योग मुद्रा मराठी माहिती – योग मुद्रा म्हणजे काय?

योग क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे या आसनास योगमुद्रासन असेही म्हणतात.

योगमुद्रासन माहिती मराठी, Yoga Mudra in Marathi
योगमुद्रासन माहिती मराठी, Yoga Mudra in Marathi

योगमुद्रासन करण्याची पद्धत – Yoga Mudra in Marathi

 1. चटईवर बसून पद्मासन करा.
 2. दोन्ही हात पाठीमागे नेऊन एका हाताच्या पंजाने दुसऱ्या हाताचे मनगट पकडा.
 3. दुसऱ्या हाताची मूठ वळवा.
 4. सरळ बसा.
 5. हनुवटी व मान ताठ ठेवून नजर समोर स्थिर करा.
 6. दीर्घ श्वास घ्या.
 7. डोळे बंद करा.
 8. श्वास हळू सोडा.
 9. पोट पाठीमागे पाठीच्या कण्याच्या बाजूला ओढा.
 10. पुढे वाकून जमिनीवर कपाळ टेकवा.
 11. आता श्वासोच्छवास शक्य तितका वेळ बंद ठेवा.
 12. सुरुवातीस जमिनीला कपाळ टेकवण्याची घाई करू नका.
 13. ही क्रिया झटके देऊन करू नका.
 14. या स्थितीत थोडा वेळ राहिल्यानंतर हळू श्वास सोडा, उठा आणि पूर्वस्थितीत या.
 15. वाटल्यास तुम्ही हात वर उचलू शकता.
 16. सरावानंतर तुम्ही ही मुद्रा 5 ते 10 मिनिटेच नव्हे तर कित्येक तास करू शकता.
 17. पण तुम्ही फक्त 10 सेकंद ही मुद्रा करावी.
 18. 10 मिनिटे मुद्रा करावयाची असल्यास कुंभक करू नका.
 19. अशा वेळी श्वासोच्छवास सामान्य ठेवा.

योग मुद्रा करण्याचे फायदे आणि लाभ

 1. जठरातील मळमळ आणि भूक न लागणे हे विकार या आसनामुळे कमी होऊ शकतात.
 2. पोटदुखी आणि अपचनावर हे आसन गुणकारी आहे.
 3. पाठीचा कणा, कंबर, रक्तवाहिन्या आणि स्नायू लवचिक व सशक्त बनण्यास या आसनाची चांगली मदत होते.
 4. मधुमेह कमी होण्यास याचे साहाय्य होते.
 5. लठ्ठपणा कमी होऊ शकतो.
 6. योगमुद्रेमुळे सर्व शरीराला व्यायाम मिळतो.

योगमुद्रासन विडिओ मराठी

अजून वाचा:

Leave a Reply