मत्स्यासन मराठी माहिती – Matsyasana in Marathi

‘‘मत्स्य’’ म्हणजे ‘‘मासा.’’ आसन करतेवेळी आपण माशासारखे पाण्यात पोहतो असे वाटते म्हणून यास मत्स्यासन म्हणतात.

मत्स्यासन मराठी माहिती, Matsyasana in Marathi
मत्स्यासन मराठी माहिती, Matsyasana in Marathi

मत्स्यासन करण्याची पद्धत

 1. चटईवर पद्मासनात बसा.
 2. कोपऱ्याच्या आधाराने पाठीवर सावकाश पडा.
 3. गुडघे जमिनीवर टेकवा.
 4. दोन्ही हात मांडीखाली ठेवा आणि शरीराला आधार द्या.
 5. कंबर वर उचला.
 6. त्याला मानेकडे वळवा.
 7. डोके जमिनीवर टेकवा.
 8. चेहरा मागे ताणून ठेवा आणि छाती वरच्या बाजूस ताणून ठेवा.
 9. उजव्या पायाची बोटे डाव्या हाताने आणि डाव्या पायाची बोटे उजव्या हाताने पकडा.
 10. कोपर जमिनीवर टेकवा.
 11. दीर्घ श्वास घ्या.
 12. पूर्ण शरीर ताणून धरा, कमरेखालील शरीराला पुलाचा आकार द्या.
 13. दोन्ही जबडे दाबून धरून अंतिम स्थितीत या.
 14. शक्य तितका वेळ या स्थितीत थांबा.
 15. पायाची बोटे सोडा.
 16. मांड्या हाताने पकडा.
 17. कंबर आणि पाठ जमिनीवर येऊ द्या.
 18. नंतर कोपराच्या आधाराने उठा.
 19. शवासन करून विश्रांती घ्या.
 20. नेहमी सर्वांगासनानंतर मत्स्यासन करावे.

मत्स्यासन करण्याचे फायदे आणि लाभ

 1. या आसनाच्या सरावाने पाण्यात सहज पोहता येते. या आसनाने मनुष्य पाण्यात बुडू शकत नाही.
 2. आतड्यांतील वायू या आसनामुळे खाली ढकलला जातो.
 3. पोट स्वच्छ होऊन पचनक्रिया वाढण्यास या आसनाची चांगली मदत होते.
 4. आतड्या स्वच्छ आणि बळकट होतात.
 5. मेंदू, मान, फुफ्फुस, नाक आणि कान यांच्या आजारावर हे आसन उपयुक्त आहे. कारण हे मान आणि छातीला ताणून धरते.
 6. श्वासोच्छवासाच्या विकारावर गुणकारी आहे. या आसनामुळे कंठग्रंथी बळकट होऊ शकतात.

मत्स्यासन विडिओ मराठी

अजून वाचा:

Leave a Reply