विद्यार्थ्यांना शैक्षणिक भाषणे लिहिण्यात आणि भाषण देण्यास मदत करण्यासाठी, आम्ही या लेखात एक सुंदर लोकमान्य टिळक भाषण मराठी प्रदान केले आहे.
आम्ही इयत्ता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 च्या विद्यार्थ्यांसाठी मराठीमध्ये Lokmanya Tilak Speech in Marathi लिहिले आहे.
सुप्रभात, आदरणीय प्राचार्य महोदया, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो. आज मला लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त काही ओळी सांगण्याचा मान मिळाला. सर्वप्रथम, मला गुरुपौर्णिमा निमित्त लोकमान्य टिळकाबद्दल भाषणाची ही संधी दिल्याबद्दल मी माझ्या शिक्षकांचे आभार मानू इच्छितो.
लोकमान्य टिळक भाषण मराठी – Lokmanya Tilak Speech in Marathi
अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन व येथे जमलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींनो आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांनबद्दल जे काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती.
एकदा वर्गामध्ये शेंगाची टरफले पडलेली होती. वर्गात गुरुजी आल्यानंतर त्यांनी सर्व मुलांना या शेंगा कुणी खाल्ल्या हे सांगा अन्यथा हातावर छड्या खायला तयार व्हा असे सुनावले. इतर मुलांनी छड्या खाल्ल्या पण एका चुणचुणीत मुलाने शिक्षकांना उत्तर दिले “मी शेंगा खाल्ल्या नाहीत तर मी छड्या खाणार नाही.
शिक्षकांना न केलेल्या चुकीबद्दल ठणकावून सांगणारा तो विद्यार्थी इंग्रज सरकारविरुद्ध निर्भिडपणे लिहिता झाला की, ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ?’ असा निर्भिड विद्यार्थी म्हणजेच बाळ गंगाधर टिळक. त्यांचे खरे नाव केशव गंगाधर टिळक, पण खूप दिवसांनी घरात जन्माला आलेला मुलगा म्हणून त्यांना सर्वजण लाडाने बाळ म्हणत आणि मग तेच नाव पुढे रुढ झाले.
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” असे म्हणणाऱ्या लोकमान्य टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरीतील चिखली गावी झाला. लोकमान्य टिळकांची बुद्धी लहानपणापासूनच कुशाग्र होती. त्यांना असत्य व अन्यायाबद्दल चीड होती. आत्मविश्वास आणि निर्भयपणा हे गुण त्यांच्या मध्ये होते. शाळेमध्ये वहीमध्ये संत हा शब्द संत, सन्त आणि सनत अशा तिन्ही प्रकारे लिहिल्यास तो बरोबरच आहे असे आत्मविश्वासाने शिक्षकांना सांगून त्यांनी शाबासकी मिळविली होती. त्यांच्या वयाच्या १० व्या वर्षी वडिलांची बदली पुणे येथे झाली आणि त्यांचे शिक्षण व कार्यक्षेत्र पुणे हेच घडून गेले. १८७२ मध्ये मॅट्रीक झाल्यानंतर पुण्याच्या डेक्कन कॉलेजातून त्यांनी बी. ए. ची परिक्षा उत्तीर्ण केली. पूढे एल. एल. बी. ची पदवी त्यांनी मिळवली.
उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे येथे लोकसेवेसाठी त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर व गोपाळराव आगरकर यांच्या सहकार्याने न्यू इंग्लिश स्कूल व फगर्युसन कॉलेज या शिक्षण संख्या सुरु केल्या. जनता, राष्ट्रप्रेमराष्ट्रभक्तीने प्रेरीत होऊन लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा वृत्तपत्राची निर्मिता केली. वृत्तपत्राचे माध्यमातून जळजळीत लेखन करुन त्यांनी इंग्रज सरकारला सळोकी पळो करुन सोडले. दुष्काळ, प्लेग या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सरकारी अधिकारी व नोकरवर्ग यांच्या कडून सामान्य जनतेवर जे अत्याचार झाले त्याचा त्यांनी अत्यंत कडक शदात निषेध केला. भारतीय समाजाला एकजूट करण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव सुरु केले.
लोकमान्य टिळकांनी स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण स्वराज्य व बहिष्कार या चतु:सूत्री कार्यक्रमाचा पुरस्कार केला. त्यांच्या भाषणाने व लेखनाने जनता जागृत होऊन पेटून उठली. त्यानी भारतील जनतेला स्वराज्याचा महान मंत्र दिला. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना त्यांनी केली. त्यामुळे स्वराज्याचा मंत्र सामान्य जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन पोहचला. होमरुल लीग व स्वराज्य संघ या संस्था त्यांनी स्थापन केल्या. त्या माध्यमातून राष्ट्रवादी विचारांचा प्रसार त्यांनी केला.
सामान्य जनतेला राजकीय दृष्ट्या जागृत करुन परकीय सत्तेच्या विरोधात उभे करण्याचे अत्यंत कठीण कार्य त्यांनी केले. म्हणूनच ‘भारतीय असंतोषाचे जनक’ ही उपाधी त्यांना मिळाली. २४ जून १९०८ रोजी टिळकांवर राजद्रोहाचा खटला भारण्यात आला. त्यामध्ये त्यांना सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येऊन ब्रम्हदेशातील मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली. त्यांचा मूळपिंड अभ्यासू विद्वानाचा त्यामुळे तुरुंगासारख्या वातावरणातही त्यांनी ‘गीता रहस्य’ या अजोड ग्रंथाचे अभ्यासपूर्ण लेखन केले.
प्रश्न १. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी कधी असते?
उत्तर – १ ऑगस्ट
प्रश्न २. लोकमान्य टिळकांचा जन्म कधी झाला?
उत्तर – २३ जुलै १८५६ मध्ये रत्नागिरीतील चिखली गावी.
पुढे वाचा: