बैल पोळा सणाची माहिती – Bail Pola Information in Marathi

पोळा भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेती बैलांच्या मदतीने होते. आपल्याला ज्यांच्या श्रमाने अन्नधान्य मिळते, त्या बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रावणातील अमावस्येला पोळा हा सण असतो. ग्रामीण भागात, विशेषतः देशावर या सणाचे महत्त्व फार आहे. या सणाला ‘बेंदूर’ असेही म्हणतात. आषाढात मूळ नक्षत्राच्या दिवशी बेंदूर साजरा करतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी भाद्रपद अमावास्येच्या दिवशी पोळा करतात.

शेतकर्‍यांचे आपल्या बैलांवर प्रेम असते व त्यांची काळजी तो नेहमीच घेतो; पण पोळ्याच्या दिवशी बैलांचे विशेष कौतुक करण्यात येते.

बैल पोळा

वेदकाळापासून गाईगुरांना संपत्ती मानले जाते. गोधन हा शब्द हेच सुचवतो. धर्माशी जीवनाची कशी सांगड घातली आहे त्याचे हे उदाहरण आहे.

आपल्यावर उपकार करणारा कोणीही, मग तो पशू असला तरी आपण त्याच्याबद्दल आदराची भावना बाळगली पाहिजे, अशी सुंदर शिकवण हा सण आपल्याला देतो.

शेतीच्या कामाने थकलेल्या बैलांना या दिवशी सुटी देण्यात येते. त्यांना स्वच्छ अंघोळ घालून सजवले जाते. गळ्यात घुंगरांच्या माळा, शिंगांना गोंडे असे सजलेले बैल मग वाजतगाजत मिरवणुकीने गावात हिंडवतात. शेतकर्‍याची घरधनीण बैलांना कुंकू लावून ओवाळते व त्यांच्यासाठी खास बनवलेली पुरणपोळी त्यांना खाऊ घालते. काही ठिकाणी बैलांच्या शर्यतीही लावतात.

कोकणात हा सण इतक्या मोठ्या प्रमाणात साजरा होत नाही. बैलांना गोडधोड मात्र खायला देतात.

देशावरची आणखी एक प्रथा म्हणजे मातीचे छोटे बैल बनवून रंगवतात व त्यांची पूजा करतात. संध्याकाळी मिरवणुकीने वाजत गाजत नेऊन त्या मूर्तींचे विसर्जन करतात.

तामिळनाडूमध्ये पोंगल या सणाच्या वेळी गाई-गुरांची पुजा करतात. हा सण पौषात असतो.

पुढे वाचा:

Leave a Reply