Shikhar Dhawan Information in Marathi : शिखर धवन हा भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे, जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि सध्या आयपीएलमध्येही दिल्ली कैपिटल्स साठी खेळतो. शिखर धवन भारतीय क्रिकेट संघाचा डाव्या हाताचा सलामीचा फलंदाज आहे आणि अधूनमधून उजव्या हाताचा ब्रेक गोलंदाज देखील आहे.

शिखर धवन नोव्हेंबर २००४ मध्ये दिल्लीकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अंडर १७ आणि १९ वर्षाखालील संघात खेळला. सध्या तो भारतीय संघासाठी सलामीवीराची भूमिका साकारत आहे. मित्रांनो, आजचा लेख या यशस्वी भारतीय संघाच्या क्रिकेटर सलामीवीरांच्या चरित्रावर आहे. चला तर जाऊन घेऊया शिखर धवन याच्याबद्दल.

शिखर धवन माहिती मराठी, Shikhar Dhawan Information in Marathi
शिखर धवन माहिती मराठी, Shikhar Dhawan Information in Marathi

शिखर धवन माहिती मराठी – Shikhar Dhawan Information in Marathi

Table of Contents

खरे नाव –शिखर धवन
टोपणनाव –गब्बर
व्यवसाय –भारतीय क्रिकेटपटू
वाढदिवस –५ डिसेंबर १९८५
जन्मस्थान –दिल्ली, भारत
राशीचे नाव –धनु
धर्म –हिंदू
राष्ट्रीयत्व –भारतीय
पत्ता –दिल्ली आणि मेलबर्नमध्ये बंगला
छंद –योग, पोहणे, टेबल टेनिस व बॅडमिंटन खेळणे, वाचन
खाण्याची सवय –मांसाहारी
शाळा –सेंट मार्क्स सीनियर सेकंडरी पब्लिक स्कूल, दिल्ली
शैक्षणिक पात्रता –बारावी पास

शिखर धवन यांचा जन्म आणि कुटुंब

शिखर धवन यांचा जन्म ५ डिसेंबर १९८५ रोजी दिल्ली येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सुनैना धवन आणि वडिलांचे नाव महेंद्र पाल धवन आहे. त्याला एक बहीण आहे, ज्यांचे नाव श्रेष्ठा आहे. त्याची पत्नी आयशा एक ऑस्ट्रेलियन नागरिक आहे, जी त्याच्यापेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. ३० ऑक्टोबर २०१२ रोजी त्यांचे लग्न झाले होते.

शिखर धवन यांचा कुटुंब, family shikhar dhawan
शिखर धवन यांचा कुटुंब

क्रीडा जीवन – व्यावसायिक करिअर

भारतीय सलामीवीर फलंदाज शिखर धवनने वयाच्या १२ व्या वर्षी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. तारक सिन्हा असे त्याच्या प्रशिक्षकाचे नाव आहे. त्याने सुरुवातीचे क्रिकेट प्रशिक्षण आपल्या प्रशिक्षकाच्या देखरेखीखाली सोनेट क्लबमध्ये केले.

Shikhar Dhwan Chidhood Photo
Shikhar Dhwan Chidhood Photo

प्रशिक्षक तारक सिन्हा यांनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेल्या अशा १२ खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला शिखर हा विकेटकीपर फलंदाज होता. पण जसजसा वेळ गेला तसतसे त्याने फलंदाजी, फिल्डिंग आणि फिटनेसवर आपले पूर्ण लक्ष केंद्रित केले.

शिखर धवन वैयक्तिक जीवन

शिखर धवनचे २०१२ साली लग्न झाले होते. त्याची पत्नी त्याच्यापेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. ती मूळची ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नची असून तिचे नाव आयशा मुखर्जी आहे. यापूर्वी ती बॉक्सर होती. माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने आयशाची ओळख शिखर धवनशी केली.

Shikhar Dhawan with Wife
Shikhar Dhawan Wife

जेव्हा आयशा आणि शिखर यांचे लग्न झाले तेव्हा आयशा आधीच 2 मुलींची आई होती. यानंतर २०१४ साली शिखर आणि आयशाला मुलगा झाला. ज्याचे नाव त्याने झोरवार धवन असे ठेवले. शिखर धवन जेव्हा मैदानावर आनंद व्यक्त करतो तेव्हा कधीकधी त्याला मिश्या ताठ करणे आवडते.

शिखर धवनच्या आवडत्या गोष्टी

क्रिकेटर्स –क्रिकेटर्स
क्रिकेट मैदान –लॉर्ड्स क्रिकेट मैदान, लंडन
अन्न –बटर चिकन
पेय –वोडका
अभिनेता –आमिर खान, सिल्वेस्टर स्टैलोन
अभिनेत्री –करीना कपूर
चित्रपट –रॉकी

सुरुवातीची कारकीर्द

पश्चिम विहार, दिल्ली येथील सेंट मार्क्स सिनिअर सेकण्डरी स्कूलमधून शिखरने शिक्षण पूर्ण केले. वयाच्या १२ व्या वर्षापासून सॉनेट क्लब मध्ये प्रशिक्षक तारक सिन्हा यांच्याकडून शिखरने क्रिकेटचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. तारक सिन्हा ह्यांनी १२ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू घडवले आहेत. अकादमीमध्ये सुरुवातीला शिखर यष्टीरक्षण करत असे.

Shikhar Dhawan Old Photo
Shikhar Dhawan Old Photo

शिखर सुरुवातीला दिल्लीच्या सोळा वर्षाखालील संघाकडून १९९९ मध्ये विजय मर्चेट ट्रॉफीमध्ये खेळला. दिल्ली संघाने चांगले प्रदर्शन त्यामध्ये केले. त्यात शिखरने ९ डावांमध्ये ८३. ८८ सरासरीने ७५५ धावा केल्या. त्यामध्ये २ शतके आणि १९९ ही सर्वोच्च धावसंख्या होती. उत्तर विभागाच्या सोळा वर्षाखालील संघामध्ये विजय हजारे ट्रॉफी सामन्यांकरीता शिखरची निवड झाली. फेब्रुवारी २००१ मध्ये त्याने ३० धावा आणि उपान्त्य सामन्यामध्ये दक्षिण विभागाविरुद्ध ६६ धावा केल्या.

त्याच्या प्रभावी कामगिरीमुळे त्याची निवड भारताच्या १७ वर्षाखालील संघाकडून २०००-०१ मध्ये होणाऱ्या आशिया कप स्पर्धेसाठीझाली. त्याने तीन सामने खेळत सरासरी ८५ धावा केल्या. २००१-०२ साली विजय मर्चेट ट्रॉफीमध्ये शिखरची बॅट पुन्हा बरसली आणि त्याने ५ सामन्यांमध्ये ७०. ५० च्या सरासरीने २८२ धावा केल्या.

ऑक्टोबर २००२ मध्ये कूच बिहार ट्रॉफीमध्ये दिल्लीच्या १९ वर्षाखालील संघामध्ये शिखरची निवड झाली. त्यामध्ये शिखरने तेजस्वी कामगिरीची पुनरावृत्ती करत ८ सामन्यांमध्ये ५५. ४२ सरासरीने ३८८ धावांचा पाऊस पाडला. त्यानंतर विनू मांकड ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाच्या १९ वर्षाखालील संघाकडून खेळतांना त्याने रोहतक येथे पूर्व विभागाविरुद्ध ७१ धावा केल्या. फेब्रुवारी २००३ मध्ये सी.के. नायडू ट्रॉफीमध्ये त्याची धावांची सरासरी ५५ होती.

Shikhar Dhawan Old Photo
Shikhar Dhawan Old Photo

कूच बिहार ट्रॉफीमध्ये ६ सामन्यांमध्ये ७४ धावांच्या सरासरीने ४४४ धावा केल्यावर दिल्ली १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार शिखरला घोषित करण्यात आले.

२००४ मध्ये १९ वर्षाखालील आंतरराष्ट्रीय चषकामध्ये शिखर धवन आघाडीच्या फलंदाजीपैकी होता. एका स्पर्धेमध्ये सात डावांमध्ये ५०५ धावा हा शिखरचा विक्रम कुणीही मोडला नाही.

अजून वाचा: सचिन तेंदुलकर माहिती मराठी

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

ऑक्टोबर २०१० मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध एक दिवसीय मालिकेसाठी दुसऱ्या फळीतील संघामध्ये पहिल्यांदाच १४ खेळाडूंमध्ये शिखरची निवड झाली. परंतु तो खास प्रभाव पाडू शकला नाही.

जून २०११ मध्ये भारताने ३ कसोटी, ५ एक दिवसीय आणि १ टी-२० सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडिजचा दौरा केला. निवडक मर्यादित षटकांच्या सामन्यात शिखरला संधी दिली. त्याने आंतरराष्ट्रीय टी-२० मधील पदार्पण वेस्ट इंडिज विरुद्ध केले. तो सामना ४ जूनला पोर्ट ऑफ स्पेन येथे झाला. त्यामध्ये शिखरची खेळी निराशाजनक होती. मात्र कारकिर्दीच्या दुसऱ्या एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये त्याने ७६ चेंडूंचा सामना करत ५१ धावा नोंदवल्या.

कसोटी पदार्पण आणि चॅम्पियन्स ट्रॉफी

शिखर धवनने कसोटी पदार्पण मोहाली येथे १४ मार्च रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले. पहिल्या दिवशी खेळात पावसाने व्यत्यय आणला. दुसऱ्या दिवशी नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवशी सकाळी ऑस्ट्रेलियाचा संघ ४०८ धावांमध्ये बाद झाल्यावर भारताने डावाची सुरुवात धवन आणि विजय ह्या फलंदाजांना सलामीला पाठवून केली. जोडीने उरलेला तिसरा दिवस फलंदाजी करत भारतासाठी २८३ धावा केल्या. त्यामध्ये धवनचे पदार्पणात ८५ चेंडूमध्ये केलेले शतक होते. त्याने गुंडाप्पा विश्वनाथचा १३७ धावांचा विक्रम मोडत धावफलकावर १८७ धावा झळकवल्या. हाताच्या दुखापतीमुळे भारताच्या दुसऱ्या डावात शिखर फलंदाजी करू शकला नाही. ६ गडी राखून भारताने विजय मिळवला आणि शिखर धवनला सामनावीर घोषित करण्यात आले.

२०१३ च्या आय पी एल मध्ये सनरायझर्स

हैद्राबादकडून चेन्नई सुपर किंग्ज्विरुद्ध सामन्यात २५ एप्रिलला शिखरने पुनरागमन करत ४५ चेंडूमध्ये दणदणीत ६३ धावा ठोकल्या. त्या मोसमात शिखर १० सामने खेळला ज्यात त्याने ३११ धावा (सरासरी ३८. ८७) केल्या. त्यामधील ३ अर्धशतके होती.

Shikhar Dhawan ipl DC
Shikhar Dhawan IPL DC

शिखरच्या प्रभावशाली कामगिरीमुळे जूनमध्ये इंग्लंडमध्ये होणाऱ्या २०१३ आय सी सी चँपियन्स ट्रॉफीमध्ये त्याची निवड झाली. कार्डीफ येथे साऊथ आफ्रिकाविरुद्ध भारत सामन्याने स्पर्धा सुरू झाली. त्यामध्ये शिखरने आपले पहिले आंतराष्ट्रीय एक दिवसीय शतक केले. त्याने १२ चौकार व एका षटकाराच्या सहाय्याने ९४ चेंडूंना सामोरे जात झंझावाती ११४ धावा नोंदवल्या. त्याने रोहित शर्मा बरोबर सलामीला १२७ धावा केल्या. भारताने सामना जिंकला आणि सामनावीर होण्याचा मान साहजिकच शिखर धवनला मिळाला.

भारताच्या पुढील सामन्यात जो वेस्ट इंडिजविरुद्ध होता, शिखरने १०७ चेंडूंचा सामना करीत दणकेबाज नाबाद १०२ धावा केल्या. भारताने २३४ धावांचे लक्ष्य केवळ २ बळी देवून आणि १० षटके शिल्लक असताना सहज पार केले. भारताचा शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध बर्मिंगहॅम येथे झाला. जो भारताने पावसामुळे डकवर्थ-लुईस निकाल पद्धतीने जिंकला. शिखरने त्यात ४१ चेंडूंमध्ये ४८ धावा जोडल्या.

भारताने सर्व सामने जिंकून उपान्त्य फेरीत प्रवेश मिळवला. श्रीलंकेविरुद्ध उपान्त्य सामन्यात शिखरने ६८ चेंडूंना सामोरे जात ९२ धावा लुटल्या. भारताने तो सामना ८ गडी आणि १५ षटके राखून जिंकला. अंतिम सामना यजमान इंग्लंडबरोबर झाला. भारताने प्रथम फलंदाजी केली आणि ७ गडी देवून १२९ धावांचे आव्हान इंग्लंडसमोर ठेवले. धवनने २४ चेंडू मध्ये ३१ धावा केल्या. भारताने सामना ५ धावांनी जिंकला. ५ सामन्यांमध्ये ९०. ७५ ची सरासरी, १०० च्या वर स्ट्राईक रेटच्या सहाय्याने ३६३ धावा नोंदवणारा शिखर धवन गोल्डन बॅट पुरस्काराचा मानकरी ठरला. प्लेअर ऑफ दि टूर्नामेंट ह्या सन्मानानेही त्याला गौरवण्यात आले.

अजून वाचा: विराट कोहली माहिती मराठी 

मोठी धावसंख्या

वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध त्रिकोणी मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ नंतर वेस्ट इंडिजला गेला. पाच सामन्यांमध्ये सरासरी २७ धावा ह्या गतिने शिखरने १३५ धावा केल्या. नंतर पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ७७ चेंडूंचा सामना करीत घणाघाती ६९ धावा कमावल्या. भारताने अंतिम सामन्यात, श्रीलंकेला हरवून मालिका जिंकली. जुलैमध्ये भारतीय संघ ५ एक दिवसीय सामन्यांसाठी झिंबाब्वे दौऱ्यावर गेला. चार सामन्यांमध्ये धवनने २०९ धावा केल्या. भारताने मालिका ५-० अशी जिंकली. हरारे येथे धवनने तिसरे एक दिवसीय सामन्यातील शतक केले.

Shikhar Dhawan in Indian Cricket
Shikhar Dhawan in Indian Cricket

ऑगस्ट २०१३ मध्ये भारत अ संघाकडून दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये खेळतांना ऑस्ट्रेलिया ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघांविरुद्द त्रिकोणी मालिकेत शिखरची बॅट अधिकच वेगाने फिरू लागली. प्रिटोरीया येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शिखरने विशालकाय २४८ धावा १५० चेंडूमध्ये फटकावल्या. ३० चौकार आणि ७ षटकार ह्या शिखरच्या धावांच्या ‘माऊंट एव्हरेस्ट’च्या मदतीने भारताने धावपटावर ४३३ धावा नोंदवल्या आणि ३९ धावांनी सामन्यावर विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात शिखर धवनने ६२ धावांचे योगदान दिले. भारत ‘अ’ संघाने मालिका जिंकली. मालिकेत ४१० धावांच्या सर्वोच्च शिखरावर धवन विराजमान झाला.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०१३ मध्ये ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यावर एक टी-२० आणि सात एक दिवसीय सामने खेळण्यास भारतात आला. टी-२० सामन्यात धवनने ३२ धावा केल्या. भारताने तो सामना जिंकला. एक दिवसीय सामन्यांमध्ये सहा डावांमध्ये शिखर धवनने २८४ धावा नोंदवल्या. जयपूर येथे दुसऱ्या एक दिवसीय सामन्यामध्ये धवनने ८६ चेंडू खेळत ९५ धावा केल्या. भारताने ३६० धावांचे लक्ष्य केवळ एक गडी गमावून पार केले.

नागपुरमध्ये झालेल्या सहाव्या सामन्यातशिखर धवनने आणखी एक शतक फटकावले ते त्याचे चौथे शतक होते. भारताने ३५० धावांचे लक्ष्य लीलया पार केले. बेंगलूरु येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवत मालिकेवर शिक्कामोर्तब केले. नोव्हेंबर २०१३ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या एक दिवसीय सामन्यामध्ये शिखर धवनने विजयश्री खेचून आणणारी ११९ ही धावसंख्या धावफलकावर लावली. कानपूर येथे झालेल्या सामन्यात शिखर धवन सामनावीर ठरला.

जून २०१७ मध्ये झालेल्या चँपियन्स ट्रॉफीमध्ये ५ जूनला पाकिस्तानविरुद्ध शिखरने ६५ चेंडूमध्ये ६८ धावा केल्या नंतरच्या श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने १२८ चेंडूंचा सामना करत १२५ धावा केल्या. सात सामन्यांमध्ये ५०० धावा करणारा तो पहिला फलंदाज ठरला. नंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शिखरने ७८ धावा केल्या. भारताने तो सामना ८ गडी राखून जिंकला. स्पर्धेमध्ये सर्वाधिक (३३८) धावा केल्याबद्दल गोल्डन बॅटने शिखरला गौरवण्यात आले.

१ नोव्हेंबर २०१७ रोजी शिखर धवनने न्यूझीलंड विरुद्ध ५२ चेंडूंमध्ये ८० धावा केल्या. तो त्याचा टी-२० मधील सर्वाधिक स्कोअर होता. १७ डिसेंबरला धवनने श्रीलंकेविरुद्ध खेळतांना त्याचे १२ वे एक दिवसीय सामन्यातील शतक झळकावले आणि ४००० धावा सर्वात जलद गतिने करणारा तो पाचवा फलंदाज ठरला. त्याला ‘मॅन ऑफ द सिरीज’ पुरस्कार मिळाला.

मार्च २०१९ पर्यंत शिखर धवनने २३ आंतरराष्ट्रीय शतके ठोकली होती ज्यात कसोटी सामन्यातील ७ शतकांचा आणि एक दिवसीय सामन्यांतील १६ शतकांचा समावेश आहे.

शिखरची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांची यादी न संपणारी आहे. त्याचे गब्बर हे टोपण नाव त्याची बॅट सार्थ करून दाखवते. शिखर धवनच्या उत्तुंग कारकिर्दीबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा!

Shikhar Dhawan with Virat Kohali
Shikhar Dhawan with Virat Kohali

शिखर धवन कारकीर्द हायलाइट्स

 • १५ वर्षांखालील स्पर्धेत शालेय स्तरावर १०० धावा करुन कोचला प्रभावित केले.
 • १९९९-२००० मध्ये विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये तो आघाडीवर धावा करणारा होता.
 • सन २००-२००१ मध्ये शिखर धवनने ९ डावात ८३.८८ च्या सरासरीने ७५५ धावा केल्या.
 • २००१ मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तर विभागाकडून अंतिम सामन्यात खेळताना त्याने पहिल्या डावात ३० धावा आणि दुसऱ्या डावात ६६ धावा केल्या.
 • २००१ साली त्याची अंडर १७ संघात निवड झाली जेथे त्याने ३ सामन्यात ८५ च्या सरासरीने धावा केल्या.
 • २००१ साली वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी शिखर धवनला दिल्ली अंडर १९ संघात स्थान मिळाले.
 • २००२ मध्ये विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये त्याने ५ डावात ७५.५० च्या सरासरीने २८२ धावा केल्या.
 • २००२ मध्ये कूच बिहार ट्रॉफीमध्ये त्याने ८ डावात ५५.४२ च्या सरासरीने ३८८ धावा केल्या.
 • देशांतर्गत पातळीवर १९ वर्षांखालील क्रिकेट खेळत त्याने ६ डावांमध्ये ७४ च्या सरासरीने ४४४ धावा केल्या. यानंतर त्याला संघाचा कर्णधार बनविण्यात आले.
 • २००४ साली शिखर धवनने १९ वर्षांखालील भारतीय संघासाठी विश्वचषक खेळला. ही स्पर्धा बांगलादेशात खेळली गेली.
 • २००४ च्या विश्वचषकात त्याने ३ शतके आणि १ अर्धशतक झळकावले होते. अंडर -१९ विश्वचषकात त्याने ८४.१६ च्या सरासरीने ५०५ धावा केल्या.
 • २००४ साली दिल्लीहून खेळत घरगुती क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
 • सन २०१० मध्ये २० ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
 • सन २०११ मध्ये, ४ जून रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध टी -२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
 • सन २०१३ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४ मार्च रोजी कसोटी सामन्यात प्रवेश केला होता.
 • वर्ष २०१७ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वाधिक धावा ३३८ अशी नोंद झाली. ज्यात २ अर्धशतक आणि १ शतक आहे.
 • शिखर धवनची आवडती जर्सी २५ व्या क्रमांकावर आहे. वेगवान फलंदाजीशिवाय तो विकेट कीपिंग आणि ब्रेक गोलंदाजीही करतो.

शिखर धवन सोशल मीडिया अकाउंट

फेसबुकhttps://www.facebook.com/shikhardhawanofficialpage
इन्स्टाग्रामhttps://www.instagram.com/shikhardofficial/
ट्विटरhttps://twitter.com/sdhawan25
विकिपीडियाhttps://en.wikipedia.org/wiki/Shikhar_Dhawan

अजून वाचा: महेंद्रसिंग धोनी मराठी माहिती

शिखर धवन विषयी रोचक तथ्य

 • त्याला कट शॉट्स खेळायला आवडते.
 • त्याची कामगिरी इंडिया ब्लूमध्ये दिसत होती, ज्यामुळे त्याची निवड वनडेमध्ये झाली.
 • एकदिवसीय सामन्यात त्याची कामगिरी चांगली नव्हती पण कसोटी सामन्यात त्याने स्वत:ला सिद्ध केले.
 • कसोटी सामन्यात वीरेंद्र सेहवागच्या जागी त्याची निवड झाली. हा त्याचा पहिला डेब्यू होता ज्यामध्ये त्याने स्वत: लाही सिद्ध केले आणि केवळ ८५ बॉलमध्ये १०० धावा ठोकल्या.
 • त्याने तरुणानंमध्ये चांगले स्थान मिळवून सर्वांना आपल्या लूकचे वेड लावले. तारुण्याच्या मध्यभागी तो आपल्या गजनी हेअर कटआणि लांब मिश्यासाठी प्रसिद्ध होता.
 • त्याची पत्नी आयशा आधी ऑस्ट्रेलियात राहत होती, ज्याची त्याला फेसबुकच्या माध्यमातून भेट झाली आणि नंतर ते दोघेही एकत्र आले आणि लग्न केले.
 • त्याची बायको बंगाली आणि ब्रिटीश आहेत. आयशाचे आधीपासूनच लग्न झाले होते ज्याच्याबरोबर तिला दोन मुले होती.
 • त्याची पत्नी त्याच्यापेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे.
Shikhar Dhawan with Wife and Boy
Shikhar Dhawan with Wife and Boy

शिखर धवन आयपीएल स्थिती

 • शिखर धवन भारताच्या घरगुती टी-२० लीग आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळत आहे. आयपीएलच्या दुसर्‍या व तिसर्‍या सत्रात शिखर मुंबई इंडियन्स संघाकडून खेळला.
 • यानंतर, आयपीएलच्या चौथ्या हंगामात, डेक्कन चार्जर्स संघाने $ ३,००,००० साठी करार केला. यानंतर तो सन रायझर्स हैदराबादचा कर्णधार बनला. त्यानंतर डॅरेन सॅमीला काढून त्याला कर्णधार बनवण्यात आले.
 • सन २०१६ मध्ये डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात शिखरने सन रायझर्स हैदराबादकडून खेळताना १७ सामन्यांत ५०१ धावा केल्या.
 • २०१८ च्या लिलावात सन राइझर्स हैदराबादने शिखरला 5.2 कोटी रुपयांना विकत घेतले.
 • वर्ष २०१९ मध्ये त्याला दिल्ली कॅपिटलने खरेदी केले होते.

शिखर धवनला मिळालेले रस्कार आणि सन्मान

वर्ष २०१३CEAT इंटरनेशनल प्लेयर्स ऑफ़ द इयर.
ICC World XI मधील निवड.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी – सर्वाधिक धावा काढणारा.
वर्ष २०१४विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार.
वर्ष २०१५आयसीसी विश्वचषक – सर्वाधिक धावा करणारा “भारतीय” खेळाडू.
आयसीसी चॅम्पियन्स करंडक : दोनदा सलग गोल्डन बॅट विजेता.
१०० एकदिवसीय सामन्यांनंतर ४३०९ धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज.
वर्ष २०१७आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी – सर्वाधिक धावा काढणारा.
वर्ष २०१८CEAT बैट्समेन ऑफ़ द इयर.
आशिया चषक – सर्वाधिक धावा काढणारा.
एका वर्षात सर्वाधिक टी -२० धावा करणारा बॅट्समन.
आयसीसी चॅम्पियन्स करंडकदोनदा सलग गोल्डन बॅट विजेता.
कसोटी सामन्यातील पहिला दिवसलंचच्या आधी १०० धावा करणारा पहिला खेळाडू ठरला.
एकदिवसीय सामन्यात जलद१००० धावा, २००० धावा आणि ३००० धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला.

अजून वाचा: रोहित शर्मा मराठी माहिती

शिखर धवन फोटो – Shikhar Dhawan Photo Gallery

Shikhar Dhawan with Two Bat
Shikhar Dhawan
Shikhar Dhawan
Shikhar Dhawan
Shikhar Dhawan
Shikhar Dhawan in Bus
Shikhar Dhawan With His boy
Shikhar Dhawan With His boy
Shikhar Dhawan

FAQ: Shikhar Dhawan Information in Marathi

शिखर धवनची पत्नी कोण आहे?

आयशा मुखर्जी

शिखर धवनचे वय किती आहे?

३५ वर्षे (५ डिसेंबर १९८५)

शिखर धवनचे गाव कोणते आहे?

मूलत: दिल्ली

शिखर धवनची कोणती जात आहे?

पंजाबी – खत्री

शिखर धवनचे लग्न कधी झाले?

३० ऑक्टोबर २०१२ (आयशा मुखर्जी)

शिखर धवनच्या मुलाचे नाव काय?

जोरावर धवन

शिखर धवनची किती मुले आहेत?

एक मुलगा जोरावर आहे

Leave a Reply