ब्लड कॅन्सरवर उपचार – Treatment for Blood Cancer
आपण फक्त मेडिकल ट्रीटमेंट बद्दल बोलणार आहोत. आयुर्वेदिक नाही.
ब्लड कॅन्सर रक्तातल्या पांढऱ्या पेशींना होतो, प्लास्मा पेशींना होतो किंवा रक्ताच्या सर्व पेशी तयार करणाऱ्या बोन मॅरो ला होतो हे आतापर्यंत आपण पाहिले. साहजिकच ट्रीटमेंट देताना याच गोष्टी लक्षात घेतल्या जातात.
लिंफोमा कॅन्सरमध्ये जर लिम्फ नोड्स ना ट्रीटमेंट द्यायची गरज असेल तर टार्गेटेड ड्रग्स वापरणे जास्त फायद्याचे असते. ही ड्रग्स शरीरात गेल्यानंतर फक्त कॅन्सरच्या पेशींना मारतात. इतर निरोगी पेशींना मारत नाहीत.
रेडिएशन थेरपी मध्ये अतिवेगवान आणि हाय फ्रिक्वेन्सी चे एक्सरे वापरून ठराविक भागातल्या पेशी मारल्या जातात. परंतु यात आजूबाजूच्या निरोगी पेशी सुद्धा मरतात. केमो थेरपी मध्ये जे ड्रग वापरले जाते ते टार्गेटेड नसते. त्यामुळे शरीरातील सर्वच वेगवान वाढ असणाऱ्या पेशींना ते मारते. त्याचमुळे केमो घेणाऱ्या व्यक्तीचे केस जातात. कारण केसांची वाढ सर्वात जास्त असते. तरीही केमो थेरपी सर्रास वापरली जाते. कारण ती स्ट्रॉग ट्रीटमेंट आहे.
बोन मॅरो च्या कॅन्सर मध्ये बोन मॅरो मधले सर्व सेल्स मारायचे असतात. परंतु तसे केल्यास नवीन रक्तपेशी कशा बनतील ? त्यासाठी सर्वात आधी बोन मॅरो मधून स्टेम सेल्स काढून घेतले जातात. स्टेम सेल्स म्हणजे इम्मच्युअर्ड पेशी. त्या काढून घेतल्यानंतर स्ट्रॉग केमो थेरपी वापरून बोन मॅरो मधले सर्वच सेल्स मारून टाकले जातात. त्यानंतर काढून घेतलेले स्टेम सेल्स पुन्हा बोन मॅरो मध्ये सोडले जातात. हळूहळू बोन मॅरो पूर्ववत होतो. रुग्ण जर स्वतःचे स्टेम सेल्स देऊ शकत नसेल तर डोनर घ्यावा लागतो. डोनर च्या डीएनए चा किमान अर्धा भाग रुग्णाच्या डीएनए शी मॅच व्हावा लागतो. जो नातेवाईकांपैकी होऊ शकतो. डोनरच्या हिप बोन मधून स्टेम सेल्स काढून घेतले जातात.
अजून वाचा: