स्टॅटिक चार्ज आणि आग : विषय थोडा कठीण वाटू शकतो. परंतु तरीही वाचून समजण्याचा प्रयत्न करा.

कोणत्याही मोठ्या कंपनीला आग लागली आणि कारण समजले नाही तर “स्टॅटिक चार्जमुळेच ती आग लागली होती असेच जाहीर केले जाते. परंतु खरोखरच स्टॅटिक चार्ज इतका डेंजरस आहे. स्टॅटिक चार्ज हा शब्द जरी कठीण वाटला तरी आपल्याला तो लहानपणापासून माहित आहे ! प्लॅस्टिकची पट्टी डोक्यावर घासून ती कागदाच्या लहान तुकड्यांकडे नेली कि ते तुकडे पट्टीला चिकटतात. आठवतोय हा खेळ ? हे स्टॅटिक चार्जमुळे होते. पट्टी डोक्यावर घासताना घर्षणामुळे त्या पट्टीत स्टॅटिक चार्ज तयार होतो. त्या चार्जमुळे कागदाचे तुकडे पट्टीकडे आकर्षिले जाऊन चिकटतात. आता जास्त खोलात न जाता आपण उदाहरणांनी समजून घेऊ

स्टॅटिक चार्ज आणि आग

स्टॅटिक चार्ज आणि आग
स्टॅटिक चार्ज आणि आग

१) पेट्रोल पंप आणि स्टॅटिक चार्ज. 

पेट्रोल पंपात पाइपमधून पेट्रोल वाहनात शिरत असताना, पेट्रोल आणि पाइपचा आतला भाग यांचे सतत घर्षण होत राहते. त्यामुळे पाईप वर स्टॅटिक चार्ज तयार होतो. हा चार्ज प्रमाणाबाहेर वाढला तर मायनर स्पार्क होऊ शकतो. परंतु डोळ्यांना न दिसणारा हा मायनर स्पार्क संपूर्ण पेट्रोल पेटवू शकतो. म्हणूनच हे पेट्रोल पाईप मोठ्या मेटल चेन ला अशा प्रकारे जोडलेले असतात कि ती चेन सतत जमिनीवर संपर्कात राहील. यामुळे तयार होणाऱ्या स्टॅटिक चार्जची अर्थिंग होते. म्हणजेच तो चार्ज जमिनीत जातो.

२) इस्त्री आणि स्टॅटिक चार्ज

इस्त्री गरम असते. त्यामुळे आग लागण्याची शक्यता जास्त असते. याच कारणांसाठी इस्त्रीसाठी कायम थ्री पिन चा प्लग वापरला जातो. तिसरी पिन अर्थिंग साठी असते. अर्थिंगमुळे चार्ज जमिनीत जातो.

३) पाऊस पडत असताना वीज चमकते

दोन मोठमोठे ढग सतत एकमेकांवर घासून स्टॅटिक चार्ज डेव्हलोप करतात. हा चार्ज खूप जास्त प्रमाणात झाला कि स्पार्क होतो. शिवाय पाण्याचे माध्यम मिळाल्यामुळे हा चार्ज जमिनीवर कोसळू शकतो. तो जिथे पडतो तिथला भाग जळून जातो. शक्यतो असा चार्ज मोठे वृक्ष मोठे टॉवर यांवर पडतो. म्हणून वीज चमकत असताना झाडाखाली उभे राहू नये. मोठ्या टॉवर ना विजेपासून वाचवण्यासाठी टॉवर च्या वर किंवा पटांगणात एक एक उंच मेटलची पट्टी बसवलेली असते. त्याचे एक टोक जमिनीत असते. आणि दुसऱ्या टोकाला मॅग्नेट असते. वीज जर टॉवरकडे येत असेल तर मॅग्नेट मुळे ती मेटलच्या पट्टीकडे आकर्षिली जाते आणि पट्टीतून जमिनीत जाते.

४) टीव्ही बंद केल्यावर त्याच्या स्क्रीनकडे हात नेल्यास हाताचे केस स्क्रीनला चिकटतात

टीव्ही चालू असताना सतत रेडिएशन चे घर्षण स्क्रीनशी होत असते. शिवाय विद्युत ऊर्जाही असते. त्यामुळे स्टॅटिक चार्ज तयार होतो. यामुळे केस त्याकडे आकर्षिले जातात. म्हणूनच टीव्हीसाठी सुद्धा थ्री पिन प्लग वापरतात.

अजून वाचा: आगीपासून वाचण्याचे उपाय

निष्कर्ष

आपल्या घरातली अर्थिंग व्यवस्थित आहे कि नाही हे तपासून घ्यावे. ती मुख्य इमारतीच्या अर्थिंगशी नीट जोडलेली आहे कि नाही याची तपासणी करावी. जी उपकरणे तापतात किंवा थंड होतात, जसे इस्त्री, टीव्ही, मायक्रोवेव्ह, एसी, फ्रिज, अशा उपकरणांसाठी कायम थ्री पिन प्लग वापरावा.

कोरडा खोकला का येतो | Korda Khokla Ka Yeto

रात्री खोकला का येतो | Ratri Khokla Ka Yeto

सर्दी खोकला घरगुती उपाय | Sardi Khokla Gharguti Upay

खोकला घरगुती उपाय मराठी | Khokla Gharguti Upay in Marathi

Leave a Reply