Set 1: माझा आवडता पक्षी कावळा निबंध मराठी – Maza Avadta Pakshi Kavla Nibandh Marathi

कावळा हा एक उपयोगी रानटी पक्षी आहे. तो हुशार पक्षी आहे. तो झाडावर राहतो. कावळ्याला एक चोच असते. कावळ्याचा रंग काळा असतो. तो मैनेसारखा दिसतो. तो सारखा काव-काव असा ओरडतो. त्याचे ओरडणे लोकांना आवडत नाही. कावळा मासे, धान्य, किडेही खातो. कावळा भात, भाकरीसुद्धा खातो. तो आपले भक्ष्य चोचीनेच पकडतो. कावळा जगात सर्वत्र आढळतो

Set 2: माझा आवडता पक्षी कावळा निबंध मराठी – Maza Avadta Pakshi Kavla Nibandh Marathi

जिथे जिथे माणसांची वस्ती असते तिथे तिथे कावळे असतातच. त्यामुळे कावळा हा पक्षी बालपणापासूनच सर्वांना ठाऊक असतो. छोट्या बाळांना जेवण भरवतानाही ‘ हा घास काऊचा ‘ असे आई म्हणते. काऊचिऊच्या गोष्टींमुळे हा कावळा लहान मुलांना खूपच ओळखीचा होतो.

कावळा रंगाने काळा असून त्याचा आवाजही कर्कश्श असतो. त्यामुळे ब-याच जणांना तो आवडत नाही. पण हा पक्षी निसर्गातील सफाई कामगार आहे. त्याला खायला काहीही चालते.

कावळ्याचा अंडी घालण्याचा मोसम दर वर्षी मार्च ते मे असतो. कावळा- कावळीमधला फरक आपल्याला कळत नाही. कावळे खूप खपून आपले घरटे बांधतात. आपल्या घरट्याजवळून कुणी गेले तर लगेच काव काव करून चोच मारायलाही कमी करीत नाहीत. त्याच घरट्यात कोकिळा आपली अंडी घालते ते मात्र त्याला कळतही नाही.

हिंदू धर्मात कावळा पवित्र मानला आहे कारण मेल्यावर पिंडाला कावळा शिवला की मुक्ती मिळते अशी श्रद्धा असते. तसेच पितृपक्षातही पितर कावळ्याच्या रूपाने येतात अशीही श्रद्धा आहे.

असा हा कावळ्याचा महिमा आहे.

Set 3: माझा आवडता पक्षी कावळा निबंध मराठी – Maza Avadta Pakshi Kavla Nibandh Marathi

कावळा हा पक्षी आपल्याला लहानपणापासूनच माहिती असतो. कारण लहानपणी आई आपल्याला घास भरवताना’ हा घास चिऊचा, हा घास काऊचा’ असं म्हणते. त्याशिवाय छोट्या बाळाला एखादी वस्तू द्यायची नसेल तर ‘ती काऊनं नेली’ असं म्हणायचीही पद्धत आहे. त्यामुळे हा कावळा किंवा काऊ आपल्या चांगल्याच परिचयाचा असतो. शिवाय लहानपणी आपल्याला आई शिकवते,” इथं इथं बस रे काऊ, दाणा खा, पाणी पी आणि बाळाच्या डोक्यावरून भुर्रकन उडून जा.

त्याशिवाय लहानपणी आपण काऊचिऊची गोष्टसुद्धा ऐकलेली असतेच ना, काऊचं घर शेणाचं आणि चिऊचं घर मेणाचं. त्यामुळे हा कावळा लहानपणापासूनच आपल्या चांगल्या ओळखीचा झालेला असतो.

कावळा हा रंगाने काळा असतो, आकाराने मोठा असतो त्यामुळे तो चटकन घरात शिरत नाही. त्याचा आवाजही अगदी कर्कश्श असतो. त्यामुळे कावळे फार कावकाव करू लागले की आपले डोके उठते. एखाद्या ठिकाणी कावळ्यांना काही खायला मिळाले की ते सगळे एकत्र जमून खूप काव काव करतात. त्यामुळेच आपल्याला कडकडून भूक लागली की पोटात कावळे कावकाव करू लागले असे म्हणायची पद्धत पडली असावी. कावळे उरलेसुरले खातात, मेलेल्या उंदीरघुशी खातात, नगरपालिकेच्या कचरा कुंडीवर तेच बसलेले असतात.

त्यांना काय वाट्टेल ते खायला मिळाले तरी चालते त्यामुळे सगळ्या शहरी भागात कावळ्यांची संख्या खूप वाढलेली आहे. डोमकावळे नावाचा कावळ्यांचा एक उपप्रकार आहे. हे कावळे नेहमीच्या कावळ्यांपेक्षा आकाराने किंचित मोठे आणि अधिक काळेकुळकुळीत असतात. ते इतर पक्ष्यांच्या घरट्यात शिरूनत्यांची अंडी खातात. कावळे दर वर्षी एप्रिल मे महिन्याच्या सुमारास घरटे बांधतात.

घरट्यासाठी सगळीकडे लगबग करून कावळे मंडळी ह्याच काळात आपल्याला काटक्या आणि गवत गोळा करताना दिसतात. घरटे बांधण्यासाठी आणि नंतर पिल्लांना चारापाणी आणण्यासाठी नर आणि मादी दोघेही सारखेच कष्ट घेतात. तरीही त्यांची नजर चुकवून कोकिळा त्यांच्या घरट्यात आपली अंडी कशी ठेवते हे एक कोडेच आहे. कोकिळेची पिल्लेही आपली पिल्ले म्हणून कावळे वाढवतात. त्यांचाही रंग काळाच असल्यामुळे हे आपले पिल्लू नाही हे कावळ्यांना कळत नाही. मात्र पिलांना कंठ फुटला की ते कोकिळेचे आहे हे समजते.

पण तोपर्यंत कोकिळेचे काम तर झालेले असते.अशी ही कावळ्याची गंमत आहे.आपल्या हिंदू संस्कृतीत कावळ्याला विशेष महत्व आहे. माणूस मेल्यावर तेराव्या दिवशी त्याच्या पिंडाला कावळा शिवला पाहिजे तर त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या असे मानले जाते. खिडकीत बसून कावळा ओरडला तर पाहुणे येणार असेही समजले जाते.

तर अशा आहेत ह्या कावळ्याच्या गंमतीजमती.

माझा आवडता पक्षी कावळा निबंध मराठी

पुढे वाचा:

Leave a Reply