चैत्र महिना हा सनातन धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. चैत्र महिना हा हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना आहे. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे. या तारखेपासून चैत्र नवरात्रीची सुरुवात होते. २ एप्रिलपासून २०२२ हिंदू नववर्ष नववर्ष २०७९ सुरू होणार असून, या दिवशी गुढीपाडव्याचा सणही साजरा केला जातो.

मराठी समाजासाठी गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात तो मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दक्षिण भारतात हा सण उगादी या नावाने ओळखला जातो. हिंदू नववर्षाच्या सुरुवातीच्या आनंदात साजरा होणाऱ्या गुढीपाडव्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.

गुढीपाडवा माहिती मराठी-Gudi Padwa Information in Marathi
गुढीपाडवा माहिती मराठी, Gudi Padwa Information in Marathi

गुढीपाडवा माहिती मराठी – Gudi Padwa Information in Marathi

गुढीपाडव्याचा मुहूर्त 2021 – गुढीपाडवा कधी आहे

  • मराठी विक्रम संवत २०७९ ची सुरुवात प्रतिपदा तिथी १ एप्रिल २०२२ रोजी ११.५६.१५ वाजता सुरू होईल आणि प्रतिपदा तिथी २ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२.००.३१ वाजता संपेल.
  • ज्या दिवशी प्रतिपदा (पंधरवड्याचा पहिला दिवस; “पाडवा” म्हणूनही ओळखला जातो) सूर्योदयाच्या वेळी संवत्सर सुरू होतो.
  • जर प्रतिपदा 2 दिवसांच्या सूर्योदयावर प्रचलित असेल, तर पहिला दिवस उत्सवासाठी मानला जातो.
  • कोणत्याही दिवसाच्या सूर्योदयाच्या वेळी प्रतिपदा होत नसल्यास, प्रतिपदेची सुरुवात आणि समाप्ती ज्या दिवशी होत असेल त्या दिवशी नववर्ष साजरा केला जाईल.

गुढीपाडवा म्हणजे काय

पाडवा म्हणजे प्रतिपदा. हिंदूंच्या पंचांगानुसार वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा नववर्षाचा पहिला दिवस. त्याला वर्षप्रतिपदा किंवा ‘गुढीपाडवा’ म्हणतात.

गुढीपाडवा माहिती इतिहास

आर्य लोक फार पूर्वी ध्रुवप्रदेशात राहत होते. तिथे सहा महिने दिवस आणि सहा महिने रात्र असते. तेव्हा सूर्याचा पहिला किरण म्हणजे मानवाला देवाची कृपाच वाटली असणार. त्या काळी वर्षाची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यामध्ये मकरसंक्रांतीलाच होत असे. महाभारतात मार्गशीर्ष महिना सगळ्यात पहिला मानला आहे. पण पुढे वर्षाचा आरंभ वसंतऋतूत होणे जास्त योग्य वाटून हा वर्षारंभदिन चैत्रात आणला गेला असावा.

अर्थात भारतात सर्वच ठिकाणी वर्षाची सुरुवात या दिवशी होत नाही. काही ठिकाणी कालगणना सौर म्हणजे सूर्याच्या गतीनुसार असते, तर काही ठिकाणी ती चांद्र म्हणजे चंद्राच्या गतीप्रमाणे असते.

शालिवाहन शकानुसार वर्षाची सुरुवात गुढीपाडवा किंवा वर्षप्रतिपदेच्या दिवशी होते.

शालिवाहन राजा चा इतिहास मराठी

शालिवाहनाने मातीचे सहा हजार सैनिक करून ते जिवंत केले व त्यांच्या मदतीने शकांचा पराभव केला, अशी कथा आहे. त्याला चैत्र प्रतिपदेच्या दिवशी युद्धात विजय मिळाला. पुढे या दिवसापासून त्याने आपल्या नावाने ‘शालिवाहन शक’ अशी नवी कालगणना सुरू केली. इसवी सनानुसार शालिवाहन शकाची सुरुवात ७८ साली झाली. त्यामुळे शालिवाहन शक हा इसवी सनपेक्षा ७८ वर्षांनी मागे असतो. इसवी सन २००० साली पाडव्याला १९२२ हे शक सुरू झाले.

या दिवसाचे महत्त्व सांगणार्‍या आणखीही पुष्कळ कथा आहेत. याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना करायला सुरुवात केली. म्हणून हा दिवस नवे संकल्प तसेच नवीन कामाची सुरुवात करण्यास चांगला मानतात; म्हणूनच गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जातो.

गुढीपाडवा का साजरा केला जातो

  • युद्धात रावणाचा वध करून प्रभू रामचंद्र, लक्ष्मण व सीतेसह अयोध्येला परतले, तो दिवस वर्षप्रतिपदेचा होता. अयोध्येच्या नागरिकांनी रामचंद्रांचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढ्या उभारल्या, तोरणे लावली. घरांसमोर रांगोळ्या काढल्या.
  • यासंबंधी महाभारतात अशी एक कथा आहे की, चेदी देशाचा राजा वसू जंगलात तपश्चर्या करायला गेला. देव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी वसू राजाला यश देणारी वैजयंती-माला, एक विमान आणि एक राजदंड दिला. घरी परतल्यावर वसू राजाने त्या राजदंडाला जरीचे वस्त्र बांधले, त्यावर सोन्याची लोटी ठेवली आणि त्याची पूजा केली. हीच गुढीची सुरुवात असे मानतात.
  • इंद्राने वृत्रासूर नावाच्या दुष्ट राक्षसाला याच दिवशी मारले, अशीही एक कथा आहे.

गुढीपाडवा कसा साजरा करावा

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा फोटो
  1. सकाळी स्वच्छता, आंघोळ इत्यादी दैनंदिन कामे केल्यानंतर गुढी उभारली जाते.
    1. लोक त्यांची घरे स्वच्छ करतात; आणि खेड्यापाड्यात घरे ताज्या शेणाने मढवली जातात.
    2. या दिवशी अरुणोदय कालात तैल अभ्यंग करणे आवश्यक आहे असे शास्त्रांमध्ये नमूद आहे.
    3. सूर्योदयानंतर लगेच गुढीची पूजा करावी. त्यात विलंब होता कामा नये.
  2. सुंदर रांगोळी डिझाइन देखील चमकदार रंगांनी बनवल्या जातात आणि घरे ताज्या फुलांनी सजवली जातात.
  3. लोक नवीन, सुंदर कपडे घालतात. सहसा, मराठी स्त्रिया काष्ठ किंवा नऊवारी मध्ये स्वत: ला सजवतात आणि पुरुष कुर्ता पायजमा पगडीसह घालतात, जे बहुतेक भगवे किंवा लाल असते.
  4. कुटुंबे एकत्र येतात आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतात.
  5. या दिवशी नवीन वर्षाचे राशीभविष्य देखील ऐकले पाहिजे.
  6. पारंपारिकपणे, प्रसाद म्हणून गोड कडुलिंबाची पाने खाल्ल्यानंतर उत्सव सुरू होतो. साधारणपणे कडुलिंबाची पाने, गूळ, चिंच इत्यादी मिसळून पेस्ट बनवली जाते, असे मानले जाते की ही पेस्ट रक्त शुद्ध करते आणि प्रतिकारशक्ती वाढवते. या पेस्टची चव गोड, आंबट आणि कडू अशी जीवनाची वाटचाल दर्शवते.
  7. श्रीखंड, पुरणपोळी, खीर (सामान्यत: रताळे, नारळाचे दूध, गूळ, तांदळाचे पीठ इ. मराठींनी बनवलेले गोड लापशी) आणि सान्ना यासारखे स्वादिष्ट पदार्थ शिजवले जातात.
  8. नंतर संध्याकाळी लोकांकडून लेझीम सादर केला जातो.

गुढी कशी उभारतात

गुढीपाडवा फोटो
गुढीपाडवा फोटो

ज्या ठिकाणी गुढी ठेवली जाईल ती जागा व्यवस्थित स्वच्छ करणे आवश्यक आहे. गुढीच्या खाली जमिनीवर स्वस्तिक बनवावे. एका उंच काठीच्या टोकाला रेशमी वस्त्र, फुलांचा हार व साखरेच्या पदकांची माळ बांधली व त्यावर चांदीची अगर तांब्या-पितळेची लोटी पालथी घातली, की गुढी तयार होते. आजही आपण नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी अशीच गुढी उभारतो व तिची पूजा करतो.

गुढीपाडव्यानंतरचे दिवस

सणासुदीचे दिवस असले, की आपण गोडधोड पक्वान्ने करून खातोच; पण कडू रस प्रकृतीला चांगला असतो म्हणून या दिवशी कडुनिंबाच्या पानांची हिंग, मिरे घालून चटणी करतात व ती गोडधोडाआधी खातात.

वैद्यकीयदृष्ट्या कडुनिंबाला फार महत्त्व आहे. ऋषी कडुनिंब खाऊन तेजस्वी राहत असत, असे पुराणात म्हटले आहे. या पुराणकालीन जीवनपद्धतीची आठवण म्हणून, तसेच आरोग्यकारक म्हणून ही प्रथा चालू राहिली असावी. पुराणात हा दिवस सूर्याची पूजा करून आरोग्यव्रत म्हणून पाळावा असे म्हटले आहे.

चैत्र महिन्यात वसंत ऋतू सुरू होतो. झाडांना नवीन पालवी फुटते. आंब्याचा हंगाम सुरू होतो. कोकीळ गाऊ लागतो. या सुंदर दिवसांचे स्वागत करण्यासाठी चैत्र महिन्यात घरोघरी स्त्रिया चैत्रागौरीचे हळदी-कुंकू करतात. सुरेख आरास करून गौरीची म्हणजे पार्वतीची स्थापना करतात. आंब्याची डाळ आणि कैरीचे चविष्ट पन्हे असा बेत असतो.

धार्मिक सण व वसंताच्या आगमनाचा आनंद यांचा सुंदर मिलाफ नववर्षाचा हा पहिला दिवस साजरा करताना साधलेला आहे.

शालिवाहन शकाशिवाय विक्रम संवत नावाची एक कालगणना आहे. ही कालगणना इसवी सनापूर्व ५६ वर्षे सुरू झाली असे म्हणतात. पण त्याचा उल्लेख जुन्या ग्रंथात सापडत नाही. नंतर उज्जयिनीचा प्रसिद्ध राजा विक्रमादित्य याच्या नावाशी ही कालगणना जोडण्यात आली. या संवतानुसार वर्ष कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरू होते. ही कालगणना संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात जास्त प्रचलित आहे. हा दिवस आपल्याकडे दिवाळीतला ‘पाडवा’ म्हणूनही ओळखला जातो.

गुढीपाडवा फोटो

गुढीपाडवा फोटो बॅनर
गुढीपाडवा फोटो बॅनर
गुढीपाडवा शुभेच्छा बॅनर फोटो
गुढीपाडवा शुभेच्छा बॅनर फोटो
गुढीपाडवा शुभेच्छा मराठी
गुढीपाडवा शुभेच्छा मराठी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

पुढे वाचा:

कोरडा खोकला का येतो | Korda Khokla Ka Yeto

रात्री खोकला का येतो | Ratri Khokla Ka Yeto

सर्दी खोकला घरगुती उपाय | Sardi Khokla Gharguti Upay

खोकला घरगुती उपाय मराठी | Khokla Gharguti Upay in Marathi

Leave a Reply