Mahatma Gandhi Essay in Marathi : मोहनदास करमचंद गांधी ज्यांना ‘राष्ट्रपिता’ म्हणूनही ओळखले जाते, ते एक समाजसुधारक आणि स्वातंत्र्य योद्धे होते ज्यांनी ब्रिटीश राजवटीतून भारताला मुक्त करण्यासाठी कठोर परिश्रम केले. त्यांची श्रद्धा ‘अहिंसा’ च्या तत्त्वांवर आधारित होती. 2 ऑक्टोबर हा गांधी जयंती या नावाने त्यांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो, कारण संपूर्ण देश त्यांच्या प्रयत्नांचा ऋणी आहे. महात्मा गांधी निबंध मराठी या निबंधात आपण त्यांचे योगदान व वारसा पाहू.
महात्मा गांधी निबंध मराठी – Mahatma Gandhi Essay in Marathi
Table of Contents
महात्मा गांधी निबंध मराठी 100 शब्द – Short Essay on Mahatma Gandhi in Marathi
महात्मा गांधी हे आपले राष्ट्रपिता आहेत. त्यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ ह्या दिवशी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्या काळच्या पद्धतीनुसार वयाच्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबा ह्यांच्याशी झाला.
गांधीजींनी लंडनला जाऊन बॅरिस्टरची पदवी घेतली आणि ते दक्षिण आफ्रिकेत वकिलीचा व्यवसाय करायला गेले. तिथे त्यांना काळेगोरे ह्यांच्यातील भेदभावाला सामोरे जावे लागले. तेव्हा त्यांनी सत्याग्रह ह्या अहिंसक मार्गाने त्या अन्यायाविरूद्ध लढा दिला.
ते १९०९ साली भारतात आले तेव्हा भारतातही इंग्रज लोकांची जुलमी सत्ता आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्या सत्तेविरूद्ध लढण्यासाठी सर्वसामान्य भारतीय माणसाला एकत्र करायला हवे होते. ते काम महात्मा गांधींनी केले. त्यासाठी अहिंसा आणि सत्याग्रह हे मार्ग त्यांनी दाखवले. त्यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या धर्मांचे आणि पंथांचे भारतीय लोक आपल्यातील मतभेद विसरून एकत्र आले. म्हणूनच त्यांना महात्मा अशी पदवी लोकांनी उत्स्फुर्तपणे दिली.
स्वातंत्र्य मिळाल्यावर ३० जानेवारी, १९४८ रोजी नवी दिल्ली येथे एका माथेफिरू माणसाने गांधीजींची हत्या केली. ते एक श्रेष्ठ महामानव होते.
महात्मा गांधी निबंध मराठी 150 शब्द – Mahatma Gandhi Essay in Marathi 150 Words
भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी हे संपूर्ण जगाला आदर्श व वंदनीय आहेत. मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म १८६९ साली पोरबंदर येथे झाला. त्यांच्याकडे कोणतेही अधिकारपद नव्हते. पण ते भारताचे महान नेते बनले. भारताला स्वातंत्र्य मिळण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे. जगाने त्यांना ‘महात्मा’ म्हणून गौरवले आहे.
वकिली करण्यासाठी गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले, पण तेथील युरोपियन राज्यकर्ते हिंदी माणसांवर जो अत्याचार करत होते, त्यामुळे गांधीजी बेचैन झाले. त्या देली त्यांनी तेथे अहिंसेच्या मार्गाने सत्याग्रह केला.
तो जगभर गाजला. १९१९ साली जालियनवाला बागेतील हत्याकांडाविरुद्ध त्यांनी आवाज उठवला. त्यांनी भारताच्या स्वातंत्र्याची मागणी केली. त्यासाठी त्यांनी परदेशी मालावर बहिष्कार घालण्याची चळवळ उभारली. १९३० साली त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला. १९४२ साली ‘चले जाव’ ही चळवळ केली. जेथे दुःख असेल तेथे गांधीजी धावले.
महारोग्यांची सेवा केली. ते स्वातंत्र्यासाठी झगडले. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर त्यांनी कोणतेही सत्तेचे पद स्वीकारले नाही. असा हा महात्मा १९४८ साली पंचतत्वात विलीन झाला.
महात्मा गांधी निबंध मराठी 230 शब्द – Mahatma Gandhi Essay in Marathi 230 Words
महात्मा गांधी यांची एका शब्दात ओळख करून दयायची झाली, तर त्यासाठी समर्पक शब्द आहे, ‘महामानव’. गांधीजी स्वत:ला नेहमी ‘एक सामान्य माणूस’ मानत असत. त्यांनी आपल्या हातून घडलेल्या चुका प्रामाणिकपणे कबूल केल्या आणि कोणताही कमीपणा न बाळगता त्या सुधारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. कोणत्याही महान गोष्टीचे मोजमाप करण्यासाठी मानदंड वापरला जातो. मानवतेचे मापन करण्यासाठी वापरला जाणारा मानदंड म्हणजे ‘गांधीजी’ होय.
महात्माजींनी कोणतेही काम करताना मानवजातीचा विचार केला. ते वकिलीचा व्यवसाय करण्यासाठी आफ्रिकेत गेले होते; पण तेथील भारतीयांची दैन्यावस्था पाहून ते त्यांच्यामागे उभे राहिले. तेथील भारतीय जनतेवर जे अमानुष कायदे लादले गेले होते, त्यांच्याविरुद्ध ते खंबीरपणे झगडले.
भारतात परत आल्यावर त्यांनी प्रथम संपूर्ण भारताचा प्रवास केला. सामान्य भारतीय हा अर्धनग्न अवस्थेत वावरतो, अर्धपोटी जगतो हे पाहून ते अस्वस्थ झाले. त्यांनी आपल्या पोशाखात, आपल्या आहारात आमूलाग्र बदल केला. भव्य प्रासादतुल्य बंगल्यात राहण्यापेक्षा भंगी कॉलनीत राहणे, त्यांनी पसंत केले. सर्व लोकांना समाजात समान वागणूक हवी, असे आग्रहपूर्वक सांगणारे महात्माजी कचराकुंडी साफ करण्याचे काम करायला स्वतः सदैव पुढे येत असत. ,
मीठ म्हणजे सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजेचे प्रतीकच! त्या मिठावर बसवलेला. कर त्यांना अन्यायकारक वाटला; म्हणून त्या अन्यायाविरुद्ध झगडण्यासाठी महात्माजींनी ‘दांडी यात्रा’ काढली. महात्माजींनी कधीही कोणत्याही मानसन्मानाची अपेक्षा केली नाही; म्हणून तर भारतात स्वातंत्र्याचा सोहोळा साजरा होत असताना ते नौखालीला दुःखितांचे अश्रू पुसायला गेले होते. सर्व धर्मातील व सर्व जातीजमातींतील जनतेने एकदिलाने राहावे, यासाठी ते जीवनभर झटले. एका प्रार्थनासभेत त्यांची भीषण हत्या झाली. गांधीजी देहाने हयात नाहीत; पण त्यांच्या अलौकिक कार्याने ते अमर झाले आहेत.
महात्मा गांधी निबंध मराठी 250 शब्द – Mahatma Gandhi Essay in Marathi 250 Words
ज्याने जगाला अहिंसेच्या मार्गाने जाण्याची शिकवण दिली, ज्याने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अहिंसात्मक आणि शांततामय मार्गाने लढा दिला, ज्याने हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी आणि त्यांच्यातील तंटे मिटवण्यासाठी उपोषण केले, त्या महान पुरुषाचा म्हणजे महात्माजींचा जन्म भारतात झाला ही गोष्ट भारताला भूषणावह आहे.
महात्मा गांधींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे २ ऑक्टोबर १८६९ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी आणि आईचे नाव पुतळीबाई होते. लहानपणी सारेच त्यांना आवडीने मोहनिया म्हणायचे, लहानपणापासूनच ते सत्यनिष्ठ होते.
गांधीजी हायस्कूलात असताना शाळेची तपासणी घेण्यासाठी अधिकारी आले. त्यांनी मुलांना पाच शब्द लिहायला सांगितले होते. त्यात Kettle हा शब्द होता. तो लिहिताना गांधीजी चुकले होते हे त्यांच्या शिक्षकाच्या लक्षात आल्यावर त्यांनी गांधीजींना शेजारच्या मुलाचे बघून लिहिण्यास सांगितले, पण गांधीजींनी तसे केले नाही. त्यांनी दुसऱ्याची ‘कॉपी’ केली नाही. गांधीजी लहानपणी सामान्य मुलांप्रमाणेच होते वर्गात ढ म्हणून त्यांना चिडवायचे. शाळा सुटल्यावर रस्त्यातून जाताना सुद्धा ते भितभितच घरी जायचे.
वयाच्या तेराव्या वर्षी गांधीजींचे कस्तुरबांशी लग्न झाले. १९८७ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी विलायतेला गेले. ते बॅरिस्टर होऊनच भारतात परत आले. पुढे ते आफ्रिकेत गेले. तेथे त्यांनी भारतीयांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा दिला. सत्याग्रह करून हिंदी लोकांना न्याय, हक्क व सवलती मिळवून दिल्या.
१९२० साली टिळकांचे निधन झाले आणि गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. १९२१ साली त्यांनी पहिला सत्याग्रह केला. १९३० साली असहकार व सविनय कायदेभंग चळवळ हातात घेतली. १९४२ साली त्यांनी इंग्रजांविरुद्ध ‘चले जाव’ ची घोषणा दिली. असत्य, अन्याय व पारतंत्र्य यांच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य समर्पित केले आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.
महात्मा गांधी निबंध मराठी 350 शब्द – Mahatma Gandhi Essay in Marathi 350 Words
सत्य व अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला. त्यांचे कुटुंब सधन होते. वडील करमचंद व माता पुतलीबाई धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या प्रभावामुळे गांधीजी सदाचारी बनले. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबा यांच्याशी झाला. माध्यमिक शिक्षण त्यांनी राजकोट येथे घेतले. पुढे वकिली शिकण्यासाठी ते इंग्लंडला गेले. त्यानंतर ते भारतात परत आले. इथेही त्यांनी वकिली सुरू केली पण त्यात त्यांना यश मिळाले नाही.
इ. स. १८९३ मध्ये एका व्यापाऱ्याचा खटला लढविण्यासाठी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेत गेले. या खटल्यात त्यांना यश मिळाले. त्या काळात गोरे लोक आफ्रिकन लोकांवर अत्याचार करीत होते. गांधीजींनीही याचा अनुभव घेतला. ब्रिटिशांसाठी असलेल्या प्रथम वर्गाच्या डब्यातुन प्रवास करण्यास त्यांना मनाई करण्यात आली. गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेतील जातिभेदाच्या नीतीला विरोध करण्याचा निश्चय केला. इ. स. १९०९ मध्ये ट्रान्सवाल काळा कायदा पास झाला. या कायद्याविरुद्ध त्यांनी प्रखर लढा दिला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होणारे अत्याचार बंद झाले. आफ्रिकेतून परतल्यावर गांधीजींनी भारतीय राजकारणात प्रवेश केला. भारताला स्वतंत्र करण्याचा निश्चय केला. त्यासाठी इंग्रजांविरुद्ध १९१५ मध्ये शेती सुधार आंदोलन, १९२० मध्ये असहकार चळवळ, १९३० मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ, १९४२ मध्ये चले जाव चळवळ अशा अनेक चळवळी करून इंग्रज सरकारला जेरीस आणले.
मीठावर कर लादल्याबद्दल गांधीजींनी सत्याग्रह केला. दांडी येथे मीठ उचलून हा कायदा मोडून काढला. त्यामुळे संपूर्ण देशात चैतन्य निर्माण झाले. भारत छोडो आंदोलनात करोडो भारतीय उतरले. गांधीजींसहित अनेकांना तुरुंगात टाकले. याच काळात त्यांची पत्नी कस्तुरबांचे निधन झाले. परंतु ते आपल्या ध्येयापासून परावृत्त झाले नाहीत. त्यांच्या प्रयत्नामुळे शेवटी १५ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. त्यांनी सत्याग्रह, अहिंसा, व असहकार ही हत्यारे वापरली, ‘हरीजन’ व ‘यंग इंडीया’ ही वृत्तपत्रे सुरु केली.
गांधीजींनी जातिभेद, वाईट रुढी, चालीरीती, अस्पृश्यता नष्ट करण्यावर भर दिला. खादीचा वापर करण्याचे व स्वदेशी वस्तू वापरण्याचे देशाला आवाहन केले. खादी व्यवसायामुळे हजारो बेरोजगार स्त्री पुरुषांना रोजगार मिळाला. गांधीजींनी मुलांना शाळेतच उद्योगांचे शिक्षण दिले पाहिजे असे सांगितले. ज्यामुळे नोकरी नाही मिळाली तरी उद्योग-व्यवयाय करण्याची तयारी राहील. हिंदू-मुस्लिम एकतेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. यामुळेच नथुराम गोडसे नावाच्या एका तरुणाला खूप संताप आला आणि त्याने
३० जानेवारी १९४८ रोजी त्यांची हत्या केली. गांधीजी मुळेच भारताची फाळणी झाली असा आजही कित्येकांचा समज आहे.
दिल्ली येथे राजघाटावर गांधीजींची समाधी आहे. देश विदेशांतील नेत्यांचे ते एक प्रेरणा स्थळ आहे. सत्य आणि अहिंसा या तत्त्वांसाठी ते जगले, लढले आणि अमर झाले.
महात्मा गांधी निबंध मराठी 380 शब्द – Mahatma Gandhi Essay in Marathi 380 Words
परम सत्यवादी अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला. त्यांचे कुटुंब सधन होते. वडील करमचंद व माता पुतलीबाई धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या प्रभावामुळे गांधीजी सदाचारी बनले. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबाशी झाला. माध्यमिक शिक्षण त्यांनी राजकोट येथे घेतले. वकिली शिकण्यासाठी ते इंग्लंडला गेले. त्यानंतर ते भारतात परत आले. इथेही त्यांनी वकिली सुरू केली पण त्यात त्यांना यश मिळाले नाही.
इ. स. १८९३ मध्ये एका व्यापाऱ्याचा खटला लढविण्यासाठी महात्मा गांधी दक्षिण आक्रिकेत गेले. या खटल्यात त्यांना यश मिळाले. त्या काळात गोरे लोक आफ्रिकन लोकांवर अत्याचार करीत होते. गांधीजींनी जातिभेदाच्या नीतीला विरोध करण्याचा निश्चय केला. इ. स. १९०९ मध्ये ट्रान्सवाल काळा कायदा पास झाला. या कायद्याविरुद्ध त्यांनी प्रखर लढा दिला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होणारे अत्याचार बंद झाले. आफ्रिकेतून परतल्यावर गांधीजींनी राजकारणात प्रवेश केला. भारताला स्वतंत्र करण्याचा निश्चय केला. त्यासाठी इंग्रजांविरुद्ध १९१५ मध्ये शेती सुधार आंदोलन, १९२० मध्ये असहकार चळवळ, १९३० मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ, १९४२ मध्ये चले जाव चळवळ अशा अनेक चळवळी करून इंग्रज सरकारला जेरीस आणले. १
पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांनी सक्रिय भाग घेतला. इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्याचे वचन दिले. परंतु युद्ध संपल्यावर अत्याचारांत आणखी वाढ झाली. त्यांनी रौलेट अॅक्ट पास केला. ज्याला भारतीयांनी व्यापक विरोध केला. गांधीजींच्या सभेच्या वेळी जालियनवाला बाग हत्याकांड घडले. किती तरी भारतीय त्यात मारले गेले. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्यसैनिक चिडले व त्यांनी लाहोरच्या काँग्रेस अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली. १३ मार्च १९३० ला गांधीजींनी दांडी यात्रेस प्रारंभ केला. त्यामुळे संपूर्ण देशात चैतन्य निर्माण झाले. भारत छोड़ो आंदोलनात करोड़ो भारतीय उतरले. गांधीजींसहित अनेकांना तुरुंगात टाकले. याच काळात त्यांची पत्नी कस्तुरबांचे निधन झाले. परंतु ते आपल्या ध्येयापासून परावृत्त झाले नाहीत. त्यांच्या प्रयत्नामुळे शेवटी १५ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला.
गांधीजींनी जातिभेद, वाईट रुढी, चालीरीती, अस्पृश्यता नष्ट करण्यावर भर दिला. खादीचा वापर करण्याचे व स्वदेशी वस्तू वापरण्याचे देशाला आवाहन केले. खादी व्यवसायामुळे हजारो बेरोजगार स्त्री पुरुषांना रोजगार मिळाला. गांधीजींनी मुलांना शाळेतच मूलोद्योगांचे शिक्षण दिले पाहिजे असे सांगितले. ज्यामुळे नोकरी नाही मिळाली तरी उद्योगव्यवयाय करण्याची तयारी राहील. हिंदू-मुस्लिम एकतेसाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. गांधीजींचा मुसलमानांकडे असणारा ओढा पाहून नथुराम गोडसे नावाच्या एका तरुणाला खूप संताप आला आणि त्याने ३० जानेवारी १९४८ रोजी त्यांची हत्या केली. गांधीजी मुळेच भारताची फाळणी झाली असा आजही कित्येकांचा समज आहे.
दिल्ली येथे राजघाटावर गांधीजींची समाधी आहे. देश विदेशांतील नेत्यांचे ते एक प्रेरणा स्थळ आहे. सत्य आणि अहिंसा तत्त्वांसाठी ते जगले, लढले आणि अमर झाले.
महात्मा गांधी निबंध मराठी 400 शब्द – Mahatma Gandhi Essay in Marathi 400 Words
मोहनदास करमचंद गांधी ह्यांच्यासारखा महात्मा ह्या जगात खरोखरच होऊन गेला का असा प्रश्नच पुढील पिढ्यांना पडावा एवढे त्यांचे कर्तृत्व दिगंत आहे.
भारताचे राष्ट्रपिता आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते महात्मा गांधी ह्यांचा जन्म २ ऑक्टोबर, १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर ह्या गावी झाला. त्यांचे वडील राजकोट संस्थानाचे दिवाण होते. आईवडील दोघेही धार्मिक वृत्तीचे असल्यामुळे गांधीजींवर सदाचरणाचे संस्कार बालवयापासूनच झाले. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांचा विवाह कस्तुरबांशी लावून देण्यात आला.
गांधीजींचे माध्यमिक शिक्षण राजकोट येथे झाले त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांना इंग्लंडला पाठवण्यात आले. तिथून वकिली शिकून ते भारतात आले. भारतात परतल्यावर त्यांनी वकिली सुरू केली खरी पण ती काही फारशी चालली नाही. मग इस १८९३ मध्ये एका व्यापा-याचा खटला चालवण्यासाठी ते दक्षिण आफ्रिकेला गेले. दक्षिण आफ्रिकेतील गोरे लोक काळ्या लोकांना खूप अपमानास्पदरीतीने वागवत असत. गांधीजींनीही ह्याचा अनुभव घेतला. त्यांच्यापाशी प्रथम वर्गाचे तिकिट असूनही त्यांना त्या डब्यातून प्रवास करण्यास मनाई करण्यात आली. त्यांचे सामान डब्यातून फेकून देण्यात आले. तेव्हा तेथील वर्णभेदाचा सामना करण्यासाठी गांधीजी उभे राहिले. १९०९ साली तिथे ट्रान्सवालचा काळा कायदा संमत झाला. त्याविरूद्ध गांधीजींनी तिथे चळवळ केली आणि त्या चळवळीत यश मिळवले.
त्यानंतर गांधीजी आफ्रिकेतून भारतात परतले आणि त्यांनी भारतीय राजकारणात प्रवेश केला. शेतीसुधार आंदोलन, असहकार चळवळ, सविनय कायदेभंगाची चळवळ आणि सरतेशेवटी ‘चले जाव’ ची चळवळ अशा अनेक चळवळी त्यांनी ब्रिटिश सरकारविरूद्ध उभ्या केल्या आणि त्या सरकारला जेरीस आणले.
जुलमी इंग्रज सरकार मीठासारख्या रोजच्या गरजेच्या वस्तूवरही कर लावत होते. त्याविरूद्ध गांधीजींनी दांडीयात्रा काढली. त्यामुळे संपूर्ण देशात चैतन्य उभारून आले.
ब्रिटिश सरकारने देशी उद्योग बंद पडावेत म्हणून अनेक कारस्थाने केली. त्याला उत्तर म्हणून गांधीजींनी स्वदेशीची हाक दिली. ते स्वतः चरखा चालवून त्यावर सूत कातत असत आणि त्याच सुताचा पंचा नेसत असत. आपल्या देशातील अर्ध्याहून अधिक जनता अर्धवस्त्रात राहात असताना मला पूर्ण वस्त्रे घालण्याचा अधिकार नाही असे त्यांचे म्हणणे होते. ब्रिटिशांच्या दडपशाहीला उत्तर म्हणून गांधीजींनी वापरलेली शस्त्रे होती ती म्हणजे अहिंसा, सत्याग्रह आणि असहकार. त्यासाठी ब्रिटिशांनी त्यांना अनेकवेळा तुरूंगात टाकले परंतु गांधी कधीही खचले नाहीत. त्यांनी सामान्य जनतेत ब्रिटिश सरकारविरूद्ध क्षोभ निर्माण केला.
त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि सम्यक् नेतृत्वामुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. ‘हरिजन’ आणि ‘यंग इंडिया’ ह्या आपल्या वृत्तपत्रांतून गांधीजी आपले विचार व्यक्त करीत असत. त्यांनी खादी आणि स्वदेशीचा अखंड पुरस्कार केला. जातीभेद, अस्पृश्यता आणि हिंदूमुस्लिम भेदभाव नष्ट व्हावा म्हणूनही अथक प्रयत्न केले.
अशा ह्या थोर महात्म्याची नथूराम गोडसे नामक माथेफिरूने ३० जानेवारी, १९४८ रोजी गोळी घालून हत्या केली. परंतु व्यक्ती मेली तरी तिचे विचार मरत नसतात. गांधीजींच्या विचारांच्या माध्यमातून आजही ते आपल्यात आहेत.
महात्मा गांधी निबंध मराठी 650 शब्द – Mahatma Gandhi Essay in Marathi 650 Words
भारतात अनेक थोर व्यक्तींनी जन्म घेतला. परंतु गांधीजी त्या सर्वांपेक्षा अधिक थोर . त्यामागील कारणांचा आपण शोध घेऊ. गांधीजींचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य एव्हरेस्ट शखराप्रमाणे उच्च दर्जाचे आहे. त्यांची तुलना फक्त त्यांच्याशीच होऊ शकत होती. इतर माणसे त्यांच्यासमोर फारच लहान वातात. आदर्शाची ते जिवंत साकार प्रतिमा होते. सत्य, अहिंसा, न्याय, समानता, सेवा, राष्ट्र समर्पणासारख्या आदर्शाचे आणि जीवनमूल्यांचे ते
एक आदर्श उदाहरण होते. हिंसा, स्वार्थ, असत्य, संकुचितपणा, राजकारण, जातिभेद, घृणा, द्वेष, लोभ, लालसेच्या कलियुगातही त्यांनी आपले विचार आणि आदर्श यांचे उच्चांक गाठून मानवतेची कीर्ती वाढविली. या वास्तवतेवर कदाचित येणाऱ्या पिढीचा विश्वासही बसणार नाही. जे असाधारण, असंभव आणि अविसनीय वाटत होते ते सर्व काही गांधीजींनी करून दाखविले. त्यांचे जीवन, आदर्श, उच्च विचार,साधेपणा,खरेपणा युगानुयुगे लोकांना प्रेरणा देत राहील.
त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. त्यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे २ ऑक्टोबर १८६९ मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव पुतलीबाई होते. त्यांचे वडील पोरबंदर संस्थानचे दिवाण होते. आई ईश्वरभक्त, श्रद्धाळू साधी, धार्मिक स्त्री होती. ते जातीने वैश्य. वयाच्या १३ व्या वर्षी गांधीजीचा विवाह कस्तुरबाशी झाला. ते ७ वर्षांचे असताना त्यांच्या कुटुंबाने पोरबंदरहून राजकोटला स्थलांतर केले.
किशोरवयातच गांधीजींनी अहिंसा, ब्रह्मचर्य आणि करुणेचे व्रत घेतले होते. पित्याच्या मृत्यूनंतर कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेले परंतु तेथील दिखाऊ, कृत्रिम जीवनशैली त्यांना अजिबात आवडली नाही. ते भारतात परत आले व वकिली करू लागले. तेव्हाच त्यांना एका दाव्याच्या संदर्भात दक्षिण आफ्रिकेत जावे लागले. तेथे त्यांच्यावर अन्याय करण्यात आला. इंग्रजांनी त्यांना रेल्वेतून अपमान करून उतरविले. कारण गोऱ्या लोकांसाठी असलेल्या प्रथम श्रेणीच्या डब्यात ते बसले होते. त्यांना अनेकदा कारागृहांत टाकण्यात आले व मारहाण करण्यात आली. यामुळे त्यांच्या आदर्शाना आणखी बळ मिळाले व त्यांनी खरा कर्मयोगी बनण्याचा निश्चय केला. ‘गीता’ त्यांचा आदर्श बनली. तिथे असतानाच त्यांनी सत्य, अहिंसेचे व्यवहारात अनेक प्रयोग केले. त्यात सत्याग्रह मुख्य होता.
१९१५ मध्ये ते आफ्रिकेतून भारतात परत आले. अहमदाबादजवळ साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आश्रम स्थापन केला आणि आपल्या आदर्शाचा प्रसार प्रचार त्यांनी सुरू केला. त्यांनी गरीब शेतकरी, गिरणी कामगार, मजूर यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढे दिले व विजय मिळविला. भारतीय स्वातंत्र्य चळवळ तेव्हा चालू होती. गांधीजींनी त्यात भाग घेतला. सत्याग्रह, सविनय कायदेभंग आणि असहकाराचा योग्य उपयोग केला. भारतीय नेते आणि संपूर्ण जनता यांना त्यांनी संघटित केले. त्यांना मार्गदशन केले त्यांच्यावर प्रेम केले. त्याच्या सहकार्यामुळे व प्रेरणेमुळे हजारे लोकांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. संपूर्ण भारतात खादी, स्वदेशी, स्वातंत्र्य, असहकार, परदेशी मालांवर बहिष्कार टाकण्याची जणू लाटच आली.
त्यामुळे इंग्रजांच्या सत्तेचा पाया डळमळू लागला. गांधीजींनी संपूर्ण भारताचा दौरा केला. नेते, गावप्रमुख जनता यांना भेटले आणि आपले विचार त्यांना पटवून दिले. त्यामुळे सगळा भारत त्यांच्या मागे चालू लागला. परिणामी इंग्रजांची दडपशाही आणखीनच वाढली. गांधीजींवर अनेक आरोप करण्यात आले व त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. त्यांच्याबरोबर शेकडो नेत्यांना अटक करण्यात आली. गांधीजी अनेकदा तुरुंगात गेले. अनेक सत्याग्रह केले. दीर्घकाळ उपोषणे केली व जनता संघटित केली.
१२ मार्च १९३० ला गांधीजींनी प्रसिद्ध दांडी यात्रेला प्रारंभ केला जुलमी इंग्रज सरकारला हलवून सोडले. परंतु त्यांच्या मनांत इंग्रज शासकांविरुद्ध तिरस्कार नव्हता. द्वेष नव्हता. ते म्हणत पापाचा तिरस्कार करा पाप्याचा करू नका. त्यांनी ‘यंग इंडिया”हरिजन’ ही वृत्तपत्रे चालविली. या वृत्तपत्रांनी स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा व बळ दिले. काँग्रेस आणि भारताला गांधीजींनीच ‘स्वराज्य’ ही घोषणा दिली. त्यांच्याच नेतृत्वाखाली ‘भारत छोड़ो’ चळवळीची सुरुवात झाली व भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर त्याचा शेवट झाला.
शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला गांधीजींच्या नेतृत्वाखाली देश स्वतंत्र झाला. जनतेने सुटकेचा निश्वास सोडला. परंतु देशाचे दोन तुकडे झाले. जातीय दंगे भडकले. हजारो निरपराध लोक मारले गेले. अब्जावधी रुपयांची संपत्ती नष्ट झाली. हे सर्व पाहून गांधीजींना दु:ख झाले. संपूर्ण शक्तिनिशी ते याला तोंड देण्यास सिद्ध झाले. ज्या ज्या ठिकाणी दंगे झाले त्या त्या ठिकाणी गांधीजी गेले. लोकांची समजूत काढली. त्यांना शांत राहण्यास सांगितले. त्यांना या कार्यात अल्प यश मिळाले परंतु त्यांनी प्राणपणाने यासाठी प्रयत्न केले व नैतिक धैर्याचे एक उदाहरणच जनतेसमोर प्रस्तुत केले. .
दुर्दैवाने ३० जानेवारी १९४८ रोजी प्रार्थनासभेत जात असताना नथुराम गोडसे याने गोळी मारून गांधीजींचा खून केला. मारेकरी हिंदू होता. या दु:खद घटनेमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली. त्यांच्या मृत्यूबरोबरच एका झंझावाती युगाचा अंत झाला. पं. नेहरू आपल्या शोकसंदेशात देशाला उद्देशून म्हणाले, “आमच्या जीवनातील प्रकाश नष्ट झाला. सर्वत्र अंधार पसरला आहे. राष्ट्रपिता आता आमच्यात नाहीत. त्यांना आमची श्रद्धांजली असेल की आपण स्वत:ला सत्य आणि त्या मूल्यांच्या प्रति समर्पित करू ज्याच्यासाठी ते जगले आणि हुतात्मा झाले.”
महात्मा गांधी यांचे योगदान
सर्व प्रथम, महात्मा गांधी एक उल्लेखनीय सार्वजनिक व्यक्ती होती. सामाजिक व राजकीय सुधारणातील त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी या सामाजिक दुष्कर्मांपासून समाजाला मुक्त केले. म्हणूनच, त्याच्या प्रयत्नांमुळे बऱ्याच छळ झालेल्या लोकांना मोठा दिलासा मिळाला. या प्रयत्नांमुळे गांधी एक आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यक्ती बनले. शिवाय, अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये तो चर्चेचा विषय झाला.
महात्मा गांधींनी पर्यावरणीय टिकाव टिकवून ठेवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. सर्वात उल्लेखनीय म्हणजे ते म्हणाले की प्रत्येक व्यक्तीने आपल्या गरजेनुसार सेवन केले पाहिजे. त्याने उपस्थित केलेला मुख्य प्रश्न “एखाद्या व्यक्तीने किती सेवन करावे?” गांधींनी हा प्रश्न नक्कीच पुढे ठेवला.
याउप्पर, गांधींनी टिकाव धरण्याचे हे मॉडेल सध्याच्या भारतामध्ये प्रचंड प्रासंगिक आहे. कारण सध्या भारताची लोकसंख्या खूप जास्त आहे. नूतनीकरणक्षम उर्जा आणि लघु-पाटबंधारे यंत्रणांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. हे गांधीजींच्या अत्यधिक औद्योगिक विकासाविरूद्धच्या मोहिमेमुळे होते.
महात्मा गांधींचे अहिंसेचे तत्वज्ञान बहुधा त्यांचे सर्वात महत्वाचे योगदान आहे. अहिंसेचे हे तत्वज्ञान अहिंसा म्हणून ओळखले जाते. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे, गांधीजींचे ध्येय हिंसाविना स्वातंत्र्य मिळविणे हे होते. चौरी-चौरा घटनेनंतर त्यांनी असहकार आंदोलन सोडण्याचा निर्णय घेतला. चौरी चौरा घटनेतील हिंसाचारामुळे हे घडले. यामुळे या निर्णयामुळे बरेचजण नाराज झाले. तथापि, अहिंसा या तत्त्वज्ञानात गांधी कठोर होते.
धर्मनिरपेक्षता हे गांधींचे आणखी एक योगदान आहे. कोणत्याही धर्माची सत्यांवर मक्तेदारी असू नये असा त्यांचा विश्वास होता. महात्मा गांधींनी वेगवेगळ्या धर्मांमधील मैत्रीला नक्कीच प्रोत्साहन दिले.
महात्मा गांधींचा वारसा
महात्मा गांधींनी जगभरातील अनेक आंतरराष्ट्रीय नेत्यांना प्रभावित केले आहे. त्यांचा संघर्ष नक्कीच नेत्यांसाठी प्रेरणा बनला. मार्टिन ल्यूथर किंग जूनियर, जेम्स बेव्ह आणि जेम्स लॉसन असे नेते आहेत. शिवाय, गांधींनी स्वातंत्र्यलढ्यासाठी नेल्सन मंडेला यांना प्रभावित केले. तसेच, लांझा डेल वॅस्टो हे गांधींसह राहण्यासाठी भारतात आले होते.
संयुक्त राष्ट्रांनी महात्मा गांधींचा मोठा गौरव केला आहे. संयुक्त राष्ट्र संघाने 2 ऑक्टोबरला “आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन” बनविला आहे. शिवाय, बरेच देश 30 जानेवारीला अहिंसा आणि शांतीचा दिवस म्हणून साजरा करतात.
महात्मा गांधी यांना देण्यात येणा्या पुरस्कारांवर चर्चा करण्यासाठी बरेच आहेत. कदाचित काही मोजकेच राष्ट्र बाकी आहेत ज्यांनी महात्मा गांधींना सन्मानित केलेले नाही.
शेवटी, महात्मा गांधी हे आतापर्यंतच्या महान राजकीय चिन्हांपैकी एक होते. सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे भारतीय लोक त्याचे “राष्ट्राचे जनक” असे वर्णन करून आदर करतात. त्याचे नाव नक्कीच सर्व पिढ्यांसाठी अमर राहील.
अजून वाचा: शिवाजी महाराज निबंध
Mahatma Gandhi Essay in Marathi FAQ
Q1. महात्मा गांधींनी असहकार आंदोलन थांबविण्याचा निर्णय का घेतला?
A1. महात्मा गांधींनी असहकार आंदोलन थांबविण्याचा निर्णय घेतला. कुख्यात चौरी-चौरा घटनेमुळे हे घडले. या घटनेत महत्त्वपूर्ण हिंसाचार झाला होता. शिवाय गांधीजी कोणत्याही प्रकारच्या हिंसेच्या विरोधात काटेकोरपणे होते.
Q2. महात्मा गांधींनी प्रभावित केलेल्या दोन नेत्यांचे नाव सांगा?
A1. महात्मा गांधींनी प्रभावित दोन नेते म्हणजे मार्टिन ल्यूथर किंग जूनियर आणि नेल्सन मंडेला.