०० वी कसोटी खेळला ज्यामध्ये तो इंग्लंडचा सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज ठरला. दुसऱ्या सामन्यामध्ये अँडरसनने ४७ धावांमध्ये २ बळी घेतले. ती मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.

अँडरसन एक हरहुन्नरी खेळाडू, फॅशन डिझायनर आणि मीडिया मध्येही यशस्वी ठरला आहे. त्याचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आणि कष्ट हे त्याच्या आनंदी जीवनाचे रहस्य आहे.

अजून वाचा: रोहित शर्मा मराठी माहिती

FAQ: James Anderson Information in Marathi

जेम्स अँडरसन वनडेमधून निवृत्त झाला आहे का?

शेवटची कसोटी – 10 जून 2021 विरुद्ध न्यूझीलंड
शेवटचा वनडे – 13 मार्च 2015 विरुद्ध अफगाणिस्तान

जेम्स अँडरसनची संपत्ती किती आहे?

जेम्स अँडरसनची एकूण संपत्ती US 8.2 दशलक्ष (म्हणजे अंदाजे ₹ 60 कोटी) आहे.

अँडरसनने तेंडुलकरला किती वेळा बाद केले?

जेम्स अँडरसनने कसोटीत नऊ वेळा सचिन तेंडुलकरला बाद केले.

Leave a Reply