Ganesh Chaturthi Essay in Marathi : आपण अशा देशात राहतो जिथे सणांचा आपल्याशी जवळचा संबंध असतो. येथे दररोज काही ना काही सण साजरा केला जातो. पहिली गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला विविध संस्कृतींचा संगम पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे दररोज काही ना काही सण असतात. पण यापैकी आपले काही सण जसे की होळी, रक्षाबंधन, दिवाळी, ईद, ख्रिसमस इत्यादी असे आहेत जे आपण सर्वजण देशवासी म्हणून एकत्र साजरे करतो. अशा सणांपैकी एक गणेश चतुर्थी आहे जो आपण मोठ्या उत्साहाने मोठ्या उत्साहाने साजरा करतो.

गणेशोत्सव मराठी निबंध, Ganesh Chaturthi Essay in Marathi
गणेशोत्सव मराठी निबंध, Ganesh Chaturthi Essay in Marathi

गणेश चतुर्थी हा सण भगवान श्री गणेशाची जयंती म्हणून साजरा केला जातो. हा उत्सव सुमारे 11 दिवस चालतो. जरी देशभरात गणेश चतुर्थी साजरी केली जाते, परंतु पश्चिम भारतात हे पाहण्यासारखे असेल. त्यापैकी, विशेषत: मुंबईमध्ये, जिथे या काळात देशभरातील लोकच नव्हे तर परदेशातील लोकही येतात.

यावर्षी गणेश चतुर्थी २०२२ चे आयोजन बुधवार, ३१ ऑगस्ट २०२२ रोजी करण्यात आले आहे. लोक गणेश चतुर्थीच्या उत्सवांमध्ये भाषणे देतात आणि त्याबद्दल बोलतात. या लेखामध्ये आपण गणेश चतुर्थीवरील निबंध वाचू शकता. या निबंधातून आपण गणेश चतुर्थी कधी, कशी आणि का साजरी केली जाते आणि गणेश चतुर्थीचे महत्त्व इत्यादी बद्दल जाणून घेऊ शकता.

Set 1: गणपती उत्सव निबंध मराठी – Ganpati Utsav Nibandh Marathi

भाद्रपद महिन्यातील शुद्ध चतुर्थीला गणेशोत्सव सुरू होतो. त्या दिवशी घरोघर गणेशाच्या म्हणजेच गणपतीच्या मूर्तीची स्थापना करतात. सकाळी व संध्याकाळी गणपतीची पूजा करतात. गणपतीला मोदक प्रिय असतात. म्हणून त्याला मोदकांचा नैवेद्य दाखवतात. या दिवसात घरातील वातावरण प्रसन्न असते.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव हा उत्सव सुरू केला. हा उत्सव दहा दिवसांचा असतो. सभासद घरोघर जाऊन वर्गणी गोळा करतात. गणपतीची मूर्ती आणून तिची सार्वजनिक ठिकाणी स्थापना करतात. मूर्तीभोवती आरास करतात. मोठ्या जोरात संध्याकाळची आरती होते. करमणुकीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

अनंत चतुर्दशीला वाजतगाजत मिरवणुका काढून मूर्तीचे नदीत, विहिरीत किंवा समुद्रात विसर्जन करतात. महाराष्ट्रातील लहानथोर मंडळींचा हा आवडता सण आहे.

Set 2: गणपती उत्सव निबंध मराठी – Ganpati Utsav Nibandh Marathi

‘सुखकर्ता दुःखहर्ता, गजानना श्री गणराया’ अशी सुंदर आरती कानावर पडायला लागली की आठवतो तो गणेशोत्सव । लोकांमध्ये एकजुटीची भावना जागृत व्हावी म्हणून लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला सण म्हणजे गणेशोत्सव होय. आज हा सण अगदी १०-११ दिवसांचा आनंदोत्सवच म्हणावा लागेल.

गणेशचतुर्थीपूर्वीच घर सजविणे, तोरणे बांधणे, वेगवेगळ्या मूर्तीची , पहाणी करून मूर्ती नक्की करणे ही कामे सुरू होतात. एकदा का मूर्ती बसवली की घरात १०-१२ दिवस पूजा-अर्चा, लाडू-मोदक यांचा प्रसाद यांची मजा सुरू होते. याशिवाय अगरबत्तीच्या सुवासाने घर जणू एक मंदिरच आहे असे वाटते.

गणपती ही विद्येची देवता नव्हे तर सर्व भक्तांची संकटे दूर करणारी देवता आहे. गणपतीमुळे त्याचे वाहन असलेला छोटा उंदीर याचेही महत्व वाढते.

अनंतचतुदशीला म्हणजे अकराव्या दिवशी या मूर्तीचे विसर्जन होते. ती मिरवणूक मोठी वाजत गाजत निघते. फटाके फोडत गणरायाचे पाण्यात विसर्जन होते त्यावेळी रस्ते, माणसे गुलालांनी लाले लाल झालेली दिसतात. गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ या शब्दांनी आसमंत घुमून जातो. भक्तगण आपल्या गणरायाला मोठ्या दुःखी अंत:करणाने निरोप देतात.

Set 3: गणपती उत्सव निबंध मराठी – Ganpati Utsav Nibandh Marathi

दर वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून गणपती उत्सव सुरू होतो. सारे हिंदू ह्या दिवशी गणेशाची पूजा करतात. स्वातंत्र्यापूर्वी हा सण घरगुती स्वरूपात साजरा होत असे. परंतु लोकमान्य टिळकांनी ओळखले की लोकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने जर आपण ह्या सणाचे रूपांतर सार्वजनिक उत्सवात केले तर खूप चांगले होईल. तो काळ पारतंत्र्याचा होता. सणाच्या निमित्ताने लोकजागृतीचे काम करता येईल असा हेतू त्या मागे होता.

सुरूवातीच्या काळात तो हेतू साध्यही होत होता कारण स्वतः लोकमान्य टिळक, केळकर, गोखले आणि रानडे ह्यासारखे वक्ते उत्सवाच्या वेळेस भाषणे करीत असत. हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा ह्यांच्यासारख्या गायिका तिथे येऊन मैफिलीत गात असत.

नंतर पुढे स्थानिक कलाकार नाटके, नृत्य बसवू लागले. , वेगवेगळ्या स्पर्धा होऊन स्थानिक मुलामुलींच्या कलागुणांना उत्तेजन मिळू लागले. लोकांची सांस्कृतिक भूक भागू लागली. एकोपाही वाढू लागला.

आता मात्र ह्या उत्सवाला विकृत रूप मिळू लागले आहे. गणपतीच्या प्रचंड मूर्ती, अश्लील गाण्यांचा ढणढणाट, प्रदूषण, रस्ते अडवून घातलेले मंडप ह्या सगळ्या गोष्टींवर बंदी घालून हा उत्सव चांगल्या स्वरूपात सादर झाला पाहिजे.

Set 4: गणेशोत्सव मराठी निबंध – Ganesh Chaturthi Essay in Marathi

गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा अत्यंत महत्वाचा सण आहे. हा हिंदू धर्माचा अत्यंत आवडता सण आहे. हा सण संपूर्ण भारतात मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या सणाच्या आगमनाच्या अनेक दिवस आधी त्याचे सौंदर्य बाजारात दिसू लागते. हा सण हिंदू धर्माचा अत्यंत महत्वाचा आणि अतिशय प्रसिद्ध सण आहे. हा दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा गणपतीचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो जो माता पार्वती आणि भगवान शिव यांचा मुलगा आहे. तो बुद्धी आणि समृद्धीचा देव आहे, म्हणून लोक समृद्धी मिळवण्यासाठी त्याची पूजा करतात.

गणेश चतुर्थी पूर्वी आपण बाजारात गणेश मूर्ती चहुबाजूला पाहतो, बाजारात जत्रा असते, लोक गावातून माल खरेदी करण्यासाठी शहरात येतात. या दिवसांमध्ये सर्व काही खरोखर पाहण्यासारखे आहे, गणेश चतुर्थीचा हा सण 11 दिवसांचा आहे.

भारतात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कार्यालय असो किंवा शाळा-महाविद्यालय, तो सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी सर्व कार्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवून गणपतीची पूजा केली जाते. लोक या उत्सवाची आतुरतेने वाट पाहतात. तो देशातील विविध राज्यांमध्ये साजरा केला जातो, विशेषतः महाराष्ट्रात साजरा केला जातो.

गणेश चतुर्थी हा हिंदूंचा अत्यंत महत्वाचा सण आहे जो दरवर्षी भक्तांकडून मोठ्या तयारीने आणि उत्साहाने साजरा केला जातो. हिंदू मान्यतेनुसार, गणेश चतुर्थी दरवर्षी गणपतीच्या वाढदिवशी साजरी केली जाते. गणेश उत्सव भगवान गणेशाला विघ्नहर्ता या नावानेही संबोधले जाते म्हणजे भक्तांचे सर्व अडथळे दूर करणारे आणि विघ्नहर्ता म्हणजे राक्षसांसाठी त्रास निर्माण करणारा.

गणेश चतुर्थी हा 11 दिवसांचा हिंदू सण आहे जो चतुर्थीच्या दिवशी घरी किंवा मंदिरात मूर्तींच्या स्थापनेपासून सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनाने संपतो. भक्तगण गणपतीला प्रार्थना करतात, विशेषतः मोदक अर्पण करून, भक्तीगीते गाऊन, मंत्रांचे पठण करून, आरती करून आणि त्याच्याकडून बुद्धी आणि समृद्धीचे आशीर्वाद मागतात. हे मंदिर किंवा पंडाल, कुटुंब किंवा एकट्या समुदाय किंवा लोकांच्या गटाने साजरा केला जातो.

गणेश चतुर्थी दरम्यान सकाळी आणि संध्याकाळी गणपतीची आरती केली जाते आणि लाडू आणि मोदकांचा नैवेद्य केला जातो. हा सण बहुतेक महाराष्ट्रात साजरा केला जातो आणि लोक तिथे गणेश चतुर्थी पाहण्यासाठी दुरून येतात.

Set 5: गणेश चतुर्थी मराठी निबंध – Ganesh Chaturthi Essay in Marathi

गणपती ही बुद्धीची देवता आहे तसेच तो विघ्नहर्ताही आहे. त्यामुळे कुठलेही कार्य आरंभ करण्यापूर्वी गणेशाची पूजा केली जाते. त्याशिवाय दर वर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेशचतुर्थी साजरी केली जाते. त्यालाच आपण गणेशोत्सव असे म्हणतो. हा सण साधारणपणे दहा दिवस चालतो. पहिल्या म्हणजे गणेशचतुर्थीच्या दिवशी घरात गणेशमूर्तीची मखरात प्रतिष्ठापना करतात. मग त्याची विधीवत् पूजा करून आरती केली जाते आणि गणरायाला २१ मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. अशा त-हेने दहा दिवस दररोज पूजाअर्चा होते आणि दहाव्या म्हणजेच अनंतचतुर्दशीच्या दिवशी गणेशमूर्तीचे नदीत, तळ्यात, विहिरीत अथवा समुद्रात विसर्जन केले जाते.

पूर्वीच्या काळी गणेशोत्सव हा घरगुती स्तरावर साजरा केला जात असे. परंतु लोकमान्य टिळकांच्या लक्षात आले की आपण हा उत्सव सार्वजनिक स्तरावर केला तर त्यातून समाजाचे उद्बोधन करता येईल आणि इंग्रजांच्या गुलामगिरीत अडकलेल्या भारतीयांचे मानसिक प्रबोधन होईल म्हणून त्यांनी हा उत्सव सार्वजनिक स्तरावर सुरू केला. तो आजतागायत सुरू आहे.

सुरूवातीच्या काळात हिराबाई बडोदेकर, भास्करबुवा बखले अशांसारख्या दिग्गजांचे गायन गणेशोत्सवात होत असे. मोठमोठ्या वक्त्यांची भाषणेही होत असत. कालपरत्वे आता गणपतीपुढील कार्यक्रमांत बदल होत गेला. स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव इथेच मिळतो. त्याशिवाय वेगवेगळ्या स्पर्धांचेही आयोजन केले जाते. लोकांना एकत्र येण्याची संधी मिळते. काही काही गणेश मंडळे सामाजिक उपक्रमही राबवतात ही स्तुत्य बाब आहे.

मध्यंतरीच्या काळात प्लास्टर ऑफ पॅरीसच्या अगडबंब मुर्ती बनवण्याची प्रथा पडली होती. परंतु असे गणपती विसर्जन करताना मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होऊ लागले. म्हणून हल्ली काही लोक शाडूचा गणपती बनवतात. किंवा काहीजण घरातच धातूची वेगळी मूर्ती आणून ठेवतात आणि दर वर्षी तिची प्रतिष्ठापना करतात. त्याशिवाय हल्ली ध्वनिक्षेपक लावून मोठा आवाज करण्याची प्रथा पडली होती. त्या प्रथेला न्यायालयानेच आळा घातला आहे.

गणपतीसारख्या बुद्धीदेवतेची उपासना शांतपणे आणि आदरानेच करायला हवी ना?

Set 6: गणेश चतुर्थी मराठी निबंध – Ganesh Chaturthi Essay in Marathi

महाराष्ट्रात गणेशोत्सव एक महत्त्वाचा उत्सव आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात गणेशचतुर्थी येते व अनंत चतुर्दशीपर्यंत दहा दिवस गणेशोत्सव मोठ्या हर्ष उल्हासाने साजरा करण्यात येतो. गणेशोत्सवाचा शुभारंभ लोकमान्य टिळकांनी राष्ट्रात चैतन्य निर्माण करण्यासाठी केला. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. शिव पार्वती पुत्र गणेशाचे शरीर मनुष्याचे आणि शिर हत्तीचे आहे. गणेशाच्या मूर्ती बसलेल्या अवस्थेत असतात. चित्रेही तशीच असतात. मोठ्या पोटाच्या गणपतीचे वाहन उंदीर’ आहे.

गणपती ही हिंदूंची मुख्य देवता आहे. सर्व प्रकारच्या संकटांचा नाश करणारा तो विघ्नहर्ता आहे. म्हणून कोणत्याही महत्त्वाच्या कार्यापूर्वी, शुभप्रसंगी प्रथम त्याला आवाहन करून त्याची पूजा करण्यात येते. त्याला एकच दात असल्यामुळे एकदंत म्हणतात.

महाराष्ट्रात गणपती-उत्सव फार लोकप्रिय आहे. दहा दिवसांच्या या उत्सवात गणपती मंदिरे सजविली जातात. ठिकठिकाणी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. गणेशापुढे नेत्रदीपक आरास केली जाते. ती पाहण्यासाठी लोकांची गर्दी उसळते. गणपतीपुढे करमणुकीचे कार्यक्रम सादर केले जातात. निरनिराळ्या प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. व्याख्याने आयोजित केली जातात. लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणपती केला तेव्हा त्याचा मूळ उद्देश निद्रिस्त भारताला जागे करणे हा होता. त्यांच्या मते भारतीयांच्या मनात जर असा विश्वास निर्माण केला की, ज्याप्रमाणे गणपती आपल्या सर्व व्यक्तिगत संकटांना दूर करतो त्याप्रमाणे तो भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील संकटांनाही दूर करील आणि आम्ही अवश्य स्वतंत्र होऊ. बऱ्याच अंशी गणेश उत्सव साजरा करण्यामागे असलेला हा हेतू सफलही झाला.

गणेशोत्सवात गणपतीच्या जीवनाशी संबंधित देखाव्यांची शोभायात्रा काढली जाते. उत्सव सुरू अत्यंत श्रद्धेने व दु:खद अंत: करणाने अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीचे विसर्जन केले जाते. यावेळी सजविलेल्या रथांवर गणेशाची मूर्ती ठेवून मिरवणूक काढतात. ढोल, ताशे व लेझिमच्या तालावर लोक बेभान होऊन नाचतात. अशा प्रकारे दहा दिवस जीवनात आस्था, श्रद्धेची ज्योती तेवत ठेवणारा गणेशोत्सव संपतो.

गणेशोत्सव : कालचा व आजचा – मराठी निबंध – Ganesh Chaturthi Essay in Marathi

“गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या” अशा घोषणा देत गणपती बाप्पाचे विसर्जन करताना अंत:करण दु:खी होते. पण का हे सर्व केले जाते. याच्यामागचे कारण कुणीच सांगु शकत नाही. इंग्रजांच्या, मुसलमानांच्या कचाट्यात सापडलेला हिंदू समाज सैरभैर झाला होता. आपले कोण परके कोण, याचा पर्दाफाश, परामर्श होत नव्हता. तेव्हा हिंदूंनी देवतांच्या साक्षीने एकत्र यावे. महत्त्वांचे होते या एकीच्या तत्त्वाने प्रेरीत होऊन लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती हे दोन उत्सव सुरु केले. त्या काळी छोटासा गणपती आणुन गावस्वरुपी सार्वजनिक गणपती बसवला जात असे.

गावातील प्रत्येकजण घरचेच कार्य म्हणून अंग मोडून, झटून काम करत असे. सजावट, गणपती आणणे, विसर्जनात हिरिरीने भाग घेत असे. सकाळ संध्याकाळ आरती, प्रसाद, रात्रीचे कीर्तन, प्रवचन यांचे आयोजन करुन गावातील मुलांना, कलाकारांना त्यांच्या कला जोपासायला वाव मिळत असे. गावातील मुली, स्त्रिया रांगोळी घालणे, देवाला हार बनवणे, घरच्या पंचपक्वानाचा नैवेद्य गणपतीला दाखवणे इ. कामे हौसेने करत. गौरी बसवणे तिचा आदरसत्कार, पाहूणचार करणे यामुळे घरांघरात उत्सवाचे, उत्साहाचे दहा दिवस आनंदाचे असत. भांडणतंटा नाही, मान अपमान नाही त्यामुळे पुर्ण गाव एका कुटूंबाप्रमाणेच दहा दिवसाच्या गणेशोत्सवात वावरत असे. दहा दिवसात दशावतार, छोटी नाटुकली सादर केली जात. मुलांना दहा दिवस कार्यक्रमांची, प्रसादाची चंगळ असे. गावस्वरुपी मंदिराजवळ गणरायाची स्थापना आरतीनंतरचा प्रसाद तयार होई.

करुन घरांघरांतून वर्गणी काढुन गणरायाच्या शेवटच्या दिवशी गावांगावांतील, घराघरातील व्यक्ती मिरवणूकीत सामील होऊन गणरायाचे विसर्जन करुन दु:खी अंत:करणाने नित्याचे कार्यक्रम पार पाडत असत. पण आजकाल सर्वच बाबतीत तंत्रज्ञान प्रगत झाले आहे. छोटासा गणपती महाकाय रुप घेऊन अवतरला आहे. स्पर्धेमूळे गणपतीचा आकार दरवर्षी वाढतच जातो आहे. त्यासाठी खुपशा लोखंडाचा, प्लास्टर ऑफ पॅरीसचा वापर केला जातो. लाखो रुपयांची सजावट केली जाते व शेवटच्या दिवशी या सर्वांचे विसर्जन करताना पोलीस, राखीव दल, होमगार्ड, सार्वजनिक कार्यकर्ते, गाडी चालवणारे या सर्वांच्या नाकी नऊ येते. घरातील, मंडळातील, सोसायटीमधील मिळून गणपतींची संख्या कोटीच्या घरात जाते व त्यांचे विसर्जन कुठे करावे हा प्रश्न निर्माण होतो. शिवाय नऊ दिवस जागरणाच्या, आरतीच्या नावाखाली खुप ठिकाणाहून खंडणीप्रमाणे वर्गणी उकळली जाते तेव्हा अक्षरश: लोकांना लुटले जाते तसेच बिभीत्स अशा कार्यक्रमांसाठी जागरण करुन अश्लील टपोरी वागण्यालाच प्रोत्साहन दिले जाते. त्यामुळे मूळ हेतू बाजूलाच रहातो आणि गणेशोत्सव असावा की नसावा हा प्रश्न पडतो. एकीचे तत्व बाजूला राहून निरनिराळ्या मवाली टोळ्यांची भांडणे, त्यांचा सहभाग झाल्याने देव आहे की नाही हा प्रश्न पडण्याइतपत देवाचे अस्तित्वच प्रश्नांकित रहाते.

गणेशोत्सव मराठी निबंध – Ganesh Chaturthi Essay in Marathi (वर्णनात्मक निबंध)

उद्या गणेशोत्सव म्हणून आजच आम्ही तयारीला लागलो. केवढी उत्सुकता ! आपल्या घरात दहा दिवसांसाठी एक छोटासा पाहूणा येणार म्हणून तयारी चालली होती. टेबलावर दोन्ही बाजूंनी झिरझिरीत पडदे सोडले होते. घुगूरमाळा सोडल्या होत्या. गणपतीला बसवण्यासाठी सुंदर मखराची सजावट केली होती. गणपतीला बसवायला मऊ-मऊ मखमलीचे आसन केले. त्याच्या मुगूटाच्या पाठीमागे विद्यूतप्रवाहाद्वारे सुशोभित कागदांचे सुदर्शन चक्र सतत फिरते ठेवले. असा सर्व देखावा नेत्रदीपक केला. वेगवेगळ्या रंगाचे चकचकीत कागद लावून चकाकत्या झुरमुळया गणपतीच्या दोन्ही बाजूला सोडल्या. मनोरंजनासाठी गणपतींच्या आरत्यांची कॅसेट सतत चालू ठेवली त्यामुळे सर्व घरभर धार्मिक वातावरण तयार केले. अशा प्रकारे आमच्या घरातील छोट्या बाप्पापुढे दृष्याकृती करण्यात आली.

आमच्या ‘वीर अभिमन्यू’ मंडळाचा देखावा पाहून मन प्रफुल्लीत झाले. गणपतीच्या पुढे मोठे पटांगण होते. त्यात पार्टीशन घालून स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी दर्शनार्थ स्वतंत्र सोयी होत्या. गणेशोत्सवाच्या निमित्ताने नाटक, कलापथक, वगनाट्य यांची तयारी ठेवली होती. पहिल्याच दिवशी हळदीकुंकवाचा कार्यक्रम झाला. तसेच स्थानिक भजन यांनी रात्र रंगुन गेली. प्रशांत दामले, विजय कदम या सारख्या दिग्गज कलाकारांचा कार्यक्रम ठेवला होता. मंडळापुढे पुंडलिक आपल्या आईवडिलांना कावडीतुन काशीला घेवून जात आहे असे जिवंत मूर्तीमंत दृष्य दाखविले होते. पुंडलिकाचे मातृपतृप्रेम पाहून प्रेक्षकांपैकी सर्वजण भारावून गेले होते.

दुसऱ्या दृश्यात भगतसिंग, राजगुरु यासारखे थोर देशभक्त हसत हसत फासावर कसे चढले हे दाखविले होते. देशभक्तांची देशावरील प्रेमासाठी असलेली त्यागवृत्ती व देश द्रोह्यांची कृतघ्नपणे देशात होणारी आंदोलने, लुटालूट, जाळपोळ पाहून हृदयात कुठेतरी पाल चुकचूकली.

आमच्या मंडळाचा गणपती ११ दिवसांचा असल्याने सर्व दिवस कार्यक्रमांची रेलचेल होती. निरनिराळे कलाकार आपले कलागुण दाखवत असल्याने त्यांच्या गुणांना वाव मिळत असे. रोज नवनवीन प्रसाद असल्याने बालचमू आरतीच्या कार्यक्रमाला प्रचंड संख्येने वर्गणी लावत असे. कारण जोरजोरात आरत्या म्हणून त्यांनाही गायकी सादर करायला मिळते. सर्व गरीब श्रीमंत एकजुटीने इथे गणरायाची आळवणी करण्यात दंग असतात. इथे उच्च, नीच हा भेद विसरुन एकजूटीने गणेशोत्सव साजरा केला जातो म्हणूनच विषमता नष्ट होण्यास मदत होते. दुसऱ्यांची कुरापत न काढता एकत्र येतात. व आपल्याच घरचे कार्य असल्याप्रमाणे एकजूटीने सर्व कामे पार पाडतात. ११ व्या दिवशी बँडपथक व लेझीमच्या खणखणाटात ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ अशा आरोळ्यांनी परिसर दुमदुमुन निघतो व गणपतीबाप्पाला निरोप दिला जातो. या मिरवणूकीत सर्व आबालवृद्ध सामील होऊन गणरायाचे विसर्जन करतात.

एकीच्या तत्त्वांनी लोकांसाठी लोकमान्यांनी सुरु केलेला हा उत्सव सर्वांना प्रसत्रता देऊन जातो. व लोकांना एकत्र येवून काहीतरी करुन दाखविण्याची संधी मिळते.

अजून वाचा :

नरेंद्र मोदी निबंध मराठी | Narendra Modi Nibandh in Marathi

माझा आवडता महिना श्रावण निबंध मराठी | Maza Avadta Mahina Shravan Nibandh

माझा आवडता खेळ बॅडमिंटन मराठी निबंध | Maza Avadta Khel Badminton Marathi Nibandh

माझा आवडता कवी गोस्वामी तुलसीदास

भारतीय समाजात स्त्रीचे स्थान मराठी निबंध | Bhartiy Samajat Striyanche Sthan Marathi Nibandh

मराठी साहित्यातील सुवर्ण कण मराठी निबंध | Marathi Shahityatil Suvarn Kan Nibandh

मना घडवी संस्कार मराठी निबंध

“मन हरले तर मनुष्य हरतो मन जिंकले तर मनुष्य जिंकतो”

भारतातील वनसंपत्ती मराठी निबंध | Bhartatil Vansanpatti Essay Marathi

भारतीय लोकशाही मराठी निबंध | Bhartiya Lokshahi Marathi Nibandh

Leave a Reply