ब्लड कॅन्सरची लक्षणे – Blood Cancer Symptoms in Marathi

साधारणपणे सर्व कॅन्सरची लक्षणे थोड्या फार प्रमाणात सारखीच असतात. यातले महत्वाचे लक्षण म्हणजे ताप. अगदी सणकून येईलच असे नाही परंतु नॉर्मल टेम्परेचर पेक्षा जास्त टेम्परेचर नेहमीच राहते. सतत कणकण जाणवते. आधी ताप का येतो ते पाहूया.

ब्लड कॅन्सरची लक्षणे, Blood Cancer Symptoms in Marathi
ब्लड कॅन्सरची लक्षणे, Blood Cancer Symptoms in Marathi

ताप येणे हा आजार नाही. ते आजाराचे लक्षण आहे. शरीरात व्हायरस किंवा बॅक्टरीया शिरल्यावर इन्फेक्शन होते. लगेच सिग्नल मेंदूला जातो. हॉर्मोनल सिस्टम मधून तो रक्तापर्यंत पोहोचतो. पांढऱ्या पेशी इन्फेक्शनशी लढा द्यायला लागतात. या सगळ्या प्रोसेसमध्ये उष्णता निर्माण होते. त्यामुळे शरीराचे तापमान वाढते. यालाच ताप म्हणतात.

कॅन्सर असणाऱ्या माणसाच्या पांढऱ्या पेशी (निरोगी) कमी होतात. इम्युनिटी कमी होते. त्यामुळे कसले न कसले इन्फेक्शन होत राहते. त्यामुळे ताप येतो. कधीकधी तर इन्फेक्शन नसताना शरीर नॉर्मल ठेवण्यासाठी, रुटीन प्रक्रियांसाठी सुद्धा पांढऱ्या पेशींना खूप मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे कोणतेही विशेष कारण नसताना येणारा ताप हे कॅन्सरचे एक लक्षण आहे.

सतत विनाकारण थकवा येणे हे दुसरे लक्षण. कधीकधी हातपाय दुखून येतात. कॅन्सरच्या पेशंट मध्ये नॉर्मल लाईफ सायकल बिघडल्यामुळे शरीराच्या प्रक्रिया मेंटेन ठेवण्यात जास्त एनर्जी खर्च होते. त्यामुळे ग्लुकोज कमी होऊन थकवा येतो.

भूक मंदावणे हे तिसरे लक्षण. कोणत्याही रोगाचा (मानसिक सुद्धा !) पहिला परिणाम भूकेवर होतो. कमी झालेल्या ऊर्जेमुळे पाचक रस निर्मिती मंदावते. त्यामुळे भूक मंदावते.

झोपेचं पॅटर्न बदलते. नेहमीची निरोगी झोप वेगळी. आणि एखाद्या दिवशी खूप थकल्यावर लागणारी झोप वेगळी. झोपेत शरीराची दिवसभराची झीज भरून निघते. सकाळी शरीर नॉर्मल होते. त्यामुळे दुसऱ्या रात्री आपल्याला नॉर्मल झोप येते. कॅन्सर पेशंट मध्ये ही झीज पूर्ण भरून येत नाही. त्यामुळे नेहमीच थकल्यासारखी झोप येते.

याउलट काही पेशंटमध्ये झोप कमी होते. मेलॅटोनीन हॉर्मोनचे प्रोडक्शन कमी झाल्यामुळे असे होते. हे झोप येण्यासाठी आवश्यक असते.

इतर हॉर्मोन्सवर परिणाम झाल्यास चिडचिड होणे, निराश वाटणे अशी लक्षणे दिसतात. कधीकधी श्वसन संस्थेच्या पेशींवर परिणाम होऊन श्वसनाला त्रास होतो.

ब्लड कॅन्सरची इतर लक्षणे – Blood Cancer Symptoms in Marathi

मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे ब्लड कॅन्सरची लक्षणे अत्यंत कॉमन असतात. परंतु ती जास्त काळ राहतात. तरीही काही विशिष्ट लक्षणे दिसू शकतात.

1) लिंफोमा या प्रकारात ताप, इन्फेक्शन जास्त दिवस राहते. लवकर बरे होत नाही. औषधांना गुण येत नाही. शिवाय कानांच्या खाली मानेच्या दोन्ही बाजूंना लिम्फ नोड्स असतात. ( टॉन्सिल्स प्रमाणे ) या भागात वेदनारहित सूज
येते.

अशाच लिम्फ नोड्स अंडर आर्स मध्ये असतात. तिथेही सूज येते.

2) मायलोमा या प्रकारच्या कॅन्सरमध्ये मुख्य आघात हाडांवर होतो. कमरेचे हाड, मांड्यांचे, दंडांचे, छातीच्या बरगड्या. अगदी पाठीची हाडे सुद्धा दुखतात. शिवाय ताप, इन्फेक्शन आणि इतर लक्षणे असतातच.

मित्रांनो, कॅन्सर ओळखणे खूपच कठीण आहे. कारण त्याची लक्षणे खूपच सर्वसामान्य आहेत. ताप, दुखणी अंगावर काढण्याने समस्या वाढू शकतात. बऱ्याच वेळा ताप आला की तुम्ही डॉक्टरकडे न जाता स्वतःच पॅरासिटामोल घेता. त्याने ताप जातो. परंतु याआधी सांगितल्याप्रमाणे ताप येणे हे आजाराचे लक्षण आहे. आजार नाही. ताप गेला तरीही इन्फेक्शन बरे होत नाही. त्यामुळे इन्फेक्शन बरे करण्यासाठी अँटिबायोटिक्स घ्यावीच लागतात. एका गोळीत बरे वाटले तरीही ठरलेला कोर्स पूर्ण करायचाच. तसे नाही केले तर आजार पुन्हा उद्भवतो. या वेळी व्हायरस जास्त स्ट्रॉग होतो. आणि जास्त जालीम अँटिबायोटिक्स ची गरज लागते.

सर्व ट्रीटमेंट व्यवस्थित घेऊनही जर ताप उतरत नसेल तर ब्लड टेस्ट करावीच. त्यातून इन्फेक्शन नक्की कसले आहे ते समजते. मलेरियाच्या व्हायरसला टायफॉईडची ट्रीटमेंट चालत नाही.

कॅन्सरसुद्धा ब्लडटेस्ट मधून समजू शकतो. पांढऱ्या पेशींची वाढ, लाल पेशी, प्लेटलेट्स कमी होणे यावरून इन्फेक्शन किंवा कॅन्सरच्या शक्यता वर्तवता येतात. परंतु निदान करण्यापूर्वी कॅन्सरची टेस्ट करून खात्री करणे खूप आवश्यक आहे.

अजून वाचा:


अल्सर म्हणजे काय? | Ulcer Mhanje Kay

सोरायसिस म्हणजे काय? | Psoriasis Mhanje Kay

डायलिसिस म्हणजे काय? | Dialysis Mhanje Kay

PCOS म्हणजे काय? | PCOS Mhanje kay

Leave a Reply