आई संपावर गेली तर निबंध मराठी–Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi

Set 1: आई संपावर गेली तर निबंध मराठी – Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi

आमच्या घरात सगळे आळशी बनले आहेत. एकटी आईच सर्व कामे करते. आई आमच्यावर रोज रागावते. पण कोणीही आपापली कामे करत नाही. एकदा आई खूप चिडली आणि म्हणाली, “मी आता संपावरच जाणार!”

बापरे, आई संपावर गेली तर… तर सकाळी लवकर कोण उठवणार? गरम गरम नाश्ता कोण देणार? दप्तर कोण भरून देणार? शाळेतून आल्यावर जेवण कोण देणार? गृहपाठात मदत कोण करणार? प्रकल्प तयार करण्यास, स्पर्धेचे भाषण तयार करून देण्यास कोण मदत करणार? वाढदिवसाचा सुंदर केक कोण बनवणार?

घरातील वस्तू नीटनेटक्या कोण ठेवणार? बाबांना तर त्यांची प्रत्येक वस्तू हातात आणून द्यावी लागते. मग आई संपावर गेली तर…? तर बाबांचे तरी कसे होणार? मी बाबांना खूण केली, “आपण आईचे ऐकू या. ती सांगते ते योग्यच आहे. आपण आपली कामे स्वत:च करू या.”

आई संपावर गेली तर निबंध मराठी–Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi .
आई संपावर गेली तर निबंध मराठी–Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi

Set 2: आई संपावर गेली तर निबंध मराठी – Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi

आई घरात असते म्हणूनच बाबा निर्धास्तपणे त्यांच्या कामाला जाऊ शकतात. आई घरात असते म्हणून मी आणि माझी ताई निर्धास्तपणे शाळेत जाऊ शकतो. अशी आमची आई संपावर गेली तर सकाळी मला गरमगरम दूध प्यायला कोण देईल? नाश्ता कोण देईल? शाळेत जाताना ताजा भरलेला डबा कसा मिळेल?

घरात काही संपलेले असले तर आईचे बरोबर लक्ष असते. विजेचे, सोसायटीचे, फोनचे बिल भरणे, बँकेत जाणे, इस्त्रीचे कपडे तयार ठेवणे, रोजची भाजी आणि वाणसामान आणणे, कामवाल्या रखमाबाईंकडून व्यवस्थित कामे करून घेणे, आम्ही आजारी पडलो तर आमची शुश्रुषा करणे, आजोबांचे औषध आठवणीने देणे, माझा आणि ताईचा अभ्यास घेणे अशासारखी कामे कोण करील?

माझी आई जर्मन भाषा शिकलेली आहे. त्यामुळे त्या भाषेतील अनुवादाची कामेही ती करून देते. कधीकधी मला वाटते की माझ्या आईला दहा हात आहेत की काय?

माणूस संपावर का जातो? कारण त्याच्या कामाची किंमत कुणाला नसेल तर? आमच्या आईला आमच्या घरात बाबांसकट सगळे मान देतात त्यामुळे आई संपावर कधी जाणारच नाही. तशी ती गेली तर आमचे हाल कुत्राही खाणार नाही हे मात्र नक्कीच!

Set 3: आई संपावर गेली तर निबंध मराठी – Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi

संप.. संप.. संप.. रोज कुठे ना कुठेतरी संप असतोच. कामगारांचा संप, शिक्षकांचा संप, डॉक्टरांचा संप, ऑफीसमधील कर्मचाऱ्यांचा संप, वाहतूकदारांचा संप असे कितीतरी संप होत असतात. प्रत्येकजण आपल्या मागण्यांसाठी संप करत असतो. पण आईच संपावर गेली तर…

आई संपावर गेली तर- बाबा म्हणतील, जाऊ दे गेली तर. आपण घरचे काम आवरू. मग सकाळी उठल्यापासूनच आमची धांदल सुरू होणार. आंघोळीला पाणी तापवणे, जेवण करणे, धुणी-भांडी आवरणे, बाबांच्या ऑफीसला जायची तयारी हे सारे आम्हालाच करावे लागणार. इतकी सारी कामे आई कशी बरे करत असेल? प्रत्येकाला सगळ्या गोष्टी हातात द्याव्या लागतात. ते आम्हाला कसे बरे जमणार?

आई संपावर गेली तर बाबांची तर खूपच धांदल उडेल. बंब पेटवायचा की चहाला आदन ठेवायचे. जेवण करायचे की धुण्या-पाण्याचे आवरायचे.

आगपेटी सापडली तर चहापूड मिळणार नाही. मीठ सापडले तर , तिखट मिळणार नाही. एक का दोन समस्या.. आणि खरपूस भाकरी कुणी करायच्या? बाबा तर वैतागून जातील आणि आईला संप मागे घेण्यास विनंती करतील.

आई. आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय संप थोडाच मागे घेणार! आईला तिच्या कामात मदत करण्याचे आश्वासन दिल्यावरच आई आपला संप मागे घेईल. आईचे महत्त्व तिने संप केल्यावरच कळेल.

Set 4: आई संपावर गेली तर निबंध मराठी – Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi

‘आई, माझं गणिताचे पुस्तक कोठे आहे ?’ ‘आई, हा निबंध कसा लिहू ग? काही मुद्दे सांग ना.”आई, या रविवारी जिमखान्याची सहल आहे. काय देशील डबा?”आई, यंदा दिवाळीत फराळाचे पदार्थ भरपूर करायचे हं!’ ‘ई, मला बॅडमिंटनची रॅकेट हवी आहे. कधी घेशील सांग?’ अशी आपली हर एक कामे आईशी निगडित असतात. पण समजा, आई संपावर गेली, तर…

आई संपावर गेल्यास घराचे घरपणच हरवेल. सकाळी उठायला हमखास उशीर होईल; कारण नेहमीप्रमाणे लवकर जागे करण्यास आई नसेल. न्याहारीला टेबलावर केवळ कोरडा पाव असेल. लोणी स्वतः लावून घ्यायचे म्हणजे केवढे कठीण ! जवळजवळ उपासमारच!

शाळेत जातानाही किती तरी गडबड झालेली असेल, कंपासपेटीच विसरल्यामुळे लिहायला पेन्सिल, पेन काहीच नसणार ! मग त्यासाठी शिक्षकांची बोलणी खावी लागणार. मधल्या सुट्टीसाठी डबाही नसणार, कारण न विसरता सुट्टीसाठी डबा देणारी आई संपावर गेलेली असणार.

शाळेतून दमून भागून घरी यावे, तर स्वयंपाकघरातील सारा पसारा आवरणार कोण? टेबलावर ब्रेड, लोणचे, चटणी ठेवलेली असणार आणि बरोबर एक चिठ्ठीही असणार, आई संपावर आहे.’ या नुसत्या कल्पनेनेच माझे डोळे पाझरू लागले. आईच्या अपार वात्सल्याची ती जणू पावतीच होती !

Set 5: आई संपावर गेली तर निबंध मराठी – Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi

“गिरणी कामगारांचा संप, शिक्षकांचा संप, अमुक लोकांचा संप असला तरी कसेतरी चालू शकते. पण आई जर संपावर गेली तर सकाळपासूनच बोंबाबोंब. ताईची वेणी कोण घालील ? माझ्या शाळेच्या युनिफॉर्मला इस्त्री कोण करील ? माझा टाय कोण बांधील ? डबा कोण भरील ? पण डबा भरणे दूरच ! अहो, दूध, चहा, नाश्त्याचीही पंचाईत होईल.

मग बाबांना ऑफीसला उशीर आणि दुपारच्या डब्याचे काय ? खातील वडा-पाव. पण हे एक दिवस चालेल. संपाला कुठे मर्यादा असतात?
आजी-आजोबांचा नाश्ता, त्यांची औषधे कोण देणार ? घरातील कपडे कोण धुणार ? स्वयंपाक घरात भांड्यांचा ढीग लागेल. घरात नुसता कचराच कचरा होईल.

बाप रे । नको । आईचा संप नको । शाळेत शिक्षकांच्या शिक्षेला ! सामोरे जावे लागेल. कारण गृहपाठ पूर्ण नसेल ना ! पण काय मजा येईल ना, आई संपावर गेली तर.

आई संपावर गेली तर निबंध मराठी – Aai Sampavar Geli Tar Essay in Marathi

पुढे वाचा:

प्रश्न १: आई म्हणजे काय?

उत्तर: आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई होय.

प्रश्न २: संप म्हणजे काय?

उत्तर: संप म्हणजे उदयोगधंदयातील कामगारांनी सामूहिक विचाराने किंवा एकमताने पूर्णतः किंवा अंशतःकामथांबविण्याचा वा नाकारण्याचा घेतलेला निर्णय.

Leave a Reply