पद्म म्हणजे कमळ. या आसनात शरीराचा आकार कमळासारखा दिसतो म्हणून या आसनास पद्मासन असे म्हणतात. हे एक महत्त्वाचे आसन आहे. प्राणायामाकरिता बहुतेक या आसनात बसतात.
पद्मासन माहिती मराठी – Padmasana Information in Marathi
Table of Contents
पद्मासन कसे घालावे (पद्मासन पद्धत)
- चटईवर बसा.
- पाय समोर पसरा.
- उजवा पाय गुडघ्यात मुडपा.
- पाय मुडपताना यातना होत असतील तर सहजासहजी जितका मुडपता येत असेल तेवढाच मुडपा आणि या अवस्थेत थोडा वेळ बसा.
- 3/4 दिवसांत पाय सहज मुडपेल.
- उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला पकडा आणि उजव्या पायाची बोटे डाव्या हाताने पकडा.
- दोन्ही हातांच्या मदतीने वर उचलून उजव्या पायाचा पंजा आतल्या बाजूस ओढा.
- ही क्रिया काळजीपूर्वक आणि हळू करा.
- दोन्ही हातांच्या मदतीने उजव्या पायाची टाच डाव्या मांडीच्या उगमस्थानावर घट्ट बसवा.
- डावा पाय गुडघ्यात मुडपून, डाव्या पायाचा घोटा डाव्या हाताने पकडा. उजव्या हाताने डाव्या पायाची बोटे पकडा.
- आता दोन्ही हातांनी त्याला थोडे वर उचलून डावी टाच उजव्या मांडीच्या उगमस्थानावर घट्ट बसवा.
- ज्ञानमुद्रेत दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवा.
- वाटल्यास ब्रह्मांजलीच्या स्थितीत बसा.
- पद्मासनाच्या या अंतिम स्थितीत सर्व शरीराला सुखमय आनंदाची अनुभूती मिळते.
- कंबर, पाठ आणि मान सरळ रेषेत ठेवा. डोळे बंद करा.
- सुरुवातीस 5 ते 10 सेकंद या स्थितीत बसा.
- सरावाने ध्यानासाठी तासन्तास या स्थितीत तुम्ही बसू शकता.
पद्मासन लाभ :- Padmasana che Fayde in Marathi
1) पद्मासनाने संधिवात बरा होण्यास मदत होते.
2) विषयवासना मंदावते.
3) पचनशक्ती वृद्धिंगत होते.
4) पोटदुखी बरी होण्यास मदत होते आणि चांगली भूक लागते.
5) हत्तीरोगापासून मुक्तता मिळते.
6) त्वचारोग बरे होतात.
7) हृदयरोग्यांना लाभ होतो.
8) कंबर आणि त्या खालील अवयव सशक्त होतात. स्नायू लवचिक होतात.
9) या आसनाच्या नियमित सरावाने मनाला स्थिरता आणि शांती लाभते.
10) प्राणायाम आणि योगिक क्रियांचा मार्ग या आसनामुळे सुकर होतो.
पद्मासन विडिओ मराठी
अजून वाचा: