चालण्याची शर्यत माहिती, Walking Race Information in Marathi _marathime.com
चालण्याची शर्यत माहिती, Walking Race Information in Marathi

चालण्याची शर्यत माहिती – Walking Race Information in Marathi

१) चालण्याच्या शर्यतीत २० कि.मी.‚ ५० कि.मी. अशा विविध अंतरांच्या शर्यतींचा समावेश होतो.

२) जमिनीचा संबंध न सोडता एक-एक पाऊल टाकत पुढे जाणे म्हणजे चालणे. पावलाच्या टाचेचा जमिनीस स्पर्श झाला पाहिजे.

३) चालताना पुढे टाकलेल्या पावलाचा जमिनीस स्पर्श झाल्याशिवाय मागील पाऊल उचलावयाचे नाही. प्रत्येक पाऊल टाकताना जमिनीवर ठेवलेले पाऊल एक क्षण तरी ताठ केले पाहिजे. (गुडघा ताठ झाला पाहिजे.)

४) २० कि.मी. अंतराच्या शर्यतीत प्रत्येक ५ कि.मी. अंतरावर स्पंजिंगची सोय करावी. २० किलोमीटरपेक्षा अधिक अंतराच्या शर्यतीमध्ये प्रत्येक ५ कि. मीटर अंतरावर स्पर्धा समितीने उपाहाराची सोय करावी. उपाहार सहज उपलब्ध होईल असा ठेवावा अगर स्पर्धकाच्या हातात द्यावा. प्रत्येक १० किलोमीटर अंतरावर स्पंजिंगची सोय करावी. तेथे फक्त पाणी उपलब्ध असेल. (अधिकृत उपाहार केंद्राशिवाय अन्य ठिकाणी उपाहार घेतल्यास तो स्पर्धक बाद होण्यास पात्र ठरतो.)

५) २० कि.मी. अंतराच्या शर्यतीसाठी जास्तीतजास्त २.५ किलोमीटर परिघाचा वर्तुळाकार मार्ग असावा.

६) ५०. कि.मी. अंतराच्या शर्यतीत भाग घेणाऱ्या स्पर्धकाने स्पर्धेत भाग घेण्यास पात्र असल्याबद्दल वैद्यकीय दाखला आणला पाहिजे.

७) ५० कि.मी. अंतराची शर्यत रस्त्यावर घेतली जाणार असल्याने स्पर्धा समितीने स्पर्धकांच्या सुरक्षिततेची हमी घ्यावी. त्या वेळी रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवावी. (या चालण्याच्या शर्यती वाहनांचा अडथळा नसलेल्या चांगल्या रस्त्यावर घेता येतील.)

८) ५० कि.मी. अंतराची शर्यत अशी आयोजित करावी की‚ पहिल्या क्रमांकाने शर्यत पुरी करणाऱ्याने ती सूर्यास्तापूर्वी पुरी करावी.

९) चालण्याच्या शर्यतीसाठी वेगळे पंच असावेत. आपल्यापैकी एकाला ते सरपंच म्हणून निवडतील.

१०) सरपंच व दोन पंच किंवा तीन पंच यांच्या मते स्पर्धकाचे चालणे नियमानुसार नसेल‚ तर स्पर्धकाला बाद करावे.

११) स्पर्धकाचे चालणे नियमानुसार होत नसेल‚ तर त्याला योग्य खूण करून‚ विशिष्ट दोषाची जाणीव करून देऊन एकदा ताकीद द्यावी. दुसरी ताकीद देण्याची गरज नाही. त्याला बाद करावे. (शक्य तर ताकीद देताना पांढरे निशाण दाखवावे व बाद करताना तांबडे निशाण दाखवावे.) चालण्याच्या शर्यतीच्या शेवटच्या टप्प्यात अंतिम रेषेपासून ५० मी. च्या आत स्पर्धकांचे चालणे नियमबाह्य होत असल्याची सरपंचाची खात्री पटल्यास तो आपल्या अधिकारात त्या स्पर्धकास बाद करू शकतो.

१२) रस्त्यावरील स्पर्धेतील स्पर्धकाने बाद होताच धारण केलेला क्रमांक काढून ठेवावा.

१३) बाद केलेल्या स्पर्धकाला शर्यत सुरू असताना तो बाद आहे असे सांगणे शक्य नसल्यास शर्यत संपताच ताबडतोब निर्णयाची अंमलबजावणी करावी.

पुढे वाचा:

Leave a Reply