Bird Flu Information in Marathi : बर्ड फ्लूने अनेकदा पृथ्वीवर थैमान घातले आहे. 1996 मध्ये ग्वानडाँग या विषाणूचीनमधून पाळीव बदकांकडून आशियात आला. 1983 मध्ये अमेरिकेत पेनसिलव्हानिया. 1994 मेक्सिको. 1999 इटली. 2003 नेदरलँड. 2004 ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा. 2005 चीन. 2006 आफ्रिका. 2015 मध्ये अमेरिकेत बर्ड फ्लू आला होता. या नंतर दरवर्षी जगात कुठे ना कुठे तरी थंडीच्या हंगामात बर्ड फ्लू डोकावतो आहे.

बर्ड फ्लू-Bird Flu
बर्ड फ्लू

बर्ड फ्लू मराठी माहिती – Bird Flu Information in Marathi

भारतात 2006 मध्ये नवापूर येथे पहिल्यांदा बर्ड फ्लू आला होता. तेव्हापासून दरवर्षी तो थंडीत हजर होतो. यावर्षी हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश आणि केरळमध्ये सुरुवातीला पसरला. आता तो महाराष्ट्रात आला आहे.

ऐतिहासिक संदर्भ शोधल्यास बर्ल्ड फ्लू किमान शंभर वर्षांपासून असल्याच्या नोंदी मिळतात. अगदी काही साथींमध्ये फ्लूचा विषाणू स्वत:मध्ये बदल करुन तो घातक झाल्याचे आढळून आले होते. 1918 मध्ये स्पॅनिश फ्लूचा उद्रेक युरोपात झाला. तेव्हा लाखो माणसे दगावली होती. पुढे 1957 मध्ये आशियाई फ्लूमुळे, 1968 मध्ये हाँगकाँग फ्लूमुळे, 2009 मध्ये स्वाइन फ्लूने, तर 2018 मध्ये चिनी फ्लूने माणसांचा बळी घेतल्याची उदाहरणे आहेत. पण हे सगळे अपवाद असल्याचे संशोधकांचे मत आहे.

पूर्वी पक्ष्यांच्या फ्लूला ‘फाउल फ्लू’ म्हणायचे. शेफर या शास्त्रज्ञाने हा विषाणू ‘इनफ्लूएंझा ए’ प्रकारचा असल्याचे सिद्ध केल्यानंतर त्याचे नाव बदलले. यानंतर तो बर्ड फ्लू या नावाने ओळखला जात आहे. बर्ड फ्लू हा विषाणू ऑर्थोमिक्झो – व्हायरस कुळातील. आर्थोमिक्झोचे ए, बी आणि सी तीन प्रकार आहेत. हा आर-एन-ए विषाणू असतो आणि त्यातील एक प्रकारचा विषाणू अनेक प्रकारच्या पक्ष्यांना आजारी करतो. बर्ड फ्लू कमी घातक (लो पॅथॉजेनिक) किंवा घातक (हायली पॅथजनिक) अशा दोन प्रकारचा असतो. विषाणूच्या पृष्ठभागावर एच व एन या प्रकारची प्रथिने असतात आणि त्यांच्यावरूनच त्यांना विविध नावे दिली आहेत.

स्कोलोपॅसिडी, लॉरिडी, गॅलिडी या कुळातील पक्ष्यांना बर्ड फ्लूचा धोका अधिक आहे. बदक, हंस, गूज, कुरव, पाणथळ पक्षी, कोंबड्या, लाबे या पक्ष्यांचा या कुळात समावेश होत असल्याने त्यांना बर्ड फ्लूचा धोका असतो. हे पक्षी पाळीव पक्ष्यांच्या संपर्कात आले, की विषाणूचा प्रादुर्भाव वाढत जातो. लागण झालेल्या पक्ष्यांना मारून आणि जाळून विल्हेवाट लावतात. बर्ड फ्लूच्या निदानासाठी पक्ष्यांची विष्ठा, रक्त किंवा श्वासनलिका किंवा गुद्द्वारातून नमुने पीसीआर किंवा कल्चर करून विषाणूचा प्रकार निश्चित केला जातो.

‘अँटीबॉडी टेस्टिग’द्वारे आजार झालेला कळतो. बर्ड नियंत्रणासाठी कोंबड्यांचे लसीकरण उपयुक्त ठरले आहे. एच 7 एच 8 विषाणूसाठी लागण झालेले पाळीव पक्षी मारणे, स्वच्छता पाळणे, खुराडी साबणाच्या पाण्याने नियमित धुणे, मांस नीट शिजवून खाणे, मुक्त पक्ष्यांचे तसेच पाळीव पक्ष्यांचे सर्वेक्षण सतत करणे गरजेचे आहे. पाणथळ जागांत गरज नसताना फिरणे टाळायला हवे. या पक्ष्यांच्या सतत संपर्कात असलेल्यांनी सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब झाल्यास लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा.

बर्ड फ्लू मराठी माहिती-Bird Flu Information in Marathi
बर्ड फ्लू मराठी माहिती, Blood Flu Information in Marathi

पुढे वाचा:

अल्सर म्हणजे काय? | Ulcer Mhanje Kay

सोरायसिस म्हणजे काय? | Psoriasis Mhanje Kay

डायलिसिस म्हणजे काय? | Dialysis Mhanje Kay

PCOS म्हणजे काय? | PCOS Mhanje kay

Leave a Reply