आत्महत्या सुटकेचा अनैतिक मार्ग  निबंध मराठी
आत्महत्या सुटकेचा अनैतिक मार्ग निबंध मराठी

आत्महत्या सुटकेचा अनैतिक मार्ग निबंध मराठी 

‘जीवनगाणे गातच हावे झालेगेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे निसर्गात मनुष्यप्राणी सर्वात बुद्धिमान म्हणून ओळखला जातो. त्याचे अस्तित्वच मुळी धोकादायक असते. निसर्गातील सर्व फेरफार, उलथापालथ हे मानवाच्या अतिंद्रिय प्रगतीचे लक्षण आहे. आपल्या ऐषआरामासाठी, सुखासाठी माणूस निसर्गात काय बदल घडवून आणेल सांगता येत नाही. स्वत:च्या बुद्धीच्या जोरावर सुखासीन आयुष्य, धनसंपदा प्राप्त करण्यासाठी मनुष्याची धडपड अव्याहतपणे चालूच असते. स्पर्धा, मग ती कोणत्याही क्षेत्रातील असो माणुस ती स्वीकारतो आणि पेलवतोही त्यासाठी काहीही त्यागायची त्याची वृत्ती असते.

अशा या जीवघेण्या स्पर्धेमुळे आणि अवाढव्य, अमर्याद अपेक्षांमुळे स्वत:बरोबरच इतरांनाही त्यात सामावून घेतो. ‘वाळल्याबरोबर ओलेही जळायचेच’ या उक्तीप्रमाणे सर्व मनुष्यजात आज स्पर्धेच्या आणि चढाओढीच्या मैदानात उतरली आहे. त्यातुन काहीजण तावून सुलाखून निघतात, तर काही भरडून निघतात. पण ऊर फाटे तोवर मृगजळामागे धावत राहतात. त्याप्रमाणे शिक्षण हे असे क्षेत्र आहे की थोरांपासून बालापर्यंत सर्वांना त्यातील स्पर्धेची झळ पोहोचते.

आपली आजची शिक्षणपद्धतीही पुस्तकी पांडित्या पुरतीच आहे ज्यात विद्यार्थ्याला व्यवहारज्ञान न मिळता फक्त पुस्तकी पंडित बनवले जाते. पण तो विद्यार्थी प्रयोगविज्ञान किंवा व्यवहारीजगात शून्य ठरतो आणि खऱ्याचा सामना करण्याची तयारी नसल्याने आत्मघातास प्रवृत्त होतो. अभ्यासाप्रमाणे गायन, अभिनय, क्रीडा या सर्व क्षेत्रातही हांजा-हांजी करणाऱ्यांना जास्त प्राधान्य मिळते. खऱ्याचा कस लागेपर्यंत ती व्यक्ती निराश, हतबल होते कारण स्पर्धेत उतरण्यासाठी लागणारा वशिला वा ओळख किंवा लाच देण्यासाठी लागणारी रक्कम त्याच्या जवळ नसते. परिस्थिती, सामाजिक बंधन आणि असहायता यामुळे होणारी मानहानी चुकवण्यासाठी आत्मदहन किंवा समर्पण करण्याशिवाय तिच्यापुढे दुसरा पर्याय नसतो. .

अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे सुभाषित मालेत वाचण्यापुरते ठीक आहे पण ते अपयश पचवण्यासाठी किती संकटांना सामोरे जावे लागते ते तो अपयशीच जाणे. गेलेली वेळ व संपलेले आयुष्य परत घेता येत नाही. त्याप्रमाणे अपयश मिळाले की पश्चातापाच्या होळीत गोळली जावून ती व्यक्ती सर्वनाश ओढवून घेते. मार्ग कोणता व कसाही असो पण आत्मघात करणे म्हणजे संकटाकडे पाठ फिरवणे होय. जो हा मार्ग स्वीकारतो तो या जगात जीवन जगायला लायक नाही. देवाने दिलेले हे सुंदर जीवन व आयुष्य आपल्याच कर्माने मातीमोल मिळवणे म्हणजे देवाचा आणि दैवाचाच अपमान होय.

आत्मघात करणारा आपल्या जीवाला मुकतो आपली सुटका या क्षणभंगूर दुनियेतून करुन घेतो परंतु त्याचे आप्त आयूष्यभर त्याची सजा भोगत रहातात. मर्त्य जीवन जगत राहतात. जीवन आणि मरण यांच्या द्विधा मनोवस्थेत जगतात. म्हणून वैचारिक पातळीवर आत्मघात म्हणजे फार मोठा गुन्हा ठरतो. म्हणून हा गुन्हा करण्यापूर्वी मनुष्याने वैचारिक मंथन करणे आवश्यक.

मनुष्याला चौऱ्याऐंशी लक्ष योनीतुन प्राप्त झालेला हा मनुष्यजन्म म्हणजे निसर्गाची देणगी असुन तो सदृढव सुंदर कसा असेल हेच पहायला हवे. तो सत्कारणी लावण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत ‘मरावे परि कीर्तिरुपी उरावे’ या उक्तीनुसार मर्त्य शरीराला अमरत्व प्राप्त करण्यासाठी प्रयत्न असायला हवेत तरच जन्माचे सार्थक होईल. व मनुष्य जीवन कीडा मुंगी प्रमाणे न होता सफल होईल, संपन्न होईल. त्यासाठी आपण आपले जीवन सत् कार्यात गुंतवायला हवे.

पुढे वाचा:

Leave a Reply