आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्राची मानचिन्हे कोणती कोणती आहेत ते सांगणार आहोत, जसे कि महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता, महाराष्ट्राचा राज्य पक्षी, महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता, महाराष्ट्राचा राज्य वृक्ष, महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता, महाराष्ट्राचा राज्य फुल या बद्दल खाली संपूर्ण माहिती दिली आहे.
महाराष्ट्राची मानचिन्हे यादी
1. महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष कोणता?
महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष पांढरी चिप्पी (सफेद चिप्पी): (सफेद चिप्पीचे शास्त्रीय नाव – Sonneratia alba)
7 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्राच्या वन्यजीव मंडळाने ‘पांढरी चिप्पी’ (सफेद चिप्पी) या कांदळवन वृक्षास महाराष्ट्राचा राज्य कांदळवन वृक्ष (State Mangrove Tree) घोषित केले. राज्य वन्यजीव मंडळाच्या पंधराव्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सफेद चिप्पी वृक्षास कांदळवनातील सफरचंद म्हटले जाते. असा वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. खारफुटी या वनस्पतीमुळे बनलेल्या जंगलाला कांदळवन म्हणतात.
खारफुटी ही चिखलात, घट्ट माती नसलेल्या जागी आणि भरतीचे पाणी घुसणाऱ्या भागात वाढते. हिची मुळे समुद्राच्या पाण्यातले मिठाचे प्रमाण सहन करु शकतात आणि लाटांबरोबर होणारी जमिनीची धूप थांबवतात. खाऱ्या जमिनीतही जिची फूट होते ती खारफूटी. या वनस्पतीमुळे बनलेल्या वनश्रीला कांदळवन म्हणतात.
कांदळवन म्हणजे सागराजवळ वाढणारा अनेक वनस्पतीचा समूह. याला मराठीत कच्छ वनस्पती असेही म्हणतात. या कांदळवनामुळे समुद्री अन्नसाखळी टिकून राहते. भारतामध्ये जगातील सर्वात जास्त खारफुटीचे जंगल हे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर असणारे सुंदरबनचे जंगल आहे. राज्य वृक्ष – आंब्याचे झाड.
2. महाराष्ट्राचा राज्य फूल कोणते?
महाराष्ट्राचा राज्य फूल : जारुळ (ताम्हण): (शास्त्रीय नाव : Lagerstroemia Speciosa लॉगस्ट्रोमिया स्पेसओसा किंवा Legerstroemia Reginae लॅगस्ट्रोमिया रेजिनी)
ताम्हणाचे फूल लालसर – जांभळ्या रंगाचे, झालरीसारख्या पाकळ्या असणारे असते. कोकणात या वृक्षाला मोठा बोंडारा असे म्हणतात. पश्चिम मुंबईत अनेक ठिकाणी व विदर्भातही सर्वत्र हे आढळते. वसंत ऋतूची चाहूल लागताच नवीन पालवी फुटू लागते व फुलांचा बहर सुरू होतो. लहान झाडालाही फुले येतात.
3. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
महाराष्ट्राचा राज्य प्राणी : शेकरू (उडती खार) (शास्त्रीय नाव : Ratufa Indica – रॅटफा इंडिका)
ही खारीची एक प्रजाती आहे. महाराष्ट्रात भीमाशंकर, फणसाड, आजोबा डोंगररांगात, माहुली व वासोटा परिसरात शेकरू आढळतो. मेळघाट, ताडोबा येथेही तो दिसतो. शेकरू हा अतिशय देखणा आणि दुर्मीळ होणाऱ्या प्रजातीतील प्राणी आहे. त्याचे वजन दोन ते अडीच किलो व लांबी अडीच ते तीन फूट असते. त्याला गुंजीसारखे लालभडक डोळे, मिशा, अंगभर तपकिरी तलम कोट आणि गळ्यावर, पोटावर पिवळसर पट्टा, झुबकेदार लांब शेपूट असते. शेकरू 15 ते 20 फुटांची लांब उडी मारू शकतो.
4. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?
महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता : हरोली (हरियाल): (शास्त्रीय नाव : Treron Phoenicoptera – ट्रेरॉन फोनिकॉप्टेरा)
हा कबूतरवंशीय पक्षी असून तो महाराष्ट्राचा राज्यपक्षी आहे. याला हिरवा होला, हरोळी, यलो फुटेड् ग्रीन पिजन किंवा पिवळ्या पायाची हरोळी या नावांनीही संबोधले जाते. तो आनंद सागर, शेगाव येथे आढळतो. पाचू-कवडा या कबुतराच्या अंगावरील पाचूसारखी हिरवी झाक व पिवळ्या, निळ्या, जांभळ्या अशा कितीतरी रंगांच्या छटा हरियालाच्या अंगावर असतात. गर्द हिरव्या झाडांची ठिकाणे, प्रामुख्याने वड, पिंपळ, उंबर, अंजीर जातीच्या झाडावर तो असतो. हे पक्षी नेहमी थव्यानेच उडतात. त्यांचा विणीचा हंगाम मार्च 2 ते जून असतो.
5. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता?
महाराष्ट्राचा राज्य वृक्ष – आंबा : (शास्त्रीय नाव : Mangifera Indiaca – मॅजिफेरा इंडिका)
एक प्रसिद्ध, सदापर्णी, 15 ते 25 मीटर उंच, घेर 4 ते 5 मीटर आणि आकार घुमटासारखा असलेला हा वृक्ष. याची साल जाड, गर्द करडी किंवा काळपट, खरबरीत, भेगाळ, खवलेदार असते. पाने साधी, कोवळेपणी लालसर, नंतर तपकिरी होतात. शेवटी ती गर्द हिरवी, चकचकीत, लांबट भाल्यासारखी दिसतात. फुले लहान असतात, लालसर किंवा पिवळट व तिखट वासाची असतात. झाडाला जानेवारी-मार्चमध्ये मोहोर येतो. नंतर मे-जूनमध्ये आंबे धरतात. आंबा भारतात अत्यंत लोकप्रिय असून जगातल्या उत्कृष्ट फळांपैकी एक आहे.
6. महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू कोणते?
महाराष्ट्राचा राज्य फुलपाखरू – राणी पाकोळी (ब्लू मॉरमॉन): (शास्त्रीय नाव : Papilio Polymnestor , पॅपिलिओ पॉलिनेस्टर)
देशातील सदर्न बर्डविंग या फुलपाखरानंतर सर्वांत मोठे सरासरी 15 इंच असते. ते मखमली काळ्या रंगाचे असून पंखावर निळ्या रंगाच्या चमकदार खुणा असतात, तसेच पंखाच्या खालची बाजूकाळी असून शरीराकडील एका बाजूवर काही लाल ठिपके असतात. ब्ल्यू मॉरमॉन या फुलपाखराला महाराष्ट्रात राणी पाकोळी’ म्हणतात. संपूर्ण महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील जंगलांमध्ये हे फुलपाखरू आढळते.
सह्याद्री पर्वतरांगा आणि आसपासच्या प्रदेशात त्यांचे प्रमाण अधिक आहे. राज्य फुलपाखरू जाहीर करणारे पहिले राज्य महाराष्ट्र तर दुसरे कर्नाटक. कर्नाटकचे राज्य फुलपाखरू-सदर्न बर्डविंग. देशात फक्त दोनच राज्यांनी राज्य फुलपाखरू जाहीर केले आहे.
7. महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता?
महाराष्ट्राचा राज्य खेळ : कबड्डी
कबड्डी हा एक खेळ आहे ज्यामध्ये बऱ्याच खेळाचा मिश्रण आहे. यात कुस्ती, रग्बी इत्यादी खेळांचे मिश्रण दिसते. दोन पक्षांमधील हा संघर्ष असेल. हा एकीकडे एक अतिशय सामर्थ्यवान खेळ आहे, तर दुसरीकडे हा बर्याच कार्यांचा संयोजन आहे. हा खेळ कालांतराने खूप विकसित झाला आहे.
आज हा जिल्हा राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जात आहे. मोठ्या प्रमाणावर खेळल्या जाणार्या अनेक तरुणांना कबड्डीची आवडही निर्माण झाली असून कबड्डीच्या माध्यमातून आपल्या भागाची कबुली क्लबमध्ये सामील होऊन त्यांचे भविष्य व त्यांची ओळख प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
हा खेळ वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. उदाहरणार्थ, तमिलनाडु मध्ये कबड्डीला चादूकट्टू, बंगलादेश मध्ये हद्दू, मालद्वीप मध्ये भवतिक, पंजाब मध्ये कुड्डी, पूर्व भारतात हू तू तू, आंध्र प्रदेश मध्ये चेडूगुडू म्हणून ओळखले जाते. कबड्डी हा शब्द मूळचा तामिळ शब्द ‘काई-पीडी’ या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ हात धरणे, तामिळ शब्दापासून उगम पावणारी कबड्डी हा शब्द उत्तर भारतात खूप लोकप्रिय आहे.
पुढे वाचा:
- महाराष्ट्रातील विद्यापीठे यादी
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधान परिषद सभापती
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे विधानसभा अध्यक्ष
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे उपमुख्यमंत्री
- महाराष्ट्राचे आतापर्यंतचे राज्यपाल
- शरद पवार ग्रामसमृद्धी योजना माहिती
- मिशन कर्मयोगी योजना माहिती मराठी
- प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मराठी
- आयुष्मान सहकार योजना माहिती मराठी
- भारताचा GDP किती आहे
- जगातील सर्वात लहान देश कोणता आहे
- भारताची राजधानी कोणती आहे
- जगातील सर्वात उंच इमारत कोणती आहे?
- भारतात किती धर्म आहेत 2021
- भारतात किती राज्य आहेत 2021
- भारताच्या सीमेवरील देशांची नावे आणि राजधानी
- घड्याळाचा शोध कोणी लावला आणि कधी
FAQ: महाराष्ट्राची मानचिन्हे
प्रश्न 1. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे?
उत्तर- शेकरू (उडती खार)
प्रश्न 2. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे?
उत्तर- हरोली (हरियाल)
प्रश्न 3. महाराष्ट्राचा राज्य खेळ कोणता आहे?
उत्तर- कबड्डी
प्रश्न 4. महाराष्ट्राचा राज्य वृक्ष कोणता आहे?
उत्तर- आंबा
प्रश्न 5. महाराष्ट्राचा राज्य फुल कोणते आहे
उत्तर- जारुळ (ताम्हण)
खूप छान माहिती