भात कसा करतात – Rice Recipes in Marathi
भात बनवण्यासाठी लागणारे साहित्य – Ingredients for Making Rice in Marathi
तांदूळ, पाणी.
भात बनवण्याची कृती – Rice Recipes in Marathi
भात चुलीवर, शेगडीवर, स्टोव्हवर अगर गॅसवर करता येतो; पण तांब्याच्या जाड पातेल्यात चुलीवर भात केल्यास तो जास्त चांगला होतो व पुष्कळ वेळ गरमही राहतो. वासाचे तांदूळ असल्यास त्यांचा भात तपेल्यात केल्यास वास उडून न जाता तो मुरतो व खुलतो. आरोग्यदृष्ट्याही तांब्याचे भांडे चांगले असते. तांदूळ धुऊन घ्यावेत. भांड्यात साधारणपणे तांदळाच्या अडीचपट पाणी घालून त्यात तांदूळ वैरावेत. कढ येऊन गेल्यावर, निखारे बाहेर काढून, त्यांवर भांडे ठेवून झाकण घालावे. भात छान होतो. भातात चवीला थोडे मीठही घालतात. म्हणून आवडत असल्यास भात शिजतानाच थोडे मीठ घालावे. प्रेशर कुकरमध्ये भात करावयाचा झाल्यास तांदळाच्या दुप्पट पाणी घालावे.
पुढे वाचा:
- फोडणी कशी द्यावी?
- गोडा मसाला रेसिपी
- गरम मसाला रेसिपी
- कच्चा मसाला रेसिपी
- कांदा मसाला रेसिपी
- सांबार मसाला रेसिपी
- लाल मिरची पावडर रेसिपी
- हळद पावडर कशी बनवायची?
- साखरेचा पाक कसा बनवायचा?
- दुधापासून पनीर कसे तयार करतात
- नारळाचे दूध रेसिपी