Kane Williamson Information in Marathi : केन स्टूअर्ट विल्यमसनचा जन्म ८ ऑगस्ट १९९० रोजी टोरांगा, न्यूझीलंड येथे झाला. केन न्यूझीलंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. केन उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि क्वचित तो फिरंकी गोलंदाजी ही करतो.

आय. पी. एल. मधील सनरायझर्स हैदराबाद संघाचा तो कर्णधार आहे. न्यूझीलंड घरेलू क्रिकेटमध्ये विल्यमसन नॉर्दर्न डिस्ट्रिक्टस् संघाकडून खेळतो. १ इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये तो ग्लूसेस्टरशायर आणि यॉर्कशायर संघाकडून खेळला आहे.

डिसेंबर २००७ मध्ये विल्यमसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी भारताच्या १९ वर्षाखालील संघाविरुद्ध त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २००८ च्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वकरंडकामध्ये न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून विल्यमसनची निवड झाली.

केन विल्यमसन माहिती, Kane Williamson Information in Marathi
केन विल्यमसन माहिती, Kane Williamson Information in Marathi

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विल्यमसनने २०१० मध्ये पदार्पण केले. क्रिकेट विश्वकरंडकाच्या २०११ आणि २०१५ च्या मोसमात आणि २०१२, २०१४ आणि २०१६ च्या आय. सी. सी. विश्व टी-२० मोसमात विल्यमसनने न्यूझीलंड संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. भारतात झालेल्या २०१६ आय. सी. सी. वर्ल्ड टी-२० मालिकेत न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून विल्यमसनने पदार्पण केले.

अनेक प्रसंगी इयान चॅपेल आणि मॉर्टीन क्रो यांनी विल्यमसनला जगातील कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम चार ते पाच खेळाडूंमध्ये नामांकन दिले आहे. त्यांनी त्याला जो रूट, स्टिव्ह स्मिथ, विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नरसारख्या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत बसवले आहे.

केन विल्यमसन माहिती – Kane Williamson Information in Marathi

पूर्ण नावकेन स्टुअर्ट विल्यमसन
जन्म तारीख८ ऑगस्ट १९९०
वय (२०२१ पर्यंत)३१ वर्षे
टोपणनावकीवी केन, मास्टर किवी, ब्लॅक कॅप्स मास्टर
आंतरराष्ट्रीय पदार्पण कसोटी – ४ नोव्हेंबर २०१० विरुद्ध भारत अहमदाबाद येथे
एकदिवसीय – १० ऑगस्ट २०१० विरुद्ध भारत दंबुला येथे
टी – २०- १५ ऑक्टोबर २०११ विरुद्ध झिम्बाब्वे हरारे येथे
जर्सी क्रमांक#२२ (न्यूझीलंड)
#२२ (आयपीएल, काउंटी क्रिकेट)
प्रशिक्षकपेसी डेपिना आणि जोश सिम्स
आवडता शॉटऑन ड्राईव्ह
राष्ट्रीयत्वन्यूझीलंड
मूळशहरटॉरंगा, न्यूझीलंड
स्कूलटॉरंगा बॉईज कॉलेज, न्यूझीलंड
वैवाहिक स्थितीविवाहित
पत्नीसारा रहीम
पिताब्रेट विल्यमसन
आईसँड्रा विल्यमसन

सुरुवातीचा काळ

Kane Williamson Old Photo

१४ वर्षाचा असताना विल्यमसन सिनीअर रिप्रेझेंटेटीव्ह क्रिकेट आणि १६ वर्षाचा असतांना प्रथम श्रेणी क्रिकेट खेळू लागला. २००४-२००८ ह्या काळात टोरांगा बॉईज कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात विल्यमसन कप्तान होता. त्याला पेसी डेपिना ह्यांच्याकडून प्रशिक्षण लाभले. डेपिना विल्यमसनबद्दल म्हणतात, ‘त्याला स्वबळावर अभूतपूर्व यश मिळवण्याची तहान लागलेली होती.’ शाळा सोडण्याआधी विल्यमसनने ४० शतके केली होती.

अजून वाचा: विराट कोहली माहिती मराठी 

घरेलु कारकीर्द

नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स

२००७ मध्ये १७ वर्षाचा असताना विल्यमसनने नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट्स संघाकडून पदार्पण केले. न्यूझीलंडच्या घरेलू कारकिर्दीमध्ये तो त्याच संघाकडून खेळला.

इंग्लिश काऊंटी क्रिकेट

२०११ इंग्लिश काऊंटी मोसमात विल्यमसन ग्लूसेस्टरशायर संघामध्ये सामील झाला. १४ ऑगस्ट २०१३ मध्ये त्याने यॉर्कशायर संघात उरलेल्या मोसमासाठी प्रवेश केला. २०१४ मध्ये त्याच्या संघाने काऊंटी चॅम्पियनशिप जिंकली. २०१६ च्या मोसमासाठी विल्यमसनने यॉर्कशायर बरोबर करार केला. आय. पी. एल.

६ फेब्रुवारी २०१५ रोजी सनरायझर्स हैदराबाद संघाने विल्मसनला यू. एस. डॉलर ९६५०० च्या रकमेसाठी करारबद्ध केले. आय. पी. एल. २०१६ च्या मोसमात तो पुन्हा सनरायझर्स हैदराबादकडून खेळला. सनरायझर्सने करंडक जिंकला. २०१७ आय. पी. एल. मध्ये सनरायझर्सने त्याला पुन्हा करारबद्ध केले.

केन विल्यमसन, Kane Williamson IPL SRH

२०१८ च्या आय. पी. एल. च्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने रक्कम वाढवत यू. एस. डॉलर्स ४६०५०० ह्या रकमेसाठी विल्यमसनशी करार केला. २९ मार्च २०१८ रोजी डेव्हिड वॉर्नरच्या स्थानी सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार म्हणून विल्यमसनची घोषणा झाली. विल्यमसनच्या नेतृत्वाखाली सनरायझर्स हैदराबादने अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज्ने ८ गडी राखून जिंकला. २०१८ च्या आय. पी. एल. मोसमात सर्वाधिक ७३५ धावा केल्यामुळे ऑरेंज कॅप देऊन विल्यमसनचा गौरव करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

२००८ मध्ये मलेशियात झालेल्या १९ वर्षाखालील विश्वकरंडकात १७ वर्षाच्या विल्यमसनने न्यूझीलंडचे नेतृत्व केले. न्यूझीलंड उपांत्य सामन्यात भारताविरुद्ध हरला. २४ मार्च २०१० रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी न्यूझीलंडच्या संघात विल्यमसनची निवड झाली, परंतु सामन्यात तो खेळू शकला नाही.

Kane Williamson

१० ऑगस्ट २०१० रोजी विल्यमसनने भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय एक दिवसीय पदार्पण केले. नवव्या चेंडूवर तो शून्यावर बाद झाला. दुसऱ्या सामन्यात अँजेलो मॅथ्यूसने दुसऱ्या चेंडूवर विल्यमसनला शून्यावर बाद केले. १४ ऑक्टोबर २०१० मध्ये ढाका येथे बांगलादेश विरुद्ध विल्यमसनने पहिले एक दिवसीय शतक केले. तो न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासातील शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. नंतर बांगलादेश दौऱ्यामध्ये न्यूझीलंडला ४-० असा पराभवाचा धक्का बसला, परंतु त्यानंतर होणाऱ्या भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडच्या कसोटी संघामध्ये विल्यमसनचा समावेश करण्यात आला.

भारताविरुद्ध अहमदाबाद येथील सामन्यात विल्यमसनने कसोटी पदार्पण केले. ४ नोव्हेंबर २०१० च्या त्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने २९९ चेंडूंचा सामना करत १३१ धावा केल्या व तो कसोटी पदार्पणात शतक करणारा आठवा खेळाडू ठरला.

अजून वाचा: रोहित शर्मा मराठी माहिती

कामगिरी उंचावतांना

जून २०१४ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटीत विल्यमसनने १६१ धावा केल्या. त्याचे त्या मालिकेतील दुसरे शतक होते. न्यूझीलंडने सामना जिंकला. विल्यमसनने मालिकेत ४१३ धावा केल्या व तो त्या मालिकेतील आघाडीचा फलंदाज ठरला. पावसामुळे त्याचे द्विशतक होऊ शकले नाही. कर्णधार बेंडन मॅक्यूलनने सामन्याचा निकाल लागावा ह्या अपेक्षेने डाव घोषित केला.

सर्वाधिक स्ट्राईक रेटने एक दिवसीय सामन्यामध्ये शतक करणाऱ्यांच्या यादीत विल्यमसनचा तिसरा क्रमांक आहे. त्याने बुलावायो येथे झिंबाब्वे विरुद्ध ६९ चेंडूंमध्ये १०० धावा करत ही उल्लेखनीय कामगिरी केली. १९ सप्टेंबर २०१४ रोजी चॅम्पियन्स लीग टी-२० करंडकात नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट संघाकडून केप कोब्राज संघाविरुद्ध विल्यमसनने ४९ चेंडू खेळत १०१ धावा केल्या. रॉस टेलर बरोबर विल्यमसनने सर्वात सशक्त भागीदारींपैकी एक केली आहे. कसोटी सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर द्विशतक करणारा विल्यमसन फ्लेमिंगनंतरचा दुसरा खेळाडू ठरला आहे.

२०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ६९ आणि २४२ अशा धावा आणि २ झेल यासह विल्यमसनला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. ३ फेब्रुवारी २०१५ रोजी पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंडने ९९ वे शतक केले. त्यात विल्यमसनचा फार मोठा वाटा होता. २०१५ च्या क्रिकेट विश्वकरंडकापूर्वी कॅलेंडर वर्षातील केवळ २ महिन्यात विल्यमसनने विशाल काय ७०० हून अधिक धावा केल्या. १७ जून २०१५ रोजी विल्यमसन ७८ डावांमध्ये ३००० धावा करणारा सर्वात जलद पाचवा फलंदाज आणि सर्वात जलद न्यूझीलँडर ठरला. १५ नोव्हेंबर २०१५ रोजी विल्यमसन टेलर जोडीने दुसऱ्या डावामध्ये वाका पर्थ येथे प्रत्येकी शतक केले.

डिसेंबर २०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीमध्ये एका कॅलेंडर वर्षात कोणत्याही न्यूझीलंडच्या फलंदाजाने केलेला विक्रम मोडत ११७२ धावा केल्या, २०१५ मध्ये त्याने २६९२ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही प्रकारातील ती सर्वाधिक धावसंख्या होती.

कर्णधारपद आणि त्यापुढे

मार्च २०१६ मध्ये बॅडन मॅक्यूलम निवृत्त झाल्यावर विल्यमसन क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांसाठी न्यूझीलंड संघाचा कर्णधार झाला. त्याच्या कर्णधारपदाची सुरुवात भारतामधून विश्व टी-२० सामन्यातून झाली. त्याच वर्षी विल्यमसनला ‘न्यूझीलंड प्लेअर ऑफ द ईयर, टेस्ट प्लेअर ऑफ द ईअर आणि रेडपाथ कप ह्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

kane-williamson test cricket dress

ऑगस्ट २०१६ मध्ये झिंबाब्वे विरुद्ध कसोटी मालिकेत इतर सर्व कसोटी खेळणाऱ्या संघांविरुद्ध शतक करणारा तेरावा फलंदाज ठरला. ही कामगिरी त्याने सर्वात कमी डावांमध्ये केली; त्यातील सर्वात कमी वेळ त्याने कसोटी पदार्पणात घेतला आणि ही नेत्रदीपक कामगिरी करणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला.

१० मार्च २०१७ रोजी विल्यमसनने न्यूझीलंडच्या कसोटी-मधील शतकांच्या यादीत दुसरा क्रमांक पटकावला. विल्यमसनने वयाच्या २६ व्या वर्षी सर्वात कमी सामन्यात १६ शतके केली.

२३ मार्च २०१८ रोजी विल्यमसनने न्यूझीलंडमधील सर्व फलंदाजांमध्ये कसोटीमधील सर्वाधिक शतके केली. मे २०१८ मध्ये १८-१९ मोसमात २० खेळाडूंबरोबर न्यूझीलंड क्रिकेट संघाने करार केला त्यामध्ये विल्यमसन होता. सप्टेंबर २०१८ मध्ये काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये यॉर्कशायर संघाकडून खेळताना विल्यमसनने प्रथम श्रेणी क्रिकेट मधील १०,००० धावा पूर्ण केल्या.

८ डिसेंबर २०१८ रोजी पाकिस्तानविरुद्ध निर्णायक तिसऱ्या सामन्यात त्याने १९ वे कसोटी शतक केले. संघाच्या दुसऱ्या डावात केलेले त्याचे सहावे शतक होते. त्याने मालिकेत सरासरी ८३५ धावा काढल्या. ७ डिसेंबर २०१८ रोजी आय. सी. सी. टेस्ट बॅटिंगच्या क्रमवारीत ९०० रेटींग पॉईंट्स पार करणारा विल्यमसन न्यूझीलंडचा पहिला खेळाडू आहे.

२ मार्च २०१९ रोजी बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत विल्यमसनने नाबाद २०० धावा केल्या. न्यूझीलंडने त्यांच्या डावात सर्वाधिक ७१५ धावा फलकावर नोंदवल्या. ६००० धावा कसोटी सामन्यात सर्वात जलद गतीने करणारा विल्यमसन न्यूझीलंडचा पहिला क्रिकेटपटू ठरला.

एप्रिल २०१९ मध्ये क्रिकेट विश्वकरंडकासाठी न्यूझीलंडचा कर्णधार म्हणून विल्यमसनची निवड झाली. मार्च २०१९ पर्यंत विल्यमसनने २० कसोटी आणि ११ एक दिवसीय शतके केली आहेत.

अजून वाचा: हार्दिक पंड्या माहिती मराठी

व्यक्तिगत जीवन

केन विल्यमसनला लोगान हा जुळा भाऊ आहे. केन आणि लोगान पाच मुलांमध्ये सर्वात धाकटी भावंडे आहेत. त्यांना तीन बहिणी आहेत. केनने लोगान बरोबर बास्केट बॉल, रग्बी, फिल्ड हॉकी, सॉकर, हॉकी आणि क्रिकेट अशा अनेक खेळांमध्ये प्रभाव पाडला आहे व कौशल्य मिळवले आहे. बालवयात विल्यमसनचा हीरो सचिन तेंडुलकर होता.

२०१४ च्या न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तान मालिकेत ५ सामन्यांमधून मिळालेली पूर्ण रक्कम त्याने पेशावर शाळेतील हत्याकांडातील बळींना अर्पण केली. विल्यमसन उजव्या हाताने फलंदाजी गोलंदाजी करतो पण लिहितो डाव्या हाताने.

आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत केन विल्यमसन म्हणतो, ‘माझ्या पदार्पणाच्या सामन्यात मी प्रथमच माझा बालपणीचा ‘रोल मॉडेल’ सचिन तेंडुलकरला पाहिले. तो मैदानावर काय करत होता अशा विचारात मी गुंग होतो. सचिन क्रिकेट मधला ‘लेजंड’ आहे. सचिनला पाहणे हा खूपच सुखद अनुभव होता. माझे काही आवडते खेळाडू भारतीय आहेत.’

अजून वाचा: क्रिकेट मराठी माहिती

FAQ: Kane Williamson Information in Marathi

केन विल्यमसनची पत्नी कोण आहे?

सारा रहीम.

केन विल्यमसन कोणत्या संघाचा आहे?

न्यूझीलंड, सनरायझर्स हैदराबाद, नदर्न डिस्ट्रिक्ट्स क्रिकेट संघ

केन विल्यमसनची उंची किती आहे?

१.७३ मी

केन विल्यमसनचा वाढदिवस कधी आहे?

८ ऑगस्ट १९९० (वय ३१ वर्षे)

Leave a Reply