Noise Pollution in Marathi : प्रदूषण ही आज जगाची मुख्य चिंता आहे. मुख्य प्रदूषणांपैकी एक म्हणजे ध्वनी प्रदूषण. आज आवाजाच्या अनेक स्त्रोतांमुळे ध्वनी प्रदूषण हा आपल्या मुख्य चिंतेचा विषय बनला आहे. यामध्ये वाहतूक यंत्रणा, मोटार वाहन आणि विमानाचा आवाज आणि रेल्वेचा आवाज देखील समाविष्ट आहे. यासोबतच औद्योगिक आणि निवासी इमारतींमुळे निवासी भागात ध्वनी प्रदूषण होऊ शकते.
ध्वनी प्रदूषणाचे काही मुख्य स्त्रोत म्हणजे रस्त्यावरील वाहतुकीमुळे निर्माण होणारा आवाज, बांधकाम कामामुळे होणारा आवाज (इमारती, रस्ते, शहरातील रस्ते, उड्डाणपूल इ.), औद्योगिक आवाज, दैनंदिन जीवनातील घरगुती उत्पादक (जसे की घरगुती वस्तू, स्वयंपाकघरातील वस्तू इ.). , व्हॅक्यूम क्लिनर, वॉशिंग मशीन, मिक्सर, ज्युसर, प्रेशर कुकर, टीव्ही, मोबाइल, ड्रायर, कुलर इ.), इ. चला मग जाणून घेऊया ध्वनी प्रदूषणाची व्याख्या ध्वनी प्रदूषणाची कारणे आणि उपाय.
ध्वनि प्रदूषण मराठी माहिती – Noise Pollution in Marathi
Table of Contents
जे ध्वनी किंवा आवाज ऐकून आपल्याला त्रास होतो, त्याला गोंगाट म्हणतात. तो आवाज ऐकायला नकोसा असतो. तीव्र ध्वनी म्हणजे मोठा आवाज.
ध्वनि प्रदूषण व्याख्या
सहन न होणारा कर्कश गोंगाट, मोठा आवाज हा यातनादायक, दुःखदायक, मानसिक शांतता व एकाग्रता नष्ट करणारा. अस्वस्थता व मानसिक ताण वाढवणारा असतो. कर्कश आवाज ऐकल्याने बहिरेपणा येतो. रक्तदाब वाढतो. हृदयाचे ठोके वाढतात. चिडचिडेपणा, रागीटपणा वाढतो यालाच ‘ध्वनिप्रदूषण‘ म्हणतात.
जे ध्वनी ऐकायला मधुर वाटतात, अशा शांत ध्वनीमुळे मनाची एकाग्रता व प्रसन्नता वाढते, मधुर संगीत श्रवणामुळे गायी जास्त दूध देतात. पक्षी, प्राणी यांची उत्पादनक्षमता वाढते. कुक्कुटपालन केंद्रांमध्ये अंड्यांचे उत्पादन वाढल्याचे प्रयोगात आढळले आहे. मधुर ध्वनी-संगीतामुळे वनस्पती व पिकांची वाढ चांगली होते, डाल्फीन या सागरी माशांना (बहामा बेटाजवळ) संगीत आवडते. गुरांना पाणी पाजताना शीळ घालतात. गुरांची तहान समाधानाने शांत होते.
मधुर ध्वनी, शांत संगीत ऐकल्याने अभ्यास चांगला होतो. नेहमी हळू व सौम्य बोलावे.
आवाजाची, ध्वनीची तीव्रता ही ‘डेसिबल’ (dB) या एककात मोजतात. सर्वसाधारणपणे आवाजाची तीव्रता ही 50 ते 70 डेसिबल ऐकण्यास योग्य असते. म्हणून हळू, गोड आवाजात बोला. गोंगाट, मोठ्याने बोलणे, मोठा आवाज टाळा. स्फोटक द्रव्ये, फटाके इ. च्या मोठ्या आवाजाचा परिणाम आपल्या श्रवण यंत्रणेवर होतो. सार्वजनिक कार्यक्रम, उत्सव, यात्रा, मिरवणुका, लग्नसमारंभ, बारसे, सणसमारंभ, निवडणुकीचा प्रचार, जयंत्या, कीर्तन, भजन साजरे करताना ध्वनिक्षेपकाच्या (लाऊडस्पीकरच्या) कर्कश आवाजाचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, आजारी, वृद्ध व्यक्तींच्या, आरोग्यावर होतो. ध्वनिवर्धनामुळे झोप लागत नाही. विश्रांती मिळत नाही.
टेपरेकॉर्डर, दूरदर्शन, रेडिओ, वाहने, कारखान्यातील भोंगे, रेल्वेगाड्या, स्वयंपाकघरात मिक्सरमुळे आवाजाचे ‘घर‘ हे ध्वनिप्रदूषणाचे केंद्र बनते.
आपल्या नाडीच्या ठोक्यांचा आवाज हा कमीत कमी 10 डेसिबल असतो. दोन व्यक्तींमध्ये चाललेली कुजबूज ही 20 डेसिबल, गप्पा मारताना होणारा आवाज साधारणपणे 30 ते 60 डेसिबल, टाचणी जमिनीवर पडल्याचा आवाज 2 डेसिबल, दिवाळीच्या फटाक्यांचा आवाज 120 डेसिबल, मोटारसायकल, स्कूटरचा आवाज 80 ते 94 डेसिबल, ट्रकचा आवाज 90 डेसिबल, लहान प्रवासी गाडीचा आवाज 79 डेसिबल, वरातीतील वाद्यांचा आवाज 80 ते 90 डेसिबल, ढगांचा गडगडा, विजेचा आवाज 140 डेसिबल असतो.
विमाने-क्षेपणास्त्रांचा आवाज सर्वाधिक म्हणजे 160 ते 180 डेसिबल आणि औद्योगिक क्षेत्रातील आवाजाची तीव्रता 100 ते 120 डेसिबल असते. 100 डेसिबलपेक्षा जास्तीत जास्त तीव्रतेचा आवाज सतत ऐकल्याने बहिरेपणा येतो. एका प्रयोगात भांड्याच्या कारखान्याजवळ तीव्र ध्वनीमुळे झोपडपट्ट्यांत जन्मणारी मुले बहिरी झाल्याचे आढळले.
ध्वनी प्रदूषण कारणे
- कारखान्यात, उद्योगक्षेत्रांतील यंत्रांचे आवाज ध्वनिप्रदूषण करतात.
- स्वयंचलित वाहने, विमाने, रॉकेट, ट्रक, लॉरी, कार, ट्रॅक्टर्स, स्कूटर, रिक्षा, मोटारसायकली, मोटारी, रेल्वे यांच्यामुळे ध्वनिप्रदूषण होते. इंजिन व हॉर्न्स यांच्या कर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषणात भर पडते.
- धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक सण, उत्सव इ. समारंभांत लाऊडस्पीकरचा आवाज ध्वनिप्रदूषण करते.
- घरगुती व स्वयंपाकगृहात फ्रीज, मिक्सर, कपडे धुण्याचे यंत्र, प्रेशर कुकर यांच्याबरोबरच रेडिओ, दूरदर्शन, पंखे, दूरध्वनी, वाद्ये यांचे आवाज तीव्र केल्याने ध्वनिप्रदूषण होते. .
- अणुचाचण्या व अणुस्फोटकांमुळे मोठे ध्वनी निर्माण होतात.
- चित्रपटगृहे, नाट्यगृहे, नर्तन गृहे, सर्कस इ. पासून ध्वनिप्रदूषण होते.
- बाजारपेठात विक्रेत्यांकडूनव वाहनांपासून ध्वनिप्रदूषण होते.
- इमारत बांधताना विविध यंत्रसामग्रीमुळे ध्वनिप्रदूषण होते.
- नैसर्गिकरीत्या होणारे वादळी वारे, विजा, पाऊस, ढगांचा गडगडाट , ज्वालामुखीचा उद्रेक, सागरी लाटांचे आवाज इ.मुळे ध्वनिप्रदूषण होते.
- इमारतींच्या वरच्या मजल्यावरील ठकठक, पावलांचे आवाज इ. ध्वनिप्रदूषण करतात.
ध्वनी प्रदूषण परिणाम
- कायम गोंगाट व कर्कश आवाजामुळे बहिरेपणा येतो. 100 डेसिबलपेक्षा जास्त तीव्रतेच्या ध्वनीमुळे बहिरेपणा येतो.
- ध्वनिप्रदूषणामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते. चिडखोरपणा वाढतो, निद्रानाश, अपचन, दुर्बलता निर्माण होते.
- कारखान्यातील यंत्रांच्या खडखडाटामुळे कामगारांना बहिरेपणा येतो. रक्तदाब, हृदयविकार बळावतो. अस्वस्थतेतून डोकेदुखी, मळमळ निर्माण होते. शांतता मिळत नाही. दमा, विस्मरण, बुद्धिभ्रंश इ. व्याधी लागतात.अतिकर्कश आवाजामुळे कामगारांच्या हातून चुका होऊनव अपघात होतात.
- ध्वनिप्रदूषणाचा त्रास होऊ नये म्हणून काही लोक झोपेच्या गोळ्या, मद्य प्राशन, धूम्रपान, मादक पदार्थांचे सेवन करतात. त्यातून रोगटपणा येतो.
- कर्कश आवाजामुळे गर्भावर व गर्भवती स्त्रियांवर वाईट परिणाम होतो. लैंगिक क्षमता घटते.
- गोंगाटामुळे घाम येणे, चक्कर येणे, अपचन, थकवा येणे, मानसिक विकृती निर्माण होणे असे आजार बळावतात.
- ध्वनिप्रदूषणाचा परिणाम हा मानवांवर तसेच इतर प्राण्यांवरही होत असतो.
- रस्त्यांवरील ध्वनिप्रदूषणामुळे, वर्दळीमुळे संवाद करणे अवघड होते.
- ध्वनिप्रदूषणामुळे झोपशांतपणे लागत नाही. कार्यक्षमता घटते.
- गोंगाटामुळे पक्षी, प्राणी इतरत्रस्थलांतर करतात.
- तीव्र ध्वनीमुळे भिंतींना तडे जातात, काचा फुटतात.
- ध्वनिप्रदूषणामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर, वृद्धांच्या आरोग्यावर, आजारी लोकांच्या प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होतात.
- सण, उत्सव, समारंभ, यात्रा, धार्मिक विधी, विवाह यांच्यात ध्वनिवर्धक (लाऊडस्पीकर) कर्कश स्वरूपात ध्वनिप्रदूषण करतो तेव्हा त्या काळात लोकांच्या झोपा उडविल्या जातात. स्वास्थ्य वशांतता नष्ट होते.
ध्वनी प्रदूषण उपाय योजना
- सर्वच प्रकारच्या वाहनांची इंजिने, विमाने, ट्रक, चारचाकी, दुचाकी घरगुती साधनांमध्ये आवाज कमी करणारी यंत्र निर्मिती व संशोधन करणे महत्त्वाचे व उपयुक्त ठरेल.
- औद्योगिक वसाहती रहिवाशांच्या/राहण्याच्या ठिकाणांपासून दूर असाव्यात.
- ध्वनिशोषित पदार्थाचे आवरण भिंतींना घालावे.
- सतत कर्कश आवाजात काम करणाऱ्या कामगारांनी कानांसाठी विशिष्ट बोळे वापरावे; म्हणजे ध्वनिप्रदूषण टळेल.
- ध्वनिप्रदूषण क्षेत्रात सर्वत्र मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड व जोपासना करावी. वृक्षांच्या पानांमुळे ध्वनीची तीव्रता कमी होते.
- टी.व्ही., रेडिओ, कार्यशाळा, चित्रपटगृहे, सभासमारंभात ध्वनीची तीव्रता कमी करावी. रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत ध्वनिप्रदूषणक्षम साधन वापरावर बंदी घालावी.
- शाळा, शैक्षणिक क्षेत्र, न्यायालये, दवाखाने इ. संवेदनशील क्षेत्राचा समावेशखासशांततेच्या भागात करावा.
- ध्वनिप्रदूषणविषयक कायद्यांची कडक अंमलबजावणी करावी, 9. वर्दळीच्या रस्त्यावर घरांची जोतीरस्त्याच्या पातळीपेक्षा उंच बांधावीत. 10. रस्त्यावर डांबराऐवजी अॅस्फाल्ट सिमेंट वापरावे म्हणजे आवाज कमी येतो.
- सार्वजनिक उत्सवात ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांना कडक शिक्षा कराव्यात.
- इमारतींना ध्वनिरोधकपडदे लावावेत.
- शहराच्या प्रत्येक भागात वनस्पतींचे व बगिचे उभारावेत, यंत्रांना सायलेन्सर लावावेत. आवाज शोषून घेणारी यंत्रणा निर्माण करावी. घराभोवती झाडे लावल्याने आवाजाची तीव्रता कमी होते.
- आवाजापासून कानांचे रक्षण करण्यास इयरप्लग वापरावेत.
- आवाजाची कर्कशता कमी करण्यासाठी वाहने व कारखान्यांमध्ये यंत्रचालनेसाठी सौरऊर्जा, पवनऊर्जा,गॅस यांचा वापर करावा.
- सार्वजनिक कार्यक्रमात फटाके, शोभेची दारू, लाऊडस्पीकर इत्यादींच्या वापरावर नियंत्रण आणावे.
- ध्वनिप्रदूषण नियंत्रणासाठी सर्व प्रसारमाध्यमांद्वारे जनजागृती करून त्याचे भीषण रूप स्पष्ट करावे व त्यावरील उपाय सांगावेत.
(अन्न,पाणी, हवा शुद्ध ठेवा! 7 एप्रिल : जागतिक आरोग्य दिन)
ध्वनी प्रदूषणावर निष्कर्ष
ध्वनी प्रदूषणावर अनेक प्रतिबंधात्मक उपाय आहेत जसे की, उद्योगांमध्ये ध्वनीरोधक खोल्या बांधण्यास प्रोत्साहन, उद्योग आणि कारखाने निवासी इमारतीपासून दूर असावेत, मोटारसायकलचे खराब झालेले पाईप दुरुस्त करणे, गोंगाट करणाऱ्या वाहनांवर बंदी, विमानतळ, बसेस, रेल्वे स्थानके आणि इतर. वाहतूक टर्मिनल रहिवासी ठिकाणांपासून दूर असावेत, शैक्षणिक संस्था आणि रुग्णालयांच्या आजूबाजूचे क्षेत्र ध्वनी प्रतिबंधित क्षेत्र घोषित करावेत.
वरील लेख ध्वनी प्रदूषण मराठी माहिती वाचून आपल्याला ध्वनी प्रदूषणाची कारणे, ध्वनी प्रदूषणाचे उपाय आणि ध्वनी प्रदूषणाचे परिणाम या लेखातून आपल्याला समजले असेलच. Noise Pollution in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक व्हाट्सअँप आणि विविध सोशियल मीडियावर शेअर करा. तसेच Information About Noise Pollution in Marathi हा लेख कसा वाटला व अजून ध्वनी प्रदूषण बद्दल काही माहिती पाहिजे असेल तर आपण Comments द्वारे कळवा.
Noise Pollution in Marathi या आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला Comment Box आणि Email लिहून कळवावे, तुम्ही दिलेली ध्वनी प्रदूषण मराठी माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या www.marathime.com ला.
पुढे वाचा:
- जल प्रदूषण मराठी माहिती
- हवा प्रदूषण मराठी माहिती
- ध्वनि प्रदूषण मराठी माहिती
- मृदा प्रदूषण मराठी माहिती
- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मराठी
- आयुष्मान सहकार योजना माहिती मराठी
- भारताचा GDP किती आहे
- जगातील सर्वात लहान देश कोणता आहे
- भारताची राजधानी कोणती आहे
- जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे?
- भारतात किती धर्म आहेत 2021
- भारतात किती राज्य आहेत 2021
- भारताच्या सीमेवरील देशांची नावे आणि राजधानी
- घड्याळाचा शोध कोणी लावला आणि कधी
ध्वनि प्रदूषणावर वारंवार विचारले जाणारे प्रश्न
प्रश्न १. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय?
उत्तर- ध्वनी प्रदूषण हे प्रामुख्याने मोठ्या आवाजात संगीत, फोनवर बोलणे, मशिन्स, वाहतूक व्यवस्था, वाहने, गाड्या आणि विमाने आणि चुकीचे शहरी नियोजन आणि संरचनांची रचना यामुळे होते. घरातील विद्युत उपकरणे देखील भयानक आवाज करतात. जेव्हा जास्त आवाजामुळे मानवाला त्रास होतो आणि अस्वस्थता येते तेव्हा त्याला ध्वनी प्रदूषण म्हणतात.
प्रश्न २. ध्वनी प्रदूषण कसे नियंत्रित करता येईल?
उत्तर- शहरे किंवा लोकसंख्येपासून दूर उद्योग आणि कारखाने स्थापन केले पाहिजेत.
वाहनांमध्ये लावलेले हॉर्न जोरात वाजवण्यापासून थांबवावे.
शहरे, औद्योगिक संस्था आणि रस्त्यांच्या कडेला वृक्षारोपण केले पाहिजे.
ही झाडे ध्वनी शोषक म्हणून काम करून ध्वनी प्रदूषण कमी करतात.