उंच उडी माहिती मराठी, Unch Udi Information in Marathi_marathime.com
उंच उडी माहिती मराठी, Unch Udi Information in Marathi, High Jump

उंच उडी माहिती मराठी – Unch Udi Information in Marathi

१) उंच उडी टाकण्यासाठी खड्ड्याची लांबी ५ मीटर आणि रुंदी ३ मीटर असावी. उंची एक मीटर असावी. (लँडिंग एरिया म्हणून फोमच्या गादीची मापे ५ मी. × ३ मी. × १ मी. असावीत.)

२) धावण्याचा मार्ग २५ मीटरपेक्षा कमी नसावा.

३) दोन स्टँडमधील अंतर ४ मीटरपेक्षा कमी नसावे आणि ४.०४ मीटरपेक्षा अधिक नसावे. स्टँड व गादी यात किमान १० सें.मी.चे अंतर असावे.

४) आडवी काठी (Cross Bar) ३.९८ मी. ते ४.०२ मी. लांबीची असावी. काठी गोल असावी. गोल काठीचा व्यास २.५ सें.मी. पेक्षा कमी नसावा आणि ३ सें.मी. पेक्षा जास्त नसावा. काठीचे वजन २.०५ किलोग्रॅम  असावे. काठी ठेवण्यासाठी ६ सें.मी. लांबीचे व ४ सें.मी. रुंदीचे सपोर्ट्स (Supports) असावेत. (दांडीला जास्तीतजास्त २ सें.मी. झोळ असावा.)

५) स्पर्धकाने एकाच पायावर टेक्-ऑफ घेतला पाहिजे.

६) प्रत्येक उंचीला स्पर्धकाला तीन उड्या मारता येतील. (ज्यूनिअर गटासाठी दोन उड्या) प्रत्येक पाळीस स्पर्धकाने उडी मारलीच पाहिजे‚ असे नाही. विशिष्ट उंचीवर पहिली उडी मारली नाही (Pass)‚ तर त्या उंचीवरील पुढील दोन उड्या त्याला मारता येणार नाहीत.

७) प्रारंभीच्या उंचीनंतर स्पर्धक इच्छेनुसार कोणत्याही उंचीवर उडी मारण्यास सुरुवात करू शकतो. विशिष्ट उंचीवर पहिली उडी अयशस्वी ठरली‚ तर त्या उंचीवरील पुढील दोन उड्या न मारता (Pass) तो पुढील उंचीवर उडी मारू शकतो.

८) उंचीचा विचार न करता स्पर्धकाला सलग ३ उड्यांत अपयश आले‚ तर त्याला पुढे उडी मारता येणार नाही.

९) समितीने पुरविलेल्या खुणा धावण्याच्या मार्गाच्या बाहेर ठेवता येतील.

१०) काठीची उंची वाढविल्यानंतर तिची उंची पंचांनी स्पर्धकांना सांगावी. २-२ सें.मी.ने उंची वाढवीत जावे.

११) फेरी सुरू होण्यापूर्वी काठीची उंची मोजावी. उच्चांक केला जात असेल‚ तर यशस्वी उडीनंतर काठीची उंची पुन्हा मोजावी.

१२) उडी मारताना स्पर्धकाच्या शरीराचा काठीस स्पर्श झाला आणि काठी खाली पडली‚ तर तो फाउल समजावा.

१३) उडी मारणाऱ्या स्पर्धकाचा स्पर्श होऊन काठी हलत राहते. उडी मारून स्पर्धक खड्ड्याच्या बाहेर गेल्यावर जरी हलत असलेली काठी खाली पडली‚ तरी तो फाउल समजावा.

१४) वाऱ्याने काठी खाली पडली‚ तर तो फाउल समजू नये.

१५) काठीवरून उडी न मारता स्पर्धकाचा स्टँडच्या पुढील जमिनीस‚ गादीस वा खड्ड्यास स्पर्श झाला‚ तर तो फाउल समजावा.

१६) आडव्या काठीच्या खालून किंवा स्टँडच्या बाजूने स्पर्धक पुढे गेला‚ तर तो फाउल समजावा.

१७) काठीला स्पर्श न करता यशस्वी उडी मारून खड्ड्यात पडल्यावर स्पर्धकाचा स्टँडला धक्का लागून काठी खाली पडली‚ तर फाउल होतो.

१८)‘टेक्-ऑफ’ घेण्याची जागा वा खड्डा अयोग्य वाटत असेल‚ तर सरपंचाच्या परवानगीने स्टँड्स हलविता येतील. मात्र‚ फेरी संपल्याशिवाय स्टँड्स हलवू नयेत. (खेळाडूला इच्छेप्रमाणे स्टँड्स हलविता येणार नाहीत.)

१९) विशिष्ट उंचीवर एक स्पर्धक वगळता अन्य स्पर्धक बाद झाले असतील तर राहिलेल्या स्पर्धकाला पुढील उंचीवर उड्या मारून उच्चांक करण्याची संधी द्यावी. त्याच्या इच्छेनुसार काठीची उंची वाढवीत जावे.

२०) आडव्या काठीवर‚ खड्ड्यात किंवा गादीवर खुणेसाठी रुमाल किंवा कोणतीही वस्तू ठेवता येणार नाही.

२१) निकाल लावताना पेच निर्माण झाल्यास तो पुढील पद्धतीने सोडवावा−

  • अ) ज्या उंचीवर पेच निर्माण झाला असेल‚ त्या उंचीवर ज्याने कमी उड्या मारल्या असतील‚ त्याला वरचा क्रमांक द्यावा.
  • ब) वरीलप्रमाणे पेच न सुटल्यास पूर्ण स्पर्धेत कमीतकमी फाउल्स (Failures) असणाऱ्या स्पर्धकास वरचा क्रमांक द्यावा.
  • क) १) तरीही पेच न सुटल्यास शेवटी यशस्वीरीत्या पार केलेल्या उंचीवर संबंधित स्पर्धकांना पुन्हा उडी मारण्याची एक-एक पाळी द्यावी. त्या पाळीत यशस्वी ठरणाऱ्यास वरचा क्रमांक मिळेल आणि अयशस्वी ठरणाऱ्यास खालचा क्रमांक मिळेल. संबंधित पाळीत दोघेही यशस्वी किंवा अयशस्वी ठरले‚ तर त्यांच्यापैकी एकजण यशस्वी ठरेपर्यंत त्याच किंवा कमी / अधिक उंचीवर पुढे एक-एक पाळी देऊन पेच सोडवावा.
    २) अन्य क्रमांक ठरविण्यासाठी पेच न सोडविता मिळालेला क्रमांक त्यांना द्यावा.

पुढे वाचा:

Leave a Reply