Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi : विद्यार्थ्यांना शैक्षणिक निबंध लिहिण्यात आणि भाषणे देण्यास मदत करण्यासाठी, आम्ही या लेखात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक दीर्घ आणि लहान डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी प्रदान केला आहे.

आम्ही इयत्ता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 च्या विद्यार्थ्यांसाठी मराठीमध्ये Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi लिहिला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या देशाचे महान व्यक्तिमत्व आणि नायक मानले जातात आणि ते एक आघाडीचे राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात होते.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती

डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी – Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi

Table of Contents

डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी Set 1 – Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi Set 1

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे फार महान पुढारी होते. त्यांचा जन्म इ. स. १८९१ साली एका दलित कुटुंबात झाला. भारतातील शिक्षणक्रम पुरा करून ते इंग्लडला गेले. बॅरिस्टर होऊन परत आल्यावर त्यांनी दलितांच्या उद्धाराचे कार्य हाती घेतले. त्यांनी अतोनात श्रम करून दलितांमध्ये जागृती घडवून आणली. दलितांना निर्भय केले. महाड येथील चवदार तळे सर्वांसाठी खुले करण्यासाठी त्यांनी फार मोठा लढा दिला.

त्यांना वाचनाचे खूप वेड होते. त्यांनी स्वतः खूप ग्रंथ लिहिले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कायदेपंडित म्हणून ओळखले जात. ते स्वतंत्र भारताच्या घटनेचे शिल्पकार होते. इ. स. १९५६ मध्ये त्यांचे निर्वाण झाले. दलितांना बाबासाहेब देवासारखे वाटतात. म्हणूनच त्यांची पुण्यतिथी दरवर्षी अत्यंत भक्तिभावाने साजरी केली जाते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी–Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi
डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी, Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi

डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी Set 2 – Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi Set 2

आंबेडकरांचा जन्म गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे बालपण झोपडीत गेले. तरीही रात्रंदिवस कष्ट करून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. त्यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांच्याजवळ पुस्तकांचा खूप मोठा संग्रह होता. म्हणून त्यांचा पुतळा किंवा चित्र पुस्तकाशिवाय पूर्ण झालेला दिसत नाही.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. आंबेडकरांचे खरे आडनाव आंबावडेकर होते. पण त्यांच्या गुरुजींच्या आडनावावरुन ‘आंबेडकर’ हे नाव पडले.

भारतात अनेक थोर नेते, समाज सुधारक होऊन गेले. त्यापैकी महात्मा फुले, म.गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांच्या जीवनाला वेगळी दिशा दिली. डॉ. आंबेडकर इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झाले, संपूर्ण आयुष्य दलितांसाठी झगडले, म्हणून त्यांना ‘दलितांचे कैवारी’ असे म्हणतात.

Dr Babasaheb Ambedkar marathi Nibandh-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध
Dr Babasaheb Ambedkar marathi Nibandh, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध Set 3 – Dr Babasaheb Ambedkar Nibandh in Marathi Set 3

भारत हा वीर पुत्रांचा देश आहे. तसा तो विद्वानांचाही देश आहे. १४ एप्रिल १८९१ मध्ये महू’ गावात अशाच एका चमकत्या ताऱ्याचा जन्म झाला. तो तारा म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते. आईच्या नावावरूनच पाळण्यात त्यांचे नाव ‘भीम’असे ठेवण्यात आले.

बाबासाहेबांच्या घरची परिस्थिती खूप गरिबीची असल्यामुळे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कसेबसे पूर्ण झाले. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांची प्रखर बुद्धिमत्ता पाहून त्यांना अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात उच्च शिक्षणासाठी पाठविले. तेथे त्यांनी एम.ए.,पीएच.डी. ही पदवी घेतली. व इंग्लंडला जाऊन कायद्याचा खूप अभ्यास केला.

भारतात आल्यावर पदोपदी अस्पृश्य म्हणून होणारा अपमान, अवहेलना त्यांना सहन होईना. १९२० साली राजर्षी शाहू महाराजांच्या मदतीने ‘मूकनायक’ हे पाक्षिक काढले. १९२७ साली रायगड जिल्ह्यातील महाड येथे अस्पृश्य परिषद भरली होती. तेथे आलेल्या हजारो लोकांच्या साक्षीने महाडच्या चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी पाऊल उचलले.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाल्यावर स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री झाले. ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार’ म्हणून ते ओळखू लागले. त्यांनी अन टचबेल’ हा इंग्रजी ग्रंथ लिहिला. त्याच्या ग्रंथालयात हजारो पुस्तके होती. अशा या महामानवाचा मृत्यू ६ डिसेंबर १९५६ रोजी झाला.

Dr Babasaheb Ambedkar marathi Nibandh-Dr B.R. Ambedkar Essay in Marathi
Dr Babasaheb Ambedkar marathi Nibandh, Dr B.R. Ambedkar Essay in Marathi

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध Set 4 – Dr Babasaheb Ambedkar marathi Nibandh Set 4

[मुद्दे : थोर नेते – जन्म विचारवंत १८९१ – शिक्षण मुंबईत – उच्च शिक्षण परदेशात – अनेक पदव्या-बॅरिस्टर – संस्था काढल्या – नियतकालिके चालवली – शाळा-महाविदयालयांची स्थापना चवदार तळ्याचा सत्याग्रह भारतीय घटनेचे शिल्पकार – बौद्ध धर्मात प्रवेश – ‘भारतरत्न’ ही पदवी प्रदान – १९५६ साली देहावसान.]

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे थोर विचारवंत व महान मानवतावादी नेते होते. त्यांचा जन्म १८९१ साली एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण मुंबईत झाले. उच्च शिक्षणासाठी ते परदेशात गेले. त्यांनी अनेक मोठमोठ्या पदव्या घेतल्या. ते बॅरिस्टरही झाले. नंतर ते मुंबईत प्राध्यापकही झाले.

समाजाच्या सुधारणेसाठी बाबासाहेबांनी अनेक संस्था स्थापन केल्या. त्यांनी नियतकालिके चालवली. समाजात जागृती निर्माण करण्यासाठी त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांनी शाळा व महाविदयालये सुरू केली. १९२७ साली महाडला चवदार तळ्याचा सत्याग्रह केला. त्यांनी भारताची घटना लिहिली. हिंदू धर्मात जातीयता आहे. त्यामुळे अनेकांना गुलामीचे जीवन जगावे लागते. म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धर्मात प्रवेश केला.

बाबासाहेबांना सर्व भारतीय लोक ‘समाजसूर्य’ मानतात. भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ ही पदवी बहाल केली आहे. अशा या महान नेत्याने १९५६ साली या जगाचा निरोप घेतला.

बाबासाहेब आंबेडकर निबंध इन मराठी Set 5 – Dr B.R. Ambedkar Essay in Marathi Set 5

‘सूर्यफुले हातात ठेवणारा फकीर हजारो वर्षांनंतर लाभला, आता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे,’ या शब्दांत कवी नामदेव ढसाळ बाबासाहेब आंबेडकरांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त करतात. कवीने जणू आपल्या शब्दांतून सर्व दलितांचे मनोगतच व्यक्त केले आहे. दलितांना गुलामगिरीच्या बेड्या तोडून ताठ मानेने जगायला बाबासाहेबांनीच शिकवले, म्हणून दलितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परमेश्वरासमानच वाटतात, दलितांच्या वाट्याला आलेली दुःन त्यांनी स्वत: अनुभवली होती, त्यामुटन ने आपल्या ज्ञातिबांधवांना आत्मविकासाचा योग्य मार्ग दाखव शकले.

बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १८ एप्रिल १८९१ गजी महू येथे झाला होता, रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडजवळील आंबवडे है, त्यांचे मूळ गाव, पण त्याच प्राथमिक शिक्षण सातारा येथे आणि माध्यमिक व विश्वविदद्यालयीन शिक्षण मुंबईत झाले, बडोदे सरकारची शिष्यवृत्ती मिळवून ते अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी गेले, अर्थशास्त्रात पीएच्. डी. पदवी प्राप्त केलेल्या आंबेडकरांना नोकरीत कनिष्ट जातीमुळे अनेकदा अपमान सहन करावा लागला, तेव्हाच त्यांनी आपल्या कार्याची दिशा निश्चित केली, पुढे इंग्लंडला जाऊन ते कायदपाचे पदवीधर झाले.

विविध वृत्तपत्रे काढून आणि परिषदा भरवून त्यांनी दलित समाजात जागृती निर्माण केली. ‘शिकवा, चेतवा व संघटित करा’ हे त्यांच्या बहिष्कृत हितकारिणी’ या संस्थेचे ब्रीदवाक्य होते. १९२७ मध्ये दलितांना प्रवेश करण्यास मनाई असणाऱ्या महाडच्या चवदार तळ्यात ते आपल्या जातिबांधवांसह उतरले. १९३० मध्ये त्यांनी नासिक येथील काळराम मंदिरात प्रवेश करण्यासाठी सत्याग्रह केला. सायमन कमिशनपुढे साक्ष देऊन व तीनही गोलमेज परिषदांमध्ये भाग घेऊन त्यांनी दलितांची बाजू सातत्याने मांडली. भारताची राज्यघटना व हिंदू कोड बिल ही डॉ. आंबेडकरांची दोन महान कार्ये होत. आपल्या मृत्यूपूर्वी काही दिवस आधी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. आपल्या थोर नेत्याविषयी बोलताना कवी म्हणतो,

‘तू फुकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर।
तू तोडल्यास गुलामांच्या पायांतल्या बेड्या ।।

डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी Set 6 – Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi Set 6

भिमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव आहे.त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये झाला. विद्यार्थी दशेपासूनच जातीयभेदभाव सहन करीत त्यांनी शिक्षण घेतले. पुढे ते राजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे लंडन येथे शिकायला गेले.

तेथून परत आल्यांनतर राजा छत्रपती शाहू महाराज कोल्हापुर यांनी त्यांना या देशातील दलिताचे उद्धारकर्ते म्हणून पुढे केले आणि खूप मदत केली.

आज समाज त्यांना बाबासाहेब म्हणतो, इंग्रजी राजवट असताना देखील ते मंत्रीमंडळात होते आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ते मंत्रीमंडळात होते.

आपल्या दलित बांधवांच्या व्यथांना व्यक्तकरण्यासाठी त्यांनी मुकनायक, बहिष्कृत भारत आदी दैनिकं चालवली. या अर्थाने ते चांगले पत्रकारही होते. मंत्रीमंडळात होते, या अर्थाने ते चांगले राजकीय नेते होते आणि याच दरम्यान त्यांनी शुद्र पूर्वी कोण होते? अस्पृष्य पूर्वी कोण होते? भारताची फाळणी, कास्ट इन इंडिया, बुद्ध आणि त्यांचा धम्म आदी अनेक पुस्तके देखील लिहिले, या अर्थाने ते चांगले लेखक देखील होते.

त्यांनी लाखोंच्या सभा गाजवल्या, म्हणजे ते उत्तम वक्ते देखील होते. त्यांची विद्वता पाहूनच पुढे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर पंडित जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांनी त्यांच्याकडूनभारताची राज्याघटना लिहून घेतली.

आपल्या देशात आज जी शांतता दिसते आहे, कायद्याचे राज्य दिसत आहे. गरिबांवर अन्याय होवू दिल्या जात नाही तो केवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून दिलेल्या घटनेमुळेच. आज संपूर्ण देशात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांडे सामाजीक न्यायाचे प्रतिक म्हणून पाहिले जाते.

या महामानवाचे महानिर्वाण ६ डिसेंबर १९५६ रोजी मुंबईत झाले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध लेखन मराठी Set 7 – Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi Set 7

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म १४ एप्रिल, १८९१ रोजी मध्य प्रदेशात झाला. त्यांचे वडील सैन्यात सुभेदार म्हणून काम करीत असत. आंबेडकर हे त्यांच्या आईवडिलांचे चौदावे अपत्य होते.

सैन्यातून निवृत्त झाल्यावर त्यांचे वडील सातारा येथे राहावयास आले. आंबेडकर हे जातीने महार म्हणजे अस्पृश्य होते त्यामुळे त्यांना जातपात ह्या विषयावरून खूप त्रास सहन करावा लागला. लहानपणी त्यांना शाळेत शिकण्यासाठी वेगळे बसावे लागे.

परंतु ते बुद्धीने खूप हुशार होते. त्यामुळे ते कष्टांना अजिबात न डगमगता इंग्लंड येथे जाऊन शिकले. तिथे उच्च शिक्षण घेऊन परतल्यावर आंबेडकरांनी दलितांसाठी चळवळ उभारली. दलितांसाठी आणि मागासजातीच्या लोकांसाठी वेगळा मतदारसंघ हवा आणि आरक्षण हवे असे त्यांनी ठामपणे सांगितले.

स्वतंत्र भारताची राज्यघटना निर्माण करण्याचे काम नेहरूंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्याकडे सोपवले. त्यांनी खूप अभ्यास करून भारताची राज्यघटना निर्माण केली म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात.

हिंदू धर्मातील जाचक रूढींना कंटाळून आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांनी दलितांना स्वाभिमानाने जगणे शिकवले. असा तो महामानव होता.

डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी Set 8 – Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi Set 8

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे समतेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाची राज्यघटना तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी खालच्या जातीतील किंवा अस्पृश्यांमधील भेदभाव बेकायदेशीर ठरवला आणि आपल्या देशवासियांमध्ये समानता प्रस्थापित करायची होती. ज्या समाजात मैत्री, समता आणि बंधुता आहे, अशा समाजावर त्यांचा विश्वास असल्याचे ते म्हणाले. मात्र, आपल्या देशासाठी इतकं काम करणाऱ्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सुरुवातीच्या काळात आपल्या जातीबद्दल अनेक अत्याचार सहन करावे लागले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर इतिहास

बाबासाहेब आंबेडकर या नावाने ओळखले जाणारे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यातील महू नावाच्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी सकपाळ होते त्यांनी भारतीय सैन्यात असताना देशाची सेवा केली आणि त्यांच्या चांगल्या कामामुळे ते सैन्यात सुभेदार पदापर्यंत पोहोचले. त्यांच्या आईचे नाव भीमाबाई होते.

सुरुवातीपासूनच रामजींनी आपल्या मुलांना अभ्यासासाठी आणि मेहनतीसाठी प्रोत्साहन दिले, त्यामुळे भीमराव आंबेडकरांना लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती. तथापि, ते महार जातीचे होते, आणि या जातीतील लोकांनाही त्या काळी अस्पृश्य म्हटले जात असे. अस्पृश्य शब्दाचा अर्थ असा होता की, उच्च जातीतील कोणत्याही वस्तूला खालच्या जातीतील लोकांनी स्पर्श केला तर तो अपवित्र समजला जातो आणि उच्च जातीतील लोक त्या वस्तू वापरत नव्हते.

समाजाच्या चुकीच्या विचारसरणीमुळे खालच्या जातीतील मुलेही शिक्षणासाठी शाळेत जाऊ शकत नव्हते. सुदैवाने लष्करात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी सरकारने विशेष शाळा चालवली, त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे प्रारंभिक शिक्षण शक्य झाले. अभ्यासात हुशार असूनही ते त्याच्यासोबत आलेल्या सर्व खालच्या जातीच्या मुलांसह वर्गाबाहेर किंवा वर्गाच्या कोपऱ्यात बसले होते. तेथील शिक्षकांनीही त्यांच्याकडे फारसे लक्ष दिले नाही. या मुलांना पाणी पिण्यासाठी नळालाही हात लावू दिला जात नव्हता. शाळेचा शिपाई दुरूनच हातावर पाणी टाकायचा आणि मग त्यांना प्यायला पाणी यायचे. शिपाई नसताना त्यांना तहान लागली असूनही पाण्याविना अभ्यास करावा लागला.

1894 मध्ये रामजी सकपाळ निवृत्त झाल्यानंतर, त्यांचे संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रात सातारा नावाच्या ठिकाणी गेले, परंतु 2 वर्षानंतरच आंबेडकरांच्या आईचे निधन झाले. यानंतर त्याच्या काकूंनी कठीण परिस्थितीत त्याचा सांभाळ केला. रामजी सकपाळ आणि त्यांच्या पत्नीला 14 मुले होती, त्यापैकी फक्त तीन मुले आणि तीन मुली कठीण परिस्थितीतून जगू शकल्या. आणि त्यांच्या भाऊ आणि बहिणींमध्ये 1897 मध्ये सामाजिक भेदभावाकडे दुर्लक्ष करून पुढील शिक्षण सुरू ठेवणारे भीमराव आंबेडकर हे एकमेव होते.

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे शिक्षण

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईच्या हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि त्या शाळेत प्रवेश घेणारे ते पहिले खालच्या जातीचे विद्यार्थी होते. 1907 मध्ये आंबेडकरांनी हायस्कूलची परीक्षा उत्तीर्ण केली. या यशामुळे त्यांच्या जातीतील लोकांमध्ये आनंदाची लाट पसरली कारण त्यावेळी हायस्कूल उत्तीर्ण होणे ही मोठी गोष्ट होती आणि त्यांच्या समाजातील कोणीतरी ते मिळवणे आश्चर्यकारक होते.

त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1912 मध्ये अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयात पदवी मिळवून अभ्यास क्षेत्रातील सर्व विक्रम मोडीत काढले. 1913 मध्ये ते पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेला गेले आणि तेथे कोलंबिया विद्यापीठातून मध्ये एमए केले, त्याच्या एका संशोधनासाठी पुढील वर्षी 1915 मध्ये त्यांना मध्ये पीएच.डी. मिळाली. 1916 मध्ये त्यांनी Evolution of Provincial Finance in British India हे पुस्तक प्रकाशित केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर 1916 मध्ये त्यांची डॉक्टरेट पदवी घेऊन लंडनला गेले, जिथे त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये कायद्याचा अभ्यास केला आणि अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदवीसाठी प्रवेश घेतला.

मात्र, पुढच्याच वर्षी शिष्यवृत्तीचे पैसे संपल्याने त्यांना शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावे लागले. त्यानंतर ते भारतात आले आणि नोकऱ्या केल्या. 1923 मध्ये लंडनला परत जाऊन त्यांनी आपल्या उरलेल्या पैशाच्या मदतीने संशोधन पूर्ण केले. त्यांना विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान केली. तेव्हापासून त्यांनी आपले उर्वरित आयुष्य समाजसेवेत व्यतीत केले. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला, दलितांच्या सामाजिक स्वातंत्र्यासाठी आणि भारताला स्वतंत्र राष्ट्र बनवण्यासाठी अनेक पुस्तके लिहिली. 1926 मध्ये ते मुंबई विधान परिषदेचे सदस्य झाले. 13 ऑक्टोबर 1935 रोजी आंबेडकरांना शासकीय विधी महाविद्यालयाचे प्राचार्य बनवण्यात आले आणि त्यांनी या पदावर 2 वर्षे काम केले.

डॉ बाबासाहेब आंबेडकर राजकारणी म्हणून उदयास

1936 मध्ये आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली ज्याने नंतर मध्यवर्ती विधानसभा निवडणूक लढवली आणि 15 जागा जिंकल्या. 1941 ते 1945 या काळात त्यांनी ‘थॉट्स इन पाकिस्तान’ सारखी अनेक पुस्तके प्रकाशित केली. या पुस्तकात मुस्लिमांसाठी वेगळा देश निर्माण करण्याच्या मागणीला कडाडून विरोध करण्यात आला होता. आंबेडकरांची भारताची दृष्टी पूर्णपणे वेगळी होती. त्यांना तुटून न पडता संपूर्ण देश पाहायचा होता, म्हणूनच त्यांनी भारताचे तुकडे करू पाहणाऱ्या नेत्यांच्या धोरणांवर जोरदार टीका केली.

15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्यानंतर, डॉ बाबासाहेब आंबेडकर पहिले कायदा मंत्री बनले आणि त्यांची तब्येत बिघडत असतानाही त्यांनी भारताला मजबूत कायदा दिला. त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी त्यांची लिखित राज्यघटना अंमलात आली आणि त्याशिवाय भीमराव आंबेडकर यांच्या विचाराने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली.

शेवटी, राजकीय समस्यांशी संघर्ष करत असताना भीमराव आंबेडकर यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत गेली आणि त्यानंतर ६ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी समाजाची विचारसरणी मोठ्या प्रमाणात बदलली होती, दलित आणि महिलांना त्यांचे हक्क मिळवून दिले.

निष्कर्ष – डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी

डॉ. बी.आर. आंबेडकर यांना बाबासाहेब आंबेडकर या नावानेही ओळखले जाते, ते एक महान राजकारणी आणि न्यायशास्त्रज्ञ होते. त्यांनी आयुष्यभर खूप संघर्ष केला, त्यांनी खालच्या जातीतील लोकांसाठी कायदे लागू केले आणि ते भारतीय राज्यघटनेचे एकमेव मुख्य शिल्पकार होते. आजपर्यंत, त्यांच्या चांगल्या कृत्यांसाठी आणि कल्याणासाठी त्यांचे स्मरण केले जाते.

पुढे वाचा:

डॉ बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी, Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi

FAQ: डॉ बाबासाहेब आंबेडकर

प्रश्न १. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पूर्ण नाव काय आहे?

उत्तर- भीमराव रामजी आंबेडकर.

प्रश्न २. डॉ.बाबासाहेब आंबेडकर विवाहित होते का?

उत्तर- रमाबाई आंबेडकर – 1906-1935, सविता आंबेकर – 1948-1956.

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | Maza Avadta Mahina Shravan Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | Bhartiy Samajat Striyanche Sthan Marathi Nibandh

मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | Marathi Shahityatil Suvarn Kan Nibandh

मना घडवी संस्कार मराठी निबंध

“मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”

भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | Bhartatil Vansanpatti Essay Marathi

भारतीय लोकशाही मराठी निबंध | Bhartiya Lokshahi Marathi Nibandh

Leave a Reply