Jasprit Bumrah Information in Marathi : जसप्रीत जसबीरसिंह बुमराह भारतीय राष्ट्रीय संघाकडून खेळणारा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज आहे. जसप्रीतचा जन्म अहमदाबाद, गुजरात (भारत) येथे ६ डिसेंबर १९९३ रोजी झाला. स्वर्गीय जसबीर सिंग हे जसप्रीतचे वडील आणि दलजीत कौर जसप्रीतची आई. जसप्रीतची बहीण जुहीका बुमराह शिक्षिका आहे.

जसप्रीतचे शालेय शिक्षण निर्माण हायस्कूल अहमदाबाद येथे झाले. जसप्रीत, जे. बी जस्सी ह्या टोपणनावाने ओळखला जातो. जसप्रीतच्या यशस्वी कारकिर्दीत त्याचे प्रशिक्षक किशोर त्रिवेदी ह्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. जसप्रीत भारतीय वेगवान गोलंदाजांपैकी आहे. त्याची गोलंदाजीची गति ताशी १४५-१५० कि. मी. आहे. जसप्रीत इन-स्विंग यॉर्कर शैलीनेही गोलंदाजी करतो.

जसप्रीत बुमराह माहिती, Jasprit Bumrah Information in Marathi

जसप्रीत बुमराह माहिती – Jasprit Bumrah Information in Marathi

खरे नावजसप्रीत जसबीरसिंग बुमराह
टोपणनावजेबी
जन्म तारीख६ डिसेंबर १९९३
राशिधनु राशि
राष्ट्रीयत्वभारतीय
जन्मस्थानअहमदाबाद, गुजरात, भारत
शाळानिर्माण हायस्कूल, अहमदाबाद
वैवाहिक स्थितीविवाहित
कुटुंबवडील- कै. जसबीर सिंह
आई- दलजित कौर (प्राचार्य)
बहिण- जुहिका बुमराह
बायको – संजना गणेशन
व्यवसायभारतीय क्रिकेटपटू (मध्यम वेगवान गोलंदाज)
बॉलिंग शैलीउजवा हात फास्ट मध्यम
आंतरराष्ट्रीयएकदिवसीय (वनडे) – २३ जानेवारी २०१६ ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी येथे.
टी -२०- २६ जानेवारी २०१६ ऑस्ट्रेलिया विरुद्ध अ‍ॅडलेड.
प्रशिक्षककिशोर त्रिवेदी
जर्सी९३ (भारत)
९३ (आयपीएल)
कोणत्या संघाविरुद्ध खेळणे आवडतेपाकिस्तान, ऑस्ट्रेलिया
Jasprit Bumrah Family
Jasprit Bumrah Family

सुरुवातीची क्रिकेट कारकीर्द

जसप्रीत सुरुवातीला गुजरातकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला. ऑक्टोबर १३ मध्ये विदर्भ संघाविरुद्ध त्याने पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात त्याने ७ बळी घेतले. पदार्पणाच्या मालिकेत त्याने आघाडीचा गोलंदाज म्हणून प्रभाव पाडला.

जसप्रीतने महाराष्ट्राविरुद्ध २०१२-१३ मध्ये सईद मुश्ताक अली ट्रॉफीमधून खेळतांना सामनावीराचा मान मिळवला. अंतिम सामन्यात पंजाबविरुद्ध खेळतांना त्याने १४ धावांमध्ये घेतलेल्या 3 बळींचा मोलाचा वाटा विजयश्री खेचून आणण्यात महत्त्वाचा ठरला.

Jasprit Bumrah IPL Old Photo
Jasprit Bumrah IPL Old Photo

१९ वर्षाच्या जसप्रीतने आय पी एल पदार्पणातच रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरुविरुद्ध घेतलेल्या ३२ धावातील ३ बळींमुळे तो प्रकाशझोतात आला. पदार्पणात ३ बळी घेणारा जसप्रीत दुसरा गोलंदाज ठरला. पेप्सी आय पी एल २०१३ मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून अगदी थोडेच सामने खेळूनही त्याच्या आकर्षक कामगिरीमुळे मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाला पेप्सी आय पी एल २०१४ च्या मोसमासाठी त्याला पुन्हा करारबद्ध करावे लागले. २०१८ मध्ये त्याने ७८ बळी नोंदवले.

अजून वाचा: विराट कोहली माहिती मराठी 

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

२०१६ साली जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध बुमराहने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये पदार्पण केले. ऑगस्ट २०१६ मध्ये ‘वेस्ट इंडिज विरुद्ध टी-२० मालिकेतील दोन सामन्यांमध्ये जसप्रीतने एकाच कॅलेंडर वर्षात सर्वाधिक (२८) बळी घेण्याचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांतील नवा विक्रम प्रस्थापित केला.

जानेवारी २०१७ मध्ये इंग्लंडच्या भारत दौऱ्यात टी-२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात बुमराहने भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याने ४ षटकांमध्ये २० धावा देत २ बळी घेतले. शेवटच्या षटकात इंग्लंडला आठ धावांची गरज असताना जसप्रीतने केवळ २ धावा देत २ बळी घेतले. जसप्रीत ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला. शेवटच्या चेंडूवर सहा धावांची गरज असताना जसप्रीतने अप्रतिम यॉर्कर टाकला.

Jasprit Bumrah ODI Cricket
Jasprit Bumrah ODI Cricket

२०१७ साली श्रीलंका दौऱ्यावर जसप्रीत बुमराहने सर्वाधिक (१५ ) बळी नोंदवले. जलद गती गोलंदाजाने दोन देशांमधील एक दिवसीय मालिकेत नोंदवलेला सर्वाधिक बळींचा तो विक्रम होता. चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मधील अंतिम सामन्यातील जसप्रीतने नो बॉलवर घेतलेली विकेट प्रेक्षकांच्या अजूनही लक्षात आहे. फलंदाजी फरवार झमानने त्या सामन्यात केली.

नोव्हेंबर २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भारताच्या कसोटी संघामध्ये जसप्रीतची निवड झाली. केपटाऊन मधील न्यू लॅन्ड येथे 5 जानेवारी २०१८ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जसप्रीतने कसोटी सामन्यातील पदार्पण केले. जसप्रीतने ए. बी. डिव्हिलीयर्सला क्लीन बोल्ड करताच पहिली कसोटी विकेट मिळवली. भारतविरुद्ध दक्षिण आफिक्रेच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीतने ५४ धावांमध्ये ५ बळी घेतले. १८. ५ षटकांमध्ये त्याने ही नेत्रदीपक कामगिरी केली.

Jasprit Bumrah Test Cricket
Jasprit Bumrah Test Cricket

भारताच्या इंग्लंड दौऱ्यावरील ट्रेंट ब्रिज येथील २०१८ मधील सामन्यात जसप्रीतने दुसऱ्यांदा कसोटीमधील ५ बळी घेतले. त्याने ही किमया २९ षटकांमध्ये ८५ धावा देऊन साधली. भारताने २०३ धावांनी इंग्लंडचा पराभव केला.

२०१८ मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉक्सिंग डे टेस्ट मध्ये बुमराहने तिसरी ५ बळींची रोमहर्षक कामगिरी केली. ३३ धावांमध्ये सहा बळी नोंदवत तिसऱ्या दिवशी त्याने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १५१ धावांमध्ये गुंडाळण्यात हातभार लावला. एकाच कॅलेंडर वर्षात ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका अशा ३ ठिकाणी ३ वेळा ५ कसोटी बळी घेण्याचा विक्रम जसप्रीतने आपल्या नावावर नोंदवला. २१ बळी घेणारा जसप्रीत मालिकेतील सर्वोच्च बळी घेणारा गोलंदाज ठरला. वर्षाच्या अखेरीस जसप्रीतच्या नावावर ४८ बळी होते. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या वर्षात भारतीय गोलंदाजाने घेतलेल्या सर्वाधिक बळींचा तो विक्रम होता.

Jasprit Bumrah Test Cricket With Trophy
Jasprit Bumrah Test Cricket With Trophy

एप्रिल २०१९ मध्ये क्रिकेट विश्वकपकरीता भारताच्या संघात जसप्रीतला निवडले गेले आहे. इंटरनॅशनल क्रिकेट कौंसिलने त्याला क्रिकेट विश्वकपमध्ये पदार्पण करणाऱ्या ५ सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक म्हटले आहे.

अजून वाचा: महेंद्रसिंग धोनी मराठी माहिती

गोलंदाजीची तंत्रशुद्ध शैली

गोलंदाजीची नाविन्यपूर्ण ढब आणि यॉर्कर टाकण्याची क्षमता व शेवटच्या षटकात उत्तम गोलंदाजी करण्याची क्षमता ह्या शैलीमुळे जसप्रीत बुमराह प्रसिद्धी झोतात आला. गोलंदाजीच्या शैलीतील वेगळेपणा, बाणाच्या वेगाने चेंडू फेकण्याची क्षमता, नैसर्गिक गति ह्यामुळे जसप्रीतला फटके मारणे फलंदाजांना अवघड जाते.

Jasprit Bumrah Bowling Action
Jasprit Bumrah Bowling Action

जसप्रीत बुमराहने गोलंदाजीची एक गूढ शैली आत्मसात केल्यामुळे क्रिकेट विश्वात स्वतःचे एक वलय निर्माण केले आहे. मुंबई इंडियन्सचा गोलंदाज लसिथ मलिंगा जसप्रीसारखाच प्रसिद्ध आहे. जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे एक अत्यावश्यक संसाधन बनला आहे.

ताशी १४२ किमी सरासरीने गोलंदाजी करणारा जसप्रीत बुमराह भारतातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी समजला जातो. ॲडीलेड ओव्हल येथे २०१८ मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यामध्ये पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीतने १५३. ३६ या सर्वात वेगवान गतीने गोलंदाजी केली. गोलंदाजीच्या वेगात मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्ससारख्या जलदगती गोलंदाजांना ही त्याने मागे टाकले.

Jasprit Bumrah ODI
Jasprit Bumrah ODI

आपल्या गोलंदाजीच्या प्रवासाबद्दल बुमराह म्हणतो, ‘माझे सर्वात आवडते गोलंदाज मिचेल जॉन्स, वसिम अक्रम आणि ब्रेटली आहेत. मी त्यांचे व्हिडीओ पाहून बरेच शिकलो. जॉन्सन आणि मलिंगा कडूनही मला बरेच शिकायला मिळाले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या कुठल्याही ज्येष्ठ गोलंदाजाकडून मी शिकण्याचा प्रयत्न करतो.’

जसप्रीत बद्दल गौरवोद्गार काढतांना सचिन तेंडुलकर म्हणतो, ‘जसप्रीत बुमराह आज आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज आहे. सध्या खेळतो त्यापेक्षाही उत्कृष्ट तो येणाऱ्या काळात खेळेल. जसप्रीतची सर्वोत्तम खेळी अजून व्हायची आहे.’

आयपीएल २०१२ च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नईला हरवले आणि विजयावर शिक्कामोर्तब केले. मुंबईच्या त्या विजयाचा शिल्पकार जसप्रीत होता.

अजून वाचा: सचिन तेंदुलकर माहिती मराठी

Jasprit Bumrah with IPL Trophy
Jasprit Bumrah with IPL Trophy

जसप्रीतने आय पी एल च्या १२ व्या मोसमात १६ सामन्यांमध्ये १६ बळी घेतले. जसप्रीतची इकॉनॉमी ६. ६३आहे मुंबईने अंतिम सामन्यात १४९ धावा केल्या. जसप्रीतने १४ धावांमध्ये २ गडी गारद केले. जसप्रीतने चेन्नई सुपर किंग्ज्च्या धावांमध्ये अडसर निर्माण केल्यामुळे अत्यंत रोमहर्षक सामन्यात मुंबईने १ धावेने विजय मिळवला.
त्या सामन्यामध्ये जसप्रीतने लक्षपूर्वक, रणनीती आखून गोलंदाजी केली. सामन्यानंतर जसप्रीत म्हणाला, ‘सामना संपेपर्यंत मी संयम ढळू दिला नाही. सामना चुरशीचा होणार ही जाणीव असल्यामुळे प्रत्येक क्षण मी तोल सांभाळला आणि विचारपूर्वक प्रत्येक पाऊल टाकलं.’

जसप्रीत बुमराह विषयी हा लेख लिहीत असतांना आंतरराष्ट्रीय विश्वकप २०१९ एक आठवड्यावर येऊन ठेपला आहे. २०१९ विश्व कपमधील जसप्रीतच्या कामगिरीबद्दल सचिनने भाकीत वर्तवले आहे. तो म्हणतो, ‘जसप्रीत बुमराह २०१९ च्या विश्वचषकातला भारताचा हुकमी एक्का आहे आणि प्रतिस्पर्धी संघासाठी डोकेदुखी असलेला गोलंदाज ठरेल.’

Jasprit Bumrah with Dhoni, Jadeja, KL Rahul
Jasprit Bumrah with Dhoni, Jadeja, KL Rahul

विश्वचषक सुरू होण्यास अगदी थोडा कालावधी राहिला असतांना कोणते खेळाडू महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील या प्रश्नावर सचिन जसप्रीत बुमराहचे नाव घेतो आणि त्याची स्तुतीही करतो.

सचिनच्याच शब्दात – ‘जसप्रीतने आय पी एल पदार्पण मुंबई इंडियन्स संघाकडून केले. त्याचा खेळ सातत्यानं प्रगतीपूर्ण राहिला आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये त्याला अनुभव आहे आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडसारख्या देशाच्या फलंदाजांनाही त्याने सहज वठणीवर आणलं आहे.’

सामना फिरवण्याचे त्याचे कसब २०१५ मध्ये जगाने पाहिलेय. जसप्रीत घातक, फसवी, गोलंदाजी करू शकतो’ असे सचिन जसप्रीतचे कौतुक करतांना म्हणतो.

कर्णधार विराट कोहली जसप्रीतचे कौतुक करतांना म्हणतो, ‘जसप्रीतची विलक्षण कामगिरी पाहता जगातील प्रत्येक फलंदाज जसप्रीतची गोलंदाजी खेळतांना घाबरत असेल.’

विराट म्हणाला, ‘जसप्रीत बुमराहच्या माऱ्याचा सामना करणे खूप जड जाते, जेव्हा तो फॉर्मात असतो.’

‘जसप्रीत बुमराहचा दृष्टिकोन, विचारशैली हे सर्वांपेक्षा आगळेवेगळे आहेत. जसप्रीतचे लक्ष कायम विकेट कशी मिळेल याकडेच असते. संघाला ब्रेक थू मिळवून देण्याचा त्याचा कायम प्रयत्न असतो.’

गेल्या काही काळापासून मी पाहिलेल्या गोलंदाजांमध्ये मानसिक दृष्ट्या सर्वात कणखर जसप्रीत आहे.’

जसप्रीतला पुढील देदीप्यमान कारकिर्दीसाठी शुभेच्छा व अभिनंदन!

जसप्रीत बुमराहची बायको आणि लग्न

क्रिकेटर जसप्रीत बुमराह १५ मार्च २०२१ रोजी संजना गणेशनशी लग्न केले, गोव्यात त्याचे लग्न झाले, संजना गणेशन ही एक दक्षिण अभिनेत्री आहे, तिने स्प्लिट्सविलाच्या सातव्या हंगामात देखील काम केले आहे संजना गणेशन मॉडेल म्हणूनही काम करते संजना जसप्रीतपेक्षा अडीच वर्षे मोठी आहे. जसप्रीतने आपल्या लग्नाविषयी उघडपणे माहिती दिली नाही, परंतु काही काळासाठी तिने बीसीसीआयचा मेल अर्ज दाखल केला होता, ज्यामुळे अनेक अटकळे लावली जात होती आणि तिच्या लग्नाशी संबंधित सर्व अफवावरून बाहेर येऊ शकले नाही.

Jasprit Bumrah Marriage Photo with Wife
Jasprit Bumrah Marriage Photo with Wife
Jasprit Bumrah Ring Ceremony
Jasprit Bumrah Ring Ceremony

जसप्रीत बुमराहच्या आवडी निवडी

आवडते क्रिकेटर्सफलंदाज – सचिन तेंडुलकर, एबी डिव्हिलियर्स आणि वीरेंद्र सेहवाग
आवडते गोलंदाजकॉलिन क्रॉफ्ट, लसिथ मलिंगा आणि झहीर खान
आवडता डिशढोकला
आवडता अभिनेताअमिताभ बच्चन

अजून वाचा: रोहित शर्मा मराठी माहिती

जसप्रीत बुमराहविषयी काही तथ्ये

  • जसप्रीत बुमराह धूम्रपान करतात का? – नाही
  • जसप्रित बुमराह मद्यपान करतात काय? – होय
  • तो आपल्या अनोख्या गोलंदाजीच्या शैलीने फलंदाजांना त्रास देण्यासाठी ओळखला जातो.
  • २०१३ मध्ये मुंबई इंडियन्स (MI) आयपीएल संघात जाण्यापूर्वी तो प्रथम श्रेणी घरगुती सामने खेळायचा.
  • जेव्हा तो फक्त ७ वर्षांचा होता तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले.
  • तो गुजरातकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो.
  • तो एकदा म्हणाला की लसिथ मलिंगाने यॉर्कर्स कशी गोलंदाजी करावी हे शिकवले.
  • सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०१३ दरम्यान मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक जॉन राईटने प्रथम आपली कला ओळखली.
  • त्याच्या गोलंदाजीच्या विशिष्ट शैलीमुळे फलंदाजांना त्रास देण्यासाठी ओळखले जाते.
  • जसप्रीत बुमराहने ४ एप्रिल २०१३ रोजी रॉयल चॅलेन्जर बेंगळुरूविरुद्ध मुंबई इंडियन्सकडून डेब्यू सामना खेळला होता.

जसप्रीत बुमराह सोशल मीडिया अकाउंट लिंक

फेसबुकhttps://www.facebook.com/JaspritJBumrah
ट्विटरhttps://twitter.com/jaspritbumrah93
इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/jaspritb1/
विकिपीडियाhttps://en.wikipedia.org/wiki/Jasprit_Bumrah

Jasprit Bumrah Photo Gallery

जसप्रीत बुमराह
जसप्रीत बुमराह
Jasprit Bumrah
Jasprit Bumrah with MS Dhoni
Jasprit Bumrah with MS Dhoni
Jasprit Bumrah With Lasit Mallinga
Jasprit Bumrah With Lasit Mallinga
Jasprit Bumrah
Jasprit Bumrah With Wife
Jasprit Bumrah With Wife
Jasprit Bumrah Old Kids Time Photo
Jasprit Bumrah Old Kids Time Photo
Jasprit Bumrah with His Mother
Jasprit Bumrah With Mother
Jasprit Bumrah with Tiger
Jasprit Bumrah with Tiger

अजून वाचा: क्रिकेट मराठी माहिती

FAQ: Jasprit Bumrah Information in Marathi – जसप्रीत बुमराह माहिती

जसप्रित बुमराहचे वेतन किती आहे?

जसप्रीत बुमराह आयपीएल मुंबई इंडियन्स, आयपीएल पगार 2021 मध्ये ₹70,000,000 आणि एकूण आयपीएलचे उत्पन्न ₹329,000,000.

बुमराह एक पंजाबी आहे का?

जसप्रीतचा जन्म 6 डिसेंबर 1993 रोजी गुजरातच्या अहमदाबाद येथे एका पंजाबी शीख कुटुंबात झाला होता. वडील जसप्रीतसिंग यांना वयाच्या 7 व्या वर्षीच तो गमावला. त्याची आई दिलजीत एक शाळेची मुख्याध्यापिका आहे आणि एकट्याने त्याला वाढवले.

बुमराहची सर्वाधिक गती किती आहे?

153.26 किमी/ता

बुमराह पत्नी कोण आहे?

बुमराह पत्नी कोण आहे?

Leave a Reply