ब्लड कॅन्सर म्हणजे काय? – ब्लड कॅन्सर कसा होतो, Blood Cancer Information in Marathi

आधी कोणताही कॅन्सर कसा होतो याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. आपल्या शरीरात प्रत्येक अवयव पेशी आणि ऊतींपासून बनलेला असतो. प्रत्येक पेशीचे एक जीवनचक्र असते. निरोगी पेशी जन्माला येते. काही काळ आपले कार्य करते. दुसऱ्या पेशीला जन्म देते आणि नाश पावते. हे चक्र अखंड चालू असते. अशातच एखादी ऍबनॉर्मल पेशी तयार होते. ती आपले कार्य करत नाही. तर अत्यंत वेगाने विभाजित होत राहून आपल्यासारख्याच ऍबनॉर्मल पेशींना जन्म देते. पुढे या पेशी सुद्धा ऍबनॉर्मल पेशींना जन्म देतात. सुरळीत जीवनचक्रापेक्षा अनेक पटींनी वेगवान हे चक्र संपूर्ण शरीराच्या कार्यात अडथळा निर्माण करते. नॉर्मल पेशींप्रमाणे या पेशी नाश पावत नाहीत. यालाच कॅन्सर म्हणतात.

ब्लड कॅन्सर म्हणजे काय, ब्लड कॅन्सरचे प्रकार, ब्लड कॅन्सर कसा होतो
ब्लड कॅन्सर म्हणजे काय, ब्लड कॅन्सरचे प्रकार, ब्लड कॅन्सर कसा होतो

ब्लड कॅन्सरचे प्रकार

ब्लड कॅन्सरचे मुख्य तीन प्रकार आहेत. फरक फार छोटासा आहे.

1) ल्युकेमिया

हा रक्त तयार करणाऱ्या उतींना होणारा कॅन्सर आहे. या उती बॉन मॅरो मध्ये असतात. बोन मॅरो म्हणजे मोठ्या हाडांच्या मध्यभागी असणारी पोकळीसारखी जागा. मांडीचे हाड, दंडाचे हाड. सर्व मोठ्या हाडांच्या मध्यभागी बोन मॅरो कॅव्हिटी असते. त्यात लाल रक्त पेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लाज्मा पेशी आणि प्लेटलेट्स बनतात. ल्युकेमिया मध्ये या बोन मॅरो च्या उतींमध्ये बदल होतात. त्यामुळे बोन मॅरो ऍबनॉर्मल पांढऱ्या पेशी तयार करू लागतो. त्या इतक्या वाढतात की लाल रक्तपेशी, प्लाज्मा आणि प्लेटलेट्स च्या निर्मितीत बाधा येते. शिवाय या ऍबनॉर्मल पांढऱ्या पेशींमध्ये इन्फेक्शन शी लढण्याची ताकद नसते. साहजिकच इम्यूनिटीवर परिणाम होतो.

2) लिंफोमा

हा कॅन्सर बोन मॅरोमध्ये बनलेल्या पांढऱ्या नॉर्मल पेशीला होतो. एखाद्या नॉर्मल पेशीमध्ये जनुकीय बदल होऊन ती ऍबनॉर्मल बनते. त्यानंतर अत्यंत वेगाने ती आपले भाईबंधू तयार करते. या पेशी इन्फेक्शन शी झुंजू शकत नाहीत.

3) मल्टिपल मायलोमा

हे जरा विशेष आहे. हा कॅन्सर रक्तद्रव्य म्हणजेच प्लाज्मा पेशीला होतो. प्लाज्मा हा रक्तातील सर्वात महत्वाचा घटक आहे. तो इतर पेशींच्या वहनाचे कार्य करतो. एखाद्या इन्फेक्शनशी लढण्यासाठी जितक्या पांढऱ्या पेशी महत्वाच्या, तितक्याच प्लाज्मा पेशी. कारण प्लाज्मा अँटीबॉडीज बनवण्याचे कार्य करते. प्लाज्माच्या एखाद्या पेशीमध्ये जनुकीय बिघाड होऊन ती ऍबनॉर्मल बनते. प्रचंड वेगाने विभाजित होऊन अनेक ऍबनॉर्मल पेशींना जन्म देते. हे ऍबनॉर्मल सेल्स फक्त एकच अँटीबॉडी तयार करतात. ते म्हणजे पॅरा प्रोटीन. याचा शरीराला कोणताही फायदा नाही. परंतु रक्तातील याचे वाढते प्रमाण ही या कॅन्सरची प्रमुख चाचणी आहे.

डोळ्यांना दिसूही न शकणाऱ्या. एका पेशीत नकळत बिघाड होऊन. संपूर्ण रक्तात कॅन्सर पसरतो !

अजून वाचा:


अल्सर म्हणजे काय? | Ulcer Mhanje Kay

सोरायसिस म्हणजे काय? | Psoriasis Mhanje Kay

डायलिसिस म्हणजे काय? | Dialysis Mhanje Kay

PCOS म्हणजे काय? | PCOS Mhanje kay

Leave a Reply